मराठी इंटरनेट एक्सप्लोअरर ८

इंटरनेट एक्सप्लोअरर ८
आता मराठी भाषेमध्येही मिळतो असे मला आज आढळले. (खरं तर आता हे आता कोंकणी भाषेतही मिळते!)
नेहमी प्रमाणेच मायक्रोसॉफ्ट म्हणते की हे न्याहाळक अधिक वेगवान आहे. आणि टॅब्ड न्याहाळक असल्याने झटकन उघडते वगैरे वगैरे.

यात एक दावा असाही आहे : 'अधिक गोपनीय आपण वेबवर कुठेही गेलात तरी आपल्या गोपनीयतेचे व वैयक्तिक माहितीचे रक्षण करण्यास मदत करतो. '

हे कसे ते मात्र देणे यांनी टाळले आहे. बहुदा नंतर ठिगळ (पॅच) देतांना अडचण नको म्हणून असावे.
अधिक सुरक्षितता कशी मिलते हे दिले असते तर बरे झाले असते.

पुढे जाऊन ते असेही म्हणतात की 'एखादे वेबस्थळ बनावट आहे हे शोधणे सोपे करतो.'
हा दावा योग्य आहे की नाहे हे मला कळले नाही. कारण एखादे स्थळ हॅक झाले आहे हे आय ई ला कसे कळेल?
त्याला फक्त जे काही असेल ते दाखवण्याचे काम आहे.

असो, आय ई ८ साठी सहाय्य समस्यांची चर्चा करण्यासाठी असलेला न्युज ग्रुप बराच ऍक्टीव्ह आहे असे दिसते.

अजून कुणी हा न्याहाळक वापरला असेल तर नक्की कळवा.

Comments

मी

मी सध्या वापरतोय. डेव्हलपर टुलबारमधे प्रोफाईलर् चांगला वाटला बाकी विषेश् असेल् तर् अजुन् एक्सप्लोअर केले नाही.

(बहुतेक) कायमचा रामराम

नुकताच आयईला (बहुतेक) कायमचा रामराम ठोकला आहे.
घरी मराठी फाफॉ वापरू लागलो आहे.. आवडते आहे

ऋषिकेश (कोल्हे)
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

फाफॉ ३.५.२ प्रॉब्लेम

माझ्या घरच्या लॅपटॉपवर फाफॉ ३.५.२ इन्स्टॉल केले आहे. पण मला असा अनुभव येतो आहे की काही संकेतस्थळांवर लॅपटॉपचा अप ऍरो किंवा डाउन ऍरो चालत नाही. उदा. उपक्रमवर चालत नाही, लोकसत्तावर चालतो. व्हर्टीकल स्क्रोलबार वापरुन पानावर खालती-वरती जाणे फारच गैरसोयीचे वाटते.
मी पण आय-ई ला रामराम ठोकायच्या विचारत होतो, पण वरील कारणामुळे सद्ध्या वापरावे लागत आहे. तुम्हाला कुणाला असा अनुभव आला आहे का? मी अजून या प्रॉब्लेमविषयी गूगलून बघितले नाही.

माझ्या कचेरीत फाफॉ ३.०.१० आहे. तिथे सर्व काही व्यवस्थित चालते.

फाफॉ ३.५.२ प्रॉब्लेम

मी २ दिवसापूर्वी ३.५.२ व्हर्शन वापरायला सुरवात केली. आपण निर्देश केलेली अडचण मला तर येत नाही.मी स्क्रॉल, अप-डाउन ऍरो किंवा ट्चपॅड दोन्ही वापरून करू शकतो.
चन्द्रशेखर

फाफॉ

मी पूर्वी फाफॉ वापरत असे. क्रोम वापरायला लागल्यापासून आयुष्यातील बराच वेळ वाचतो आहे असे वाटू लागले आहे. :प्
ज्यांना वेगवान न्याहाळक म्हणजे काय याचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी क्रोम वापरून बघावा.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

पण

पण आजानुकर्ण मागे म्हणाला होता की क्रोम,
त्याने नुकत्याच भेट दिलेल्या सर्व पाने दाखवतो म्हणून योग्य नाही.

मग तुम्हाला तसा काही त्रास(!) नाही का?

आपला
गुंडोपंत

नाही

क्रोममध्ये नवीन ट्याब उघडल्यावर तो आधीची पाने दाखवतो (क्याशे क्लिअर केला नसेल तर.) पण याचा मला त्रास झाला नाही. शिवाय यात हवी तीच पाने दाखवता येण्याचीही सोय आहे. क्रोममधील अनेक सुविधा आवडल्या. उदा. गूगल सर्च करण्यासाठी वेगळ्या टूलबारची आवश्यकता नाही किंवा ब्याकग्राउंडमध्ये नकळत अपडेट होत रहातात.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

आवडला नाही

मला देखील क्रोम फारसा आवडला नाही. फायर फॉक्स जास्त बरा वाटतो.


माझा अनुभव

सारखा वापरताना क्रोम् अनेक वेळा क्रॅश् झाला आहे ... आई - ७ तर क्रॅश होण्याचा रेकॉर्डच् करतोय
आई-८ चे एक् फिचर् मला आवडले की ... तुम्ही ज्या टॅबवर काम् करता आहात् ते टॅब हँग् झाले की तेवढेच् टॅब् क्लोज् होते... बाकीची उघडलेली पेजेस् गमवावी नाही लागत्.

आई-८ चे अजून् एक् फिचर् मस्त् आहे ... तुम्हाला माऊस फिरवताना एक् छोटासा चौकोन् सारखा येताना दिसतो त्याला क्लिक् केले तर् तुम्ही निवडलेल्या साईटचा फक्त् तोच् भाग् अपडेटेड् तुम्हाला हवा तेव्हा पाहता येतो...
अर्थात् मी आई-७ आणि आई-८ प्रेमी नाही
मी तर् ऑपेराच् वापरतो... ऑपेरापुढे सफारी थोडाफार् उभा राहू शकतो... पण् अनेक वेबसाईट्स् व्यवस्थित् दिसत् नसल्यामुळे हा दुर्लक्षित् राहिलेला ब्राऊजर् आहे.
ऑपेरा १० बेटा ची फिचर्स् अधिक् सुंदर् आहेत्...
उत्सुकता असणार्‍यांनी अवश्य वापरुन् पहावा....

(ऑपेराप्रेमी) सागर

देवनागरी अक्षरे

नवीन ऑपेरामध्ये देवनागरी जोडाक्षरे नीट दिसतात का ?
९ व्या आव्रुत्तीत जोडाक्षरे नीट दिसत नसल्याने मी फाफॉ कडे वळलो.

सुंदर दिसतात!

ऑपेरा ९
इतक्यातच पाहिले, सुंदर मराठी अक्षरे दिसतात!

काहीही अडचण येत नाही.

आपला
गुंडोपंत

क्रोम् न आवडण्याचे

विशेष कारण म्हणजे 'एक्स्टेंशन्स्' चा अभाव - ऍड्-ब्लॉक, गमभन, वगैरे वगैरे
वेग चांगलाच आहे क्रोमचा, पण् फाफॉ साठी सुद्धा सेटिंग्ज्स् बदलली की छान वेग मिळतो (अर्थात माझे मशिन् ८GB रॅम चे आहे :) )

उत्तम माहिती.

इंटरनेट एक्सप्लोअरर ८ आता मराठी भाषेमध्येही मिळतो ही माहिती मिळाली.

पण मला व्यक्तिशः त्याचा काहीही उपयोग नाही.

 
^ वर