मेघालयातील गावाकडील सहल

शिलांग ला आल्यापासुन मेघालयातील खेडेगावात एक दिवस तरी राहावे असे मनात होते. माझे तेथील मार्गदर्शक श्री प्रशांत जी ना मी माझी इच्छा बोलुन दाखवीली. त्यांनी मणी मॉपॅक जो पेनुर्स्ला भागातील असुन तेथील कार्यकर्ता देखील आहे माझी ट्रीप आखण्याची व्यवस्था करण्यास सांगीतले. त्याप्रमाणे आम्ही शिलांग हुन टाटासुमो स्टँड वरुन पेनुर्स्ला साठी निघालो. हे अंतर अंदाजे ५० कि.मी आहे पण जाण्यास चांगले २ तास लागतात कारण रस्ता वळणदार आणी डोंगराळ.


Lyngkyrdem village

वाटेत लिन्गकिरडेम हे गाव लागते. येथे महाराष्ट्रात शिकलेला एक् मुलगा येथील सेंग खासी माध्यमिक शाळेत शिकवतो.


climb to village Lyngkyrdem

या गावात जाण्यासाठी अंदाजे ८० पायर्‍या लागतात

school ground at the backdrop is church which is common site at every village

शाळेला भव्य पटांगण होते ही सेंग खासी शाळा असुन ख्रिश्चन आक्रमणाला समर्थपणे तोंड देत आहे. मागे आ वासुन चर्च दिसत आहे

clean roads and houses in the village

शाळेला भेट दिल्यावर तेथे आमची ओळख शाळेचे सचिव श्री नाथासीघ लिम्बा यांच्याशी झाली त्यांनी घरी येण्याचे निमंत्रण दिले. त्यांच्या घरी जातांना स्वच्छ् रस्ते आणि रस्त्याच्या कडेला असलेली टुमदार घरे पाहुन या राज्याला पुर्वेकडील स्काटलॅण्ड
कां म्हणतात याची प्रचिती आली.

लेखनविषय: दुवे:

Comments

खरोखरच

स्वच्छ रस्ते आणि रस्त्याच्या कडेला असलेली टुमदार घरे पाहून ह्या राज्याला पूर्वेकडील स्कॉटलण्ड का म्हणतात त्याची प्रचिती आली.

शेवटचा फोटो कुठल्याही युरोपीय देशातील खेडेगावाचा फोटो म्हणून सहज खपून जाईल. :)

(पण त्या फोटोतील घराला तुरे का फुटलेत ते काही कळले नाही.)

--------------------------X--X-------------------------------
नाही निर्मळ जीवन, काय करील साबण |
तैसे 'चित्त' शुद्ध नाही तेथ बोध करील काई ||

स्वच्छ रस्ते खेड्यातील

तिकडे टीव्ही साठी बुस्टर लावावे लागतात. केबल ची सोय नाही खेड्यात तरी

विश्वास कल्याणकर

 
^ वर