पूर्वांचलातील प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील जनकल्याण समिती सारख्या राष्ट्रवादी संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या प्रकल्पांमधून पूर्वांचलात दुहेरी प्रतिक्रिया झाली. सामान्य समाज आनंदला. अन्य भारतीयांबद्दलची कटुता दूर होऊन कृतज्ञतेने जन्म घेतला व उर्वरित भारतातून पूर्वांचलात जाऊन तेथे सेवामग्न असलेल्या कार्यकर्त्यांकडे अधिक आपुलकीने तर पाहू लागलेच ; पण वेळप्रसंगी फुटीरतावाद्यांच्या हल्ल्यापासून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या शरिराची ढाल देखील बनवली.

दुसरीकडे मिशनरी मात्र बिथरले. स्थानीय लोकांची मने कलुषित करण्यासाठी त्यांनी उर्वरित भारतातील या संस्थांबद्दल गैरसमज पसरविले. या संघतटना मुलांचा बालमजूर म्हणुन व्यापार करतात-वगैरे भाकड गोष्टी सांगून बघितल्या; पण विद्यार्थ्यांच्या पालकांनी पत्रव्यवहारातून, दूरभाषिक संभाषणामधून वा प्रत्यक्ष येथे भेट देऊन वेळोवेळी स्वतःचे व अन्य समाजाचे गैरसमज दूर केले.

दोन वर्षे शिक्षण पूर्ण करुन सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये पूर्वांचलात परतलेल्या या विद्यार्थ्यांनी हे गैरसमज दूर करण्यासाठी मोलाची मदत केली. त्यांचा झालेला विकास व त्यांनी केलेल्या व्यवहाराकडे पाहून अनेक पालक आपल्या पाल्याला महाराष्ट्रातील या वसतिगृहांमध्ये पाठविण्यास इच्छुक झालेले दिसतात. माझ्या तेथील भेटित मला असे चित्र दिसले की महराष्ट्रात शिक्षणासाठी येणारे इच्छुक विद्यार्थी आणि आपल्याकडे असलेलि व्यवस्था यांचा मेळ घालण्यासाठी विद्यार्थ्यांची छाननी करण्याच्या उद्देशाने तिथे प्रवेश परिक्षा घेउन विद्यार्थी निवडावे लागले. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करण्याची आंतरिक इच्छा असुनही उपलब्ध व्यवस्थे च्या कमतरतेमुळे काही विद्यार्थ्यांना विन्मुख करावे लागते ही खरी खंत आहे.

पुर्वांचलातील फुटीरतेच्या गंभीर आव्हानाला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी संघटनांनी प्रयत्न चालविलेले असले तरिदेखील आज दोन्ही बाजूंची तुलना केली तर पूर्वांचलात विषमयुध्द चालेले असल्याचे दिसते. एकीकडे बंगलादेशींनी पध्द्तशीरपणे चालवलेली घुसखोरी, सुसंघटित ख्रिश्चनिटी व सुनियोजित आंतरराष्ट्रीय दहशतवात तर दुसरीकडे छद्मधर्मनिरपेक्षतेच्या कल्पनांमध्ये व सर्वधर्म समभावाच्या भ्रामक व अतिरेकी मोहात सापडलेला असंघटित भारतिय समाज असे हे युध्द विषम आहे !

या विषम युध्दाचे रुपांतर समयुध्दात करण्यासाठी आणि पूर्वांचलाची समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी संघटना आपल्याला वारंवार आवाहन करतात. जेथे या सर्व संस्थांचे एकूण दोन हजार पूर्णवेळ कार्यकर्ते 'जोडण्याचे' काम करतात त्यांच्या समोर तीस हजारांपेक्षा अधिक मिशनरी व सुमारे सात हजार अतिरेकी 'तोडण्याचे' काम करतात.

मनुष्य बळ- शिक्षक, डॉक्टर, वसतिगृह संचालक, प्रवासी कार्यकर्ते, व्यवसाय मार्गदर्शक इत्यादी अनेक रुपांमध्ये प्रत्यक्ष तेथे जाउन कार्य करण्याची आवश्यकता आहे.

आर्थिक सहाय्य- कितीतरी मार्गातुन फुटीरतेला कोट्यावधी डॉलर्स प्रतिवर्षी प्राप्त होतात. उलट राष्ट्रवादी संघटनांना लागणारा निधी मात्र फारच थोडा असतो. या संघटनांच्या कार्यकर्त्यांना निधी संकलनासाठी वणवण भटकावे लागते. दान देउन, उपकार म्हणुन नव्हे तर स्वतःच्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी चाललेल्या अभियानातील सहभाग म्हणुन उर्वरित भारतवासीयांनी या सर्व संस्थांच्या मागे आर्थिक आधार उभा केला पाहिजे.

प्रत्यक्ष सहभाग - पूर्वांचलाशी संबंधित महाराष्ट्रात चालू असलेल्या सर्व कार्यांमध्ये सक्रीयपणे सहभागी होऊन आपण पूर्वांचलाबद्दलचे आलपले कर्तव्य येथे राहून देखिल बजावू शकतो. विद्यार्थी परिषदेची 'सील'(एस्.इ.आय.एल्) वा जनकल्याण समितीच्या 'भारत मेरा घर' या यात्रांच्या आगमनाच्या वेळी विविध व्यवस्थांमध्ये समजाने पुढाकार घेतला पाहिजे. त्याच प्रमाणे पूर्वांचलाला प्रत्यक्ष भेट देण्याचे काम पर्यटक म्हणून अवश्य केले पाहिजे. तेथील संस्थांचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते याबाबतीत निश्चीत पणे आपणास सहाय्य करतील.

पूर्वांचलाच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या आवाहनाचा समाज अवश्य विचार करेल असा विश्वास वाटतो. राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वप्रथम असली पाहिजे, जर तीच नसेल तर आपण मिळवलेले वैभव एक दिवस कसे व्यर्थ होते याचा अनुभव घेतलेल्या - १९४७ साली सर्वस्व गमावून निर्वासीत बनलेल्या सिंधी, पंजाबी व बंगाली आणि १६ वर्षांपासुन निर्वासित झालेल्या काश्मीरी हिंदूच्या उदाहरणावरुन सर्वांनीच बोध घेतला पाहिजे.

केन्द्र सरकार, राष्ट्रवादी संघटना व दोन्हींकडील समाज यांनी सुसंघटितपणे जर कार्य प्रारंभ केले तर काही वर्षातच पूर्वांचलात शांततेचे, विकासाचे व एकात्मतेचे एक नविन पर्व निश्चितच सुरु होईल. आज पुर्वांचलाला वाचवणे म्हणजे उद्याच्या भारतालाच वाचवणे आहे.याचे स्मरण ठेवून प्रत्येक भारतीयाने आपले कर्तव्य बजावले पाहिजे. तरच उद्या पूर्वांचलाची सौंदर्यभूमी शापमुक्त होईल.

लेखनविषय: दुवे:

Comments

परस्पर परिचय

भारताच्या ईशान्य भागातील राज्यांना (ज्यांना सप्तभगिनी म्हणतात) पर्यटक म्हणून भेट द्यायचे नागरिकांनी ठरविले व इतर राज्यातील सचिन, केसरी, राज सारख्या पर्यटन संस्थांनी जर त्यादृष्टीने कार्यक्रम आखले तर जास्तीत जास्त इतर राज्यातील लोकं सप्तभगिनींना भेट देतील. परस्पर-परिचय वाढेल आणि तेथील लोकांचे मातृभूमी विषयी गैरसमज दूर होतील.

--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

८० हजार कोटी रुपये

आजच्या वर्तमानपत्रातील दोन बातम्या:-(१) मायावतीने बुंदेलखंड आणि पूर्वांचल या दोन विभागातील दुष्काळाला तोंड देण्यासाठीच्या खर्चासाठी केन्द्र सरकारकडे ८०,०००,००,००,००० रुपयांची मागणी केली. पूर्वांचल हा ईशान्यवर्ती भारताचा भाग नसून उत्तर प्रदेशाचा आहे हे आतातरी पटावे.(२) मेघालय आणि मणिपूरमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नावाखाली कर्नाटकात फूस लावून आणत असल्याच्या अनेक तक्रारींविरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.--वाचक्नवी

अरेरे

मेघालय आणि मणिपूरमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नावाखाली कर्नाटकात फूस लावून आणत असल्याच्या अनेक तक्रारींविरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.--

शिक्षणासाठी कसली आली आहे फूस?
अरेरे!

तत्पेक्षा फूस लावून धर्मांतर करणार्‍यांची चौकशी व्हायला हवी. न्युझिलंडच्या चर्चची मदत करणे आणि त्याचे परिणाम याची चौकशी व्हायला हवी. त्या ख्रिस्ती धर्मांतराच्या परिणांमाबद्दल त्यां न्युझिलँड च्या चर्चेसकडून दंड वसूल करून तो संघाच्या शिक्षण प्रकल्पांवर वापरला जायला हवा.
यासाठी संघानेही न्युझिलँड मध्ये लॉबींग करायला हवे.

आपला
गुंडोपंत

सहमत, पुर्वांचल आणि अवांतर

१. गुंडोपंताशी न्यूझीलंडच्या चर्चच्या बाबतीत सहमत

२. श्री. वाचक्नवी म्हणतात ते खरे आहे. पुर्वांचल हा उत्तर प्रदेशचा भाग आहे अशीच माझीही माहिती आहे

अवांतर
माझ्या माहीतीप्रमाणे आधी उत्तरांचल व उत्तराखंड हे दोन वेगळे विभाग होते आता अचानक उत्तरांचल चे नामकरण उत्तराखंड झालेले बघुन बुचकळ्यात पडलो आहे.

खरंतर
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

उत्तराखंड आणि उत्तरांचल

उत्तर प्रदेश जेव्हा संयुक्त प्रान्त होता तेव्हापासून उत्तर प्रदेशाचे उत्तरांचल, व्रज, अवध, बुंदेलखंड, बागेलखंड आणि पूर्वांचल असे विभाग होते. ह्या ठिकाणी असलेल्या नकाशांपैकी खालचा नकाशा पहावा. पुढे जेव्हा उत्तरांचलाचे वेगळे राज्य झाले तेव्हा त्या प्रान्ताचे नाव उत्तराखंड ठेवले गेले. (नांवात घोटाळा होऊ नये म्हणून जे केले ते योग्यच केले.) --वाचक्नवी

 
^ वर