अल्फा आणि ओमेगा

अल्फा आणि ओमेगा

काही कामानिमीत्त मी आंतरजालावर काहीं देशांचे झेंडे पाहात होते. त्यावेळेस स्पेनच्या अस्टुरीयास (Asturia) ह्या राज्याचा झेंडा मला पाहिला मिळाला.

झेंडा पाहाताना तराजूसारखा भास झाला, कानात डूल लटकत आहे असेही वाटले. पण दोन्ही डूलांचा आकार वेग वेगळा आहे. अरे ही तर अल्फा आणि ओमेगा ग्रीक मुळाक्षरे. ह्यांची ओळख आपल्याला रसायन व भौतिक शास्त्र विषय शिकतांना झालेली.

अल्फा आणि ओमेगा ही ग्रीक अक्षर ह्या झेंड्यावर अशी का लटकत आहे? कुतूहल वाढले म्हणून ह्या झेंड्याची अधिक माहिती वाचली.

flag of asturia

निळ्यारंगाच्या झेंडयावर सोनेरी रंगाचा येशूचा क्रॉस आहे. क्रॉसच्या आडव्या दांड्यावर उजव्या भागावर अल्फा हे अक्षर तर डाव्या भागावर ओमेगा हे अक्षर लटकवले आहे. ह्या अक्षरांचा सबंध थेट रेवेलशेन ह्या पुस्तकातून घेतला आहे. देव म्हणतो, मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी सुरूवात आणि शेवट आहे.

ग्रीक मुळाक्षरांनमधले अल्फा (uppercase Α, lowercase α ) हे १ पहिले अक्षर. सुरूवात, पहिले ह्या अर्थाने वापरले जाते.

ओमेगा (uppercase Ω , lowercase ω) हे २४वे म्हणजेच शेवटचे अक्षर. ओमेगा हे अक्षर ‘शेवट’ ह्या अर्थाने वापरले जाते.

'सुरूवात आणि शेवट', 'पहिला आणि शेवटचा' आहे हे सांगण्यासाठी अल्फा आणि ओमेगा (alpha and omega) असे एकत्रीत संबोधन केले जाते.
देव ह्या अर्थाने 'अल्फा आणि ओमेगा' (Revelation 22:13, KJV, and see also 1:8).) ह्याचे संबोधन केले जाते.

लेखनविषय: दुवे:

Comments

वा!

वा!
दगड, देव आणि कुंपण

नंतर
कापड, क्रॉस आणि झेंडा

सही आहे!

आपला
गुंडोपंत

आल्फा आणि ओमेगा

देव ह्या अर्थाने 'अल्फा आणि ओमेगा' (Revelation 22:13, KJV, and see also 1:8).) ह्याचे संबोधन केले जाते.

नक्की संदर्भ आठवत नाही, परंतु बायबलात कोठेतरी 'मी आल्फा आणि ओमेगा आहे' (म्हणजे 'मीच सुरुवात आणि शेवट आहे' अशा अर्थी) असे काहीसे वचन आहे ना? की हेच ते?

अवांतर: बायबलात दिल्याप्रमाणे येशू अनेकदा स्वतःला 'देवाचे लहानगे कोकरू' (गॉड्ज़ लिट्ल लँब') म्हणवून घेत असे असे वाटते. येशूच्या मातेचे नाव मेरी हे लक्षात घेता, 'मेरी हॅड अ लिट्ल लँब' ही बहुधा ख्रिस्तजन्माची कहाणी असावी अशी एक शंका आमच्या खोडसाळ मनाला उगाचच चाटून जाते. (अतिअवांतर: 'टू हॅव' म्हणजे 'जन्म देणे' असाही एक अर्थ होऊ शकतो. उदा. 'शी हॅड अ बेबी' = 'तिला बाळ झाले.')

बरोबर

नक्की संदर्भ आठवत नाही, परंतु बायबलात कोठेतरी 'मी आल्फा आणि ओमेगा आहे' (म्हणजे 'मीच सुरुवात आणि शेवट आहे' अशा अर्थी) असे काहीसे वचन आहे ना? की हेच ते?

बायबलातील संदर्भ हेच आहेत. रेव्हलेशन २२:१३ आणि १:८.

----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32

टु हॅव

अतिअवांतर: 'टू हॅव' म्हणजे 'जन्म देणे' असाही एक अर्थ होऊ शकतो.
यावरुन 'जॉन, व्हेअर जेम्स हॅड हॅड हॅड, हॅड, हॅड हॅड हॅड. हॅड हॅड हॅड हॅड टीचर्स ऍप्रूव्हल' ही वाक्ये आठवली!
सन्जोप राव
आजपर्यंत मेलो नाही म्हणून यापुढे मरणार नाही, असे नाही. किंबहुना आजपर्यंत मेलो नाही म्हणूनच यापुढे मरणार! - विनोबा

वाचलेले आहे, पण...

यावरुन 'जॉन, व्हेअर जेम्स हॅड हॅड हॅड, हॅड, हॅड हॅड हॅड. हॅड हॅड हॅड हॅड टीचर्स ऍप्रूव्हल' ही वाक्ये आठवली!

वाचलेले आहे, पण दुर्दैवाने फोड आणि अर्थ विसरलो.

काही अवतरणचिह्ने आवश्यक.

जॉन, ह्वेर जेम्स हॅड हॅड "हॅड", हॅड हॅड "हॅड हॅड". हॅड "हॅड हॅड" हॅड द टीचर्स अप्रूवल, देन जॉन वुड हॅव बिन राइट!

जेथे जेम्सचे "had" होते, त्या ठिकाणी जॉनचे "had had" होते. जर "had had"ला शिक्षकाचा होकार असता, तर जॉनचे बरोबर असते.

अवतरण चिह्ने इथे अत्यावश्यक आहेत, नाहीतर वाक्यखंड, श्वासखंड आणि आवाजाचा चढउतार ठरवता येत नाही. मोठ्याने उच्चारले, तर या वाक्याचा अर्थ बर्‍यापैकी स्पष्ट आहे.

हे वाक्य पहिल्यांदाच वाचतो आहे. सन्जोप रावांचे आभार. अन्वयाचा शोध गूगल शोधयंत्राने लगेच लागला.

आभार

स्पष्टीकरणाबद्दल आभारी आहे. (आता फोड लक्षात ठेवली पाहिजे. रोचक आहे.)

रोचक

रोचक माहिती. बायबलातील संदर्भही छान.

----

याचा 'ओम्'शी काही संबंध?

अल्फा आणि ओमेगा याचा (ओढून ताणून का होईना) 'ओम्'शी काही संबंध लावता येईल?

ओहम...

'ओहम' या विद्युतरोधाच्या एककाकरिता 'पहिल्या लिपीतला' (म्हणजे अपरकेस) ओमेगा हे चिन्ह वापरतात.

'ओहम' हा 'ॐ'चा अपभ्रंश आहे असे सिद्ध करता येईल काय?

तसा 'ॐ'चा 'बिग बँग'शी संबंध लावला जातो असे म्हणतात. त्यामुळे त्याचा 'ओहम'सारख्या क्षुल्लक गोष्टींशी संबंध लावणे हा भारतीय संस्कृतीचा आणि सनातनधर्माचा अपमान आहे, असे वाटते. ('थिंक बिग!' किंवा, 'नॉट फेल्युअर, बट लो एम इज़ अ क्राइम.')

तसेही 'ॐ' म्हणजे जर 'बिग बँग' असेल, तर ते (जगाच्या) सुरुवातीचे प्रतीक आहे. याउलट 'ओमेगा' म्हणजे खरे तर शेवटाचे प्रतीक. त्यामुळे 'ॐ' आणि 'ओमेगा' यांचा जर संबंध असेल, तर 'आपल्या'कडे जे सुरुवातीचे प्रतीक आहे ते 'पाश्चात्यां'कडे शेवटाचे प्रतीक आहे, असे म्हणावे लागेल. (या पाश्चात्यांचे सगळेच उलटे!) किंवा, 'पाश्चात्यांचे विश्व जेथे संपते तेथे आमचे विश्व सुरू होते' असाही दावा करता येईल.

जॉर्ज सायमन ओहम्

जॉर्ज सायमन ओहम् हा जर्मन वैज्ञानिक जर भारतीय वंशाचा असता, तर कदाचित तो मूळचा ॐ घराण्यातला होता असे म्हणायची संधी मिळाली असती.--वाचक्नवी

जर्मन...

... हे आर्यवंशीय, नाही का?

हो

हो, लक्षातच आले नाही. म्हणजे ओहम् हा मूळचा ॐ असायला हरकत नसावी.--वाचक्नवी

द्वारावरील प्रतीके

हिंदू संस्कृतित प्रवेश द्वारात स्वस्तिक आणि मागच्या परसद्वारात "ॐ" रेखाटण्याची प्रथा आहे असे वाटते.

 
^ वर