मेघालयातील शिक्षण उपक्रम

फ्लांगटींगोर् येथे जीवनरॉय मेमोरियल स्कुल आहे. परिसरातिल १५० विद्यार्थ्यांना के.जी. पासुन सातव्या वर्गापर्यंत विद्यादानाचे कार्य इथे केले जाते. येथे आसाम येथील बोर्नालीदेवी हि युवती हिन्दी विषय शीकवते तर वंदाशीशा खारवानलँग ही खासी युवती व बिशरलँग इआविम हा खासी युवक शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत्.

building of jeebon Roy memorial school, phlangtyngor

शाळेसमोर् मोठे पटांगण असुन शाळेच्या मागे रम्य पहाड या भागाची शोभा वाढवतात.

The scenic view at the back yard of the School
Vast Ground in front of the school
The Shibir of the students who came on summer vacation from Maharashtra

शिबीर संपल्यावर् आम्ही डेलीना या युवतीच्या घरी भोजनास गेलो होतो. आपल्याकडे घरात वापरल्या जाणार्‍या केरसुण्यांचे शेत येथे पहाण्यास मीळाले. आपल्या घरातल्या स्वच्छतेत मोठा वाटा हा मेघालयाचा आहे ही किती आश्चर्‍याची बाब अहे आणी तरीही या भागाची फार थोडी माहिती आपणास आहे.

The recently cut crop of Zadu farming
The 'Zadu' farm of Delina

माझा मार्गदर्शक मणी च्या मागे मी डेलीना च्या घरी भोजनासाठी गेलो. तीचे घर रस्त्यापासुन खाली १ फुटाच्या ६० पायर्‍या उतरुन होते. तीच्या घरासमोर मासे जोपासण्यासाठी तळे तयार केले असुन मागे केरसुण्यांचे पीक ठेवण्यासाठी कोठार आहे. कोठार देखील बांबुचे की एखाद्या कॉटेज ची आटवण यावी. डेलीना हिने पुणे येथुन एल्.एल्.बी ची डिग्री या वर्षीच मिळवली असुन एल् एल् एम् साठी तीचा आटापिटा सुरु आहे.

kids returning from school
Delina with her mother. In the back is fishpond and mother indicating the storage of agrl.crop
लेखनविषय: दुवे:

Comments

चित्रमय

सफर चांगली दिसते आहे. आधीचे भागही वाचत आहे. माहिती अधिक विस्तृत स्वरूपात देता येईल असे एकदा वाटले, पण आहे त्याही स्वरूपात छायाचित्रे पाहूनही बरेच काही वेगळे दिसते.

पहाडातील शाळा

पाहून दूरदर्शनवर लागणारी ही ध्वनिचित्रफित आठवली आणि मन उल्लसित झाले.

--------------------------X--X-------------------------------
नाही निर्मळ जीवन, काय करील साबण |
तैसे 'चित्त' शुद्ध नाही तेथ बोध करील काई ||

 
^ वर