हुसैनीवाला बॉर्डर- शहिद स्मारक

१९७८ च्या दसृयाला माझी बदली हरयाणा च्या अंबाला या शहरातून् फिरोजपूर येथे झाली. सतलज नदिच्या किनार्‍यावरील हे पंजाब राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण लाहोर येथून जवळच १०० कि.मि.च्या आत. त्या काळी भारतात टी वी सर्वत्र यावयाचे होते. पण हरियाणा व पंजाब मध्ये होते. फिरोजपुर मध्ये लाहोर स्टेशन वरुन भारत-पाकिस्तान च्या लाहोर येथील मेचेस दिसत. फिरोजपुर शहर त्याकाळी मला पाकिस्तानात असल्यासारखे भासले कारण तेथे सीमा जवळ असल्याकारणाने नविन बांधकाम लोक करीत नसत. सर्व इमारती या ५० वर्षे जुन्या दोन मजली छ्ज्जे असलेल्या आणी मध्ये निमुळत्या अरुद गल्ल्या. या शहरापासुन ७ कि.मी वर हुसैनिवाला गाव. हे गाव आणि फिरोजपुर यात विशाल सतलज नदिचे पात्र व त्यावर मोठा जुना पुल १९७१ च्या युध्दात पाकिस्तानी सेना फिरोजपुर शहरात येवु नये म्हणुन हा पूल भारतिय सैन्याने उडवून दिला होता. नंतर त्याची डागडुजी करुन पुन्हा वाहतुकिसाठी नीट केल्या गेला.

हा पुल पार केल्यावर हुसैनिवाला हे गाव आहे. या गावाचे वैषिष्ट्य महणजे येथे भगतसिह, राजगुरु आणि सुखदेव या क्रांतीकारकांच्या समाध्या आहेत्. निर्धारित वेळेच्या आधीच गडबड होउ नये म्हणुन ब्रिटिशांनी त्यांना रात्री फाशी देवुन त्याची प्रेते इथे आणली. येथे त्यांचे अंतिम संस्कार करुन समाधी बांधण्यात आली. वैशाखी या पंजाबच्या सणात येथे फार मोठी जत्रा भरते. १९७१ च्या युध्दात या समाधी चे पाकिस्तान सैन्याने बरेच नुकसान केले त्यानंतर पुन्हा समाधी निट बांधण्यात आली. या युध्दात मेजर वाराइच हे पाकिस्तानी सैन्याच्या हाती सापडले त्यांच्या बद्दल त्यांच्या कुटुंबीयाना आजतागायत काहिच माहिती नाही.

रोज संध्याकाळी येथे ध्वज संचलन होते आणि दोन्ही देशांचे नागरिक येथे मोठ्या संख्येने हा सोहळा पहाण्यासाठी जमतात.

लेखनविषय: दुवे:

Comments

लय भारी

चांगली माहिती आहे. पुर्वाचल यायच्या लेखनाचा पेशल विभाग कराया पाह्यजेन.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

 
^ वर