उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
पुणेरी पर्याय?
प्रभाकर नानावटी
August 23, 2009 - 5:37 am
स्वाइन फ्लू, वाह्तुकीच्या समस्या, वायू प्रदूषण, साठलेल्ल्या व न उचललेल्या कचर्यापासून होणारा धोका इत्यादीसाठी पुणेकरांनी शोधलेला पर्याय!
दुवे:
Comments
पुणे?
यातील पुण्याचा संदर्भ कळला नाही. चित्रातील व्यक्ती नक्कीच पुण्यातल्या वाटत नाहीत.
फक्त पुण्यासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी हे व्यंगचित्र योग्य वाटते.
----
उत्तम व्यंगचित्र
थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्याचा उगम तंबाखु वा पान या सवयीत दिसतो. अन्य देशात थुंकायची काय प्रथा आहेत ते माहीत नाही. आता 'थुंक' ही नैसर्गिक हाक आल्यावर कुठ थुंकायच हा प्रश्नच आहे.
प्रकाश घाटपांडे
सहमत / निषेध / आक्षेप
सहमत आहे. स्वाइन फ्लू, वाहतुकीच्या समस्या, वायुप्रदूषण, साठलेल्या व न उचललेल्या कचर्यापासून होणारा धोका इत्यादींसाठी उपाय म्हणून मास्क एक वेळ समजण्यासारखा आहे, परंतु ऊठसूट पुरुषांनी सूट आणि स्त्रियांनी ब्रायडल गाउन घालून सरसकट हिंडण्याने आरोग्यास नेमका कोणता फायदा होतो ते कळू शकत नाही.
पुण्याच्या क्यांपामधील (अथवा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणार्या पुणे शहरानजीकच्या गावांतील इतर ख्रिस्ती वस्त्यांमधील) एखाद्या चर्चमधील एखाद्या ख्रिस्ती विवाहाच्या वरातीच्या सोहळ्याचे हे चित्र असल्याखेरीज चित्रातील व्यक्ती या पुणे शहरातील सर्वसाधारण व्यक्ती वाटत नाहीत, आणि अशा पोशाखात हिंडण्याची सरसकट पद्धत पुण्यात सर्वत्र अजूनपर्यंत तरी आली असल्याचे ऐकिवात नाही. (किंबहुना, अधिक निरीक्षणाअंती चित्रातील वधू आणि वर वगळता इतर पात्रांची वेषभूषा ही पुण्यातील ख्रिस्ती बांधवांची सामान्य अथवा विशेषप्रसंगीची वेशभूषाही वाटत नाही.) त्यामुळे हे चित्र कोणत्याही प्रकारे पुण्याचे "प्रातिनिधिक" चित्र होऊ शकते असे वाटत नाही.
तात्पर्य, प्रस्तुत चित्र पुण्याच्या नावावर खपवणे हा तद्दन खोडसाळपणाचा प्रकार आहे असे वाटते. किंबहुना स्वाइन फ्लू, प्रदूषण वगैरेंचे निमित्त पुढे करून येनकेनप्रकारेण पुणे, पुणेकर, पुणेकरांची वृत्ती, पुणेकरांच्या सवयी वगैरे विषयांवर मागील दाराने चर्चा सुरू करण्याचा अथवा त्या दिशेने चर्चा अपरिहार्यपणे वळेल हे सुनिश्चित करण्याचा हा प्रयत्न असावा अशी शंका प्रथमदर्शनी आली होतीच; चर्चेला येणार्या प्रतिसादांना आपोआप लागलेले वळण पाहून त्याबद्दल खात्री पटली आहे. असे खोडसाळ चित्र हे एखाद्या खरडवहीपुरते मर्यादित न राहता एखाद्या मुख्यप्रवाहातील लेखात येऊन टिकू शकते याबद्दल सखेद आश्चर्य वाटते. या कारणास्तव, एक भूतपूर्व पुणेकर या नात्याने प्रस्तुत चित्राचा मी कडक शब्दांत निषेध करू इच्छितो आणि प्रस्तुत चित्राबद्दल आणि चर्चाप्रस्तावाच्या मसुद्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवू इच्छितो.
(अर्थात, संपादनमंडळाचा याविषयी जो काही निर्णय होईल तो मला आगाऊ मान्य आहे. याविषयी अधिक चर्चा करण्याची इच्छा नाही.)
"Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely." -Lord Acton's dictum.
सहमत
सहमत आहे.
हे उपक्रमावरही व्हावे याचे सखेद आश्चर्य वाटते. सर्व जग ग्लोबल व्हिलेज बनत असताना, शहरांमध्येच नव्हे तर देशांमध्ये स्थलांतरे होत असताना, एखाद्या शहराबद्दल आणि शहरातील लोकांबद्दल काही लोकांना इतका आकस का असावा हे आकलनापलिकडचे आहे.
वर्तुळे आखून घ्यायचीच म्हटली तर बरीच घेता येतात. मग कसबा विरूद्ध नाना पेठ इथपासून सुरू करून पुणे-मुंबई, महाराष्ट्र-इतर प्रांत, भारत-इतर देश, (अजून वैविध्य हवे असल्यास) गोरे-काळे, हिंदू-मुसलमान, युरोपियन-अमेरिकन, विज्ञानवादी-सश्रद्ध.. यादी कराल तितकी मोठी आहे.
----
"कॅमरे में रील चले या न चले, स्टीव्हन कपूर ऐसा डायरेक्टर है जिसके दिमाग में हमेशा रील चलती रहती है."
सहमत
पण प्रस्तुत चित्र पुण्यातील आहे असे चर्चाप्रस्तावात स्पष्ट केलेले नाही. तरीही अशा चर्चेत सहभागी झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अर्थात सहभाग केवळ उपचर्चेपुरताच मर्यादित असल्याने विशेष फरक पडला नसावा.
ध्वनित
यातून ते पुरेसे सूचित / ध्वनित होते असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
असो. सहभागाचे दु:ख नाही. (तसेही अशा चर्चांनी कशावरही फरक पडतो असे वाटत नाही.)
"Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely." -Lord Acton's dictum.
प्रतिकात्मक
चर्चाप्रस्तावाचा आशय गडद व्हावा हा उद्देश असू शकेल (चूभूद्याघ्या.). चर्चाप्रस्तावकच यावर प्रकाश टाकू शकतील.
अंशतः असहमत. चर्चेच्या अनुषंगाने नवे मुद्दे (हेल्मेटच्या वापरासंदर्भात) कळले. फारसा फरक पडत नसावा हे मात्र मान्य.
पटले नाही
चर्चाप्रस्तावाचा उद्देश नेमका काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. तसेही स्वाइन फ्लू, वाहतुकीची समस्या, वायुप्रदूषण, साठलेल्या व न उचललेल्या कचर्यापासून धोका वगैरे समस्या हा जर चर्चाप्रस्तावाचा आशय असेल (असे मानण्यास जागा आहे), तर तो पुण्याचे नाव ओढूनताणून त्यात गोवून आणि त्यातसुद्धा त्याकरिता पुण्याशी यत्किंचितही संबंध नसलेले एक छायाचित्र छापून नेमका कसा गडद होतो, हे कळत नाही. (प्रस्तुत छायाचित्र हे gas mask wedding picture असा गूगलशोध घेऊन सहजगत्या सापडू शकणारे एक अत्यंत सामान्य छायाचित्र असून, त्याचा पुण्याशी काही संबंध असल्याचा कोणताही निर्देश त्यातून मिळत नाही. गूगलशोधाचा दुवा. चित्राचा दुवा.)
तसेही (विशेषतः पुण्यातील) हेल्मेटच्या वापराकडे चर्चा वळली हे लक्षात घेता, हेल्मेटच्या मुद्द्याचा चर्चाप्रस्तावाशी संबंध (असल्यास) या चित्राने कसा गडद होतो हे कळतं नाही. छायाचित्रातील एकाही व्यक्तीने हेल्मेट घातलेले दिसले नाही.
या कारणास्तव, चर्चाप्रस्तावाचा आशय काय आहे, तो गडद कसा करावा वगैरेंवर हा चर्चाप्रस्ताव मांडताना फारसा गंभीर विचार झाल्याची कोणतीच लक्षणे (निदान मला तरी) अजूनही स्पष्टपणे दिसून येत नाहीत. त्यामुळे 'चर्चाप्रस्तावाचा आशय गडद व्हावा हा (चर्चाप्रस्तावकाचा) उद्देश असू शकेल' हा आपला अंदाज पटणे (निदान मला तरी) कठीण जाते. (चूभूद्याघ्या.)
शक्यता न पटणे योग्यच
चर्चाप्रस्ताव 'स्वाइन फ्लू, वाह्तुकीच्या समस्या, वायू प्रदूषण, साठलेल्ल्या व न उचललेल्या कचर्यापासून होणारा धोका इत्यादीसाठी पुणेकरांनी शोधलेला पर्याय!' असा आहे. त्याखाली एका लग्नसमारंभात मास्क घातलेल्या लोकांचे छायाचित्र आहे.
पुण्यातील अनेक नागरी समस्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी पुण्यातील लोक स्वतःभोवती कुंपण (मास्क हे प्रतिक) घालून वावरत आहेत. छायाचित्रात विवाहासारख्या समयीही प्रत्येक व्यक्ति (वधु आणि वर सुद्धा) मास्क घालून जातांना दिसत आहेत. यातुन पुणेकरांचा 'नागरी समस्यांकडून बचाव करण्यासाठी वाट्टेल ते करू पण सामूहिकपणे काहीच नाही' असा दृष्टिकोन अधोरेखित करण्याचा उद्देश असावा.
मी स्वतः पुण्यात जवळजवळ दहा वर्षे राहिलेलो असल्याने मला वरील आशय पटत नाही (इतर शहरात परिस्थिती वेगळी नाही या अर्थाने). आणि असा आशय असावा अशी निव्वळ शक्यता आहे. चर्चाप्रस्ताव आणि त्यानंतर छायाचित्र यामागे काहीएक हेतू असावा, असे गृहित धरून कदाचित 'आशय गडदता' अशी शक्यता वर्तवली होती.
हेल्मेट आणि मास्क यांचा दुरायन्वाने का होईना संबंध लावता येईल. पण मूळातच त्रोटक असलेला चर्चाप्रस्तावाचा आशय नंतर झालेल्या चर्चेनंतर गडद वाटण्याऐवजी धूसर वाटू लागला आहे.
चित्रातील व्यक्ती पुण्यातल्याच!
कदाचित हा दुर्मिळ फोटो असेल.
कसे काय जमवले ते सांगाच बुवा!
अहो नानावटी तुम्ही सुपारी देऊन तर हा फोटो काढविला तर नाही? कसे काय जमवले ते सांगाच बुवा!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
जबरी
हा हा हा... काय जबरी चित्र आहे.
तुम्हीच बनवलंत की ढकलपत्रातून आलंय?
जबरी चित्र
ढकलपत्रातून आलेला फोटो असून कुणी खोडकरपणा केलेला असल्यास कळणे कठिण आहे.
प्रकाटाआ
प्रकाटाआ
समजले नाही.
चित्रातील व्यक्ती पुण्यातल्याच!
हे कशावरुन ओळखलेत कळेल का? की उगीच पुणेकरांना टपली मारण्यासाठी असे लिहिले आहे याचे स्पष्टीकरण द्यावे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मेहनत
चित्र आवडले. फोटोशॉपवर बरीच मेहनत घेतलेली दिसते. नवरानवरीचे मास्क म्याचिंग आहेत!
आपल्याला एखाद्या पुणेकराने चांगलाच इंगा दाखवलेला दिसतोय :प्
----
"मेरा कंपिटीशन यहां के डायरेक्टरोंसे नही है, हॉलीवूड से है. स्पिलबर्ग, कपोला..."
पुणे आणि मास्क
पुण्याच्या लोकांना कोणत्याही गोष्टीचा बाऊ करण्याची प्रचंड सवय आहे. बाकी सार्या जगातल्या दुचाकीस्वारांना हेल्मेट घालून कोणताही त्रास होत नाही. पुण्याच्या लोकाना ती एक अशक्य कोटीतील गोष्ट वाटते. जगात सगळीकडे लोक चारचाकी चालवताना सीट बेल्ट लावतात. पुण्याच्या लोकांना तीही नसती कटकट वाटते. तसेच मास्कचे आहे. २००३ मधे सार्सची साथ आल्यापासून कधीही कोणतीही साथ आली तरी जगभरचे लोक मास्क लावतात. पुण्याच्या लोकांना जन्मात प्रथम् मास्क लावण्याची वेळ आली आहे त्याचा कोण त्रास वाटतो आहे. या फ्ल्यूच्या निमित्ताने लोकांच्या थुंकण्याच्या आणि हात न धुण्याच्या सवयी बदलल्या तर वाईटातून काहीतरी चांगले निघाले असे म्हणता येईल.
चन्द्रशेखर
किंचित
हल्ली मी शहरांच्या वादात पडत नाही पण इथे पुणेकरांवर थोडा अन्याय झाल्यासारखे वाटते. पुण्यातील लोकांनी मास्क लावण्याबद्दल तक्रार केल्याचे माझ्या तरी पहाण्यात नाही. राहता राहिली हेल्मेट लावण्याची सवय तर भारतातील रहदारीची अवस्था पहाता कुठल्याही शहरामधील बहुसंख्य लोक जागरूकतेने हेल्मेट घालतात किंवा सीटबेल्ट लावतात असे वाटत नाही. परवा दिल्लीमध्ये एका महिलेला गाडीने उडवले तर थांबण्याऐवजी तिच्या शरीरावरून गाड्या जातच होत्या. बर्याच गाड्या गेल्यानंतर लोकांनी ट्रॅफिक थांबवले.
शेवटच्या वाक्याबद्दल सहमत आहे पण ते होणे नाही.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
अंशतः असहमत
१)
२)
वरील दोन्ही विधानात उपहास आहेच. परंतु तुलना करताना सरधोपट केली आहे असे वाटते. टिपीकल अकॅडमिक प्रतिक्रिया वाटते.(चंद्रशेखरजी कृपया व्यक्तिगत घेउ नये) एखाद चित्र रंगवताना कॅनवास ही गोष्ट महत्वाची. वरील दोन्ही विधानात हेल्मेट व सीट बेल्ट याचा नियम बनवताना त्यामागील हेतु काय? तो नियम कुठल्या पार्श्वभुमिवर तयार केला? ज्या रस्त्यावरुन ही वाहतुक होते ते रस्ते तरी नियमानुसार (शास्त्रीय म्हणा हव तर) आहेत काय? रस्त्याचे क्षेत्रफळ व वाहनांची संख्या,वारंवारिता, गती यांचा परस्पर संबंध कसा असावा?
हेल्मेट ची सक्ती करताना ती विलासरावांच्याच काळातच कशी काय झाली? (दोन वेळा?) अचानक लोकहिताचा कळवळा कसा काय आला ब्वॉ! नियम सुरक्षिततेसाठीच बनवले आहेत हे मान्यच आहे. विरोध अथवा नाराजी आहे ती सक्ती बद्द्ल आहे सुरक्षिततेच्या हेतु बद्दल नाही. त्याकाळात अचानक हेल्मेटच्या किंमती वाढल्या होत्या. ब्लॅकने हेल्मेटची विक्रि चालू होती. त्या अगोदर हेल्मेटला कुणी विचारत नव्हत. काही अत्यल्पसंख्या़क् उच्चभ्रु फक्त वापरत होते.हेल्मेट उत्पादकांचे अर्थिक हितसंबंध हे अधिक प्रभावी होते हे उघड आहे.
सीट बेल्ट व हेल्मेट वापरल्यामुळे पुण्यातील चालकाचे अस्वास्थ्यच वाढते.पुण्याच्या गर्दीत वाहनाचा वेग किती असणार आहे? वाहतुकीचे नियम हे इतरांनी जरी पाळले नाही तरी त्याचा फटका हा एखाद्या निरपराधाला बसतो. असो बाकी ठीक! चालु द्यात!
अवांतर- एखादा कायदेशीर वागतो म्हणजे तो नैतिक वा विवेकी आहे असे नाही अथवा एखादा बेकायदेशीर वागतो म्हणजे तो अनैतिक वा अविवेकी आहे असे नाही. यातील परिस्थिती सापेक्षता नीरक्षीर विवेकानेच अथवा सोप्या भाषेत तारतम्यानेच ठरवता येते.
प्रकाश घाटपांडे
सीट बेल्ट् व हेल्मेट
सीट बेल्ट व हेल्मेट वापरल्यामुळे पुण्यातील चालकाचे अस्वास्थ्यच वाढते.
जगातल्या बाकी शहरांच्यातल्या लोकांचे स्वास्थ्य या गोष्टींमुळे वाढते कारण या गोष्टी वापरल्या आणि आपल्याला अपघात झाला तर आपण जास्ती सेफ आहोत हे त्यांना माहिती असते. त्यामुळे या गोष्टींचा वापर करताना होणारा थोडासा त्रास ते सहन करतात. पुण्याचेच लोक असे काय विशेष आहेत की त्यांचे या गोष्टी वापरून अस्वास्थ्यच वाढते.
घाटपांडॅ साहेब मी पुण्याचाच आहे. कित्येक वर्षे मी पुण्यात दुचाकी (हेल्मेट घालून)चालवलेली आहे आणि अजूनही जेंव्हा मी पुण्यात असतो तेंव्हा चार चाकी(सीट बेल्ट लावूनच) चालवतो. तेंव्हा मी काहीही वैयक्तिक घेत नाही. मला पुण्याची, 'आम्ही जास्त शहाणे' ही वृत्ती योग्य वाटत नाही म्हणून हा प्रतिसाद
चन्द्रशेखर
प्रत्युत्तर
मीही मूळचा पुण्याचाच आहे. मात्र पुण्यात राहत असताना सायकल वगळल्यास दुसरे कोणतेही वाहन चालवण्याची (स्वयंचलित वाहन तोपर्यंत चालवायला शिकलेलो नसल्यामुळे) वेळ आलेली नव्हती. परंतु यदाकदाचित स्वयंचलित दुचाकी चालवली असती तर बहुधा (तीर्थरूपांच्या धाकामुळे का होईना) हेल्मेट घालूनच चालवली असती, असे वाटते. पण ते असो.
बाकी, पुण्याच्या 'आम्ही जास्त शहाणे'वृत्तीबद्दल बोलायचे झाले, तर तात्त्विक आणि भावनिकदृष्ट्या आपल्याशी सहमत आहे, परंतु अनुभवाअंती पुण्याची (किंवा पुणेकरांची) 'आम्ही जास्त शहाणे'वृत्ती आणि पुणेकरांच्या नावाने सदान्कदा खडे फोडून त्यांना शहाणपण शिकवू पाहणार्यांची 'आम्ही जास्त शहाणे 'वृत्ती यांमध्ये डावेउजवे करता येणे कठीण होऊ लागले आहे. या कारणास्तव शहरांच्या वादांत न पडण्याबद्दल आरागॉर्न यांच्याशी सहमत.
या भागाशी तत्त्वतः सहमत. परंतु मास्कच्या बाबतीत अतिरेक होत आहे असे अजूनही वाटते.
"I am not what I think I am. I am not what you think I am. I am what I think you think I am." -?????.
दुरुस्ती
हे त्रिकालाबाधित सत्य नसावे. १९८०-१९९०दरम्यानच्या दशकात एकदा कधीतरी (नक्की वर्ष आठवत नाही.) पुण्यात हेल्मेटची कायद्याने सक्ती करण्यात आली होती, असे अंधुकसे आठवते. आणि पुण्याच्या सर्वसामान्य जनतेकडून त्या वेळी त्यास सरसकट विरोध वगैरे झाल्याचे आठवत नाही. मात्र काही शीख गटांनी घेतलेल्या आक्षेपामुळे या कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्याआधीच हा कायदा रद्द झाल्याचे आठवते.
"I am not what I think I am. I am not what you think I am. I am what I think you think I am." -?????.
हेल्मेटसक्ती
भारतातील कुठल्याच शहरातील दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरायला आवडत नाही. दुचाकी केव्हा लागते? कोपर्यावरून कोथिंबीर आणायला, किंवा मुलाला किंवा मुलीला क्लासला पोचवायला. फारतर कीर्तनाला गेलेल्या आईला देवळापासून घरी आणण्यासाठी. एवढाश्या अर्धा ते एक किलोमीटर अंतरासाठी हेल्मेट कशाला लागते? बरे, गर्दीच्या रस्त्यावरचा बहुतेक प्रवास दोन्ही पाय जमिनीला टेकून गाडी ढकलत ढकलत नेतच होणार असतो. आपण खूप हेल्मेट घालू, पण आपल्या पायात जे दोनतीन वर्षाचे मूल हॅन्डल धरून उभे आहे, त्यालाही हेल्मेट? मागे बायको बसली आहे, तिच्या मांडीवरच्या तान्ह्या मुलालाही? एवढ्या छोट्या आकाराची हेल्मेटे मिळतात? हेल्मेट वापरायला लागले की दुचाकीच्या प्रवासाचा सुटसुटीतपणाच संपतो.
शिवाय, हेल्मेट घातल्याने अनेकांचे डोके दुखते आणि कमी ऐकू येते हे सत्य विसरून कसे चालेल?--वाचक्नवी
खरेच
>आपल्या पायात जे दोनतीन वर्षाचे मूल हॅन्डल धरून उभे आहे, त्यालाही हेल्मेट? मागे बायको बसली आहे, तिच्या मांडीवरच्या तान्ह्या मुलालाही?
खरेच, बाळांना कशाला लागते हेल्मेट? !
(आधी बाळे अशा प्रकारे बसवायचीच का, हा प्रश्न पडला पाहिजे, नाही का?)
असेच म्हणतो
असेच म्हणतो. त्याच बरोबर तो परिस्थितीचा रेटा आहे असेही म्हणतो.
प्रकाश घाटपांडे
परिस्थितीचा रेटा
चेन्नई शहरातील कही मासलेवाईक फोटो. इतर शहरातही थोड्या फार् फरकाने हीच परिस्थिती असेल.
हेल्मेटची सक्ती करावे की दुचाकी फक्त दोघासाठीच असते हे पटवून द्यावे?
पायाजवळील मुल
अनेक स्त्रिया पुर्वी बजाज स्कुटर वर पायाशी मुल उभे करुन ठेवत. त्याचा ब्रेक हा मुलाच्या पायाजवळच असल्याने चुकुन जरी त्यावर मुलाचा पाय पडला तरी अपघात होणार त्यामानाने नवीन गिअरलेस स्कुटर ला तो धोका नाही.
प्रकाश घाटपांडे
सक्ती
हेल्मेटच्या किंमतीबाबत थोडेसे.
बहुतेक सक्तीच्या वेळी 'येत्या सोमवारपासून' सक्ती आहे असे होत नाही. सक्तीची तारीख खूप आधीपासून सांगितलेली असते. आणि प्रत्यक्ष तारखेच्या १५-२० दिवस आधीपर्यंत किमती सामान्य असतात. परंतू तेव्हा सर्वांना कोणत्यातरी न्यायालयाकडून सक्तीला स्थगिती दिली जाईल अशी खात्री/आशा असते. त्यामुळे शेवटची घटका येईपर्यंत हेल्मेट (किंवा सक्ती होणारी कुठलीही गोष्ट) घेत नाहीत. आयत्यावेळी झुंबड उडाल्याने किंमती वाढतात.
विलासरावांच्या मुलाची/कोणाचीतरी हेल्मेटची फ्याक्टरी नसती तर पुणेकर बिनबोभाट हेल्मेट घालणार होते असे ध्वनित होत आहे.
असो. कायदेशीर रीत्या हेल्मेटसची सक्ती १ जुलै १९८९ रोजी नवा मोटारवाहन कायदा अस्तित्वात आला तेव्हापासून आहे. (कायद्यातील इतर तरतुदी: टँकरचालक किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. दुचाकी वाहनांनाही वळताना दाखवण्याचे ब्लिंकर असावेत वगैरे) त्यावेळी बहुधा पवार मुख्यमंत्री होते. आणि हा कायदा महाराष्ट्र सरकारचा नसून भारत सरकारने देशभर लागू केला.
मास्कबद्दल म्हणावे तर पुणेकरांत त्याबद्दल नाराजी नसावी. उलट मला माहिती असलेल्या पुणेरी स्वभावानुसार हौशीने मास्क घालणार्यांची संख्या सक्तीने मास्क घालणार्यांपेक्षा जास्त भरेल.
हेल्मेटने होणार्या त्रासाविषयी:
हेल्मेट घालू लागल्यावर काही दिवस सवय होईपर्यंत डोक्याला जड वाटते बाजूबाजूच्या वाहनांचे हॉर्न ऐकू येत नाहीत असे वाटते. साधारण आठवड्याभरात सवय होऊन जाते असा स्वअनुभव आहे. (असाच अनुभव आपण पहिल्यांदा हातात घड्याळ घालतो तेव्हाही येतो). आसपासच्या गाड्यांचे हॉर्न ऐकू न येणे हे वातानुकूलित गाड्यांच्या खिडक्या बंद केल्यावरही होते म्हणून लोक खिडक्या उघड्या ठेवून वाहने चालवतात का?
असो. हेल्मेट घालायचे नाही असा निर्णय आधी घेऊन त्याला समर्थन शोधण्याचा हा प्रकार आहे. ('सरकारचे डोके ठिकाणावर .... या परंपरेचा परिणाम असावा काय?)
भिती
यात सक्तीपेक्षा भीती एन्जॉय करण्याचा भाग मला अधिक वाटतो. सन्स्पेन्स चित्रपटात आपण भीती पण एन्जॉय करतो.साडेसातीत लोक शनी एन्जॉय करतात.
नियम असुनही त्याची अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळे विलासरावांच्या हितसंबंधियांकडे हेल्मेट पडुन होती. शेतात बुजगावण उभ केल कि तेवढच काही पाखरे घाबरुन का होईना पण दाणे खात नाहीत.डॅम्बिस पाखरांना ते बुजगावण आहे हे माहित असत. ते नुसत भ्यालासारख करुन कणसावर् बसतातच.
सक्ती झाल्यामुळे नाईलाजाने का होईना हेल्मेट विकत घेतली गेली; पक्षी खपली.
हेल्मेट मुळे दृष्टीक्षेपात येणारे क्षेत्रफळ हे कमी होते.हेल्मेट मुळे सुरक्षिततेच्या शक्यतेत मोठी वाढ होते व ती होणार्या त्रासाच्या मानाने अधिक मुल्यवान आहे म्हणुन त्रास नाहीच असे म्हणणे वस्तुनिष्ठ नाही. एक गट हेल्मेट कसे उपयुक्त आहे हे बोलतो तर् दुसरा गट ते कसे त्रासाचे आहे हे बोलतो. आमचा मुद्दा तारतम्याचा आहे.
हेल्मेट का घालायचे नाही? व न घातल्यामुळे होणार्या संभाव्य परिणामांना /धोक्यांना सामोरे जाउन मग त्याला समर्थन शोधण्याचाही हा प्रकार असु शकतो.
(पुणे शहराबाहेर जाताना हेल्मेट घालणारा)
प्रकाश घाटपांडे
विदा प्रमाण मानता येईल
हेल्मेट घातल्याने सुरक्षिततेच्या शक्यतेत वाढ होते किंवा नाही, हे तपासून पाहण्यासाठी दुचाकी वाहनांच्या अपघातांचा विदा पाहणे योग्य ठरावे. हेल्मेटचे फायदे आणि तोटे केवळ युक्तिवादांवर अवलंबुन असू नये. अशा प्रकारचा विदा कोणाच्या पाहण्यात आहे काय?
अमेरिकेतील विदा संकलन
या दुव्यावर बराच विदा संकलित केलेला आहे - पण बहुतेक अमेरिकेतील विदा आहे (दुवा).
पण अन्य देशातलाही विदा उपलब्ध आहे, असे माझ्या वाहातुक सुरक्षा क्षेत्रात काम करणार्या मित्राने सांगितले, ते मला आठवते. पण माझ्यापाशी तो उपलब्ध नाही :-(
रोचक माहिती
दुव्याबद्दल धन्यवाद. दुव्यातील प्र. क्र. २ मधील माहिती प्रकाश यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांना (हेल्मेट मुळे दृष्टीक्षेपात येणारे क्षेत्रफळ हे कमी होणे, ऐकायला कमी येणे (ही माहिती स्थलसापेक्ष नसावी)) उत्तर मिळू शकेल. खाली वाचक्नवी यांनी म्हटल्याप्रमाणे भारतातील शहरांविषयी विदा मिळाल्यास तो खूपच उपयुक्त ठरावा (रस्त्या-रस्त्यांचा विदा मिळणे कठीण असू शकेल पण 'बुधवार चौकापासून मंडईपर्यंत' वगैरे परिस्थिती अभ्यासासाठी simulate करता यावी).
म्हणजे...
अशा वेळी आपले 'गट फीलिंग' काय सांगते त्याप्रमाणे वागावे, असा मुद्दा आहे काय?
सवय
हेल्मेट घालू लागल्यावर काही दिवस सवय होईपर्यंत डोक्याला जड वाटते बाजूबाजूच्या वाहनांचे हॉर्न ऐकू येत नाहीत असे वाटते. साधारण आठवड्याभरात सवय होऊन जाते असा स्वअनुभव आहे. (असाच अनुभव आपण पहिल्यांदा हातात घड्याळ घालतो तेव्हाही येतो).
मलाही असेच म्हणायचे आहे. मी जेव्हा पुण्यात होते तेव्हा हेल्मेट घालूनही न बघता ते जाचक आहे म्हणून (आणि पुण्याच्या हवेचा परिणाम म्हणून ;)) हेल्मेटला विरोध करायचे. पण इकडे बंगलोरला आल्यावर हेल्मेट सक्तीचे असल्याने मी ते वापरायला लागले. एका आठवड्याच्या आतच मला ते सोयिस्कर आणि सुरक्षित वाटायला लागले. इकडच्या स्थानिक लोकांनी त्याचा कोणताही त्रास होतो अथवा गैरसोय होते म्हणून विरोध न केल्याचे मला आठवत नाही. आता माझ्यासकट बहुतेक दुचाकी चालक स्वप्रेरणेने हेल्मेट वापरतात.
पुण्याची बंगलोरशी तुलना नको.
बंगलोरमधले तिन्ही ऋतू पुण्यापेक्षा सौम्य आहेत. रस्ते रुंद, उड्डाणपूल अनेक, महामार्ग शहराच्या मधून गेले तरी डोक्यावरून जातात(उदा. बेल्लारी रोड), ट्रॅफ़िक जॅम पुण्यापेक्षा खूप कमी . त्यामुळे बंगलोरमध्ये दुचाकी वेगाने जाऊ शकतात. नवीन ले-आउट्समध्ये काय, तर रस्त्यांवर गर्दीच नाही. शिवाय, सुप्रीम कोर्टाने मनाई केली असली तरी बंगलोरमध्ये अजूनही अनेक गतिरोधक आहेत. त्यामुळे पुण्याची तुलना बंगलोरशी करता येणार नाही. --वाचक्नवी
तुलना नाहीच
मी बंगलोर आणि पुणे या शहरांची तुलना केलीच नाहीये. तुलना केलीये ती फक्त तिथल्या स्थानिक लोकांच्या हेल्मेटविषयीच्या मानसिकतेची!
माझा मुद्दा एवढाच होता की एखाद्या नवीन गोष्टीला आपण विरोध करतो पण ती गोष्ट वापरल्यावर आपल्याला जाणीव होते की त्यात विरोध करण्यासारखे काही नाही.
अवांतरः तुम्ही बंगलोर नक्की कधी पाहिले हे मला माहिती नाही. बंगलोरमधले रुंद रस्ते आणि पुण्यापेक्षा खूप कमी ट्रॅफिक जॅम हे मी गेल्या तीन वर्षात पाहिले नाही. उलट पुण्याहून जेव्हा नवीनच बंगलोरला आले तेव्हा इकडचे अरुंद रस्ते आणि अतिशय भयानक असे रोजचे आणि प्रत्येक रस्त्यावरचे ट्रॅफिक जॅम यामुळे अतिशय हैराण होते.
हो, पण ऋतूमान मात्र खरंच सौम्य... तरीही पुण्यात पाऊस फक्त पावसाळ्यात पडतो तर बंगलोरला १२ महिन्यात कधीही पडू शकतो.
असो. पुणे-बंगलोर या तुलनेसाठी ही चर्चा नाही :)
हेल्मेट सुखकर की नाही?
हेल्मेट घातल्याने त्रास होतो की नाही ते समजून घ्यायचे असेल तर एक करावे. आपण हेल्मेट घालून कार्यालयाला जातो किंवा कार्यालयातून घरी परत येतो तेव्हा पहिल्याप्रथम काय करतो? तर डोक्यावरचे ते घमेले उतरवून ठेवतो आणि हुश्श म्हणतो. यातच सर्व काही आले. त्रास जर होत नसता तर आपण नेसलेल्या वस्त्र-पादत्राणांसह जसे दिवसभर राहू शकतो, तसे हेल्मेटसहही राहता आले, तर हेल्मेटची तुम्हाला सवय झाली असे म्हणता येईल. सरदारजी ऑफ़िसमध्ये पागोटे सोडून काम करीत नाहीत. त्यांना पागोटे शरीराचाच एक हिस्सा आहे असे वाटत असते.
अवांतर: सरदारजींच्या पागोट्याला पगडी का म्हणतात?--वाचक्नवी
विदा देशाचा नको.
विदा देशाचा नको आहे, शहराचा हवा. आणि तोही रस्त्यारस्त्याचा. उदाहरणार्थ, पुण्यातल्या बुधवार चौकापासून मंडईपर्यंत किंवा अप्पा बळवंत चौकापर्यंत दुचाकीचे किती अपघात होऊन स्वारांची डोकी फुटली ? हेल्मेटे घातली असते तर फायदे झाले असते का? वेळ, हवामान आणि गाडीचा वेग वगैरे कोणती, कसे आणि किती? रस्त्याला खड्डे होते की खड्ड्यांमधेमधे रस्ता होता? रस्त्याला विनाआक्रमित फ़ुटपाथ होता का ? पायी चालणार्यांच्या संख्येसाठी तो पुरेसा होता का ? की माणसांना फुटपाथवरून खाली यावे लागत होते? वगैरे वगैरे. असा विदा जमवून त्याचा अभ्यास केल्यानंतरच पुणेकर हेल्मेट वापरायचा विचार करतील.-वाचक्नवी
विदारी
वरील 'विद्या' साठी विदाकार / विदारी म्हणुन ब्रह्मदेव व चित्रगुप्त यांचीच नेमणूक करावी लागेल.(ह घ्या).
प्रकाश घाटपांडे
कायदा पालन
मी उपस्थित केलेल्या मुद्यांवर बरीच चर्चा झाली. मला वाटते की माझा मुख्य मुद्दा बाजूलाच राहिला आहे. हेल्मेट घालणे सीट बेल्ट लावणे दुचाकीवरून मुलांना पुढे उभे करून् नेणे ही सगळी या मुद्याची स्पेसिफिक उदाहरणे आहेत.
मुख्य मुद्दा असा आहे की ज्या वेळेस एखादा कायदा किंवा नियम शासन किंवा महानगरपालिका करतात त्यावेळी सर्व सुबुद्ध नागरिकांनी तो पाळावा अशी अपेक्षा असते. पुणेकरांचे वर्तन कायद्याचे पालन होते का? मुंबईत जाणारा पुणेकर सीटबेल्ट जरूर लावतो. पुण्यात आल्यावर तो काढून टाकावा असे त्याला का वाटते? कायदा मुंबईला निराळा आणि पुण्याला निराळा असे त्याला का वाटते? पुणेकर पुण्यात कायद्यांचे पालन का करत नाहीत हा माझा प्रश्न आहे.
चन्द्रशेखर
खरा मुद्दा
हाअ खरा आणि योग्य मुद्दा आहे. हा मुद्दा पकडूनच चर्चा व्हावी. पुणेकर मनापासून वाहतुकीच्या नियमांचे/कायद्याचे पालन करतात असा कोणाचा (पुणेकर अथवा पुणेकर नसलेले कोणीही) दावा आहे काय? असल्यास सोदाहरण स्पष्ट करावे.
बाकीचे
बाकीच्या शहरांमध्ये सर्व लोक मन लावून वाहतूकीच्या नियमांचे पालन करत आहेत आणि फक्त पुणेकरच बेशिस्तपणे गाड्या हाकत आहेत अशी परीस्थिती असती तर आपल्या म्हणण्यात तथ्य होते. सर्व देशात मन मानेल तशी वाहतूक चालू असताना फक्त पुण्याच्या नावाने कंठशोष करणे आक्रस्ताळेपणाचे वाटते. पुणेकरांवर तोफ डागायचीच असेल तर याहून सशक्त मुद्दा शोधावा असा (एक पुणेकर म्हणून) अनाहूत सल्ला द्यावासा वाटतो. :प्
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
बाकीचे
बाकीचे? पुण्यात चालणारी वाहतुक आदर्श आहे असे आपले मत आहे काय? वाहतुकीच्या मुद्यावर पुण्याचा व्यर्थ अभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे.
विपर्यास
हा विपर्यास होतो आहे. पुण्यात बेशिस्त वाहतूक आहे याबद्दल दुमत नाही. पण बाकीच्या शहरांमध्येही आहे. यात पुण्याचे समर्थन करण्याचा प्रश्न येतो कुठे? सर्व भारतात हीच परिस्थिती आहे मग एकाच शहराच्या नावाने खडे का फोडायचे?
कृपया दुवा पहावा.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
सर्व भारतात
काही आकडेवारी उपलब्ध आहे का?
दुवा
दिलेला दुवा पहावा. त्यातील एक वाक्य.
"Driving a car through Lakdikapul area in Hyderabad could make one go in circles. I want to turn left, but the traffic pushes me to the right. "At this rate, you won't survive in our city," says Rehman, my guide. "Think of yourself and don't bother about others."
आणि संपूर्ण भारतात वाहतुकीची काय परिस्थिती आहे हे विदा असल्याशिवाय कळू नये इतकी भारतातील वाहतूक सुव्यवस्थित आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
----
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
इतर ठिकाणी
इतर काही ठिकाणी असेच चालते म्हणून हेच बरोबर आहे, हे कितपत योग्य आहे. तुमचा एक मुद्दा मान्य करु की पुणेकरच हे बाजुला ठेवू. आपण भारतीय म्हणूयात? पण काही मुद्दे असे आहेत जेथे पुण्याने आपले वेगळेपण जाणवुन दिले आहे जे वरिल चर्चेत आले आहेच. असे का? हा चंद्रशेखर यांचा मुद्दा आहे. मला तो योग्य वाटतो. इतर सर्व ठिकाणी आहे म्हणून पुणेकर धुतलेल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत हा युक्तिवाद काही पटत नाही बुवा.
पुन्हा तेच
मी पुणेकरांचे समर्थन करत आहे असा आपला समज का झाला कल्पना नाही. मी पुणेकरांचे समर्थन करत नाही. ही फक्त पुण्यातील परिस्थिती नसून सर्व भारतातील समस्या आहे इतकेच म्हणायचे आहे. देशभरात वाहतुकीची समस्या असताना फक्त पुणेकर अतिशहाणे म्हणून त्यांच्या नावाने खडे फोडणे मला तरी पटत नाही. इतरत्र शोधले असता राजकोटमध्येही हेल्मेट घालण्यास नकार दिला असल्याचे समजते. आणखीही शहरे सापडतील. शिवाय जिथे नकार दिलेला नाही तिथेही किती लोक हेल्मेट जागरूकतेने घालतात?
बदलायचे असेल तर सगळीकडे बदलायला हवे. एका शहराच्या नावाने कंठशोष करून उपयोग नाही.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
बदल
बरोबर, बदल स्वतः पासून सुरु झाला तर? असो, चर्चेचे रुपांतर वादात होण्यापेक्षा मला येथे थांबायला आवडेल.
ठीक आहे
>बरोबर, बदल स्वतः पासून सुरु झाला तर?
उद्यापासून पायी जातानाही हेल्मेट घालायला सुरूवात करतो. पादचार्यांनाही धोका कमी नाही.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32