छायाचित्र : रोषणाई

कितीही वेळा गेले तरी शिकागो शहराची रोषणाई नेहमीच भुलवुन टाकते. न्युयॉर्कच्या तुलनेत शिकागोतील उत्तुंग इमारती आधुनिक असल्याने जास्त सुंदर दिसतात. स्थापत्य शास्त्रातल्यापोस्ट मॉडर्न कंटेक्शुऍलीज ह्या तंत्राचा वापर करुन् बांधलेल्या इमारती नुसत्या बाहेरुन पाहाण्यात संपूर्ण दिवस सहज घालवू शकतो.

इथे दिलेले छायाचित्र हे 'जॉन हॅनकॉक' नावाच्या इमारतीच्या ९५व्या मजल्यावर असलेल्या बार मधून घेतलेले आहे. ही इमारत उंचीमधे शिकागोमधील ४ नंबरची इमारत असली तरी ह्याच्या खिडक्यांमधून पहिल्या दोन क्रमांकाच्या टोलेजंग इमारती पाहायला मिळतात आणी त्यामूळे खूपच सुंदर देखावा दिसतो. चित्रात दिसणारी दोन शिंगेवाली इमारत म्हणजे अमेरिकेतली सर्वात उंच इमारत 'सिअर्स टॉवर' (नुकतेच बदलेले नाव विलीस टॉवर) तर त्याच्य शेजारी असणारी एकच शिंग (लाल दिवा) असणारी इमारत म्हणजे ट्रम्प टॉवर (उंची मधे क्रमांक २)

जॉन हॅनकॉक इमारतीचे आणखी एक वैशीष्ट्य म्हणजे इतकी मोठी इमारत पूर्णपणे बिनखांबी आहे. इमारतीच्या बाहेरुन पोलादाच्या पट्ट्या वापरुन इमारत तोलून धरली आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

कठिण आहे

या चित्रात शहरभरात आगी लागल्या आहेत असे वाटते. मी काढलेली चित्रेही अशीच येतात. हा भाव दाखवायचा असेल तर हे ठीकच आहे.

पण मला कधीकधी शहर शांतपणे झगमगते आहे, ही भावना प्रत्यक्षात उत्पन्न होते. ती भावना मात्र चित्रात उतरवण्यात मी आजपर्यंत अयशस्वी झालेलो आहे. याबद्दल मार्गदर्शन मिळाले तर हवे आहे. (बहुधा गडद लाल काच लावून - किंवा गडद निळी काच लावून कृष्णधवल प्रकाशचित्र पकडायला पाहिजे...)

चित्राची मांडणी तर (नेहमीप्रमाणे) छानच आहे.

आगी

हाहा..शहरभरात आगी लागल्या आहेत हे वर्णन मस्तच वाटले. खरोखर तसे वाटतही आहे. पण इतक्या मोठ्या शहराचा बर्ड्स् आय व्ह्यू मधून फोटो काढल्यावर लाखो दिव्यांचा झगमगाट असाच दिसणार आणि तीच तर त्याची गंमत आहे असे मला वाटते.

ह्याउलट बोटीत बसुन लेक मिशिगन मधे काही अंतरावर जाऊन लांबुन नुसती स्कायलाईन पकडली तर शांतपणे झगमगणारे शहरही दाखवता येईल. त्याची मजा वेगळी.

आगच!

खरोखर आगच लागल्यासारखी दिसते आहे!

यात किती उजेड गरजेचा आणि किती दिखावू? किती कोटी डॉलर्स या आगीत जळत आहेत? पृथ्वीचे वातावरण किती तापत आहे?
'पृथ्वीसाठी एक तास' वगैरे मोहिमेची आठवण झाली.
केवळ एक तास दिवे बंद करून काय साधेल?

झगमगाट

शिकागो शहराचा झगमगाट पाहून डोळे दिपले अगदी!!
खरंच असंच दिसतं की छायाचित्र तसं आलंय?? धनंजयराव म्हणतात तसं शहरभरात आगी लागल्या आहेत असं वाटतंय... :D

:(

धनंजयशी सहमत आहे. मी हॅनकॉक टॉवरमधून साधारण याच वेळी शिकागो पाहिलं आहे. नुसत्या डोळ्यांना दिसणारा सुंदर झगमगाट क्यामेरा मात्र टिपू शकत नाहि असे वाटले.
यावेळी फोटो तितकासा आवडला नाहि (अर्थात तुलना तुमच्याच छायाचित्रांशी आमच्याशी केली तर हे चित्र ग्रेटच आहे :) )

जाहिरातः अस्मादिकांनी सिअर्स टॉवरवरून काढलेला हॅनकॉक टॉवरचा फोटो (हो तोच तो लांबचा काळा टॉवर) :)

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

छान!!

छानच फोटो.

-- येडा बांटू

छान

मस्त


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मस्त

छायाचित्र उत्तम आले आहे. येडा बांटूंनी काढलेल्या या छायाचित्राची आठवण आली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आवडले आणि नाहीही

धनंजय आणि ऋषिकेशसारखेच म्हणतो. चित्रातून काय दाखवायचे आहे हे महत्वाचे आहे असे वाटते. आगी लागल्याचा भास होतो आहे असेही वाटते. बहुतेक सर्व हॉलीवूड ऍक्शनपटांमध्ये शहराचा असा पॅनोरामिक व्ह्यू देणारा एकतरी शॉट असतोच. आणि मग काहीतरी होऊन शहर उध्वस्त होते.
नुकत्याच आलेल्या हॅनकॉक चित्रपटाचा आणि या चित्रातील हॅनकॉक इमारतीचा काही संबंध आहे का? चित्रपटाच्या नायकाचे नावही जॉन हॅनकॉक आहे.

---

नाही आवडले....

चित्र खरेच आग लागलेल्या शहरासारखे दिसत आहे. उकळत्या लाव्हारसाने भरलेले रस्ते!
मला तर सुरुवातीला ही काहीतरी संगणकी करामत असल्याचे वाटले होते. स्मिता१ म्हणतात त्याप्रमाणे खरे वाटले नाही.
ए़कूणात अस्वस्थ करणारे चित्र आहे. दिव्यांचा झगमगाट आहेच पण खूपच अती झाले आहे. रात्रीच्या वेळी येथे एक तरी तारा, चांदण्या दिसत असतील का नाही याची शंकाच आहे.
दोन शिंगेवाल्या इमारतीच्या डावीकडच्या इमारतीच्या वरचा तप्त, पिवळा गोल लक्षवेधक आहे. तिथे खरेच आगीचा डोंब उसळल्यासारखे वाटते. शिवाय चित्राच्या डाव्या कडेला असलेला रस्ताही तसाच!

-सौरभ.

==================

'फँटॅस्टिक'

ह्या प्रकाशचित्राला हात लावला तर चटका बसेल असे वाटले. एखाद्या विज्ञानकथेत घेऊन गेले. 'फँटॅस्टिक'.

इथे दिलेले छायाचित्र हे 'जॉन हॅनकॉक' नावाच्या इमारतीच्या ९५व्या मजल्यावर असलेल्या बार मधून घेतलेले आहे.

असे होय. नक्की कुणाला चढली होती? फोटोग्राफराला की कॅमेऱ्याला?

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

हाहाहा!

असे होय. नक्की कुणाला चढली होती? फोटोग्राफराला की कॅमेऱ्याला?

हाहाहा! ९५व्या मजले चढूनही (फोटो काढेपर्यंत तरी)दोघांनाही चढली नव्हती. ;)

छान

सुरेख चित्र. आवडले.
खूप मोठी दिवाळी असल्यासारखे वाटले.

अवांतर -जॉन हँकॉक टॉवरबद्दल - अजून त्याही इमारतीचा फोटो द्यायला हवा.

अधिक अवांतर - इमारतीच्या आतल्या बाजूला एकही खांब नाही असे म्हणायचे आहे का? पोलादी पट्ट्या ज्याला म्हटले आहे, ते कदाचित बिल्ट अप सेक्शन्स असावेत, त्यांची चपटी बाजू बाहेरच्या बाजूस दिसेल असे लावलेले. अर्थात हा माझा अंदाज आहे.

जबरी

आग ही आग! बघीतल्यावर ओसामा म्हणेल अमेरिका इज हेल!

>यात किती उजेड गरजेचा आणि किती दिखावू? किती कोटी डॉलर्स या आगीत जळत आहेत? पृथ्वीचे वातावरण किती तापत आहे?
विसुनानांशी सहमत. वरुण, शिकागोच्या पर्यावरणविषयक नियतकालीकात दे हे चित्र.

 
^ वर