मार्टिनिकचा सापाचा झेंडा
'साप हे मानवाचे मित्र आहे', हे दर्शवणारा 'नागपंचमी' हा सण आपण साजरा करतो.
जगात एखाद्या प्रदेशाच्या ध्वजावर/ झेंड्यावर सापाचे प्रतिक विराजमान झालेले मला माहित नव्हते.
मार्टिनिक ह्या प्रदेशाच्या ध्वजावर मार्टिनिकच्या स्थानिक प्रजातीच्या सापाचे प्रतिक रेखाटले आहे.
flag of martinique |
मार्टिनिक हे एक बेट पूर्व कॅरिबियन समुद्रात आहे. हा कॅरिबियन प्रदेशातील फ्रान्सचा एक विभाग आहे.
मार्टिनिकच्या झेंड्याला 'मार्टिनिकचा सापाचा झेंडा' असे संबोधतात. हा ध्वज 'अन्ऑफिशली' आता वापरला जातो. पण १७६६ सालापासून ह्या झेंड्याचा ऊपयोग मार्टिनिकची फ्रेंच वसाहत दाखवण्यासाठी केला जात होता. हा झेंडा निळ्या रंगाचा आहे. निळ्या रंगावर पांढर्या रंगाने अधिकचे चिन्ह रेखाटले आहे. अधिक चिन्हाच्या प्रत्येक चौकोनात 'L' (for Lucia ) आकाराचे साप रेखाटले आहे. 'फेर्-दे-लानस' (fer-de-lance) ह्या जातीचे हे विषारी साप आहे. हे साप मार्टिनिकच्या बेटावरच पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या सापांना विशेष महत्व प्राप्त झाले आणि त्यांना मार्टिनिकच्या झेंडयावर विराजमान होता आले.
Comments
वा
मार्टिनिक हे अजूनही फ्रेंच वसाहत आहे का?
(हा ध्वज भारी आहे.
नागालँडचा म्हणूनही खपावा!)
आवांतरः
असेही आपल्याकडे भारतात राज्यनिहाय ध्वज नाहीतच काय?
आपला
गुंडोपंत
मार्टिनिक - फ्रेंच वसाहत आहे
मार्टिनिक हे अजूनही फ्रेंच वसाहत आहे का?
मार्टिनिक हे अजूनही फ्रेंच वसाहत आहे. फ्रांस देशा बाहेर २६ फ्रेंच वसाहती (France overseas region) आहेत. मार्टिनिक हे युरोपियन युनियन मध्ये सामिल झालेले आहे. आणि ह्या प्रदेशाचे चलन 'युरो' आहे. युरो नोटेच्या मागच्या भागावर 'ΕΥΡΩ ' ह्या चिन्हाने ही नोट मार्टिनिक प्रदेशाची आहे असे दर्शवले जाते.
आवांतरः
असेही आपल्याकडे भारतात राज्यनिहाय ध्वज नाहीतच काय?
भारतात राज्याप्रमाणे वेगळे ध्वज 'ऑफिशयली' नाही आहे.
जम्मू आणि काश्मीर हे राज्य ह्याला अपवाद आहे. जम्मू आणि काश्मीरच्या ध्वजाची माहिती ह्या दूव्यावर इंग्रजीत वाचायला मिळेल.
भारताच्या राज्याची चिन्हे /प्रतीके वेगवेगळी आहेत.
भारत ह्या मराठी विकिवर बघितल्यास फारच थोडी माहिती हाती लागते.
इंग्रजीत India बघितल्यास अधिक सविस्तर माहिती मिळते. त्यात राज्याप्रमाणे ध्वजवेगळी आहेत अशी माहिती मिळाली नाही. (चू. भू. द्या. घ्या.)
नागालँडचे राज्य चिन्ह :
जम्मू आणि काश्मीरचा ध्वज
जम्मू आणि काश्मीरचा ध्वज:
२००७ ला जम्मू आणि काश्मीरचा ध्वज कसा वापरायचा हे राज्याच्या संविधानात - १४४व्या सेक्शनमध्ये नमुद केले आहे.
चिन्ह
असेच चिन्ह आधी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते पण मेंदूमध्ये मेमरी फॉल्ट येतो आहे. :-)
----
काही शक्यता
- लहानपणी खेळलेला सापशिडीचा खेळ
- वैद्यकीय क्षेत्रासंबंधीच्या चिन्हाचा अर्धभाग
यस्स!
लहानपणीचा सापशिडीचा खेळ. त्यावर असेच चिन्ह होते. तेव्हा शिडीपेक्षा सांपांशीच अधिक संबंध आल्याने चिन्ह लक्षात राहिले.*
*इथे "आणि नंतरही आयुष्यातील सापशिडीच्या खेळात नियतीने टाकलेल्या फाशांवर शिड्यांना भेटण्याचा योग क्वचितच आला." असे कैच्याकै, एखाद्या नुकत्याच सुरू झालेल्या ब्लॉगमध्ये शोभावे असे वाक्य टाकण्याचा मोह आवरत नाहिये.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
आयुष्याच्या खेळातील शिड्या
आयुष्याच्या खेळात शिड्यांना भेटण्याचा योग येणे आणि आलेल्या शिड्यांना ओळखता येऊन त्यांचा प्रत्यक्ष वापर केला जाणे यांच्यातील फरकही सूक्ष्म असला तरी चिंत्य आहे, हाही मुद्दा येथे लक्षात घेण्यासारखा आहे. यावरून एका असीम परमेश्वरभक्ताच्या आणि परमेश्वराच्या संवादाबद्दलची आणखी एक कथा आठवली. पण ती पुन्हा कधीतरी.
लिटिल् चॅम्प
मराठी सारेगमपच्या लिटिल् चॅम्पस मध्ये ह्या खेळाने रंगत आणली होती. गंमत बघ्यायला छान वाटत होते पण स्पर्धकाचे मुड साप की शिडी ? काय मीळणार ह्या संभ्रमात असायचे.
मुग्धा नेहमी सापाच्या तोंडाला पायाने मारायची.