मेघालयातील मानवी अलंकार

आपल्यामध्ये एक वाक्य संस्कृती संबंधात ऐकवल्या जाते. भुक असतांना जेवणे ही प्रकृती, आपल्या ताटातील अर्धी पोळी भुकेलेल्यास देणे ही संस्कृती आणि भूक नसतांना खाणे ही विकृती. मेघालयात असतांना आणि तेथिल लोकांशी व्यवहार करतांना त्यांच्यातील अंगभुत असलेली ही मानवी मुल्ये मला पदोपदी अनुभवावयास मिळाली. कुणाकडेही भेटावयास गेल्यावर ती जर जेवण्याची वेळ असेल तर ती मंडळी जेवायचा आग्रह करत्तात. माझ्या सोबत असलेला खासी मित्र मला म्हणाला आपली जेवायची व्यवस्था असली तरी त्यांना नाही म्हणु नका कारण त्यांना नम्रपणे नकार दिला तरी ते ती बाब मनाला लावतात आणि आपण त्यांना परके समजतो असा त्यांचा समज होतो. आपण जर जेवायचे मानले तर त्याना अत्यंत आनंद होतो आणि तो त्यांच्या चेहर्‍यावर आपल्याला दिसतो. तसेच जेवायला बसल्यावर एकदा वरण भात घेतल्यावर आणि तो संपल्यावर दुसर्‍यांदा तो वाढतात तेंव्हा थोडा घेतला तरी चालेल पण नाही म्हणु नये कारण ते देखील त्यांच्या मते नाराजीचे कारण होते.

दुसरी एक बाब मला प्रकर्षाने जाणवली ती ही कि शिलांग सारख्या मोठ्या शहरातच नव्हे तर खेड्यात देखील मला भिकारी दिसला नाही. बस स्टॉप वर हमखास असणारी ही जात तिथे औषधाला हि दिसली नाही. माझ्या खासी सहकार्याने सांगीतले कि असे गरिब व निराधार लोक असले तर् त्यांचे नातेवाइक त्यांच्या जेवण्याची व रहाण्याची सोय आळिपाळिने करत्तात व तो उपाशी रहाणार नाहि याची काळजी घेतात. त्याला जर नातेवाइक नसतील तर समाजाचे ईतर लोक त्याची काळजी घेतात.

भिकार्‍यांवरुन आठवले मी अंबाला छावणी येथे नोकरी निमीत्त १९७६-७८ मध्ये असतांना तीथे एक बोर्ड वाचल्याचे आठवते "BEGGING IS CRIME IN HARYANA" महाराष्ट्रातुन प्रथमच बाहेर पडलो असल्याने तो बोर्ड माझेसाठी एक नवलच होते. आणि खरोखरच तेथे रेल्वे स्टेशन वर व बस स्टँड वर देखील मला भिकारी दिसला नाही आज काय परिस्थिती आहे कल्पना नाही.

नॉरटीआंग येथे एका विद्यार्थ्यांच्या पालकाकडे गेलो असता त्यांनी इतर कुटुंबीयांची ओळख करुन देतांना एका १०-१२ वर्षाच्या मुलीची ओळख करतांना ती आमच्या मुलीसारखी म्हणुन करुन दिली. तीचे वडील अकाली वारल्या मुळे ती व तीची आइ निराधार झाल्या होत्या दोघींना घरी आणुन आई घरी असलेल्या बेकरीत मदत करते आणि मुलीला सेंग खासी च्या शाळेत घातले व त्याचा खर्च ते स्वतःच करतात असे कळले. पुढे असेही कळले की अशी परिस्थिती अनेकांवर येते आणि त्यातुन असा मार्ग काढणे अशी प्रथाच आहे. स्वतःची परिस्थीती जेमतेम असतांना समाजाची जवाबदारी आपली सगळ्यांची असते म्हणुन ती सहजपणे पार पाडणे ही खासी समजाजी प्रथा खुपच भावली. तथे मातृसताक पध्दती असल्याने हे निर्णय मुख्य स्त्रीच घेत असते.

तीथे असतांना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किवा अन्य मोठे पदाधिकार्‍यांची ओळख करुन देण्यात आली. त्यांची साधी राहणी बघुन मी चकित झालो त्या व्यक्ती मला इतरत्र भेटल्या असत्या तर मी त्यांच्याकडे एक सामान्य व्यक्ती म्हणुन दुर्लक्ष केले असते कारण शिक्षण संस्थेचा मोठा व्यक्ती हा सफारी सुट घालणारा किवा भारदस्त व्यक्तीमत्वाचा अशी डोळ्यांना सवय झालेली. पण हिच साधी व्यक्ती मोठ्या समुदायासमोर प्रभावी भाषण करतांना आणी श्रोते आदराने वागतांना पाहिले आणि त्यांच्या साध्या आणि सरळ व्यक्तिमत्वाला मनोमन सलाम केला.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम अलंकार

सुंदर ओळख.

त्यांची साधी राहणी बघुन मी चकित झालो त्या व्यक्ती मला इतरत्र भेटल्या असत्या तर मी त्यांच्याकडे एक सामान्य व्यक्ती म्हणुन दुर्लक्ष केले असते कारण शिक्षण संस्थेचा मोठा व्यक्ती हा सफारी सुट घालणारा किवा भारदस्त व्यक्तीमत्वाचा अशी डोळ्यांना सवय झालेली. पण हिच साधी व्यक्ती मोठ्या समुदायासमोर प्रभावी भाषण करतांना आणी श्रोते आदराने वागतांना पाहिले आणि त्यांच्या साध्या आणि सरळ व्यक्तिमत्वाला मनोमन सलाम केला.

आमचाही या गोष्टीला सलाम
प्रकाश घाटपांडे

वा!

नॉरटीआंग येथे एका विद्यार्थ्यांच्या पालकाकडे गेलो असता त्यांनी इतर कुटुंबीयांची ओळख करुन देतांना एका १०-१२ वर्षाच्या मुलीची ओळख करतांना ती आमच्या मुलीसारखी म्हणुन करुन दिली. तीचे वडील अकाली वारल्या मुळे ती व तीची आइ निराधार झाल्या होत्या दोघींना घरी आणुन आई घरी असलेल्या बेकरीत मदत करते आणि मुलीला सेंग खासी च्या शाळेत घातले व त्याचा खर्च ते स्वतःच करतात असे कळले. पुढे असेही कळले की अशी परिस्थिती अनेकांवर येते आणि त्यातुन असा मार्ग काढणे अशी प्रथाच आहे.

आवडले! स्फूर्तीदायक आहे.

आपला
गुंडोपंत

 
^ वर