भारतीय क्रिकेट संघाला प्रशिक्षकांचा सल्ला

च्यांपीयन करंडक खेळण्यासाठी परदेशी गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन ह्यांनी एक आगळा वेगळा सल्ला दिला आहे. संघाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आहार, सराव, व्यायाम ह्याबरोबर भरपूर सेक्स ह्यावर त्यांनी भर दिलेला आहे. खेळाडूंनी नियमीत सेक्स केला तर त्यांची ऊर्जा, आक्रमकता आणि स्पर्धात्मकता वाढते असे वैद्यकशास्त्र सांगते. सध्यातरी संघ प्रशिक्षकांच्या ह्या आगळ्यावेगळ्या सल्ल्यामुळे भारतीय संघ चांगलाच चर्चेत आहे.

सेक्स करण्यास काही हरकत नाही पण जोडीदार पटवण्यासाठी खेळाडूंना बार मधे जाऊन रात्री उशीरा पर्यंत मद्यपान करावे लागेल ज्याचा त्यांच्या परफॉर्मन्स वर परिणाम होईल अशी भिती वर्तवली जाते आहे.

उपक्रमींची ह्यावर मते काय ते जाणून घ्यायला आवडेल.

बातमी इथे वाचा

वसंत लिमये

Comments

हाहा - हास्यविनोदात्मक

इंद्रियनिग्रहाने व्यावसायिक कार्यक्षमता वाढते, की लैंगिक अनुभूतीने वाढते, हा मुद्दा उलटसुलट बाजूंनी मोठ्या हिरिरीने सांगितला जातो.

जेथ्वर मी वाचले आहे - म्हणजे याबद्दल एकदोन शोधनिबंध फक्त - क्रीडा स्पर्धांपूर्वी लैंगिक संबध ठेवल्यामुळे क्रीडांगणावरील कामगिरी सुधारतही नाही, आणि बिघडतही नाही.

पण याबाबतीत अंधविश्वासामुळे कोण्या खेळाडूला बरे वाटत असेल, तर आपण काय सांगावे?

प्रतिसादांची लांबी आणि कर्स्टन महाशयांचा सल्ला

प्रतिसादातली आक्रमकता किंवा मवाळपणा, प्रतिसादाची लांबी किंवा आखूडपणा आणि कर्स्टन महाशयांचा सल्ला ह्यात काही संबंध असू शकतो काय? असल्यास नक्की कसा ह्यावर विचार करतो आहे. ह्याशिवायही अनेक प्रश्न आहेत पण तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नवीन

'सेक्स करणे' या नवीन क्रियापदाबद्दल भाषाशुद्धीवाल्यांची मते जाणून घ्यायला आवडेल. :)

---

कर्णकटु वाक्प्रचार

"सेक्स करणे" हा वाक्प्रचार माझ्या कानांना बरा वाटत नाही.

मी बहुधा वापरणार नाही - अनेक इंग्रजी शब्द वापरतो तरी - म्हणजे भाषाशुद्धीचा मुद्दा नाही.

** संभोगणे<----()---->झंवणे
एक टोक अती-शरीरशास्त्रीय आहे, तर दुसरे टोक व्रात्य प्रयोगातले आहे. या दोन टोकांमध्ये मराठीत अनेक शब्द आहेत, (संबंध ठेवणे, कोणाशी झोपणे, शरीरसुख घेणे). हे सर्व शब्द कित्येक संदर्भछटा आणि अर्थछटा व्यापतात. थोड्याशा खालच्या आवाजात का होईना, यांच्यापैकी काही शब्द सभ्य ठिकाणी बोलता येतात.
.
इतके असून सकाळमधील स्तंभलेखकाला आपली खास अर्थछटा सांगण्यास मराठीचे दारिद्र्य जाणवले, याबद्दल वाईट वाटते. आणि नेमकी कुठली अर्थच्छटा मिळवली? "सेक्स करणे" म्हणजे कुठल्या विशिष्ट सामाजिक परिस्थितीत (बारमध्ये इंग्रजी बोलत एकमेकांना पटवून) शरीरसंबंध ठेवणे, अशी विशेष अर्थच्छटा आहे काय? पुढील शब्दकोशकारांसाठी लक्ष देण्यासारखा मुद्दा आहे.
**

रोचक विरोधाभास

हा शब्दप्रयोग केवळ सकाळच नव्हे तर मटामध्येही अनेकदा दिसला आहे. ज्याबद्दल आपल्या देशात कामसूत्र लिहीले गेले त्यासाठी लोकांना परकीय शब्द जवळचा वाटावा हा विरोधाभास रोचक आहे. इंग्रजीत सेक्स हा शब्द बर्‍याच अर्थांनी वापरला जातो. सेक्सी हे विशेषणही रूढ आहे. यामुळे कदाचित सेक्स म्हणणे सोईचे जात असावे.एकूणात मराठीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे हे मात्र खरे.

---

सेक्स् करणे

लेखकाने "नियमित सेक्स् करणे" च्या ऐवजी "नियमित समागम करणे" किंवा "नियमित मैथुनकरणे" या सारखे शब्दप्रयोग करायला हरकत नव्हती. हे शब्दप्रयोग नेहमीच्या बोलीभाषेतले नाहीत ; परंतु कर्स्टन यांचा संदर्भसुद्धा नेहमीच्या संभाषणातला नाही. एका प्रशिक्षकाने दिलेला उपदेश आणि त्या उपदेशाबद्दलची ती बातमी आहे. त्यामुळे प्रस्तुत संदर्भात भाषेचा बोज राखला जायला हवा.

सहवास करणे

लेखकाने "नियमित सेक्स् करणे" च्या ऐवजी "नियमित समागम करणे" किंवा "नियमित मैथुनकरणे" या सारखे शब्दप्रयोग करायला हरकत नव्हती.

नेमाने सहवास करणे जरा अधिक सभ्य. पण 'सेक्स करणे' हा वाक्प्रचार अगदी मजेदार आहे. त्यातला पंच कुठेच नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नियमित मैथुनकरणे

'मैथुन' ह्याचा अर्थ माझ्यामते 'इज्याक्युलेशन' असा आहे. त्यामूळे मैथुन हे सेक्स ही क्रीया केल्याशिवायही घडू शकते. भाषा आणि वैद्यकशास्त्रातील तज्ञांनी अधिक प्रकाश पाडावा.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

मैथुन म्हणजे (दोघांनी) परस्पर करायचे कार्य

मिथः म्हणजे (दोघे) परस्पर. मिथुन म्हणजे जोडी.
**(हा उपयोग राशिचक्रातील एका राशीच्या बाबतीत अजून दिसतो. गेल्या काही दशकांमध्ये एक मुलाचे नाव म्हणूनही "मिथुन" लोकप्रिय आहे. परंतु विशेषनामांचा अर्थ "विशिष्ट मनुष्य" असा असतो, सामान्य शब्दार्थ फार विचारात घ्यायचा नसतो. नाहीतर माझ्या "धनंजय" नावावरून "धन जिंकलेला" वगैरे अर्थ काढला तर तो निश्चितच खोटा आहे.)**

मैथुन म्हणजे दोघांनी परस्पर करण्याचे कार्य. रूढीने हे फक्त लैंगिक संबंधालाच लागू आहे. लाक्षणिक अर्थाने आता कुठल्याही लैंगिक व्यवहाराला लागू होते - कृती एक व्यक्तीच करत असेल तरीही.

इंग्रजीमधील "इजॅक्युलेशन" साठी "रेत सरणे" हा शब्द मराठीत उपलब्ध आहे. मैथुनक्रियेमध्ये रेत सरले नाही तरी ते मैथुनच राहाते.

वृथा घृतेंवीण भोजन । वृथा वंध्येचें मैथुन ।
वृथा भावेंवीण भजन । सत्य जाण उद्धवा ॥८२॥
(एकनाथी भागवत ११वा अध्याय)

.

सेक्स घेणे

माझा एक मित्र 'सेक्स घेणे' असा शब्दप्रयोग वापरत असे. कॉफी घ्यावी किंवा बीअर घ्यावी असा तो प्रयोग बराच मजेशीर वाटला होता.
सन्जोप राव
ये सारा जिस्म बोझ से झुककर दोहरा हुवा है
मैं सजदे में नही था, आपको धोखा हुवा है

प्रा. डॉ. गॅरी कर्स्टन

कर्स्टन मास्तर आता वैद्यकीय सल्लेही देऊ लागले की काय?

मात्र त्यांच्या सल्ल्याशी सहमत आहे. शंकर पाटलांच्या कथेतला बाप पोराला नापास केल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना जे स्पष्टीकरण देतो तेच इथे लागू पडेल. (एका खेळात पटाईत असलेला खेळाडू दुसरा खेळही चांगलाच खेळणार.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रशिकक्षांचा सल्ला-

खरोखर आगळा वेगळा आहे, यात शंकाच नाही! पण तो देण्यात एवढा उशीर? सल्ल्यामुळे भारतीय संघ नक्की चर्चेतच नाही,तर फॉर्मातही राहील.

हा हा हा..

हा हा हा..
कर्स्टनसाहेबांचा नक्की 'धंदा' काय आहे? ;)

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

शब्दछल

इंटरनेट सर्फिंग करणे, इमेल चेक करणे, ह्यासारखाच सेक्स करणे हा शब्द देखिल मला सोयीचा वाटतो.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

कर्स्टन मास्तर असे म्हणालेच नाहीत

वसंतरावांनी वर दिलेले वाक्य हे कर्स्टनमास्तरांचे नाही हे स्वतः मास्तरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे वाक्य खुद्द मास्तरांनी म्हटले आहे असे म्हणायला वाव नाही असे मला वाटते.

वर चाललेली चर्चा क्रिकेट किंवा मास्तरांवर नाही. संपादकांनी कृपया कर्स्टन मास्तरांच्या तोंडी दिलेले हे चुकीचे वाक्य बदलावे अशी मी जाहीर विनंती करतो.

आपला
(कर्स्टनभक्त) आजानुकर्ण सिंग धोनी


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हम्म...

वसंतराव 'वर देतात' त्यातील कायकाय येथील संपादक बदलत रहाणार आहेत? उपक्रमपंतांना आता केवळ ह्या कामासाठीच एक संपादक नेमावा लागणार की काय, असे वाटू लागले आहे.

कर्स्टन मास्तर

"कर्स्टन मास्तर हे क्रिकेटतत्ववादी आहेत, त्यामुळे क्रिकेटत्वाचे महत्व सिद्ध करण्यासाठी, ते अथवा त्यांचे समर्थक काय म्हणू शकतील हेच यातून समजते. अर्थात त्यांनी म्हणले काय अथवा त्यांच्या समर्थकांनी तसे त्यांच्या नावाने छापले काय एकूण यातून जे समजायचे ते समजतेच," असे जर कुणाला वाटत असेल तर आश्चर्य नको... ;)

संदर्भ आणि पुरावा नसताना एखाद्या ऐतिहासीक व्यक्तीचे वाक्य जसे उर्धृत करू नये तसेच जेंव्हा जिवंत व्यक्ती एखादे वाक्य जाहीरपणे नाकारते तेंव्हा देखील ते वाक्य त्या व्यक्तीचे म्हणून ठेवू नये असेच वाटते..,

,

अरे बापरे ...काल प्रतिसाद लिहीलेला ... कुठे दिसत नाही तो ?
असं काय अक्षेपार्ह लिहीलेलं की साधा प्रतिसादही उडाला ?

असो !!

- टारझन

 
^ वर