इ-स्कुटर

एका माहितीतील वयस्कर गृहस्थांना 'वाहन-चालन-परवाना आणि शिरस्त्राण' सक्तीचे नसलेली यांत्रिक किंवा इ - दुचाकी घ्यावयाची आहे. तरी कोणीतरी किंमत, अपेक्षित प्रति कि.मी. इंधनव्यय तसेच अन्य तांत्रिक माहिती तुलनात्मक तक्त्याद्वारे दिली तर उत्तमच.

(तसेच माझ्या व्यक्तिगत उपयोगासाठी 'रेवा' ह्या चारचाकीच्या उपलब्धतेविषयी सुद्धा माहिती कोणी देऊ शकले तर दुधात साखर).

लेखनविषय: दुवे:

Comments

क्षम्यताम

इ-स्कुटर ? क्षम्यताम, अहं न जानामि . :(

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबुराव :)

व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् |

अहं न जानामि |

हा आपला विनय म्हणावा का ? ;)

सक्तीचेच

बहुधा स्वयंचलित वाहन म्हटले की परवाना हा लागतोच. १९८०-८१ च्या सुमारास सायकलला मागून जोडता येईल असे "गोपेड" नावाचे एक ढकलयंत्र आले होते. त्यासाठी परवाना लागत नाही असा तेव्हा दावा होता. परंतु मी एकही प्रत्यक्ष सायकलला जोडलेले यंत्र पाहिले नाही. फक्त चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखवल्या जाणार्‍या जाहिरातींमध्येच ते पाहिले होते (दिलीप धवन- नुक्कडमधले गुरू) हे त्या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम करीत.
हा प्रकार परदेशात मात्र उपलब्ध दिसतो.
http://www.goped.com

शिरस्त्राण हेही बहुधा सक्तीचे असावे.

आपल्या परिचयातील व्यक्तीस असे वाहन का हवे आहे? परवाना काढण्याची कटकट नको म्हणून?

नितिन थत्ते

अवांतर प्रतिसादाला

माझे अवांतर उत्तर येणेप्रमाणे -

माझ्या माहितीप्रमाणे इ-स्कुटरला परवाना (अनुज्ञप्तीपत्र :) ;) ) व शिरस्त्राण हे दोन्ही सक्तीचे नाही. वयस्कर व्यक्तींना प्रा.वा.का. (R.T.O.) मध्ये जाऊन परवाना काढणे त्रासाचे ठरते आणि शिरस्त्राणाने मानेवर ताण येऊ शकतो.

यो बाईक

माझ्याकडे यो बाईक आहे. त्यावेळी २९०००/- ला घेतली होती. मुलगी वापरत होती शाळेत जाण्यासाठी. दोन वर्षे वापरली. नुकतीच तिला डियो घेतली म्हणुन योबाईक चालु अवस्थेत पडुन आहे. तरी त्याला एक्स्चेंच वाल्याने फक्त २५००/- देतो असे सांगितले. कारण गिर्‍हाईक मिळेल याची खात्री नाही.
आमचे मत - यो बाईक ची बॅटरी ८०००/- ची आहे. दोन वर्षानी बॅटरी बदलावी लागते. तसेच पंक्चर झाल्यास काढायला त्रास होतो. टायर ट्युब सहज उपलब्ध नाही. रोज ५० किमि चालवल्यास फायदेशीर आहे.कुरियर वाल्यांना उत्तम आहे. रोज चार्ज करावी लागते. अधिक माहिती यो बाईक च्या संकेतस्थळावर मिळेल.

प्रकाश घाटपांडे

धाव?

एकदा चार्ज करण्याचा खर्च किती? एकदा चार्ज केल्यावर किती धावते? सर्वाधीक वेग किती? चढावर चालवतानाचा अनुभव काय?


कुंपणापर्यंत

चार्जचा खर्च माहिती नाही . पण चार्ज केल्यावर ७० किमि धावते. बॅटरीची ताकद कमी झाल्यावर (दोन वर्षांनी)हे किमि ४० वर येते. वेग ताशी ४० किमि. चढावर ६० किलो पेक्षा अधिक वजनाची व्यक्ती असल्यावर उतरायला लागते.
कालच ही योबाईक आपल घर या विजय फळणीकरांच्या संस्थेला दान केली. संस्थेच्या एका मुलीला एस एन डी टी ला जायला उपयोगी येईल असे फळणीकरांनी सांगितले.
विसुनानांनी आपल घर या विषयी माहिती उपक्रमावर या पुर्वीच दिली आहे इथे ती पहाता येईल. विसुनानांविषयी व उपक्रमाविषयी माहिती फळणीकरांना दिली.

प्रकाश घाटपांडे

अरे वा...

चांगले झाले.
एकुणच इलेक्ट्रीक गाड्या फारशा व्यवहार्य नाहीत असे माझे वैयक्तिक मत आहे. काही ठराविक कारणांसाठी ठिक आहे पण त्या सध्याच्या भरमसाठ पेट्रोल/डिझेल जाळणार्‍या गाड्यांना पर्याय नाही ठरत. असो.


एका भारुडाची आठवण झाली...

दोन वर्षानी बॅटरी बदलावी लागते. तसेच पंक्चर झाल्यास काढायला त्रास होतो. टायर ट्युब सहज उपलब्ध नाही.

काट्याच्या अणिवर वसले तीन गाव, दोन ओसाड तिसरे वसेची ना... दोन आंधळे तिसर्‍या दिसेची ना... दोन थोटे तिसरा चालेची ना...

ही यो पण तशीच दिसत आहे.

__________________________________________________

आणिबाणी जाहीर करुन टाकली आहे. साला कुणाची मस्ती नाय पायजेल! आपल्याला जे वाटेल ते ठेऊ, बाकीचं उडवू! 'हेच नमोगतावर होत होतं तर त्यावर तू कांगावा केलास, आणि तुझ्या स्थळावर झालेलं बरं चालतंय तुला?' अशी एक आगाऊ प्रतिक्रिया आली होती. लगेचच उडवली!

माहिती

बी एस ए कंपनीच्या इ-स्कुटर बद्दल माहिती बी एस ए च्या संकेतस्थळावर मिळेल. नव्या रेवा गाड्या बद्दल माहिती येथे मिळेल.

नवी रेवा
नवी रेवा

माझ्या माहिती प्रमाणे फक्त इलेक्ट्रीक व्हेईकल्स फारशी उपयुक्त नाहीत. त्या ऐवजी हायब्रीड व्हेईकल्स चांगली. भारतात अजुन कोणी हायब्रीड व्हेईकल्स तयार करत नाही अथवा विकत नाही. टोयोटाची हायब्रीड गाडी प्रायस आणि होंडाची हायब्रीड सिव्हिक या गाड्या बर्‍या पैकी लोकप्रिय आहेत.


चांगली माहिती

आणि चांगले दुवे. धन्यवाद.

_______________________________________________
आणिबाणी जाहीर करुन टाकली आहे. साला कुणाची मस्ती नाय पायजेल! आपल्याला जे वाटेल ते ठेऊ, बाकीचं उडवू! 'हेच नमोगतावर होत होतं तर त्यावर तू कांगावा केलास, आणि तुझ्या स्थळावर झालेलं बरं चालतंय तुला?' अशी एक आगाऊ प्रतिक्रिया आली होती. लगेचच उडवली!

हे पहा

येथे रेवा आणि जनरल मोटर्सच्या सहकार्या बाबत एक बातमी आहे. ती पहा.


रेवा

माझा हा ब्लॉग बघावा कदाचित काही उपयुक्त माहिती मिळू शकेल
चन्द्रशेखर

 
^ वर