छायाचित्र् (आणि संपादित् छायाचित्र) टीका

परवा ग्रिफिथ ऑब्झर्व्हेटरी नावाच्या एका जागेवरून लॉस अँजलिस डाऊनटाऊनचा फोटो काढला. त्या फोटोवरून मला ही कल्पना सुचली. मूळ फोटो आणि संपादित केलेला फोटो खाली देत आहे. संपादनासाठी जिंप ही मुक्तस्रोत प्रणाली वापरली आहे. कृपया आपले अभिप्राय कळवावेत.

मूळ छायाचित्र -

मूळ चित्र

संपादित केलेले चित्र (अंतराळयानाचे चित्र जालावरून साभार) -

संपादित छायाचित्र

- माठवि

लेखनविषय: दुवे:

Comments

वा वा वा!

मा.ठ. विद्यार्थी! छान जमले आहे.
आपल्या छायाचित्रांचे स्वागत आहे.
टर्मिनेटरच्या चौथ्या भागाचे प्रसिद्धी चित्र म्हणून खपून जाईल असे वाटते. :-)
शुभेच्छा!

-सौरभ.

==================

मुळ छायाचित्र जास्त आवडले

मुळ छायाचित्र जास्त आवडले. फक्त त्यावर एकप्रकारचा भुर्‍या रंगाचा लेयर वाटतो.. चित्र काचेतून काढले आहे बहुतेक.

संपादित चित्रात ती भुरी छटा / लेयर / अनावश्यक (परावर्तित?) प्रकाश काढला आहे ते योग्य वटले -आवडले.. मात्र मला वैयक्तीकरित्या संपादन करताना शहरावर हल्ला करून शहर बेचिराक करायला आलेली याने असे विध्वंसक संपादन खटकले :) यात अर्थातच चित्र संपादन करणार्‍याचा दोष नसून माझी व्यक्तीगत नावड आहे तेव्हा असो. :)

अवांतरः त्यापेक्षा शहरावर अंथरलेले आकाश, पुर्ण चंद्र अगदिच हवा तर धुमकेतु वगैरे टाकून जास्त सुंदर करता आले असते का?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

हेझ

मूळ फोटोमधील हेझ कदाचित ओव्हर एक्स्पोज केल्यामुळे आलेली असू शकेल. मूळ फोटोचं एक्स्पोजर २० सेकंद आहे. बाकी परग्रहावरचे जीव, हल्ला वगैरे ते जरा माझ्या फँटसी आवडणार्‍या डोक्याचा परिणाम म्हणावा लागेल.

(लैच विंग्रजी झालं नाय का?)

गमतीदार

येथे फोटोशॉप/गिंप तज्ज्ञ आणखी रसग्रहण करू शकतील.

मूळ चित्र काढताना अनावरण १० सेकंद सुद्धा करून बघितले होते का?

अवांतर : लॉस ऍन्जलेसचे प्रसिद्ध प्रदूषण क्षितिजावर दिसते आहे.

अनावृतकाल

अनावरण १० सेकंद ठेवले असता शहरातले लखलखणारे दिवे तितकेसे आकर्षक वाटत नाहीत. साधारण १० सेकंदाच्यापुढे अनावृतकाल ठेवल्यासच त्यातली मजा छायाचित्रात पकडली जातेय असं मला वाटलं. शिवाय लॉस अँजलिसच्या त्या प्रसिद्ध प्रदूषणाचा मला संपादन करताना लैच फायदा झाला. आकाशाचा काँट्रास्ट बदलल्यानंतर काळा-पिवळा असा चित्रात दिसणारा ग्रेडियंट मला आयताच मिळाला. किंबहुना मी ह्या छायाचित्राच्या काँट्रास्ट आणि लेव्हल्सशी जिंपमधे खेळत असतानाच त्यातून असे काही होऊ शकेल अशी कल्पना माझ्या डोक्यात आली. मुळात या चित्राचा पायाच त्या कल्पनेशी इतका जुळल्यामुळे नंतर आवश्यक् ते बदल करणं खूप सोपं गेलं. उदा. जणू लागलेल्या आगीच्या धुरामुळे पिवळसर-धुरकट दिसणारी पार्श्वभूमी, आकाशातले किंचित रंगीत ग्रेडियंट असलेले ढग हे फक्त 'डिफरन्स क्लाऊड्स' वापरून मिळालं. त्यामानाने या चित्रात संपादन फारसं काहीच नाहीये. मी फक्त जिंपमधे १२ लेयर्स वापरलेत (३ अंतराळयानांचे, ४ विजांचे, ४ उल्कांसाठी आणि १ मूळ चित्राचा). व्यावसायिक छायाचित्र संपादनात ४०-४० लेयर्स वापरलेले मी पाहिले आहेत. मुख्य मेहेनत अंतराळयानं नीट दिसणे (कृत्रिम चिकटवल्यासारखी न वाटणे), विजा नीट दिसणे, वीज पडलेल्या ठिकाणी आग नीट दिसणे आणि चित्राचं एकंदर हायलायटिंग या गोष्टींवर घ्यावी लागली. बाकीच्या गोष्टी तशा सोप्या गेल्या. असो.

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

- माठवि

स्टीवन स्पीलबर्ग

स्टीवन स्पीलबर्गकडे एखादी वेकेन्सी आहे का याची पटकन चौकशी करून टाका बघू.

प्रयोग चांगला आहे. करत रहा.

इंडीपेंडन्स डे

छायाचित्र पाहून 'इंडीपेंडन्स डे' चित्रपट आठवला. पृथ्वीवर एलियन्सचा हल्ला होतो आणि अमेरिकन प्रेशिडेंट जिवाची छाती करून जगाला वाचवतो असा काहीसा विनोदी चित्रपट होता. नाही म्हणायला विल स्मिथ हा एक दिलासा होता.
छान प्रयत्न. पुछाशु.

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

मस्त!

एकदम झक्कास जमलाय प्रयोग!
विजा जिथे जमिनीवर धडकतायत त्या जागेवरचा इफेक्टसुध्दा मस्त आलाय!

सही!

http://bspujari.googlepages.com/

 
^ वर