व्यक्तिचित्र

मुंबईमध्ये हाजीअली जवळ टिपलेलं पोर्ट्रेट! ४०० ए.एस्.ए. फुजी कलर टीपी वापरली आहे. स्कॅन करून संगणकात फोटो-एडिटरमध्ये कृष्ण-धवल रूपांतरण केलं आहे. चेह-यावरील भाव अधोरेखित व्हावे म्हणून इतर भागावर थोडंसं बर्निंग केले आहे.

धन्यवाद!

लेखनविषय: दुवे:

Comments

बेष्ट

छायाचित्रांमधील ओ की ठो कळत नसले तरी सदर चित्र आवडले. यातील व्यक्तीच्या चेहर्‍यावरील भाव तर 'ये सारा जिस्म बोझ से झुककर दोहरा हुवा है, मैं सजदे में नही था, आपको धोखा हुवा है' असेच म्हणतात असे वाटते!
सन्जोप राव
ये सारा जिस्म बोझ से झुककर दोहरा हुवा है
मैं सजदे में नही था, आपको धोखा हुवा है

छान....

पोर्ट्रेट उत्तम आले आहे.....

आपले स्वागत...

मात्र ४०० ए.एस्.ए. फुजी कलर टीपी वापरली आहे हे कळले नाही. ४०० आयएसओ ची फिल्म वापरली आहे का?
कृपया माहिती द्यावी.

-सौरभदा.

==================

झकास

चित्र आवडले. (आणि मनसेचा प्रचार करण्याची युक्तीही)

(हे कसे वाटते)


मस्तच!

सुंदर पोर्ट्रेट. चेहर्‍यावरील सर्व बारकावे, डोळ्यातील भाव सगळे मस्त आले आहे. कृष्णधवल केल्याने आणखीनच परिणामकारक.
उपक्रमावर स्वागत!

आभार

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार!

सौरभदा, मी फुजिक्रोम प्रोव्हिया 400F ही ट्रान्सपरन्सी वापरली होती.

मस्तच

मस्तच आहे. दिवाळी अंकात एखादे तुम्ही काढलेले छायाचित्र असेल अशी आशा करतो :)






सुंदर

सुंदर, अतिशय नॅचरल फोटो
चेहर्‍यावरील सुरकुत्या आणि दाढीचे पांढरे केस यांनी छान परिणाम साधला आहे
चन्द्रशेखर

मस्तच..

सुरेख

चित्र आवडले. पोर्टेट प्रकारात आपला हातखंडा आहे असे आपल्या संकेतस्थळावरची चित्रे पाहून वाटते.

---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?

काबुलिवाला

काबुलिवालामधल्या बलराज साहनीची आठवण झाली. फोटो छान आहे.

आभार

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार! :-)

सुन्दर...

छायाचित्रण कलेमधील फारसे काही समजत नाही. पण भोगलेले जीवन चेह-यावर स्पष्ट दिसते. काही वर्षापूर्वी छायाचित्रण कलेला १०० वर्षे (जर मला योग्य स्मरत असेल तर) झाल्या बद्दल एक दिवाळी अंक (बहुतेक 'अक्षर' चा असावा) आला होता. आपण वाचला असेलच त्या अंकाची आठवण झाली.

फोटो काढण्यासारखा चेहरा अनेकदा झालेले

शहाणे...उंटावरचे

वा

दाढीच्या केसांचे छायावैविध्यसुद्धा छान टिपलेले आहे.

वा!

फोटो आवडला.. अजून येऊ देत

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

चांगलेच आले आहे पोर्ट्रेट!

चेहेर्‍यावरचे रापलेपण आणि मध्यपूर्वेच्या भागातील (अफगाण) फीचर्स अगदी ठसठशीतपणे दिसताएत. ह्या माणसाचे डोळे बदामी-पिंगट असावेत असे वाटते आहे.

चतुरंग

बरोबर

चतुरंग, डोळे तसेच होते. :-)

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार.

वा

वा. निसटले होते हे प्रकाशचित्र नजरेतून!

 
^ वर