ईशान्य भारतातील प्राणी जीवन

ईशान्य भारतात जशी नैसर्गिक संपदा भरपुर आहे तसेच तेथील प्राणि जीवन देखील वैविध्यपुर्ण आहे. र्‍हायनो, याक, मिथुन हे प्राणि काय किवा फॉक्स टेल्ड ऑर्किड हे फुल काय भारतियांनी कधीच न पाहिलेली ही संपदा देखील इथेच दिसते.

हॉर्नबिल पक्षी हे अरुणाचल चे खास वैशीष्ठ्य 'शिंग चोच्या" असेही याला म्हणतात कारण याची चोच हि शिगासारखी मजबुत असते. मलबारी धनेश या नावाने हो सह्याद्रि व कोकण भागात ओळखला जातो. हा विशालकाय पक्षी घारीपेक्षाही मोठा असतो. या पक्षाची मादी अंडी उबवण्यासाठी झाडाच्या ढोलित जाउन बसते आणि हवा घेण्यासाठी केवळ चोच बाहेर काढता येइल इतकी जागा ठेवुन ढोलिचा दरवाजा स्वत:च्या विष्ठेने लिपुन टाकते. अंडी उबवुन पिल्ले बाहेर येत पर्यंत मादी अशी स्वतःच तयार केलेल्या कैदेत बंद रहाते. पिल्ले मोठी होइस्तेवर त्यांचे व मादीचे संगोपन करण्याचे काम नराचे असते. पिल्ले मोठी झाल्यावर नर आपल्या बळकत चोचीने हा दरवाजा तोडतो आणि मादीची सुटका करतो. यदाकदाचीत जर नर या दरम्यान मारला गेला तर मादी व पील्यांना जिवंत समाधिच मीळते कारण मादीने स्वतःच्या विष्ठेने तयार केलेले हे बंदीगृह तोडुन बाहेर् निघणे मादीला शक्य नसते इतके ते मजबुत असते.

Hornbill
लेखनविषय: दुवे:

Comments

वा!

कर्नाळा किल्ल्याजवळ असणार्‍या पक्षी सँक्च्युएरी (मराठी गंडलं)मध्ये महाकाय धनेश पक्षी आणि त्याचा तो बिगूल वाजवल्याप्रमाणे आवाज ऐकण्याचे भाग्य लाभले होते त्याची आठवण झाली.

लेख थोडे विस्तृत लिहावे, किंवा लहान लेख एकत्र करून मोठा लेख लिहावा.

 
^ वर