अर्थक्रांती

अर्थक्रांती उपक्रमातून श्री अनिल बोकिल यांनी काही छान संकल्पना मांडल्या आहेत, आणि त्या फार आकर्षक वाटतात. परंतू भारतातील पुर्ण आर्थिक व्यवस्था या प्रकारे बदलायची असेल तर त्या साठी आपली व्यवस्था सक्षम आणि तयार आहे का हे बघणे फार जरुरी आहे. तसेच ह्या बदलांमुळे निर्माण होण्याऱ्या परिणामांचा आणि नविन challenges चा विचारही जरुरी आहे. परंतू ह्या लेखाचा उद्देश अर्थक्रांतीच्या संकल्पनेला विरोधाचा नसून अधिक foolproof बनवण्यासाठी काय काय करता येईल हे बघण्याचा आहे. कृपया हे लक्षात घ्या की मी कोणी आर्थिक तज्ञ नाही, त्या मुळे अधीक जाणकार लोकांची मदत मिळाली तर पाहिजेच आहे.
मी या लेखाचे दोन विभाग केले आहेत .
पूर्वतयारी
परिणाम

पूर्वतयारी

  • गावा गावात पोहोचलेली उत्कृष्ठ बॅंकिंग प्रणाली, यात बॅंकांचे संगणकीकरण फार महत्वाचे आहे
  • उत्कृष्ठ टेलिफोन नेटवर्क जे भारतातील कोणत्याही कानाकोपऱ्यात २४x ७ x ३६५ उपलब्ध असेल
  • लोकांचा बॅंकेवर विश्वास.
  • लोकशिक्षण
  • अशिक्षित लोकांची फसवणूक होऊ नये या साठी control system

परिणाम

  • भ्रष्टाचाराला आळा (+ चांगली गोष्ट)
  • सर्व कर रद्द झाल्यास वस्तू आणि सेवा यांच्या किमती सुमारे ५० ते ७० % नी कमी होऊ शकतात. (तुम्हाला हे पटते आहे का?) , तसे झाल्यास भारताची निर्यात फार कमी वेळात कित्येक पटींनी वाढू शकते
  • वस्तूंच्या किमती कमी झाल्यास अप्रत्यक्षपणे त्याचा अर्थ असा होईल का, की एका रात्रीत पगारदार वर्गाचा पगार सुमारे ३० ते ५० % नी वाढेल.
  • ५० रुपयांवरील सर्व चलनी नोटा रद्द केल्यास आणि काळ्या पैशावरील शिक्षा रद्द केल्यास अर्थव्यवस्थेत अचानक जो प्रचंड पैसा जमा होइल त्याचा चलनफुगवट्यावर (वाढेल?) आणि व्याजदरावरील (कमी होईल?) परिणाम
  • महसूल (आयकर, विक्रीकर, अबकारी, जकात आणि तत्सम अनेक) खात्यातील अगणित (केंद्र, राज्य, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था) सरकारी नोकरांचे करायचे काय? (हा एक सामाजिक प्रश्न होऊ शकतो)

अर्थशास्त्र हा खुप गुंतागुंतीचा विषय आहे आणि या प्रपोझल साठी खुप पुर्वतयारी लागेल आणि याचे अनेक चांगले वाईट परिणाम असतील आणि यातून अनेक नविन प्रश्न तयार होतील पण हे माझे सुरवातीचे काही विचार.

Comments

शंकास्पद

कल्पनेच्या नंदनवनातील विहार?

या सर्व गोष्टी करणे योग्य असे बहुतेक सार्‍या टेक्स्टबुकांत लिहिलेले असतेच. त्या एकाचवेळी सर्व अंमलात आणणे शक्य वाटत नाही. त्यामुळे त्या अंमलात आणण्याचा क्रम (प्राधान्यक्रम) निश्चित करावा लागेल.

साईटवर पाहिलेल्या गोष्टींतून फार काही हाती लागले नाही. परंतु कर रद्द करावे असे म्हटलेले नसून वेगवेगळे कर रद्द करून एकच कर असावा असे काहीसे म्हटले आहे. तेव्हा एकूण करांची रक्कम तेवढीच असावी. तेव्हा वस्तूंच्या किंमती कमी होतील या म्हणण्याला काही अर्थ नाही.

जमा होणार्‍या करापैकी मोठा भाग >६०-७०% (?) कर गोळा करण्याच्या सिस्टिमवर खर्च होतो असा काहीसा समज दिसतो. तो कितपत खरा आहे याचा काही विदा दिसला नाही. मला तरी तो समज चुकीचा वाटतो. कर गोळाकरण्याचा खर्च २०-२५ % पेक्षा जास्त नसेल असे वाटते.

कररचनेत एक्विटी असावी असे तत्त्व सांगितले आहे. त्यानुसार ज्याची कर देण्याची ऐपत आहे त्याच्याकडून कर घ्यावा असे तत्त्व आहे. अप्रत्यक्ष कर जास्त असल्याने हे तत्त्व न पाळले जाता सर्वांकडून कर घेतला जातो असे म्हटले आहे. हे खरेच आहे पण कर गोळाकरण्याची जी पद्धत सुचविली आहे (बँकेत पैसे जमा झाले की कर लागू) त्यातही या इक्विटीच्या तत्त्वाची पायमल्लीच होणार आहे.

एकुणात 'कल्पनेच्या नंदनवनातील विहार'च वाटतो आहे.

नितिन थत्ते

अर्थक्रांती-

विचार खूप चांगले आहेत.परंतु मनांत आणले तर भ्रष्टाचारकर्तेच अर्थक्रान्ती घडवून आणू शकतील ,असे खेदाने म्हणावे लागते.त्यांचेच नेटवर्क लवकर दूरवर पसरते.

काही प्रश्न

अर्थक्रांती उपक्रम काय आहे? तसेच श्री अनिल बोकिल हे कोण आहेत? त्यांचे लेखन आंतरजालावर उपलब्ध आहे काय?
पूर्वतयारी म्हणून दाखविलेल्या गोष्टी केल्यास परिणाम म्हणून दाखवलेले बदल घडतील असे काही काय?

.

.

हि घ्या लिंक

http://arthakranti.org/ ह्या वर अर्थक्रांती प्रतीष्ठानची सर्व प्रपोझल्स आहेत.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत

धन्यवाद

दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. पण पुढील प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही: पूर्वतयारी म्हणून दाखविलेल्या गोष्टी केल्यास परिणाम म्हणून दाखवलेले बदल घडतील असे काही काय?

स्पष्टीकरण

इथे पूर्वतयारी हा शब्द मला वाटते की चुकिचा वापरला आहे . मला इंफ्रास्ट्रक्चर रीक्वायर्ड असे म्हणायचे होते . उद्देश हा आहे की, हे प्रपोझल इंप्लीमेंट करायचे असेल तर आपल्याकडे तसे इंफ्रास्ट्रक्चर आहे का?
या प्रपोझल मधे सांगीतलेले फायदे खरच होतील का हा मला वटते की अर्थशास्त्र तज्ञांनी विचार केलेला बरा. त्या दृष्टीने पण मी काही प्रश्न मांडले आहेत.

तुषार

विश्वजालावरील मराठी जग

..पण आधि मानसिकता बदलली जाण्याची वाट बघावी लागेल.

कल्पना खरचं चांगली आहे. पण तीची अंमलबजावणी कशी करणार? जनतेची मानसिकता बदलणार कशी? हे संकेतस्थळावर लिहीलेले आढळले नाही.
५०० व १००० रुपयाच्या नोटा छापण्याची कल्पना सरकारला कोणी व कशी दिली? ती सरकारने कशी लगेच स्विकारली? हे व असे प्रश्न उरतातच.
आमच्या कंपनीमध्ये परराज्यातील मंडळीदेखील आहेत. त्यांच्याच कडून कळलेल्या माहितीनुसार ओरिसा, आसाम, बिहार, झारखंड येथे गरीब व गरजू व्यक्ती घरकामासाठी सहज मिळते. ते चाकरी करताना अक्शरशः गुलाम होवूनच चाकरी करतात. फक्त दोन वेळचे जेवण, वर्शातून दोन-तीनदा कपडा-लत्ता व बिडीकाडी साठी कधीतरी थोडे पैसे दिले कि ते त्यात धन्यता मानतात. जे चाकरी करून घेतात, ते देखील स्वस्तामध्ये नोकर मिळाला म्हणून सुखात जगतात. त्या गुलामांची बँकेत खाती कोण उघडणार? का उघडणार?
श्री. अनिल बोकिल यांनी महाराष्ट्र व सुधारलेली राज्ये यांना डोळ्यासमोर ठेवून हि कल्पना मांडलेली आहे. आर्थिकदृष्ट्या मागसलेल्या राज्यांची, व तेथील जनतेची मानसिकता देखील मागासलेली आहे, ती कशी बदलणार? बंगाली माणूस तर आर्थिक व्यवहारांमध्ये सगळ्यात चिकट असतो, असे ऐकून आहे.

 
^ वर