खरच लवासा एवढे सालसपणे वागेल ?

"समाजाच्या सर्व थरांना विकासाची संधी देणारे लवासा" असा श्री. निळू दामले यांचा लेख दि. २१.०७.२००९ च्या लोकसत्तामध्ये प्रसीद्ध झाला आहे. सदर लेख त्या आधी १७.०७.२००९ रोजी प्रसीद्ध झालेल्या सुलभा ब्रम्हे यांच्या "लवासा लेकसिटी : चंगळवादाचा विनाशकारी रस्ता" या लेखाला उत्तर म्हणून आला आहे.
दोन्ही लेख वाचल्यानंतर मला काही प्रश्न पडले ते तुम्हापुढे ठेवतो आहे.

श्री निळू दामले यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे तेथील धनगरांनी नाचणीचे पीक घेण्यासाठी तेथील झाडे नष्ट केली! ....त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे त्यांची लोकसंख्या होती फक्त ३१००...?

लवासाने जागा घेतल्यावर पावसाळ्यानंतर तरी मिळणारी लाकडे मिळतील का?

झाडे न वाढण्याच कारण जमीनीची धूप की जमीनीची धूप होण्याचे कारण झाडे नसणे ? तारांची जाळी बसवून खरच धूप थांबते?

ना ना प्रकारची नेमकी कोणती झाडे लवासा लावत आहे? शोभेची किती ? देशी (Native) किती ? परदेशी (exotic) किती ? तिथल्या मुळ जैवविवीधतेचे काय ?

पानशेत धरणाच्या पाणलोटक्षेत्राचे संरक्षण करणे अगत्याचे असल्याने या प्रश्नाचा अभ्यास करून त्या परिसराचे शास्त्रशुद्ध संरक्षण कसे करावे याविषयीचा अहवाल १९८६ साली लेखिका आणि वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. तेताली पी. यांनी केंद्र शासनाच्या पर्यावरण खात्याच्या संशोधन अनुदानाखाली पुरा करून पर्यावरण खात्यास सादर केलेला आहे.... सुलभा ब्रम्हे.
....... डॉ. तेताली पी. यांच्या या संशोधनाचे पुढे काय झाले?

पाणी अडवा, पाणी जिरवा घोषणेनुसार लवासा छोटे छोटे बांध घालत आहे. त्यातून एवढं पाणी जमिनीत मुरेल की या शहराला बाहेरून पाणी घ्यावं लागणार नाही.... निळू दामले
.... लवासा प्रकल्पासाठी मोशी नदीच्या उगमस्थानाजवळच्या खोऱ्यात बंधारे बांधण्याची योजना आहे. धामणओहोळ आणि दासवे या खेडय़ांजवळ प्रत्येकी पाच बंधारे बांधून सुमारे १.०३१ अब्ज घनफूट पाणीसाठा व्यापारी वापराकरता करण्याची परवानगी कंपनीने मिळवली आहे. या परिसराला जून महिन्यात भेट दिली असता असे आढळले की, दासवे येथील लवासा धरण पाण्याने भरलेले, पण वरसगाव धरण मात्र कोरडे!... सुलभा ब्रम्हे. ???

९५ हजार रोजगार, स्वच्छ, प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्त रस्ते, हॉटेल, खाण्यापिण्याच्या चांगल्या सोयी, मनोरंजनाच्या सोयी, शिक्षण, आरोग्य, करमणूक, वस्ती ????

शेतकऱ्यांना, आदिवासींनाही ते समजतंय. त्यांना खेडय़ात राहायची इच्छा नाही ..... ???

या प्रकल्पामध्ये कोट्यावधींची उलाढाल होईल. रोजगार निर्माण होतील. करांच्या स्वरूपात सरकारला वाढीव उत्पन्न मिळेल....निळू दामले.
.....लवासा कॉर्पोरेशनला शासनाने मुद्रांक शुल्क माफ केले आहे. कंपनीने २४ सप्टेंबर २००२ रोजी सूट मिळण्यासाठी अर्ज केला आणि २५ सप्टेंबर २००२ रोजी सूट मिळालीही! शासनाने १००० ते ५००० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडले आहे....सुलभा ब्रम्हे. ???

खरच लवासा एवढे सालसपणे वागेल ?

कॄपया जिज्ञासूंनी दोन्ही लेख वाचून चर्चा करावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

इंडिया आणि भारत

लवासाचा प्रकल्प हा इंडियन्सनी इंडियन्ससाठी(प्रामुख्याने अनिवासी) बनवला आहे. त्या बनवण्यात शरिरिक काबाडकष्ट सोडले तर भारतीयांचा काहीही सहभाग नाही तसेच तो भारतीयांसाठी बनवलेला नाही. यात सर्व काय ते आले.
या प्रकल्पाच्या उभारणीत धनलाभ् कोणाला झाला आहे ते सर्वांना माहित आहे.
चन्द्रशेखर

आंदोलन मधील लेख

जरा उशीराच आंदोलनचा अंक हाती आला. मेधा पाटकर आणि रिफत मुमताज यांचा ’लवासा : कंपनी राज’ हा लेख लवासावरील बरेच मुद्दे मांडतो असे वाटल्याने त्यातील निवडक मुद्दे इथे देत आहे.

1. महाराष्ट्र शेतजमीन (कमाल धारणा) कायदा १९६१ च्या अंतर्गत आदिवासींना वाटप करण्यात आलेल्या जमीनींच्या वापरहेतूमध्ये बदल करून घेतले.
2. म. कृ. खो. वि. म. ची सार्वजनीक हितासाठी असलेली जमीन खाजगी हेतूसाठी व वनीकरणासाठी राखीव असलेली वनजमीन वनेतर हेतूसाठी हस्तांतरीत करून घेण्यात आली.
3. प्रकल्प १०००मी. पेक्षा जास्त उंचीवर असूनही पर्यावरण आणि वन मंत्रालयाची पर्यावरणीय मान्यता घेतलेली नाही.
4. अतिरीक्त संपादीत जमीनीची मुळ मालकाला भरपाईची शिफारस आहे रु. १.५० प्रती गुंठा. (लवासाची विक्री किंमत आहे फ्क्त ४ कोटी रुपये प्रती गुंठा ! !)

इच्छूकांनी गुगल वरून पहाणी करावी म्हणजे फ़क्त एका भागातील कामाने केलेली निसर्गाची हानी दिसून येईल (चित्रे २००५ मधील आहेत)
सर्व मुद्दे वेळेअभावी टंकता आले नाहीत. इच्छूकांनी आंदोलनचा जुन जुलै २००९ चा जोड अंक पहावा ( लेख प्रकाशचित्रांसह आहे.)

“आंदोलन – शाश्वत विकासासाठी”
द्वारा- ६, राघव, श्रीरघुराज सोसायटी,
११८ – अ, सिंहगड रोड, पुणे - ३०
फो. ०२० – २४२५१४०४
Email : andolan.napm@gmail.com

जाता जाता : या लेक सिटीचे सारे waste water हे वरसगाव धरणात उतरणार आहे (दुसरा मार्गच नाही) आणि पुणेकर ते पिणार आहेत.

अवांतर : 'उरूळी देवाची' च्या गावकर्‍यांना बदला घेतल्याचे समाधान लाभेल का ?

.........................
कोणीतरी.......कुठेतरी
काहीतरी......काहीतरी

 
^ वर