भारताचे राजकिय प्रतीक आणि भारतीय राज्यांची प्रतीके

भारताचे राष्टीय प्रतीक/चिन्ह - अशोक स्तंभ
national emblem of India

सारनाथ येथील अशोक स्तंभ हा अशोकाचा सर्वात प्रसिद्ध स्तंभ मानला जातो. हा वाळूच्या दगडाचा बनला असून अशोकाने सारनाथला भेट दिल्याची त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे.

४ सिंह पाठीला पाठ लावून गोलाकार चक्रावर उभे आहेत. गोलाकार चक्रावरच्या घंटाकृती कमळावर हत्ती, घोडा, बैल आणि सिंह हे प्राणी अशोक चक्राने विभागलेले कोरले आहे. हे कोरीवकाम एका सलग वाळूच्या दगडी स्तंभात केलेले आहे.
समोरून बघितल्यावर ३ सिंह दिसत असल्यामुळे चिन्हात/शिक्क्यात तीनच सिंह दाखवले जातात जे घंटाकार कमळावर ऊभे आहेत. गोलाकार चक्रावर मध्य भागी अशोकचक्र आणि अशोकचक्राच्या उजव्या बाजूला बैल तर डाव्या बाजूला घोडा.
गोलाकार चक्राच्या खाली देवनागरी लिपीत 'सत्यमेव जयते' (English: Truth Alone Triumph ) हे वाक्य कोरले आहे. हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे.

२६ जानेवारी १९६० साली भारत गणराज्य देश झाल्या पासून अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे.

हे चिन्ह भारतीय कामकाजाच्या सरकारी कागदपत्रांवर शिक्कयाच्या रुपात वापरले जाते, त्याचप्रमाणे भारतीय नोटांवरही हे चिन्ह वापरतात. अशोक चक्र हे भारताच्या ध्वजावर रेखाटलेले आहे.

भारत हा देश विवीधतने नटला आहे. हे प्रत्येकवेळी म्हटले जाते. भारताच्या प्रत्येक राज्याचे प्रतीकपण हेच सांगतात. राज्यांच्या प्रतीकांची अधिक माहिती गोळा करण्याचा मी प्रयत्न करत आहे.

इंग्रजी इंडियाच्या विकिवर प्रतीकांची चित्रे मिळाली पण अर्थ सापडले नाहीत. मराठी, हिंदित सविस्तर माहिती दिलेली नाही.

भारतीय राज्यांच्या प्रतीकांच्या चित्रांचे मी संकलन केले आहे.

rajye 1-14
rajye 15-28
kendrashashit pradeshe

भारताच्या अधिकृत संकेतस्थळावर पण काही माहीती मिळाली नाही.

भारतीय राज्यांच्या प्रतीकांची अर्थांसकट माहिती उपक्रमी वाचकांकडून मिळेल का?

Comments

चांगला संग्रह

व्वा ! चांगला संग्रह, चांगली माहिती.
अजून येऊ द्या...!

-दिलीप बिरुटे

१ ते चौदा?

एक ते चौदा ह्या राज्यांची प्रतीके दिसलीच नाहीत, १५ ते २८ दोनदा आली.--वाचक्नवी

१-१४

माझी चूक झाली. दोन चित्राची लिंक एकाच फोटो लिंकमध्ये टाकल्या गेल्या.

१-१४ राज्यांची प्रतीके

rajye 1-14

मुद्रा की प्रतीके?

तुम्ही दाखवल्या आहेत त्या बहुधा, राज्यांच्या मुद्रा असाव्यात; प्रतीके कदाचित वेगळी असतील. उदाहरणार्थ, नागालॅन्डचे प्रतीक येथे आहे.
(चूभूद्याघ्या)--वाचक्नवी

मुद्रा/प्रतीके/चिन्हे

तुम्ही दाखवल्या आहेत त्या बहुधा, राज्यांच्या मुद्रा असाव्यात; प्रतीके कदाचित वेगळी असतील

प्रतिके/चिन्हे आणि मुद्रा हे समान अर्थ आहेत असे मला वाटते. (चूभूद्याघ्या)

दाखविलेल्या प्रतीकांना इंग्रजीत Seal म्हणतात.

किंचित मतभेद

माझ्या (गैर?)समजुतीप्रमाणे, प्रतीक हे सील असू शकते; सील हा एम्ब्लेम असेलच असे नाही. आपल्या राष्ट्रध्वजातला भगवा रंग हा (म्हणे) त्यागाचे प्रतीक आहे, तो कसलीही मुद्रा नाही.--वाचक्नवी

नागालॅन्डचे प्रतीक

नागालॅन्डचे प्रतीक येथे आहे.

नागालॅन्डच्या प्रतीकांसारखे (Emblem) इतर भारतीयांचे प्रतीके आहेत का?

प्रतीके - चिन्हे - मुद्रा

प्रतीक - चिन्हे - मुद्रा ह्यांची अधिक माहिती ह्या दूव्यावर इंग्रजीत वाचायला मिळेल.

 
^ वर