वरील चित्र-आलेखात जागतिक साथीचा स्तर "४" असा दिला आहे (म्हणजे जागतिक साथ "संभाव्य" आहे).
आता तो स्तर-६ (जागतिक साथ आहे हे निश्चित) असे ठरवले गेले आहे, आणि सर्व राष्ट्रीय सरकारांनी त्या प्रकारे उपाययोजना करावी, असा विश्व आरोग्य संघटनेचा सल्ला आहे.
(विनंती : संपादकांनी चित्रांचा आकार थोडा लहान केला तर ती माझ्या पडद्यावर नीट मावतील, आणि वाचायला सोय होईल.)
धन्यवाद, राजेंद्र.
यावर इटालियनमध्ये 'ग्रात्सि आ ते' (उलट तुम्हालाच धन्यवाद) असा चपखल बसणारा प्रतिसाद आठवतो.
चित्रांचा आकार लहान केल्याबद्दल संपादकांचेही अनेक आभार.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32 प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

चांगली उपयुक्त माहिती. आभार, राजेंद्र. (म्हणजे अरबीमध्ये 'शुकरन जाझिलन! ;-)
स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरसकट हाताला येतील ते मास्क वापरणे लोकांनी सुरु केले आहे. या मास्कसचा उपयोग फक्त मानसिक आधार इतकाच आहे. हा व्हायरल रोग असल्याने आणि व्हायरस हा बॅक्टेरियांपेक्षा अतिसूक्ष्म असल्याने तो साध्या फिल्टर मास्कमधून सहज इकडे जाऊ शकतो. त्यामुळे असे मास्क वापरण्याऐवजी दोन तीन पदरी जाड कापड नाका- तोंडाभोवती गुंडाळणे हा त्यातल्या त्यात उपयोगी मार्ग वाटतो.
स्वाईन फ्लू आणि साधा फ्लू यांमुळे मरणार्या लोकांची टक्केवारी सारखीच आहे. फक्त स्वाईन फ्लूचा प्रसार अधिक वेगात होतो आणि स्वाईन फ्लूचा विषाणू जनावरांमध्ये जिवंत राहातो, वाढतो. त्यामुळे स्वाईन फ्लू अधिक धोकादायक - म्हणजे नियंत्रण करायला अधिक कठीण आहे. स्वाईन फ्लूचा व्हायरस सध्या 'लो व्हिरुलन्स' म्हणजे कमी प्रादुर्भावक्षमतेचा आहे. व्हायरस हा स्वतःचा आकार बदलू शकत असल्याने त्याच्याविरुद्ध लस तयार करणे अवघड आहे. सध्या स्वाईन फ्लूवर उपलब्ध असणारी टॅमीफ्लूसारखी औषधे काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. ही औषधे सरसकट वापरली तर हा विषाणू या औषधानांही दाद देणार नाही. खरा प्रश्न मग उभा राहील.
स्वाईन फ्लूने मरणारे बहुतेक लोक हे इतर कोणत्यातरी आजाराने (दमा, हृदयविकार, मधुमेह, श्वसनसंस्थेचे आजार) त्रस्त असलेले - 'इम्युनोकॉम्प्रमाइजड्' असे असतात. या लोकांनी अधिक सावध राहायला हवे.
शेवटी स्वाईन फ्लूबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री विद्वान श्री. गुलाम नबी आजाद म्हणाले की येत्या दोन वर्षांत हा आजार ३३% भारतीयांना होण्याची शक्यता आहे, आणि काही मृत्यू तरी नक्की होतीलच!
जय हो!
सन्जोप राव
आजपर्यंत मेलो नाही म्हणून यापुढे मरणार नाही, असे नाही. किंबहुना आजपर्यंत मेलो नाही म्हणूनच यापुढे मरणार! - विनोबा
...(कोणी वापरावेत, योग्य रीत्या कसे वापरावेत वगैरे) या दुव्यावर मिळू शकेल.
एकंदरीत, आरोग्यसेवा पुरवणार्या व्यक्तींस किंवा अशा प्रकारच्या संस्थांत किंवा वातावरणांत काम करणार्या व्यक्तींस (डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी वगैरे) मास्कचा विशेष उपयोग आहे; सामान्य मनुष्यास मास्क वापरण्याची फारशी गरज अथवा विशेष फायदा नाही, परंतु तरीही वापरावासा वाटल्यास कसा वापरावा आणि काय काळजी घ्यावी, अशा स्वरूपाची प्राथमिक माहिती आहे.
(हा दुवा जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरून घेतला आहे.)
सध्या महाराष्ट्र् स्वाईन फ्लू साठी खूप गाजत आहे. काही शाळा, कॉलेजेसना १ आठवडा ते १० दिवस सूट्टी घोषित केली आहे. साधा वाटणारा आजार योग्य काळजी न घेतल्यास जीवावर बेतत आहे.
शुक्रवारी 'स्वाईन फ्ल्यू' या विषयासंदर्भात मुंबईतील राज्य इनफ्ल्यूएन्झा (एन१एच१) नियंत्रण केंद्राचे प्रमुख डॉ. प्रदिप आवटे यांची मुलाखतकार वासंती वर्तक यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीचे शब्दांकन महान्यूज च्या संकेतस्थळावर दिलेले आहे.
वा! चांगले संकलन व सविस्तर उत्तरे
मुळ धाग्याबद्दल राजेंद्र व या दुव्यांबद्द्ल अंजली ताईंचे आभार
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
आमच्या ऑफिसमध्ये स्वाईन फ्लूची काळजी घेण्यासाठी एक समिती बनवली आहे त्या समितीच्या सदस्यांना कोणाला सर्दी खोकल्या झाल्यास सांगायचे. ते सदस्य त्यांना योग्य सल्ला देणे, डॉक्टरांनाकडे घेऊन जाणे इ. काम करतात.
सर्दी खोकल्या झाल्यास त्या रोग्याला ऑफिशल सुट्टी , जबरदस्तीने घ्यावी लागते.
संगणक क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांनी इतर देशातून भारतात परत आल्यास आपली वैद्यकिय चाचणी करून घावी.

आता काय उपयोग? बहुतांश याच लोकांशी मैत्री करुन हा येथे आला. त्यापेक्षा असे म्हणूया की संगणक क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांनी इतर देशातून भारतात परत येण्याआधी आपली पुर्ण तपासणी करुन आणि योग्य उपचार करुनच परत या.

त्यापेक्षा असे म्हणूया की संगणक क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांनी इतर देशातून भारतात परत येण्याआधी आपली पुर्ण तपासणी करुन आणि योग्य उपचार करुनच परत या.
या रोगाचे आणि साथीचे गांभीर्य समजू शकतो, आणि आवश्यक आणि शक्य तेवढे प्रतिबंधक उपाय केलेच पाहिजेत, हेही मान्य. परंतु येथे थोडा अतिरेक होतो आहे असे वाटत नाही काय?
या रोगासाठी तूर्तास प्रतिबंधक लस उपलब्ध नाही (किंवा नुकतीच सापडली असे कोठेतरी वाचले परंतु बाजारात यायला बहुधा वेळ लागावा; अधिक माहिती बहुधा येथे मिळू शकावी.), आणि सामान्य फ्लूपेक्षा याचा विषाणू थोडा वेगळा आहे, त्यामुळे याविरुद्ध रोगप्रतिकारकक्षमता नाही आणि होण्याची शक्यता तूर्तास नाही. तसेच याकरिता औषधे उपलब्ध असली तरी साठा बहुधा मर्यादित असावा. या सर्व आणि इतरही कारणांस्तव ही साथ गंभीर आहे हे पटण्यासारखे आहे.
मात्र ही साथ गंभीर असली तरी, या रोगामुळे मृत्यू होण्याची शक्यता ही सामान्य फ्लूमुळे मृत्यू होण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक नाही. अन्य प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे मृत्यूची सर्वाधिक शक्यता अन्य कारणांमुळे ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती तुलनेने कमी आहे किंवा अगोदरच कमी झालेली आहे (उदा. बालके, वृद्ध, मधुमेही, एड्सचे रुग्ण, कर्करोगाकरिता काही विशिष्ट उपचार घेणारे रुग्ण) अशा लोकांमध्ये आहे. (हे सामान्य फ्लूलाही लागू आहे.) अशा लोकांनी विशेष काळजी घेण्याची आणि गरज पडल्यास उपचार घेण्याची गरज सर्वाधिक आहे. बहुतांश इतर रुग्णांमध्ये हा रोग काहीही उपचार न घेता बरा व्हावा. (या माहितीत काही चूक असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांनी ती जरूर सुधारावी.) तसेच एखाद्या रुग्णापासून हा रोग इतरांना पसरू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे हे खरे असले, तरी, ही काळजी (इतर प्रतिसादांत दिल्या गेलेल्या अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त दुव्यांवर दिल्याप्रमाणे) मुख्यतः शिंकताना किंवा खोकताना तोंडावर हात धरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, रुग्णाच्या अतिनिकट संपर्कात (गरज असल्याशिवाय) इतरांनी येणे शक्य तोवर टाळणे आणि एकंदर स्वच्छता राखणे अशा स्वरूपाची, अत्यंत प्राथमिक स्वरूपाची आणि पाळायला सोपी असून, सामान्य फ्लूचा फैलाव रोखण्याकरिता घेण्याच्या काळजीपेक्षा वेगळी नाही. या सर्व दृष्टीने हा रोग आणि ही साथ गंभीर असली तरी सामान्य फ्लूपेक्षा किंवा सामान्य फ्लूच्या साथीपेक्षा अधिक गंभीर नाही.
त्यामुळे उगाच अतिरेकी पॅनिकच्या आहारी जाऊन वागण्याची काही गरज आहे असे वाटत नाही. गंभीर लक्षणे दिसून आल्यास चाचणी करून घेणे योग्य आहे, परंतु काहीही लक्षणे नसताना उगाच भीतीपोटी तपासणी अनावश्यक असून अगोदरच समाजात कमी नसलेल्या विनाकारण पॅनिकला खतपाणी घालणे आहे. तसेच या रोगाचे निदान झालेल्या रुग्णाने सुट्टी घेणे किंवा त्यास तशी सुट्टी घेण्यास भाग पाडणे ही आवश्यक खबरदारी होऊ शकेल, किंवा साधी सर्दी किंवा खोकला झाल्यास तपासणी करून घेण्यास भाग पाडणेही समजण्यासारखे आहे, परंतु केवळ सर्दी किंवा खोकल्यासाठी सुट्टी घेण्यास भाग पाडणे हा निव्वळ अतिरेक आहे असे वाटते.
बाकी मानवी हालचालींबद्दल बोलायचे झाले, तर तेथेही अतिरेकी भयप्रतिक्रिया कामी येताना दिसत आहे. अर्थात देशात प्रवेश करणार्या मनुष्यास जर लक्षणे दिसून येत असतील तर त्याला क्वारंटाइन करणे हे केवळ योग्यच नव्हे, तर आवश्यकही आहे. परंतु सरसकट मानवी हालचालींवर निर्बंध आणण्यासारखे यात काहीही नाही. तसेच, या रोगाचा प्रादुर्भाव अद्याप ज्या राज्यांत नाही, अशा राज्यांनी तो प्रादुर्भाव असलेल्या राज्यांवर बहिष्कार टाकण्याची भाषा करणे, किंवा अशा प्रादुर्भाव नसणार्या राज्यांतील खाजगी कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना अशा राज्यांत खाजगी कारणांसाठी (उदा. घरच्यांना भेटून येण्यासाठी) गेल्यास स्वखर्चाने तपासणी केल्याशिवाय परत न येण्याची ताकीद देणे (माझ्या एका पुण्याच्या परंतु नोकरीनिमित्ताने कर्नाटकात राहणार्या नातलगास अशा प्रकारचा अनुभव नुकताच आला.) हे निव्वळ अतिरेकी आणि घातक प्रकार आहेत.
तसेही मानवी हालचालींवर सरसकट निर्बंध आणणे किंवा प्रादुर्भाव झालेल्या भागांना भेट देण्याचे टाळणे वगैरे अनावश्यक आहे, आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत त्याने रोगाचा फैलाव होण्याच्या प्रमाणात किंवा रोग होण्याच्या शक्यतेत काहीही फरक होणार नाही, अशा भागांस भेट देणे किंवा देण्याचे टाळणे यांतून रोग पकडण्याची किंवा न पकडण्याची शक्यता सारखीच आहे, त्यामुळे असे सरसकट निर्बंध लादून किंवा प्रवास टाळून फायदा तर काहीही होणार नाही, उलट (आधीच वाईट असलेल्या) अर्थव्यवस्थेस नुकसान मात्र पोहोचेल, असे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे असल्याचे समजते. (दोन आठवड्यांपूर्वी मेक्सिकोला सहकुटुंब सहपरिवार भेट देऊन आलो. पर्यटनाकरिता. जाण्यापूर्वी - किंवा खरे तर प्रवासयोजना निश्चित करण्यापूर्वी - मनात धाकधूक होती. त्यामुळे सीडीसी, जागतिक आरोग्य संघटना, मेक्सिकोचे आरोग्यखाते वगैरेंची संकेतस्थळे पालथी घालून जेथून जेवढी मिळेल तेवढी माहिती चाळत होतो. त्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर कोठेतरी असे विधान केलेले आढळले (दुवा). निर्धास्त होऊन जाऊन आलो. परत आल्यावर जर काही लक्षणे जाणवलीच, तर तपासणी करून घेऊ, असा विचार होता. सुदैवाने तशी गरज भासली नाही, आणि आता दोन आठवडे काहीही न होता उलटून गेल्यावर यापुढे ती शक्यताही वाटत नाही. परत आल्यावर कामाच्या ठिकाणीही अनेकांना माहीत असूनसुद्धा आजतागायत मला ओवळ्यातला असल्यासारखी वागणूक मिळालेली नाही. कोणी कधी प्रश्न विचारलाच, तर तो 'सहल कशी झाली?' अशा स्वरूपाचा असे. बाकी मेक्सिकोतसुद्धा तूर्तास अतिरेकी भयप्रक्रिया जाणवली नाही. विमानतळावर उतरल्यावर आप्रवासन/कस्टम्स तपासणी वगैरे झाल्यावर लगेच 'तुम्हास पुढीलपैकी कोणती लक्षणे जाणवत आहेत का?' अशा प्रकारचा एक सर्वेक्षणात्मक फॉर्म भरावयास देण्यात आला. त्यांतील सर्व प्रश्नांना 'नाही' असे उत्तर दिल्यावर अधिक कोणतेही प्रश्न न विचारता सोडून देण्यात आले. एखाद्या प्रवाशाने एखाद्या प्रश्नास 'हो' असे उत्तर दिल्यास अधिक काय काळजी घ्यावी, किंवा तपासणीची गरज वाटल्यास कोठे करून घेता येईल किंवा उपचारांची गरज भासल्यास कोठे करून घेता येतील, याबद्दल अधिक माहिती गरजेनुसार त्या प्रवाशास देता यावी, एवढ्या मर्यादित उद्देशाने हे सर्वेक्षण घेण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. कोणतीही अडवणूक झाली नाही. बाकी मेक्सिकोत सुरुवातीच्या काळात ही साथ जोरावर असताना मेक्सिको सोडताना कोणाला अशी लक्षणे दिसून आल्यास किंवा तशी अधिकार्यांस शंका आल्यास त्याची जागच्याजागी तपासणी करून उपचार पूर्ण होईपर्यंत मेक्सिकोत अडवून धरले जात असे आणि पूर्ण बरा होईपर्यंत मेक्सिको सोडता येत नसे असे ऐकले होते, परंतु परत येताना असा काही अनुभव आला नाही. तपासणी सोडा, साधा प्रश्नही विचारला गेला नाही. बाकी पर्यटनस्थळी वगैरे अनेक ठिकाणांहून अनेक माणसे येत असल्यामु़ळे लोकांमध्ये प्रादुर्भावाच्या भीतीची भावना अधिक असावी अशी समजूत होती, परंतु तेथेही अशी कोणती घबराट दिसली नाही. असो.)
शाळा बंद करणे हे लहान मुलांमध्ये एकंदरीतच रोगांचा प्रसार अधिक सहजपणे होण्याची शक्यता लक्षात घेता एक वेळ समजण्यासारखे आहे, परंतु तेथेही शाळा सरसकट बंद न करता प्रादुर्भाव झालेल्या मुलांना घरी राहावयास सांगणे असे काही करता येण्यासारखे नसावे काय, असा प्रश्न पडतो. (तशाही शाळा किती दिवस बंद ठेवणार हा प्रश्न उरतोच.)
बाकी, अशा प्रसंगी नेतेमंडळींकडून प्रथेस धरून येणार्या मूर्खपणाच्या आणि बेजबाबदार विधानांचे आता आश्चर्य वाटेनासे झाले असले, तरी त्याने परिस्थिती सुधारतही नाही, हेही तितकेच खरे. पुण्यात मृत्यू पावलेली शाळकरी मुलगी एका रुग्णालयातून दुसर्या रुग्णालयात जात असताना अनेकांमध्ये जंतू पसरवण्यास जबाबदार असण्याबाबतचे विधान काय किंवा गुजरातेत (?) मृत्यू पावलेल्या अनिवासी भारतीयाबद्दलचे 'या एनाराय लोकांचे सोशल सर्कल मोठे असते, ते कोठून ना कोठून जंतू मिळवतात आणि पसरवतात' अशा छापाचे विधान काय, केवळ बेजबाबदार आणि विकृत ('ज्यू लोक अनेक रोगांचे जंतू बाळगून असतात आणि पसरवतात' या नाझी अपप्रचाराची आठवण झाल्यावाचून राहत नाही.) असते तरी पुरेसे वाईट होते, परंतु आधीच बिकट असलेल्या परिस्थितीत लोकांमध्ये चुकीचे समज आणि द्वेष पसरवू शकणारे म्हणून अधिक धोकादायक आहे. परंतु दुर्दैवाने अनपेक्षित नाही.
या सर्व प्रकरणात मला न कळलेली आणखी एक गोष्ट ती अशी: पुरेशी संसाधने उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णालये या रोगाचे निदान किंवा इलाज करण्यास असमर्थ असू शकतील हे समजण्यासारखे आहे, आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अशी संसाधने उपलब्ध असणेही शक्य आहे, परंतु म्हणून खाजगी रुग्णालयांतून उपचार करून घेणे हे बेकायदेशीर आणि खाजगी रुग्णालयांनी असे उपचार करणे हा गुन्हा का ठरावा? (पुण्यात मृत्यू पावलेल्या मुलीच्या बाबतीत तिच्यावर प्रथम ज्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले त्या रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा सरकारचा विचार असल्याबद्दल एक विधान वाचनात आले.) अशा गंभीर सामाजिक परिस्थितीत ज्यांनाज्यांना म्हणून शक्य आहे अशा सर्व पात्र व्यक्ती आणि संस्थांनी मैदानात उतरणे इष्ट नाही काय? आणि पात्र असल्यास आणि शक्य असल्यास उपचार करणे हा गुन्हा का ठरावा?
बाकी, नाट्यगृहे, सिनेमाघरे अशा सार्वजनिक (आणि बंदिस्त) ठिकाणी, सार्वजनिक वाहनांत (उदा. मुंबईच्या लोकलमध्ये) किंवा त्याहीपेक्षा (लवकरच येऊ घातलेल्या) सार्वजनिक गणेशोत्सवात आणि विशेषतः गणेशविसर्जनाच्या मिरवणुकींत वगैरेही अनेक लोकांची गर्दी झाल्याने रोगाचा फैलाव होण्याची शक्यता पुष्कळ (किंबहुना ऑफिसमध्ये कोणीतरी शिंकण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक) असू शकते. त्याबद्दल काही प्रतिबंधक योजना विचाराधीन आहे अथवा नाही हे कळले नाही.
एकंदरीत, या रोगाचे आणि साथीचे गांभीर्य लक्षात घेतले, तरीसुद्धा त्यावरील प्रतिक्रियेत आणि हाताळणीत अतिरेक होत आहे, आणि 'रोग परवडला, पण हाताळणी नको' असे म्हणणे जरी योग्य नसले, तरी 'रोग वाईट, पण त्यापेक्षाही प्रतिक्रिया आणि हाताळणी अधिक वाईट' अशी परिस्थिती होत आहे, असे वाटते. चूभूद्याघ्या.
अतिरेक तर नक्कीच होतो आहे. तुम्ही बरेच मुद्दे लिहिले आहेतच. पण भारतातला एक मुद्दा असा आहे कि अतिरेक हा आमचा स्वभाव आहे. मग तो अतिरेक अस्वच्छतेचा असो, अथवा अशा प्रसांगांच्यावेळी शास्त्रीय दृष्टिकोन न ठेवण्याचा असो की प्रसांगाचा वापर राजकिय करण्यासाठी असो. अतिरेक तर होतोच.
सार्वजनीक गणोशोत्सव त्या निमित्ताने नाही साजरा केला तर त्याचा समाजाला फायदा नक्कीच आहे. पण त्याच वेळी ऑफिसच्या वातानुकुलन यंत्रणेमुळे एकजण बाधीत असला तरी इतरांना लागण होण्याची शक्यता जास्त. कदाचित आधी कार्यालयात लागण होईल आणि गणेशोत्सवात प्रसार.
पुरेशी संसाधने उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णालये या रोगाचे निदान किंवा इलाज करण्यास असमर्थ असू शकतील हे समजण्यासारखे आहे, आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अशी संसाधने उपलब्ध असणेही शक्य आहे, परंतु म्हणून खाजगी रुग्णालयांतून उपचार करून घेणे हे बेकायदेशीर आणि खाजगी रुग्णालयांनी असे उपचार करणे हा गुन्हा का ठरावा? (पुण्यात मृत्यू पावलेल्या मुलीच्या बाबतीत तिच्यावर प्रथम ज्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले त्या रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा सरकारचा विचार असल्याबद्दल एक विधान वाचनात आले.)
या संबंधात माझी ऐकीव माहिती अशी.
जहांगिर व रूबीहॉल यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
या प्रकारचा विषाणू कुठल्या प्रकारच्या प्रयोगशाळेत तपासला जाऊ शकतो याबद्दल WHO चे काही नियम आहेत. (याबद्दल तांत्रिक माहिती नाही. :-( ). पुण्यातील रूबीहॉलमध्ये याची चाचणी का करण्यात आली?
अशा प्रकारचा रूग्ण आढळल्यास तातडीने आरोग्य खात्याला कळवणे गरजेचे होते. तसे का केले नाही?
स्वाईन फ्लूची लक्षणे दिसल्याबरोबर तपासणी का केली नाही? त्यात दिरंगाई का?
टॅमी फ्लू सर्वत्र उपलब्ध करणार असल्याचे आज वाचले. हे आधी करता आले असते का? याबद्दल असे कारण दिले जात होते
की उठसूठ सर्वांनी टॅमी फ्लू घेतल्यास विषाणू त्याला रेझिस्टंट होतील. यात कितपत तथ्य आहे कल्पना नाही.
हे लिहीत असतानाच दादरला दहीहंडीसाठी गर्दी जमत असल्याचे विहंगम दृश्य पाहिले. च्यानेलवाला याला मुंबईचे स्पिरीट म्हणत होता. इथे आमची मती खुंटते.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32

माहितीबद्दल आभारी आहे. (थोडक्यात, procedural issues. अधिक तांत्रिक माहितीअभावी, नेमके कोणी काय केले अथवा केले नाही याबद्दलच्या तपशिलांअभावी आणि दुसर्या बाजूच्या म्हणण्याबद्दलच्या माहितीअभावी अधिक बोलणे फोल आहे.)
(मात्र यातून पुढे जर कधी खाजगी रुग्णालयांना मैदानात उतरू देण्याचा निर्णय घेतला गेला, तर त्यांनी कारवाईच्या भीतीपोटी मैदानात उतरण्यास नाकारण्याची परिस्थिती येऊ नये ही आशा आहे.)

'उठसूठ सर्वांनी टॅमिफ्लू घेतल्यास विषाणू त्याला रेझिस्टंट होतील' या म्हणण्यात तथ्य आहे खरे, परंतु हे समजण्याची आणि त्याप्रमाणे जबाबदारीने औषध प्रिस्क्राइब करण्याची कुवत खाजगी रुग्णालयांत नसते, केवळ सरकारी रुग्णालयांत असते, हे (सरकारी) गृहीतक समजू शकत नाही. (तसेही हे प्रिस्क्रिप्शन मेडिकेशन आहे, ओव्हर द काउंटर नव्हे की वाटेल त्याने उठून वाटेल तेव्हा विकत घ्यावे आणि वाटेल तितके खावे. आणि अनेकदा भारतात ओळख असली तर केमिस्ट प्रिस्क्रिप्शन औषधे - विशेषतः पेशंटच्या नेहमीच्या वापरातील असल्यास - प्रिस्क्रिप्शनशिवायसुद्धा विकतात हे जरी खरे असले, तरी ते सहसा बेजबाबदार नसावेत असे पूर्वानुभवावरून तरी वाटते, आणि खास करून सध्याच्या माहौलात त्यांच्याकडून विशेष जबाबदारीच्या जाणिवेची अपेक्षा करणे फोल नसावे.)

कारणे दाखवा नोटीस प्रोसीजरल इश्श्युजबद्दल असली तरी ती पाठवण्याचे कारण म्हणजे रूग्णालयावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. निदान लवकर होऊन औषधोपचार सुरू केले असते तर मुलीचा जीव वाचू शकला असता असे संबंधितांचे म्हणणे आहे.

सामान्यतः डॉक्टरवर किंवा रुग्णालयावर पेशंटने किंवा पेशंटच्या नातेवाइकांनी मेडिकल मॅल्प्रॅक्टिसची तक्रार दाखल करण्याच्या घटनांबद्दल आजवर ऐकले होते. डॉक्टरवर किंवा रुग्णालयावर प्रतिस्पर्धी आरोग्यसंस्थेने दाखल केलेल्या मॅल्प्रॅक्टिसच्या तक्रारीचे निदान माझ्या माहितीतले तरी हे पहिलेच उदाहरण असावे. असो.
हा रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, झाला असल्यास काय काळजी घ्यावी, मास्क वापरावेत किंवा नाही, औषध घेणे कधी योग्य आणि कधी अयोग्य, उपचार कधी घ्यावेत, हा रोग झालेल्या मातेने बाळाला स्तनपान करावे किंवा नाही, वगैरे प्रश्नांबद्दल सामान्य माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरील या दुव्यावर मिळू शकेल. तसेच, काय-करावे-आणि-काय-करू-नये (Do's and Don't's) या स्वरूपाची माहिती अत्यंत संक्षिप्त स्वरूपात त्याच संकेतस्थळावरील या दुव्यावरही मिळू शकेल.
यानिमित्ताने परत एकदा शासनाची बेफिकीरी/अनास्था समोर आली आहे. समारंभ टाळावेत असा आदेश काढलेला असतानाच पुलाच्या नामकरणासाठी जमलेल्या राजकारण्यांचे चित्र बघायला मिळते. इतके होऊनही निरुपम दहीहंडी करणारच असे म्हणतात. हा रोग धोकादायक नसला तरी त्याविषयी बेफिकीरी दाखवल्यास तो धोकादायक होऊ शकतो, नव्हे झाला आहे. यासंबंधात सुरूवातीपासूनचे शासनाचे निर्णय पाहिले तर असे लक्षात येते की परिस्थितीचे गांभीर्य संबंधित अधिकार्यांना कधीही पूर्णपणे कळले होते असे वाटत नाही. 'शाळा बंद करणे हा उपाय नाही', मग काही मृत्यू झाल्यावर शाळा बंद करणे अशा प्रकारचे धरसोड धोरण ही आपली पहिल्यापासूनची खासियत आहे. रोगाचा प्रादुर्भाव थांबयावचा असेल तर उपाय एक पाउल पुढे असावे लागतात. आपले उपाय नेहेमी एक पाउल मागे असतात.
यामध्ये मृत्यू झाले नसते तर शासन आणि लोक आत्ता आहेत तितके तरी जागरूक झाले असते का? (आताच मालेगावमध्ये सात जण गॅस्ट्रोमुळे बळी गेल्याचे वाचले.)
तात्पर्य : आपल्या देशात प्राणांचे मोल नाही.

राजेंद्र तात्पर्य बरोबर आहे आणि ते त्रिकालाबाधीत सत्य आहे.
भारताला उगाच सध्याची आणि भविष्यातली मोठी बाजारपेठ म्हणत नाही. कोणीही यावे आणि लोकांना मुर्ख बनवुन जावे. मंत्र्यांचे म्हणणे वाचले असेलच की जगात कुठेही लस तयार झाल्यास वाट्टेल त्या किमतीला विकत घेऊ. मला तर पुढची बाजारपेठ दिसते आहे. प्राणांचे मोल नाही असे म्हणतोस? काही प्राण जाऊन देशांच्या अर्थव्यवस्थांची घडी बसणार असेल तर आपल्या देशातच प्राणांचे खरे मोल आहे :)
तहान लागली की विहिर खणणार, इथे कोणी संशोधन करायला अडवलं होतं का?
सामान्यतः अशा प्रकारचे सर्व आंतरराष्ट्रीय प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना कोऑर्डिनेट (मराठी?) करते, असे वाटते. (म्हणजे लस निर्माण करण्यासाठी आवश्यक असणार्या विषाणूंच्या वाटपापासून ते लस बनवल्यानंतर त्याच्या चाचण्या आणि चाचण्यांनंतर आवश्यक तेथे उपलब्ध करून देणे येथपर्यंत.) यात काही गैर किंवा कमीपणाचे आहे असे वाटत नाही. हा प्रश्न एकट्या भारताचा नाही, जागतिक आहे, त्यामुळे यात जागतिक प्रयत्न आणि सहकार्य आणि त्यांचे कोऑर्डिनेशन हे होणारच, नव्हे आवश्यक आणि योग्यच आहे.
स्वाइन फ़्लूचे निमित्त करून प्रसारमाध्यमांनी उडवलेल्या धुराळ्याबद्दल १३ ऑगस्टच्या लोकसत्ताच्या पुरवणीतला पळा रे पळा.. आकाश पडलं..! हा लेख वाचण्यासारखा आहे.--वाचक्नवी
Comments
उतम - (मात्र आता साथीचा जागतिक स्तर ६)
वरील चित्र-आलेखात जागतिक साथीचा स्तर "४" असा दिला आहे (म्हणजे जागतिक साथ "संभाव्य" आहे).
आता तो स्तर-६ (जागतिक साथ आहे हे निश्चित) असे ठरवले गेले आहे, आणि सर्व राष्ट्रीय सरकारांनी त्या प्रकारे उपाययोजना करावी, असा विश्व आरोग्य संघटनेचा सल्ला आहे.
(विनंती : संपादकांनी चित्रांचा आकार थोडा लहान केला तर ती माझ्या पडद्यावर नीट मावतील, आणि वाचायला सोय होईल.)
धन्यवाद, राजेंद्र.
धन्यवाद
धन्यवाद, राजेंद्र.
यावर इटालियनमध्ये 'ग्रात्सि आ ते' (उलट तुम्हालाच धन्यवाद) असा चपखल बसणारा प्रतिसाद आठवतो.
चित्रांचा आकार लहान केल्याबद्दल संपादकांचेही अनेक आभार.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
उपयुक्त माहिती
धन्यवाद. सध्याच्या परिस्थितीत अत्यंत उपयोगाची आणि व्यवस्थित मार्गदर्शन करणारी माहिती.
चांगली माहिती. आणखी थोडे
चांगली उपयुक्त माहिती. आभार, राजेंद्र. (म्हणजे अरबीमध्ये 'शुकरन जाझिलन! ;-)
स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरसकट हाताला येतील ते मास्क वापरणे लोकांनी सुरु केले आहे. या मास्कसचा उपयोग फक्त मानसिक आधार इतकाच आहे. हा व्हायरल रोग असल्याने आणि व्हायरस हा बॅक्टेरियांपेक्षा अतिसूक्ष्म असल्याने तो साध्या फिल्टर मास्कमधून सहज इकडे जाऊ शकतो. त्यामुळे असे मास्क वापरण्याऐवजी दोन तीन पदरी जाड कापड नाका- तोंडाभोवती गुंडाळणे हा त्यातल्या त्यात उपयोगी मार्ग वाटतो.
स्वाईन फ्लू आणि साधा फ्लू यांमुळे मरणार्या लोकांची टक्केवारी सारखीच आहे. फक्त स्वाईन फ्लूचा प्रसार अधिक वेगात होतो आणि स्वाईन फ्लूचा विषाणू जनावरांमध्ये जिवंत राहातो, वाढतो. त्यामुळे स्वाईन फ्लू अधिक धोकादायक - म्हणजे नियंत्रण करायला अधिक कठीण आहे. स्वाईन फ्लूचा व्हायरस सध्या 'लो व्हिरुलन्स' म्हणजे कमी प्रादुर्भावक्षमतेचा आहे. व्हायरस हा स्वतःचा आकार बदलू शकत असल्याने त्याच्याविरुद्ध लस तयार करणे अवघड आहे. सध्या स्वाईन फ्लूवर उपलब्ध असणारी टॅमीफ्लूसारखी औषधे काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. ही औषधे सरसकट वापरली तर हा विषाणू या औषधानांही दाद देणार नाही. खरा प्रश्न मग उभा राहील.
स्वाईन फ्लूने मरणारे बहुतेक लोक हे इतर कोणत्यातरी आजाराने (दमा, हृदयविकार, मधुमेह, श्वसनसंस्थेचे आजार) त्रस्त असलेले - 'इम्युनोकॉम्प्रमाइजड्' असे असतात. या लोकांनी अधिक सावध राहायला हवे.
शेवटी स्वाईन फ्लूबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री विद्वान श्री. गुलाम नबी आजाद म्हणाले की येत्या दोन वर्षांत हा आजार ३३% भारतीयांना होण्याची शक्यता आहे, आणि काही मृत्यू तरी नक्की होतीलच!
जय हो!
सन्जोप राव
आजपर्यंत मेलो नाही म्हणून यापुढे मरणार नाही, असे नाही. किंबहुना आजपर्यंत मेलो नाही म्हणूनच यापुढे मरणार! - विनोबा
मास्कबद्दल काही प्राथमिक माहिती...
...(कोणी वापरावेत, योग्य रीत्या कसे वापरावेत वगैरे) या दुव्यावर मिळू शकेल.
एकंदरीत, आरोग्यसेवा पुरवणार्या व्यक्तींस किंवा अशा प्रकारच्या संस्थांत किंवा वातावरणांत काम करणार्या व्यक्तींस (डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी वगैरे) मास्कचा विशेष उपयोग आहे; सामान्य मनुष्यास मास्क वापरण्याची फारशी गरज अथवा विशेष फायदा नाही, परंतु तरीही वापरावासा वाटल्यास कसा वापरावा आणि काय काळजी घ्यावी, अशा स्वरूपाची प्राथमिक माहिती आहे.
(हा दुवा जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरून घेतला आहे.)
चांगली माहिती
चांगल्या माहितीबद्दल धन्यवाद.
सध्या महाराष्ट्र् स्वाईन फ्लू साठी खूप गाजत आहे. काही शाळा, कॉलेजेसना १ आठवडा ते १० दिवस सूट्टी घोषित केली आहे. साधा वाटणारा आजार योग्य काळजी न घेतल्यास जीवावर बेतत आहे.
स्वाईन फ्लूची मराठीत दिलेली माहिती ह्या दूव्यावर पाहा
मराठीत माहिती....
स्वाईन फ्लूची मराठीत दिलेली माहिती ह्या दूव्यावर पाहा
मराठी भाषेत असलेल्या माहितीचा दुवा दिल्याबद्दल आपले मनापासून आभार !
-दिलीप बिरुटे
तुळस
तुळशीच्या २०-२५ ताजा पानांचा रस दिवसातून २ वेळा रिकाम्या पोटी घेतल्यास स्वाईन फ्लु लवकर बरा होण्यास मदत होते असे आयुर्वेदिक तज्ञांचे मत आहे.
महान्यूज
शुक्रवारी 'स्वाईन फ्ल्यू' या विषयासंदर्भात मुंबईतील राज्य इनफ्ल्यूएन्झा (एन१एच१) नियंत्रण केंद्राचे प्रमुख डॉ. प्रदिप आवटे यांची मुलाखतकार वासंती वर्तक यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीचे शब्दांकन महान्यूज च्या संकेतस्थळावर दिलेले आहे.
अशी घ्यावी स्वाईन फ्ल्यूची काळजी भाग-१
अशी घ्यावी स्वाईन फ्ल्यूची काळजी भाग-२
चांगले संकलन
वा! चांगले संकलन व सविस्तर उत्तरे
मुळ धाग्याबद्दल राजेंद्र व या दुव्यांबद्द्ल अंजली ताईंचे आभार
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
काळजी घेणे
प्रत्येकाने आपली काळजी घ्या!.
आमच्या ऑफिसमध्ये स्वाईन फ्लूची काळजी घेण्यासाठी एक समिती बनवली आहे त्या समितीच्या सदस्यांना कोणाला सर्दी खोकल्या झाल्यास सांगायचे. ते सदस्य त्यांना योग्य सल्ला देणे, डॉक्टरांनाकडे घेऊन जाणे इ. काम करतात.
सर्दी खोकल्या झाल्यास त्या रोग्याला ऑफिशल सुट्टी , जबरदस्तीने घ्यावी लागते.
संगणक क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांनी इतर देशातून भारतात परत आल्यास आपली वैद्यकिय चाचणी करून घावी.
आता काय?
आता काय उपयोग? बहुतांश याच लोकांशी मैत्री करुन हा येथे आला. त्यापेक्षा असे म्हणूया की संगणक क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांनी इतर देशातून भारतात परत येण्याआधी आपली पुर्ण तपासणी करुन आणि योग्य उपचार करुनच परत या.
सहमत
कर्मचार्यांनी इतर देशातून भारतात परत येण्याआधी आपली पुर्ण तपासणी करुन आणि योग्य उपचार करुनच परत या.
सहमत.
अतिरेक
या रोगाचे आणि साथीचे गांभीर्य समजू शकतो, आणि आवश्यक आणि शक्य तेवढे प्रतिबंधक उपाय केलेच पाहिजेत, हेही मान्य. परंतु येथे थोडा अतिरेक होतो आहे असे वाटत नाही काय?
या रोगासाठी तूर्तास प्रतिबंधक लस उपलब्ध नाही (किंवा नुकतीच सापडली असे कोठेतरी वाचले परंतु बाजारात यायला बहुधा वेळ लागावा; अधिक माहिती बहुधा येथे मिळू शकावी.), आणि सामान्य फ्लूपेक्षा याचा विषाणू थोडा वेगळा आहे, त्यामुळे याविरुद्ध रोगप्रतिकारकक्षमता नाही आणि होण्याची शक्यता तूर्तास नाही. तसेच याकरिता औषधे उपलब्ध असली तरी साठा बहुधा मर्यादित असावा. या सर्व आणि इतरही कारणांस्तव ही साथ गंभीर आहे हे पटण्यासारखे आहे.
मात्र ही साथ गंभीर असली तरी, या रोगामुळे मृत्यू होण्याची शक्यता ही सामान्य फ्लूमुळे मृत्यू होण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक नाही. अन्य प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे मृत्यूची सर्वाधिक शक्यता अन्य कारणांमुळे ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती तुलनेने कमी आहे किंवा अगोदरच कमी झालेली आहे (उदा. बालके, वृद्ध, मधुमेही, एड्सचे रुग्ण, कर्करोगाकरिता काही विशिष्ट उपचार घेणारे रुग्ण) अशा लोकांमध्ये आहे. (हे सामान्य फ्लूलाही लागू आहे.) अशा लोकांनी विशेष काळजी घेण्याची आणि गरज पडल्यास उपचार घेण्याची गरज सर्वाधिक आहे. बहुतांश इतर रुग्णांमध्ये हा रोग काहीही उपचार न घेता बरा व्हावा. (या माहितीत काही चूक असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांनी ती जरूर सुधारावी.) तसेच एखाद्या रुग्णापासून हा रोग इतरांना पसरू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे हे खरे असले, तरी, ही काळजी (इतर प्रतिसादांत दिल्या गेलेल्या अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त दुव्यांवर दिल्याप्रमाणे) मुख्यतः शिंकताना किंवा खोकताना तोंडावर हात धरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, रुग्णाच्या अतिनिकट संपर्कात (गरज असल्याशिवाय) इतरांनी येणे शक्य तोवर टाळणे आणि एकंदर स्वच्छता राखणे अशा स्वरूपाची, अत्यंत प्राथमिक स्वरूपाची आणि पाळायला सोपी असून, सामान्य फ्लूचा फैलाव रोखण्याकरिता घेण्याच्या काळजीपेक्षा वेगळी नाही. या सर्व दृष्टीने हा रोग आणि ही साथ गंभीर असली तरी सामान्य फ्लूपेक्षा किंवा सामान्य फ्लूच्या साथीपेक्षा अधिक गंभीर नाही.
त्यामुळे उगाच अतिरेकी पॅनिकच्या आहारी जाऊन वागण्याची काही गरज आहे असे वाटत नाही. गंभीर लक्षणे दिसून आल्यास चाचणी करून घेणे योग्य आहे, परंतु काहीही लक्षणे नसताना उगाच भीतीपोटी तपासणी अनावश्यक असून अगोदरच समाजात कमी नसलेल्या विनाकारण पॅनिकला खतपाणी घालणे आहे. तसेच या रोगाचे निदान झालेल्या रुग्णाने सुट्टी घेणे किंवा त्यास तशी सुट्टी घेण्यास भाग पाडणे ही आवश्यक खबरदारी होऊ शकेल, किंवा साधी सर्दी किंवा खोकला झाल्यास तपासणी करून घेण्यास भाग पाडणेही समजण्यासारखे आहे, परंतु केवळ सर्दी किंवा खोकल्यासाठी सुट्टी घेण्यास भाग पाडणे हा निव्वळ अतिरेक आहे असे वाटते.
बाकी मानवी हालचालींबद्दल बोलायचे झाले, तर तेथेही अतिरेकी भयप्रतिक्रिया कामी येताना दिसत आहे. अर्थात देशात प्रवेश करणार्या मनुष्यास जर लक्षणे दिसून येत असतील तर त्याला क्वारंटाइन करणे हे केवळ योग्यच नव्हे, तर आवश्यकही आहे. परंतु सरसकट मानवी हालचालींवर निर्बंध आणण्यासारखे यात काहीही नाही. तसेच, या रोगाचा प्रादुर्भाव अद्याप ज्या राज्यांत नाही, अशा राज्यांनी तो प्रादुर्भाव असलेल्या राज्यांवर बहिष्कार टाकण्याची भाषा करणे, किंवा अशा प्रादुर्भाव नसणार्या राज्यांतील खाजगी कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना अशा राज्यांत खाजगी कारणांसाठी (उदा. घरच्यांना भेटून येण्यासाठी) गेल्यास स्वखर्चाने तपासणी केल्याशिवाय परत न येण्याची ताकीद देणे (माझ्या एका पुण्याच्या परंतु नोकरीनिमित्ताने कर्नाटकात राहणार्या नातलगास अशा प्रकारचा अनुभव नुकताच आला.) हे निव्वळ अतिरेकी आणि घातक प्रकार आहेत.
तसेही मानवी हालचालींवर सरसकट निर्बंध आणणे किंवा प्रादुर्भाव झालेल्या भागांना भेट देण्याचे टाळणे वगैरे अनावश्यक आहे, आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत त्याने रोगाचा फैलाव होण्याच्या प्रमाणात किंवा रोग होण्याच्या शक्यतेत काहीही फरक होणार नाही, अशा भागांस भेट देणे किंवा देण्याचे टाळणे यांतून रोग पकडण्याची किंवा न पकडण्याची शक्यता सारखीच आहे, त्यामुळे असे सरसकट निर्बंध लादून किंवा प्रवास टाळून फायदा तर काहीही होणार नाही, उलट (आधीच वाईट असलेल्या) अर्थव्यवस्थेस नुकसान मात्र पोहोचेल, असे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे असल्याचे समजते. (दोन आठवड्यांपूर्वी मेक्सिकोला सहकुटुंब सहपरिवार भेट देऊन आलो. पर्यटनाकरिता. जाण्यापूर्वी - किंवा खरे तर प्रवासयोजना निश्चित करण्यापूर्वी - मनात धाकधूक होती. त्यामुळे सीडीसी, जागतिक आरोग्य संघटना, मेक्सिकोचे आरोग्यखाते वगैरेंची संकेतस्थळे पालथी घालून जेथून जेवढी मिळेल तेवढी माहिती चाळत होतो. त्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर कोठेतरी असे विधान केलेले आढळले (दुवा). निर्धास्त होऊन जाऊन आलो. परत आल्यावर जर काही लक्षणे जाणवलीच, तर तपासणी करून घेऊ, असा विचार होता. सुदैवाने तशी गरज भासली नाही, आणि आता दोन आठवडे काहीही न होता उलटून गेल्यावर यापुढे ती शक्यताही वाटत नाही. परत आल्यावर कामाच्या ठिकाणीही अनेकांना माहीत असूनसुद्धा आजतागायत मला ओवळ्यातला असल्यासारखी वागणूक मिळालेली नाही. कोणी कधी प्रश्न विचारलाच, तर तो 'सहल कशी झाली?' अशा स्वरूपाचा असे. बाकी मेक्सिकोतसुद्धा तूर्तास अतिरेकी भयप्रक्रिया जाणवली नाही. विमानतळावर उतरल्यावर आप्रवासन/कस्टम्स तपासणी वगैरे झाल्यावर लगेच 'तुम्हास पुढीलपैकी कोणती लक्षणे जाणवत आहेत का?' अशा प्रकारचा एक सर्वेक्षणात्मक फॉर्म भरावयास देण्यात आला. त्यांतील सर्व प्रश्नांना 'नाही' असे उत्तर दिल्यावर अधिक कोणतेही प्रश्न न विचारता सोडून देण्यात आले. एखाद्या प्रवाशाने एखाद्या प्रश्नास 'हो' असे उत्तर दिल्यास अधिक काय काळजी घ्यावी, किंवा तपासणीची गरज वाटल्यास कोठे करून घेता येईल किंवा उपचारांची गरज भासल्यास कोठे करून घेता येतील, याबद्दल अधिक माहिती गरजेनुसार त्या प्रवाशास देता यावी, एवढ्या मर्यादित उद्देशाने हे सर्वेक्षण घेण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. कोणतीही अडवणूक झाली नाही. बाकी मेक्सिकोत सुरुवातीच्या काळात ही साथ जोरावर असताना मेक्सिको सोडताना कोणाला अशी लक्षणे दिसून आल्यास किंवा तशी अधिकार्यांस शंका आल्यास त्याची जागच्याजागी तपासणी करून उपचार पूर्ण होईपर्यंत मेक्सिकोत अडवून धरले जात असे आणि पूर्ण बरा होईपर्यंत मेक्सिको सोडता येत नसे असे ऐकले होते, परंतु परत येताना असा काही अनुभव आला नाही. तपासणी सोडा, साधा प्रश्नही विचारला गेला नाही. बाकी पर्यटनस्थळी वगैरे अनेक ठिकाणांहून अनेक माणसे येत असल्यामु़ळे लोकांमध्ये प्रादुर्भावाच्या भीतीची भावना अधिक असावी अशी समजूत होती, परंतु तेथेही अशी कोणती घबराट दिसली नाही. असो.)
शाळा बंद करणे हे लहान मुलांमध्ये एकंदरीतच रोगांचा प्रसार अधिक सहजपणे होण्याची शक्यता लक्षात घेता एक वेळ समजण्यासारखे आहे, परंतु तेथेही शाळा सरसकट बंद न करता प्रादुर्भाव झालेल्या मुलांना घरी राहावयास सांगणे असे काही करता येण्यासारखे नसावे काय, असा प्रश्न पडतो. (तशाही शाळा किती दिवस बंद ठेवणार हा प्रश्न उरतोच.)
बाकी, अशा प्रसंगी नेतेमंडळींकडून प्रथेस धरून येणार्या मूर्खपणाच्या आणि बेजबाबदार विधानांचे आता आश्चर्य वाटेनासे झाले असले, तरी त्याने परिस्थिती सुधारतही नाही, हेही तितकेच खरे. पुण्यात मृत्यू पावलेली शाळकरी मुलगी एका रुग्णालयातून दुसर्या रुग्णालयात जात असताना अनेकांमध्ये जंतू पसरवण्यास जबाबदार असण्याबाबतचे विधान काय किंवा गुजरातेत (?) मृत्यू पावलेल्या अनिवासी भारतीयाबद्दलचे 'या एनाराय लोकांचे सोशल सर्कल मोठे असते, ते कोठून ना कोठून जंतू मिळवतात आणि पसरवतात' अशा छापाचे विधान काय, केवळ बेजबाबदार आणि विकृत ('ज्यू लोक अनेक रोगांचे जंतू बाळगून असतात आणि पसरवतात' या नाझी अपप्रचाराची आठवण झाल्यावाचून राहत नाही.) असते तरी पुरेसे वाईट होते, परंतु आधीच बिकट असलेल्या परिस्थितीत लोकांमध्ये चुकीचे समज आणि द्वेष पसरवू शकणारे म्हणून अधिक धोकादायक आहे. परंतु दुर्दैवाने अनपेक्षित नाही.
या सर्व प्रकरणात मला न कळलेली आणखी एक गोष्ट ती अशी: पुरेशी संसाधने उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णालये या रोगाचे निदान किंवा इलाज करण्यास असमर्थ असू शकतील हे समजण्यासारखे आहे, आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अशी संसाधने उपलब्ध असणेही शक्य आहे, परंतु म्हणून खाजगी रुग्णालयांतून उपचार करून घेणे हे बेकायदेशीर आणि खाजगी रुग्णालयांनी असे उपचार करणे हा गुन्हा का ठरावा? (पुण्यात मृत्यू पावलेल्या मुलीच्या बाबतीत तिच्यावर प्रथम ज्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले त्या रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा सरकारचा विचार असल्याबद्दल एक विधान वाचनात आले.) अशा गंभीर सामाजिक परिस्थितीत ज्यांनाज्यांना म्हणून शक्य आहे अशा सर्व पात्र व्यक्ती आणि संस्थांनी मैदानात उतरणे इष्ट नाही काय? आणि पात्र असल्यास आणि शक्य असल्यास उपचार करणे हा गुन्हा का ठरावा?
बाकी, नाट्यगृहे, सिनेमाघरे अशा सार्वजनिक (आणि बंदिस्त) ठिकाणी, सार्वजनिक वाहनांत (उदा. मुंबईच्या लोकलमध्ये) किंवा त्याहीपेक्षा (लवकरच येऊ घातलेल्या) सार्वजनिक गणेशोत्सवात आणि विशेषतः गणेशविसर्जनाच्या मिरवणुकींत वगैरेही अनेक लोकांची गर्दी झाल्याने रोगाचा फैलाव होण्याची शक्यता पुष्कळ (किंबहुना ऑफिसमध्ये कोणीतरी शिंकण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक) असू शकते. त्याबद्दल काही प्रतिबंधक योजना विचाराधीन आहे अथवा नाही हे कळले नाही.
एकंदरीत, या रोगाचे आणि साथीचे गांभीर्य लक्षात घेतले, तरीसुद्धा त्यावरील प्रतिक्रियेत आणि हाताळणीत अतिरेक होत आहे, आणि 'रोग परवडला, पण हाताळणी नको' असे म्हणणे जरी योग्य नसले, तरी 'रोग वाईट, पण त्यापेक्षाही प्रतिक्रिया आणि हाताळणी अधिक वाईट' अशी परिस्थिती होत आहे, असे वाटते. चूभूद्याघ्या.
नक्कीच
अतिरेक तर नक्कीच होतो आहे. तुम्ही बरेच मुद्दे लिहिले आहेतच. पण भारतातला एक मुद्दा असा आहे कि अतिरेक हा आमचा स्वभाव आहे. मग तो अतिरेक अस्वच्छतेचा असो, अथवा अशा प्रसांगांच्यावेळी शास्त्रीय दृष्टिकोन न ठेवण्याचा असो की प्रसांगाचा वापर राजकिय करण्यासाठी असो. अतिरेक तर होतोच.
सार्वजनीक गणोशोत्सव त्या निमित्ताने नाही साजरा केला तर त्याचा समाजाला फायदा नक्कीच आहे. पण त्याच वेळी ऑफिसच्या वातानुकुलन यंत्रणेमुळे एकजण बाधीत असला तरी इतरांना लागण होण्याची शक्यता जास्त. कदाचित आधी कार्यालयात लागण होईल आणि गणेशोत्सवात प्रसार.
गुन्हा
पुरेशी संसाधने उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णालये या रोगाचे निदान किंवा इलाज करण्यास असमर्थ असू शकतील हे समजण्यासारखे आहे, आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अशी संसाधने उपलब्ध असणेही शक्य आहे, परंतु म्हणून खाजगी रुग्णालयांतून उपचार करून घेणे हे बेकायदेशीर आणि खाजगी रुग्णालयांनी असे उपचार करणे हा गुन्हा का ठरावा? (पुण्यात मृत्यू पावलेल्या मुलीच्या बाबतीत तिच्यावर प्रथम ज्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले त्या रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा सरकारचा विचार असल्याबद्दल एक विधान वाचनात आले.)
या संबंधात माझी ऐकीव माहिती अशी.
जहांगिर व रूबीहॉल यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
या प्रकारचा विषाणू कुठल्या प्रकारच्या प्रयोगशाळेत तपासला जाऊ शकतो याबद्दल WHO चे काही नियम आहेत. (याबद्दल तांत्रिक माहिती नाही. :-( ). पुण्यातील रूबीहॉलमध्ये याची चाचणी का करण्यात आली?
अशा प्रकारचा रूग्ण आढळल्यास तातडीने आरोग्य खात्याला कळवणे गरजेचे होते. तसे का केले नाही?
स्वाईन फ्लूची लक्षणे दिसल्याबरोबर तपासणी का केली नाही? त्यात दिरंगाई का?
टॅमी फ्लू सर्वत्र उपलब्ध करणार असल्याचे आज वाचले. हे आधी करता आले असते का? याबद्दल असे कारण दिले जात होते
की उठसूठ सर्वांनी टॅमी फ्लू घेतल्यास विषाणू त्याला रेझिस्टंट होतील. यात कितपत तथ्य आहे कल्पना नाही.
हे लिहीत असतानाच दादरला दहीहंडीसाठी गर्दी जमत असल्याचे विहंगम दृश्य पाहिले. च्यानेलवाला याला मुंबईचे स्पिरीट म्हणत होता. इथे आमची मती खुंटते.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
आभार
माहितीबद्दल आभारी आहे. (थोडक्यात, procedural issues. अधिक तांत्रिक माहितीअभावी, नेमके कोणी काय केले अथवा केले नाही याबद्दलच्या तपशिलांअभावी आणि दुसर्या बाजूच्या म्हणण्याबद्दलच्या माहितीअभावी अधिक बोलणे फोल आहे.)
(मात्र यातून पुढे जर कधी खाजगी रुग्णालयांना मैदानात उतरू देण्याचा निर्णय घेतला गेला, तर त्यांनी कारवाईच्या भीतीपोटी मैदानात उतरण्यास नाकारण्याची परिस्थिती येऊ नये ही आशा आहे.)
'उठसूठ सर्वांनी टॅमिफ्लू घेतल्यास विषाणू त्याला रेझिस्टंट होतील' या म्हणण्यात तथ्य आहे खरे, परंतु हे समजण्याची आणि त्याप्रमाणे जबाबदारीने औषध प्रिस्क्राइब करण्याची कुवत खाजगी रुग्णालयांत नसते, केवळ सरकारी रुग्णालयांत असते, हे (सरकारी) गृहीतक समजू शकत नाही. (तसेही हे प्रिस्क्रिप्शन मेडिकेशन आहे, ओव्हर द काउंटर नव्हे की वाटेल त्याने उठून वाटेल तेव्हा विकत घ्यावे आणि वाटेल तितके खावे. आणि अनेकदा भारतात ओळख असली तर केमिस्ट प्रिस्क्रिप्शन औषधे - विशेषतः पेशंटच्या नेहमीच्या वापरातील असल्यास - प्रिस्क्रिप्शनशिवायसुद्धा विकतात हे जरी खरे असले, तरी ते सहसा बेजबाबदार नसावेत असे पूर्वानुभवावरून तरी वाटते, आणि खास करून सध्याच्या माहौलात त्यांच्याकडून विशेष जबाबदारीच्या जाणिवेची अपेक्षा करणे फोल नसावे.)
याबद्दल न बोललेलेच बरे. असो.
कारण
कारणे दाखवा नोटीस प्रोसीजरल इश्श्युजबद्दल असली तरी ती पाठवण्याचे कारण म्हणजे रूग्णालयावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. निदान लवकर होऊन औषधोपचार सुरू केले असते तर मुलीचा जीव वाचू शकला असता असे संबंधितांचे म्हणणे आहे.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
ठपका
सामान्यतः डॉक्टरवर किंवा रुग्णालयावर पेशंटने किंवा पेशंटच्या नातेवाइकांनी मेडिकल मॅल्प्रॅक्टिसची तक्रार दाखल करण्याच्या घटनांबद्दल आजवर ऐकले होते. डॉक्टरवर किंवा रुग्णालयावर प्रतिस्पर्धी आरोग्यसंस्थेने दाखल केलेल्या मॅल्प्रॅक्टिसच्या तक्रारीचे निदान माझ्या माहितीतले तरी हे पहिलेच उदाहरण असावे. असो.
चांगला धागा
धन्यवाद.
अर्थात मराठीत लिहले असतेस तर क्या कहने! :-)
?
हि भाषा कोणती समजायची बॉ? :)
दीर्घ
हि भाषा कोणती समजायची बॉ?
'ह' ला दुसरी येलांटी 'ही' असा शबूद लिव्हाला पाह्यजेन.
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
खरे आहे
अर्थात मराठीत लिहले असतेस तर क्या कहने!
खरे आहे. शरमेने आमची मान झुकली आहे. या घोर अपराधाबद्दल आम्हाला विषाणूही माफ करणार नाहीत.
अतिअवांतर : स्वाईनचे विषाणूही मराठी बोलत असतील का? :-)
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
काय काळजी घ्यावी: आणखी काही दुवे
हा रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, झाला असल्यास काय काळजी घ्यावी, मास्क वापरावेत किंवा नाही, औषध घेणे कधी योग्य आणि कधी अयोग्य, उपचार कधी घ्यावेत, हा रोग झालेल्या मातेने बाळाला स्तनपान करावे किंवा नाही, वगैरे प्रश्नांबद्दल सामान्य माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरील या दुव्यावर मिळू शकेल. तसेच, काय-करावे-आणि-काय-करू-नये (Do's and Don't's) या स्वरूपाची माहिती अत्यंत संक्षिप्त स्वरूपात त्याच संकेतस्थळावरील या दुव्यावरही मिळू शकेल.
अनास्था, बेफिकीरी
यानिमित्ताने परत एकदा शासनाची बेफिकीरी/अनास्था समोर आली आहे. समारंभ टाळावेत असा आदेश काढलेला असतानाच पुलाच्या नामकरणासाठी जमलेल्या राजकारण्यांचे चित्र बघायला मिळते. इतके होऊनही निरुपम दहीहंडी करणारच असे म्हणतात. हा रोग धोकादायक नसला तरी त्याविषयी बेफिकीरी दाखवल्यास तो धोकादायक होऊ शकतो, नव्हे झाला आहे. यासंबंधात सुरूवातीपासूनचे शासनाचे निर्णय पाहिले तर असे लक्षात येते की परिस्थितीचे गांभीर्य संबंधित अधिकार्यांना कधीही पूर्णपणे कळले होते असे वाटत नाही. 'शाळा बंद करणे हा उपाय नाही', मग काही मृत्यू झाल्यावर शाळा बंद करणे अशा प्रकारचे धरसोड धोरण ही आपली पहिल्यापासूनची खासियत आहे. रोगाचा प्रादुर्भाव थांबयावचा असेल तर उपाय एक पाउल पुढे असावे लागतात. आपले उपाय नेहेमी एक पाउल मागे असतात.
यामध्ये मृत्यू झाले नसते तर शासन आणि लोक आत्ता आहेत तितके तरी जागरूक झाले असते का? (आताच मालेगावमध्ये सात जण गॅस्ट्रोमुळे बळी गेल्याचे वाचले.)
तात्पर्य : आपल्या देशात प्राणांचे मोल नाही.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
तात्पर्य
राजेंद्र तात्पर्य बरोबर आहे आणि ते त्रिकालाबाधीत सत्य आहे.
भारताला उगाच सध्याची आणि भविष्यातली मोठी बाजारपेठ म्हणत नाही. कोणीही यावे आणि लोकांना मुर्ख बनवुन जावे. मंत्र्यांचे म्हणणे वाचले असेलच की जगात कुठेही लस तयार झाल्यास वाट्टेल त्या किमतीला विकत घेऊ. मला तर पुढची बाजारपेठ दिसते आहे. प्राणांचे मोल नाही असे म्हणतोस? काही प्राण जाऊन देशांच्या अर्थव्यवस्थांची घडी बसणार असेल तर आपल्या देशातच प्राणांचे खरे मोल आहे :)
तहान लागली की विहिर खणणार, इथे कोणी संशोधन करायला अडवलं होतं का?
सिरम
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट लस बनवण्याच्या प्रयत्नात आहे असे वाचले.
----
हो
हो, ते ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमुळे.
कोऑर्डिनेशन
सामान्यतः अशा प्रकारचे सर्व आंतरराष्ट्रीय प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना कोऑर्डिनेट (मराठी?) करते, असे वाटते. (म्हणजे लस निर्माण करण्यासाठी आवश्यक असणार्या विषाणूंच्या वाटपापासून ते लस बनवल्यानंतर त्याच्या चाचण्या आणि चाचण्यांनंतर आवश्यक तेथे उपलब्ध करून देणे येथपर्यंत.) यात काही गैर किंवा कमीपणाचे आहे असे वाटत नाही. हा प्रश्न एकट्या भारताचा नाही, जागतिक आहे, त्यामुळे यात जागतिक प्रयत्न आणि सहकार्य आणि त्यांचे कोऑर्डिनेशन हे होणारच, नव्हे आवश्यक आणि योग्यच आहे.
कमीपण नाही
प्रश्न कमीपणाचा नाही. प्रश्न आहे तो हि लस तयार झाल्यावर होण्याच्या धंद्याचा. असे जास्तीत जास्त संशोधन भारतात झाले तर आम्हाला आनंदच आहे.
स्वाईन फलूसे बचने की दुआ
श्रद्धेचा कळस म्हणावा की काय पण फोटो खेचण्याचा मोह आवरता आला नाही.
-दिलीप बिरुटे
पळा रे पळा.. आकाश पडलं..!