विरक्ती

दुकानांच्या बंद दारांकडे तोंड करून जगाकडे फिरवलेली पाठ. विरक्तीचा भगवा रंग. शांत झोप.

पण जगाकडे पाठ फिरवून चक्रातून सुटका होत नाही.

कारण, शरीर. शरीराला अन्न लागतं. अन्नासाठी पैसे. पैशासाठी काम. काम शक्य नाही मग भीक मागायची, विरक्तीच्या झेंड्याखाली.

लेखनविषय: दुवे:

Comments

पत्रकारिका छायाचित्र

श्री.अब्द यांनी सहज रस्त्यावर दिसलेला एक क्षण छान टिपला आहे. मथळा चपखळ आहे.
पर्स्पेक्टिव्ह थोडे सुधारावयास हवे; नाही तर शटर अंगावर पडते आहे असे वाटते. ते बदलून चित्र कसे दिसेल ते बघा.

virakti

सहमत

पर्स्पेक्टिव्ह थोडे सुधारावयास हवे; नाही तर शटर अंगावर पडते आहे असे वाटते.

खरे आहे. फार बिघडले आहे 'पर्स्पेक्टिव'. सर्व तिरकेच दिसते - सरळ म्हणून काही दिसत नाही.

सुधारायलाच हवे 'पर्स्पेक्टिव', नाहीतर अंगावर (अंगाशी?) येणार असे वाटते.

असो.

छान

प्रकाशचित्र आवडले. शरदरावांची सुधारणा योग्य वाटली

चित्र पाहून ह्या ओळी आठवल्या:

उंच पाटी पालथी उशाखाली
हात दोन्हीही आडवे कपाळी
फरसबंदीची शेज गार गार
शांत घोरत पसरला वर मजूर
-(बहुदा) केशवकुमार
कविता: खाली आणि वर

ऋषिकेश
------------------
पलिकडे सात मजल्यांची हवेली
दिपशृंगारे सुबक सजवलेली
.....................सौधभागी ??? (ही ओळ विसरलो कोणी सांगेल का?)
लाल लक्ष्मीचा पहुडला पलंगी

रंगसंगती

मला तितकी पटली नाही. कृष्णधवलराखुंडी रंगात एकच कुठला रंग असता, तर बरे दिसले असते. पण भगवा झेंडा, गुलाबी पंचा (आणि निळी पिशवी) हे एकमेकांना पोषक नाहीत.

त्यामुळे भगव्या रंगाने सांगितलेल्या कथेतील एका मुद्द्याचा मोह टाळून चित्र कृष्णधवल केले, तर (मलातरी) चांगले दिसले. पाठमोर्‍या व्यक्तीकडे करड्यात एकच शुभ्र वस्तू म्हणून लक्ष केंद्रित होते, वगैरे.

(पर्स्पेक्टिव्ह वेगळे असते, तर बहार आली असती.)

छान - पुढील चित्रांसाठी शुभेच्छा!

+१

सिलेक्टीव्ह कलरिंग करून फक्त पताकेचा भगवा रंग ठेवला असता तर शीर्षक आणि चित्र अजून छान जुळले असते. फ्रेमबाबतही सहमत. जमिनीच्या जवळून घेतलेला फोटो अधिक चांगला आला असता. अर्थात ही वैयक्तिक मते आहेत. बर्‍याचदा छायाचित्रकाराच्या मनातलं चित्र आणि पाहाणार्‍याच्या मनातलं त्याचं आकलन सारखं असेलच असं नाही. कधी कधी दोघांचाही दृष्टिकोन आपापल्या परीने योग्य असू शकतो. केवळ शीर्षक आणि चित्र यांचा संबंध नीट प्रस्थापित होताना दिसत नाही म्हणून हा प्रतिसाद (किंवा मताची पिंक).

अवांतर: एका मामुली मुद्द्यावर मतभेद

(पर्स्पेक्टिव्ह वेगळे असते, तर बहार आली असती.)

या मुद्द्याबद्दल असहमत!

'पर्स्पेक्टिव' वेगळे असते, तर बहार आली असती, असे आपणास वाटते. 'पर्स्पेक्टिव' आहे तसेच बरे आहे, असे 'पर्स्पेक्टिव'ला वाटते. शेवटी 'पर्स्पेक्टिव'चा प्रश्न आहे.

एक ओरिजिनल पर्सपेक्टिव

तुमच्या 'स्वतःच्या पर्सपेक्टिव'मधून आम्हाला ते दृश्य अनुभवायला दिल्याबद्दल धन्यवाद. तज्ञांची मते त्यांच्या जागी. इतक्यातच वाचलेल्या मोकाशींच्या 'पालखी'तले वारकरी आठवले.

धन्यवाद

प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद.

 
^ वर