घुसखोरी
बांगला देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या शतकाअखेरीस् ती २० कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. इतक्या लोकांना तेथे राहणेच शक्य नाही. या शिवाय बांगलादेश जेव्हा पूर्व पाकिस्तान होता तेव्हा पश्चीम पाकिस्तानने त्याचे शोषण करुन त्यांची आर्थीक अवस्था बिकट केली होती. भारत-बांगलादेशामध्ये असलेली मैदानी सीमा २५०० मैल असून तेथे कसलेही बंधन वा कुंपण नाही. कुंपण घालण्याचे काम सुरु आहे तरी देखील काही भाग अजुनही मोकळाच आहे. त्यामुळे घुसखोरीवर नियंत्रण नाही. आसाम मध्ये जी अस्वस्थता आहे त्याचे मुळ् कारणही हेच आहे. आपल्या देशातील विचित्र कायदे देखिल घुसखोरीला उत्तेजन देतात.उदाहरणार्थ घुसखोर सिध्द झाल्यास त्यास कायद्याने फार कमी शिक्षा आहे. कधी कधी तर ते साध्या जामिनावरही सुटतात. हा कायदा अनेक वेळा घुसखोरी निदर्शनास आणून देणार्या व्यक्तिलाच अडचणीत आणतो. तसेच विदेशातून येणारा वारेमाप पैसा वापरुन , आसाममधील जमिनी बळकावून तेथे घुसखोरांना वसविले जाते.
Comments
बांगलादेशींची घुसखोरी
आपण म्हणता त्याला पुष्टी देणारी बातमी म टा मध्ये नुकतीच वाचली. दुवा आणि बातमीमधला एक लहानसा भाग खाली देतो आहे.
बांगलादेशीःभारतात हवे एक राज्य
(बातमी मधून साभार.)
-- लिखाळ.