उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
दगड, देव आणि कुंपण
--
August 10, 2009 - 12:11 pm
![]() |
एक होता दगड. मग त्याला कोणीतरी शेंदूर फासला. मग लोक त्याला देव म्हणू लागले. एक कुंपण होतंच.
कोणीतरी म्हणालं, 'देव चराचरात असतो.' मग लोक म्हणू लागले, 'देव चराचरात आहे.'
चराचर म्हणजे मंडईतली फसफसून वाहणारी कचराकुंडी. . . लूत लागलेलं कुत्रं. . . वेडी झालेली म्हातारी. . . कांदे. . . बटाटे. . . लसणी. . . भाज्या. . . माणसांची गर्दी. . . असं बरंच काही.
त्या चराचरात शेंदूर लावलेले तीन दगड आहेत, फुलांचे हार घातलेले. . . आणि कुंपण आहे.
दुवे:
Comments
देव
आपल्याकडे ३-४ मजली इमारतींमधे जिन्याच्या कोपर्याकोपर्यात लोकांनी पिचकार्या मारून घाण केलेली आढळते. किंवा कांपाउंडच्या भिंतीशी लोक लघुशंका करतात.कोणीतरी शक्कल काढून अशा जागांच्यावर देवांची चित्रे असलेल्या टाईल्स बसविण्यास सुरवात केली आहे. या टाईल्सना देव मानायचे का?
चन्द्रशेखर
श्रद्धा
मुर्तीला देव मानायचे का? दगडाला देव मानायचे का? तसबीरीला देव मानायचे का? जे लोक या गोष्टी आपल्या श्रद्धेचे प्रतिक म्हणुन मानतात ते असंसकृत् लोक हे अशा टाईल्स पाहुन् तरी किमान थुंकणार नाही हा त्यामागील हेतु आहे.सुसंस्कृतांसाठी त्या नाहीत. कारण तसे ही थुंकणार नाहीत असे गृहीत आहे. जर थुंकले तर ते सुसंस्कृत उपाधीस पात्र नाहीत.
प्रकाश घाटपांडे
मग काय करायचे?
मग काय करायचे बरे?
राजकारण्यांचे फोटो लावावेत. म्हणजे थुंकणार्यांना चांगला चेव येईल. कि आरसे लावावेत?
कुंपणामागचा बंदीस्त देव
वा! ह्या कुंपणामगच्या बंदीस्त देवाचे चित्रही खूप आवडले
देवाभोवतीचे ते ठळक (उत्तम फोकस!) कुंपण तारेचे नसून त्याच्यावर आपला सगळा भार टाकणार्या (खरं तर सगळा भार टाकून मोकळे होणार्या) भक्तांचे आहे असे वाटते.
हा फोटो बघून संदीप खरे यांची "नास्तिक" ही सुंदर कविता आठवली
ऋषिकेश
------------------
देव देव्हार्यात नाही.. देव नाही देव्हारणीत.. देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई!!??
कविता
हा फोटो बघून संदीप खरे यांची "नास्तिक" ही सुंदर कविता आठवली
प्रतिसादाशी सहमत आहे. मला हरिवंशराय बच्चन यांची बुद्ध और नाचघर ही कविता आठवली.
----
"And you shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत
कविता
हा फोटो बघून संदीप खरे यांची "नास्तिक" ही सुंदर कविता आठवली
प्रतिसादाशी सहमत आहे. मला हरिवंशराय बच्चन यांची बुद्ध और नाचघर ही कविता आठवली.
सहमत आहे. मला कुसुमाग्रजांची 'गाभारा' आठवली. स्पष्ट, फोकसमध्ये असलेली तार आणि धूसर, अस्पष्ट देव हे प्रतिक (किंचित शांतारामी ढोबळ असले तरी) फार आवडले.
सन्जोप राव
आजपर्यंत मेलो नाही म्हणून यापुढे मरणार नाही, असे नाही. किंबहुना आजपर्यंत मेलो नाही म्हणूनच यापुढे मरणार! - विनोबा
कुंपणातसुद्धा देव असतोच
चराचरात कुंपणसुद्धा आलेच. त्यामुळे कुंपण आणि शेंदूर फसलेले दगड यात काही फरक नाही. देव असणे आणि त्याची पूजा करणे या वेगळ्या गोष्टी आहेत. देवावर वाहण्यात येणारी फुले, अक्षता, हळद, कुंकू या सगळ्यात सुद्धा देव असतो, तसाच ते वाहणार्या भक्ताच्या शरीरातदेखील असतो. त्यामुळे तर्कदृष्ट्या हे सगळेच निरर्थक वाटेल. ज्या माणसाला ज्या प्रकाराने देवाची आराधना करावी असे वाटते ( वाटल्यास) त्या प्रकारे तो करत असतो. त्यात त्याला मानसिक समाधान मिळते म्हणून तो ते करतो.
सहमत आहे !
घारे साहेबांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. च्यायला, हल्ली देव-धर्म आणि त्याच्या श्रद्धांना नावे ठेवण्याची नुसती फ्याशन नव्हे तर चढाओढ लागली आहे असे वाटते. फोटो ठीक वाटला, म्हसोबाचे चित्र स्पष्ट दिसत नाही. पण तारेला आम्ही नमस्कार केला. धन्यवाद !
-दिलीप बिरुटे
(श्रद्धाळू)
मानसिक समाधान
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. आनंद घारे यांच्या प्रतिसादाचा प्रा.(डॉ.) दिलीप बिरुटे यांनी थोडा विपर्यास केला असावा असे वाटते.
यात मिळणारे मानसिक समाधान भ्रामक आहे. अशा समाधानासाठी माणसाने एव्हढा असमंजसपणा करावा याचे आश्चर्य वाटते.
..एक संवादः
"काहो, त्या मंदिरात तुम्ही प्रतिदिनी का जाता?"
"देवदर्शनासाठी."
"पाषाणाच्या मूर्तीत देव नसतो हे तुम्हांला ठाऊक आहे ना?"
" हो. पण त्या देवळातील मूर्ती धातूची आहे!"
असतात काही लोक असंमजस :)
श्री. आनंद घारे यांच्या प्रतिसादाचा प्रा.(डॉ.) दिलीप बिरुटे यांनी थोडा विपर्यास केला असावा असे वाटते.
यात मिळणारे मानसिक समाधान भ्रामक आहे. अशा समाधानासाठी माणसाने एव्हढा असमंजसपणा करावा याचे आश्चर्य वाटते.
एखाद्या प्राध्यापकाने एखाद्या विषयाला ज्याला लोक भ्रामक समजतात अशा विषयांविषयी इतका असंमंजसपणा दाखवावा आणि नेमके जिथे डोळसपणाची अपेक्षा ज्यांच्याकडून असते (असावी कदाचित) असे असतांना अशा विषयांच्या समर्थनार्थ किंवा समाधानासाठी विषयाच्या निमित्ताने कै च्या कै विपर्यास कधी-कधी होत असावा, त्यामुळे असेच आश्चर्य आपल्यासारखे अनेकांना वाटू शकते. असो, आपल्यालाच काय कधी-कधी मला अशा विषयाचे समर्थन करतांना स्वतःचेच आश्चर्य आणि आनंद वाटतो. क्या करु आदत से मजबूर हू ! :)
-दिलीप बिरुटे
मराठीत भाषांतर करा...
एखाद्या प्राध्यापकाने एखाद्या विषयाला ज्याला लोक भ्रामक समजतात अशा विषयांविषयी इतका असंमंजसपणा दाखवावा आणि नेमके जिथे डोळसपणाची अपेक्षा ज्यांच्याकडून असते (असावी कदाचित) असे असतांना अशा विषयांच्या समर्थनार्थ किंवा समाधानासाठी विषयाच्या निमित्ताने कै च्या कै विपर्यास कधी-कधी होत असावा, त्यामुळे असेच आश्चर्य आपल्यासारखे अनेकांना वाटू शकते.
वरील वाक्याचे कुणी साध्या सोप्या आणि व्याकरणशुद्ध मराठीत भाषांतर करु शकेल काय?
सन्जोप राव
आजपर्यंत मेलो नाही म्हणून यापुढे मरणार नाही, असे नाही. किंबहुना आजपर्यंत मेलो नाही म्हणूनच यापुढे मरणार! - विनोबा
शुद्धलेखन हा विषय संपला का ?
व्याकरणशुद्ध मराठीत भाषांतराचे जाऊ द्या. शुद्धलेखनाचे विषय संपले की, संग्रहातील पुस्तके संपली ?
-दिलीप बिरुटे
भाषांतर?
भाषांतर?
एका प्राध्यापकाला दुसर्या
प्राध्यापकाचे मराठीतील लेखन मराठीत भाषांतर करून
समजून घेण्याची गरज पडावी याची अंमळ मौज वाटली.
आपला
गुंडोपंत
क्षमस्व!
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"यात मिळणारे मानसिक समाधान भ्रामक आहे. अशा समाधानासाठी माणसाने एव्हढा असमंजसपणा करावा याचे आश्चर्य वाटते."
हे लिहिताना 'माणसाने' म्हणजे मनुष्यप्राण्याने असे मला अभिप्रेत होते. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. शेंदूर फासलेल्या दगडाला नमस्कार करून त्यात मानसिक समाधान मानावे हा मला त्या बुद्धिमान मनुष्यप्राण्याचा असमंजसपणा वाटतो.
माझ्या त्या एका वाक्याने प्रा.(डॉ.) बिरुटे दुखावले असतील तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.त्यांना दुखवावे हे माझ्या ध्यानी मनीही नव्हते. मी त्यांची मनापासून क्षमा मागतो.
प्रतिसाद काढावा
>>माझ्या त्या एका वाक्याने प्रा.(डॉ.) बिरुटे दुखावले असतील तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.त्यांना दुखवावे हे माझ्या ध्यानी मनीही नव्हते. मी त्यांची मनापासून क्षमा मागतो.
यनासर आपल्याकडून आम्ही कधीच दुखावल्या जात नाही. तेव्हा तसा विचारही मनात कधीच येऊ देऊ नका. आपल्या लेखनाचा आणि आपला आम्ही खूप आदर करतो. उलट आमच्याकडून काही चूक भूल होत असेल तर मोठे म्हणून आम्हाला क्षमा करत जा ! असो,
संपादकांनी यनासरांच्या प्रतिसादातील शेवटची ओळ किंवा प्रतिसादाबरोबर, माझाही हा प्रतिसाद काढावा ही नम्र विनंती.
-दिलीप बिरुटे
विपर्यास?
माझ्या विधानाचा अर्थ श्रध्दाळूपणाला माझा पाठिंबा आहे असा घेतला असेल तर तसे नाही. माणसे श्रद्धाळू का असतात, ते विशिष्ट प्रकाराने देवाची आराधना का करतात याचे एक स्पष्टीकरण मी दिले आहे. त्यातून काही लोकांना समाधान मिळते यात शंका नाही. त्या समाधानामुळे जर त्या माणसाला धीर आला, त्याच्या मनाला स्वस्थता वाटली, त्यामुळे तो आपले काम चांगल्या प्रकारे करू लागला, तर दुसर्या कोणाला ते समाधान भ्रामक वाटले (आणि ते तसे असले) तरीही त्यातून त्या श्रद्धाळू माणसाचा फायदाच होईल.
प्रत्येक सर्वसाधारण माणसाला अंतिम सत्य शोधण्याची एवढी इच्छा नसते, त्याची तेवढी कुवतही नसते. "अज्ञानात सुख असते "अशी एक म्हण आहे, भ्रमनिरास झाल्यामुळे सुखातला जीव दु:खात पडतो हा अनुभव येतच असतो. म्हणून अज्ञानातच रहावे असा माझा रोख नाही, पण त्यामुळे श्रद्धा वगैरेसारखे शॉर्टकट निर्माण झाले आणि ते होतच राहतील ही वस्तुस्थिती आहे, हे मान्य करावे लागते.
भ्रामक?
यात मिळणारे मानसिक समाधान भ्रामक आहे.
यात मिळणारे समाधान भ्रामक आहे?
बरे ठीक क्षणभर तुमचा मुद्दा मान्य केला!
पण त्याच वेळी मग सध्याची जी प्रगती आहे त्या जोरावर जगाचे जे काही घडते आहे त्या प्रगतीला काय म्हणावे?
ही सो कॉल्ड प्रगती आणि त्यानुषंगाने चालणारा अर्थव्यवहार त्याचा लोभ आणि त्यातून आपल्या सगळ्यांचाच दिसत असलेला विनाश या विषयी काय म्हणावे? ती प्रगती भ्रामक नाहीये काय? भ्रामकच नाही तर विध्वंसकही दिसते आहे.
या सगळ्यापेक्षा देवभक्तीच्या साथीने केलेली साधी सोपी ध्यान साधना काय वाईट?
[त्याच वेळी ती साधना इतरांनीही (आम्ही म्हणू तशीच) करावी हे मात्र पटेनासे!]
असो,
श्रद्धेप्रमाणेच सत्य ही भ्रामकच वाटते (असते?) इतकेच नाही, तर ते व्यक्तीसापेक्षच असते.
आपला
गुंडोपंत
वास्तव स्वीकारावे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.गुंडोपंत लिहितातः"...मग सध्याची जी प्रगती आहे..तिला काय म्हणावे?....
ही सो कॉल्ड प्रगती आणि त्यानुषंगाने चालणारा अर्थव्यवहार त्याचा लोभ आणि त्यातून आपल्या सगळ्यांचाच दिसत असलेला विनाश या विषयी काय म्हणावे?"
....
वैज्ञानिक शोधांमुळे माणसाची सतत प्रगती होत आहे हे वास्तव आहे.आज आपण विज्ञानाधारित किती सोयी सुविधा उपभोगतो आहोत ते सांगणे नलगे.(रेल्वेप्रवासाच्या आरक्षणाची पूर्वीची स्थिती आठवा.)
मात्र देशात भ्रष्टाचार,आर्थिक घोटाळे,बनावट औषधे,भेसळ,फसवणूक, लैंगिक अपराध, इ.चे प्रमाण एव्हढे मोठे आहे की महान भारतीय संस्कृती म्हणतात ती हीच असे वाटावे.पण या अनैतिकतेचा संबंध विज्ञानक्षेत्राशी नाही. धर्मक्षेत्राशी आहे. भ्रष्टाचार्यांचे अध्वर्यू जे राजकारणी ते सर्व(किमान ९०%तरी) धार्मिकच आहेत.या अनाचारासाठी विज्ञान दोषी नाही.
**(श्री.अब्द यांची क्षमा मागायला हवी. त्यांनी एक सुंदर प्रकाशचित्र दिले. त्यावर कोणी काही लिहावे ही अपेक्षा. पण आमचे हे प्रतिसाद भलतीकडेच वहावत आहेत.)
भारी
आस्तिक-नास्तिकत्वाचे माहित नाही पण फोटो १ नंबर आहे! (आणि खालचं शिर्षकसुद्धा!)
एकदम प्रतिभासंपन्न! भारी!!!
-भालचंद्र!
http://bspujari.googlepages.com/
वा वा वा!
छान छान! आवडले चित्र. चित्राखालची टिप्पणीही दाद देण्याजोगी आहे.
शुभेच्छा!
बाकी कुंपणाच्या आतच देव आहे/असतो, कुंपणाच्या बाहेर नसावा/नसतो असा मी तरी अर्थ काढला आहे. :-)
सन्जोपराव, तुमचे बरोबर आहे..... गाभारा सलामत तो देव पचास!
-सौरभ.
==================
कुतुहल
हे छायाचित्र आता उपलब्ध नाही, ज्यांनी पाहिले होते त्यांपैकी कोणीतरी त्याचे वर्णन करावे ही विनंती.
मी सुद्धा उत्सुक आहे!
हेच तर... मला प्रथमतः वाटले की पृष्ठावरील "ते" छायाचित्र लोड झाले नसावे... पण शेवटी हा प्रतिसाद बघितला... नक्कीच, मलासुद्धा ते छायाचित्र बघण्याची उत्सुकता आहे वा च्याशी संबंधित वर्णन वाचायला आवडेल!
धन्यवाद!