शब्दच्छल

पुणेरी पर्याय या मूळ चर्चेतील काही प्रतिसाद येथे हलवण्यात येत आहेत. शाब्दिक शंका, शब्दच्छल यांवर यापुढे येथे चर्चा करता येईल. धन्यवाद!

लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

एक शंका

'कायदेआझम'चा 'कायद्या'शी फारसा ('फारशी' नव्हे!) संबंध नसावा, नाही का?

फारशीतज्ज्ञांनी कृपया खुलासा करावा.

(की 'काइद' करतो तो 'कायदा', असे काही आहे?)


"If you can't stand the heat, get out of the kitchen." - Harry S. Truman?

काइद म्हणजे नेता

'कायदेआझम'चा 'कायद्या'शी फारसा ('फारशी' नव्हे!) संबंध नसावा, नाही का?
नाहीच. काइद म्हणजे अध्वर्यू, नेता. बॅ. जिना आणि कायद्याचा संबंध असला तरी कायेदमंडळाचा आणि कायदेआझम ह्यांचा काडीचाही संबंध नाही.

खुलासा:
मला फारशीचे फारसे ज्ञान नाही. पण काही चांगले फारशीतज्ज्ञ नक्कीच माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

आभार / काइद, कायदा, कायदेआझम वगैरे / काही शंका

खुलाशाबद्दल आभार.

'काइद' म्हणजे नेता (आणि म्हणूनच 'काइद-ए-आझम' म्हणजे थोर नेता - 'मुग़ल-ए-आझम'प्रमाणे) याबद्दल कल्पना होती. (हा शब्द मूळ फारशी की अरबी याबद्दल मात्र नक्की माहिती नाही. फारशी असावा असे का कोणास ठाऊक पण वाटते, पण खात्री नाही.) त्यामुळे कायदेमंडळाचा आणि कायदेआझमचा काहीही संबंध नसावा हा अंदाज होताच, आता या खुलाशाने खात्री पटली.

अवांतरः 'कायदा' हा रूढ शब्द 'यावनी' (म्हणजे पुन्हा फारशी की अरबी याबद्दल मला निश्चित खात्री नाही.) अतएव त्याज्य म्हणून त्याऐवजी 'विधी' हा संस्कृतोद्भव शब्द (आणि त्याचप्रमाणे 'कायदेमंडळा'ऐवजी 'विधीमंडळ' वगैरे त्याची derivatives वगैरे) अधिकृतरीत्या रूढ करण्यात आला. (अतिअवांतरः यात आणि इतरत्र दिलेल्या पाकिस्तानातील उदाहरणातील 'खुदा हाफि़ज़' बाद करून त्याऐवजी 'अल्लाह हाफि़ज़' अधिकृतरीत्या रूढ करण्यात मला व्यक्तिशः अर्थाअर्थी फारसा फरक जाणवत नाही. परंतु हे माझे व्यक्तिगत मत म्हणून सोडून देऊ. प्रत्येकालाच एकएक असते, वगैरे वगैरे. तर ते एक असो.) तर यावरून मला काही शंका आहेत.

१. एखाद्या (कायदेमंडळाचा सदस्य असलेल्या व्यक्तीने) 'कायदेमंडळात जाऊन कायदा केला' म्हणण्याऐवजी 'विधीमंडळात जाऊन विधी केला' म्हणणे उचित ठरावे काय?
२. सकाळीसकाळी संमत झालेल्या कायद्यास 'प्रातर्विधी' म्हणून संबोधावे काय?

असो.


"If you can't stand the heat, get out of the kitchen." - Harry S. Truman?

यावनी

सहमत.
यावनी शब्द काढून टाकण्याचा अत्ताहास इतका वाढला की अनेक सामान्य उपयोगातले शब्द घालवून नवे शब्द आणले गेले.
सरकारी = शासकीय
छापखाना = मुद्रणालय
कचेरी = कार्यालय
फौलाद = इस्पात (हा शब्द कधी पूर्वी अस्तित्वात तरी होता की नाही याबद्दल शंका आहे)
(नंतर अजून एका लाटेत यावनी पटकथाकार - डॉ राही मासूम रझा - यांनी संस्कृतप्रचूर हिंदी रूढ केले. त्यात राह देखना ऐवजी प्रतीक्षा करना वगैरे शब्द रूढ झाले).

नितिन थत्ते

शब्दांचा छळ

यावनी शब्द काढून टाकण्याचा अत्ताहास इतका वाढला की अनेक सामान्य उपयोगातले शब्द घालवून नवे शब्द आणले गेले.

अरेरे! अशा अनेक रूढ शब्दांचा छळ अशाप्रकारे झाला असावा असे वाटते.

शब्दांचा छळ = शब्दच्छल(?) ;-)

आणि दिवस संपता..

आणि दिवस किंवा अधिवेशन संपतासंपता संमत केलेल्या कायद्याला अन्त्यविधी? आणि अधिवेशनात जर विधी पसार होत असतील तर त्याला विधिवेशन का म्हणू नये? --वाचक्नवी

यावनी शब्द घालवले?

यावनी शब्द काढून टाकण्याचा अत्ताहास इतका वाढला की अनेक सामान्य उपयोगातले शब्द घालवून नवे शब्द आणले गेले.

सरकारी अध्यादेशाने असे शब्द घालवता येत नाहीत. जुने शब्द सोपे असल्याने ते तर राहिलेच, पण नवीन शब्द मिळाले. नवीन शब्दांचा उपयोग वाढला याचे कारण ते संस्कृत आहेत हे नसून त्यांच्यापासून प्रत्यय लावून व समास करून नवे शब्द निर्माण करता येतात म्हणून. प्रेस, छाप, छापील आणि छापखाना यांची जागा मुद्रा, मुद्रित आणि मुद्रणालयाने पूर्णपणे घेतली नाही. छापाचा गणपती, प्रसन्‍न मुद्रा, शिवाजीची मुद्रा, छापील साड्या, छाप पाडणे, शिळा प्रेस यांतील शब्द बदलून चालेल?
मामलेदार कचेरीला कुणी कार्यालय म्हणते? आणि मंगल कार्यालयाला मंगल कचेरी? बरे, मंगल कार्यलयाच्या कार्यालयाला कचेरीची कचेरी? मायबाप सरकारला मायबाप शासन? आणि स्वत:च्या गृहिणीला राणीशासन?
प्रतीक्षालय, प्रतीक्षानगर, प्रतीक्षाकरी, रांगेत उभे राहून केलेली प्रतीक्षा या ठिकांणी राह चालेल? एका भाषेतील दोन शब्द तंतोतंत एकाच अर्थाचे असण्याची शक्यता अगदी कमी असते यावर मागे उपक्रमावर चर्चा झाली होती ,तिचा निष्कर्ष हाच होता.
खास टीप: इस्पात पूर्वी असेलही, पण त्याचे लिखाण स्पात असेल. उत्तरी भारतीयांना उच्चारता यावा म्हणून इस्पात केला.---वाचक्‍नवी

स्पात-इस्पात

स्पात हा शब्द इसवीसनाच्या दहाव्या शतका पूर्वी खरोखरीच वापरला जात होता का?
जाणकारांनी खुलासा करावा.
(पोलादी पुरूषाचा इस्पाती पुरुष न बनता 'लोहपुरुष' बनला म्हणून आपली शंका)

सावरकरांच्या एका पुस्तकात 'कायदा' या शब्दाला 'निर्बंध' हा शब्द त्यांनी सुचवला होता आणि त्याचे काही पाने भरून विवेचन केले होते. त्यात निर्बंध शब्द कसा चपखल आहे आणि आता कायदा हा 'परकीय' शब्द वापरण्याची कशी गरज नाही हे सांगितले होते. हे लक्षात ठेवले म्हणजे विविध शब्द बदलले जाण्यामागची 'प्रेरणा' कोणती हे लक्षात येते.
सध्या सावरकरांनी सुचवलेला निर्बंध न वापरता (कागदोपत्री) अधिनियम हा शब्द वापरात आहे. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र कायदा हाच शब्द वापरात आहे.

नितिन थत्ते

शिवाजी आणि भाषा'शुद्धी'

शिवाजी महाराजांनीही राज्यकारभाराशी संबंधित व्यवहारात फारसीचा वापर कमी करुन तिथे संस्कृत भाषेतील शब्द रूढ करायचा प्रयत्न केला. उदा. त्यांची राजमुद्रा. ह्यामागची 'प्रेरणा' सावरकरांशी मिळती जुळती होती का?

वा!

श्री. वाचक्नवींचे असे प्रतिसाद मला नेहमीच आवडतात. आपलीच भाषा आपणच नकळत किती नजाकतीने वापरतो हे ते इतक्या सहजपणे दाखवून देतात की मी चकित होतो

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

 
^ वर