मदत पाहीजे - मराठी शब्द कृपा / पृथ्वी

मी उबंटु ९.०४ वापरतो. त्यावर एस् सी आय एम वापरून मी मराठी लिहितो, परंतु कृपा / पृथ्वी सारखे शब्द लिहिताना ते 'प्रु' असे लिहीले जातात. कोणाला काही माहीती?

Comments

ऋकार्

शिफ्ट आणि आर् असे टाईप करा. किंवा कॅपिटल आर्. व पुढे उकार. म्हणजे तो ऋकार होईल .

दुर्दैवाने

इनस्क्रिप्ट वगळता इतर कोणत्याही टंकलेखनपद्धतीत देवनागरीसाठी प्रमाणित कळयोजना नाही. त्यामुळे इनस्क्रिप्ट टंकलेखन शिकणे हेच सर्वात योग्य. एकदा इनस्क्रिप्ट शिकलात की फायरफॉक्सचे इंडिक इनपुट एक्टेंशन किंवा एससीआयएम मधील इनस्क्रिप्ट पर्याय वापरुन हवे ते शब्द लिहिता येतील.

बाय द वे, ९.१० टाकून पाहा (अल्फा-४ आवृत्ती उपलब्ध आहे). फार सुंदर आहे. ९.०४ मधील फ्लॅशबाबतच्या अडचणी दूर झाल्या आहेत आणि दिसायलाही सुबक आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बराह

मी बराह वापरतो . सर्व शब्द सुलभतेने लिहता येतात. आण जरूर वापरून बघा.
शरद

बरहा वापरता येत नाही

लिनक्समध्ये बरहा वापरणे अवघड आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर