उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
तर्कक्रीडा:७२:एकशे दहा नाणी.
यनावाला
September 30, 2009 - 4:51 am
तर्क.७२:
नाण्यांची दोन कोडी अनेकांना ठाऊक आहेत.
एक नऊ नाण्यांचे. त्यांत एकच सदोष. इतरांहून हलके.दोन पारड्यांचा काटा.दोनदाच तुलना.सदोष नाणे शोधा.हे सोपे.
दुसरे बारा नाण्यांचे.त्यांत एकच सदोष.जड/हलके ठाऊक नाही.तीनदाच तुलना.सदोष नाणे शोधा.जड/हलके सांगा.हे अवघड.पण सुटते. उकल योग्य तर्हेने समजावल्यास समजू शकते.
आता प्रस्तुत कोडे:
एकशे दहा(११०) नाणी आहेत.त्यांत एकच नाणे सदोष आहे.उर्वरित सर्व समान वजनांची आहेत. दोन पारड्यांच्या तराजूवर केवळ दोनदाच तुलना करून सदोष नाणे हलके का जड ते ओळखायचे आहे.
तर हे तुम्ही कसे कराल?
.............................................................................
कृपया उत्तर व्य.नि.ने.
.................................................................................
दुवे:
Comments
माझा प्रयत्न
व्य. नी. पाठवला आहे.
तर्क.७२ व्यनि.उत्तर १
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सर्वप्रथम श्री. भाऊराव यांनी हे कोडे सोडवले आणि योग्य विवेचनासह उत्तर पाठवले. धन्यवाद!
व्यनि.उत्तर:२
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. महेश हतोळकर यांनी नाण्यांची दोनदाच तुलना करून सदोष नाणे हलके की जड हे अचूक ओळखले आहे.अभिनंदन!
व्यनि.उत्तरः३
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांनी उत्तर पाठविले आहे. ते बरोबर आहे हे लिहिणे नलगे.
व्यनि.उत्तरे:४ आणि५
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.चिनार आणि श्री.चतुरंग यांनी उत्तरे पाठविली आहेत. दोन्ही उत्तरे बरोबर आहेत.प्रत्येकाची स्पष्टीकरण देण्याची पद्धत भिन्न असली तरी दोन्ही बुद्धीला पटण्यासारख्या आहेत. धन्यवाद!
व्यनि. उत्तरः ६
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.पुण्याचे पेशवे यांचे उत्तर आधी आले होते. पण त्यांची विचार करण्याची पद्धत इतर सर्वांहून भिन्न असल्याने ते तपासायला वेळ लागला. सदोष नाणे जड का हलके हे दोनदाच वजने करून कसे ओळखायचे हे त्यांनी अगदी बरोबर सांगितले आहे.अभिनंदन!
व्यनि. उत्तर :७
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.कर्क यांनी नेमक्या शब्दांत अचूक उत्तर कळविले आहे.धन्यवाद!
एकाच तुलनेत...
एकाच तुलनेत हे करणे बहुधा शक्य आहे असे वाटते. (थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स.)
हिंट येथे.
व्यनि.उत्तरः८
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. आनंद घारे यांनी या कोड्याचे बरोबर उत्तर पाठवले आहे. धन्यवाद!
नऊ नाण्यांचे कोडे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.पुण्याचे पेशवे यांनी तर्क.७२ चे उत्तर पाठवले त्यात"मला पहिली दोन कोडी जमली नाहीत" असे प्रांजळपणे लिहिले आहे. त्यांतील ९ नाण्यांच्या कोड्याचे उत्तर इथे लिहितो.या नऊ नाण्यात एकच हलके आहे.दोन वजनांत ते शोधायचे आहे.
..समजा तीनच नाणी. त्यांत एक हलके आहे. तर एकाच वजनात ते शोधता येईल ना? येईलच. दोन पारड्यांत दोन ठेवली. एक हातात. पारडी समतोल तर हातातले हलके नाहीतर वर गेलेल्या पारड्यातले हलके.
आता नऊ नाणी. समजा प्लॅस्टिकच्या तीन लहान पिशव्या घेतल्या. प्रत्येकीत ३ नाणी ठेवली. तीनातली एकच पिशवी हलकी. मघा सारखीच एका वजनात ती सापडेल. परत त्या तीन नाण्यांतील हलके एका वजनात कळेल. म्हणजे ९ नाण्यांसाठी दोन वजने पुरे. तसेच २७ नाण्यांसाठी ३ दा तर ८१ साठी ४ दाच तोलणे पुरे हे सहज समजते.१२ नाण्यांचे थोडे अवघड आहे. कारण जड/हलके दिलेले नाही. पण तिसरी पायरी अशीच आहे.
धन्यवाद
धन्यवाद यनावालासर,
मला पहीले कोडे थोडा विचार केल्यावर नंतर सुटले. पण १२ नाणेवाले अजून सुटलेले नाही. :( असो. अजून विचार करतो आहे.
-पुण्याचे पेशवे
विनंती
श्री यनावाला, श्री भाऊराव, श्री हतोळकर, श्री धनंजय, श्री चतुरंग, श्री चिनार, श्री पेशवे, श्री कर्क, श्री घारे यापैकी कोणी मला निरोपाने उत्तर कळवाल का? प्लिज..
तर्कक्रीडा:७२: उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्यात सदोष नाणे जड का हलके एव्हढेच ओळखायचे आहे.त्यामुळे ते अनेक प्रकारे सोडविता येते.श्री. चिनार यांनी पुढील प्रमाणे सोडविले आहे.
...............
प्रेषक: चिनार
प्रति: यनावाला
विषय: प्रति: तर्कक्रीडा ७२
दिनांक: गुरू, 10/01/2009 - 18:34
> > माझे उत्तर खालीलप्रमाणे. बघा पटतंय का...
> >
> > प्रथम ११० नाण्यांचे १०८ नाणी आणि २ नाणी असे भाग करा.
> >
> > वजन पहिले :- १०८ नाण्यांचे ५४-५४ नाणी एकेका पारड्यात ठेवून वजन करा. यात २ पर्याय येतील
> >
> > पर्याय १ : दोन्ही पारडी सारखी.
> > याचा अर्थ सर्व १०८ नाणी सारख्या वजनाची असून सदोष नाणे उरलेल्या २ नाण्यांत आहे.
> >
> > पर्याय १ वजन दुसरे : आता १०८ नाण्यांपैकी कुठलीही २ नाणी घेऊन एका पारड्यात टाका आणि प्रथमतः न घेतलेली २ नाणी (ज्याच्यात १ नाणे सदोष आहे) दुसर्या पारड्यात टाका.
> > जर सदोष नाणे असलेले पारडे वर गेले तर सदोष नाणे हलके
> > जर सदोष नाणे असलेले पारडे खाली गेले तर सदोष नाणे जड
> >
> > पर्याय २: ५४-५४ नाणी असलेल्या पारड्यांपैकी १ जड आणि एक हलके. याचा अर्थ सदोष नाणे यापैकी कुठल्यातरी एका पारड्यात आहे. उरलेली २ नाणी सारख्याच वजनाची आहेत.
> >
> > आता या ५४ नाण्यांच्या २ पारड्यांपैकी जड पारड्यामधील नाणी घेऊन त्याचे २७-२७ नाण्यांचे २ भाग करा.
> >
> > पर्याय २ वजन दुसरे : वरीलप्रमाणे केलेल्या २७-२७ नाण्यांचे २ भाग एकेका पारड्यात ठेऊन वजन करा.
> >
> > जर या २७-२७ नाण्यांच्या दोन्ही पारड्यांचे वजन सारखे भरले तर सदोष नाणे प्रथमतः वजन करताना हलके भरलेल्या ५४ नाण्यांमध्ये आहे म्हणून सदोष नाणे हलके.
> > जर या २७-२७ नाण्यांच्या दोन्ही पारड्यांचे वजन वेगळे भरले तर सदोष नाणे याच ५४ नाण्यांमध्ये आहे. ही ५४ नाणी सुरुवातीला जड भरल्यामुळे सदोष नाणे जड.
> >
धन्यु
मी असा विचार खरच् करत होतो. श्री पर्स्पेक्टिव यांची खरडवही पहा. पण मला वाटले की दोन्ही पारड्यात नाणी टाकून एक प्रकारे दोन वजने झाली. मला माहीत नव्हते की असे चालले असते. पण माझा पहिला विचार - सरासरीचा - चुकीचाच होता. चला मार्ग तरी बरोबर होता हे समाधान.