सेंग खासी शाळेच्या सचिवाकडे चहा घेउन आम्ही निघालो. येथे सगळीकडे लाल चहा मिळतो. साखर टाकुन ऊकळत्या पाण्यात चहा टाकुन झाकण ठेवतात व गॅस बंद करुन कपात आणतात. चहा न उकळल्यामुळे तो कडवट लागत नाही आणि कॅलेस्ट्रोल साठी उत्तम असतो. येथे दुध मिळत नाही. दुभती जनावरे नाहिच. पुन्हा पायर्या उतरुन रस्त्यावर सुमो ची वाट पहात बसलो.
|
with Mani at sumo stand at lyngkyrdem |
समोर गावाकडे जाणारा चढाइचा रस्ता आणि गाडीची वाट पहाणारे प्रवासी.
|
village uphill |
लगेच सुमो आली आणि आम्ही ५ की.मि.वर असलेल्या पेनुर्सुला येथे पोचलो. आपल्या कडे असलेली प्रवाशांची गर्दी येथे दिसत नाही.
|
view of sumo stand at penursla |
उतरल्यावर आम्हाला सेंग खासी शाळेतिल शिक्षक श्री जेफरी खोंगलॅम भेटले. हे महाराष्ट्रात सात वर्षे शीकुन एम्. ए. झाले असुन आता शीक्षक आहेत. त्यांच्या सोबत आम्ही ते शीकवत असलेल्या शाळेत जाण्यासाठी पायी निघालो.
|
with teachers on sumo stand at Penursla |
|
with Mani and jeffree on way to school |
|
Board of Seng khasi school |
|
school at hillock and Mani with vice president of the school |
आम्ही शाळेत गेल्यावर शिक्षक व संस्थेचे उपाध्यक्ष यांनी एक मिटीग शाळेची माहिती देण्यासाठी घेण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यासाठी सुट्टी देण्यात आली.
या शाळेत पाचवी ते दहावी पर्यंत शीक्षण देण्यात येते आणी शाळेत २०० विद्यार्थी शीकतात. निरनिराळ्या वर्गांसाठी आणि विषयांसाठी ९ शीक्षक आहेत. शाळेची भेट आटोपून आम्ही पायीच फ्लांग्टींगोर या गावी असलेल्या जीवनभॉय मेमोरीयल स्कुल् ला भेट देण्यासाठी उपाध्यक्षांच्य घरी जाण्यासाठी नीघालो त्यांनी आमच्या साठी मारुती कार ची व्यवस्था केली कारण ते गाव ३० कि.मी वर होते. ते गाव देखील उंचावर होते आणी रस्ता पायवाटेने होता.
|
climb to phlangtyngor school |
पुण्याहून गेलेले श्री प्र॑शांत महामुनी प्रथम् या गावात २ वर्षे राहीले ते घर मला मणी ने दाखवीले. केवळ खासी भाषा शिकता यावी या उद्देशाने या गावी २ वर्षे श्री प्रशांत राहिले त्या घराचा फोटो काढण्याचा मोह मी आवरु शकलो नाही. समाजऋण् फेडण्याच्या उद्देशाने या घरात अनोळखी गावी जेथे भाषा देखील माहीत नाही आणि मराठी किवा हिंदी चा गंधही तेथील लोकांना नाही तेथे रहाण्याची तीहि २ वर्षे कल्पनाच केलेली बरी.
|
house where prashantji stayed for 2 years |
Comments
रोचक
रोचक लेख. प्रशांतजींबद्दल सहमत आहे.
अवांतर : गावाचे नाव वाचून उत्सुकता वाटली. नावाचा स्थानिक भाषेत काही अर्थ असेल का? तसा असायलाच हवा असे अजिबात नाही. पिंपरी किंवा सोलापूरचा कुठे अर्थ आहे? विविध ठिकाणांची नावे कशी पडली याबद्दल कुणाला अधिक माहिती असल्यास वाचायला आवडेल. [मुंबईकडची नावे आंग्लाळलेली वाटतात. (सांताक्रूझ, चर्चगेट)]
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
माहिती भारी
मेघालयावर तुम्ही लिव्हीत राव्हा !
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
रोचक
माहिती चांगली आहे.. रोचक आहे
फक्त अगदीच साध्या कारणाने शाळा सोडलेले वाचून वाईट वाटले
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव