प्रवास

पुणे विद्यापीठाच्या आवारात,

..... या नावाचा माणूस पंढरपूरपासून पुण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासाबद्दल काहीतरी सांगत असतो, त्याच्या घरातल्या भाऊबंदकीबद्दल काहीतरी सांगत असतो, त्याच्या भणंग आयुष्याबद्दल काहीतरी सांगत असतो,

तेव्हा चाफ्याच्या झाडांच्या निष्पर्ण फांद्यांच्या सावलीचं जाळं रस्त्यावर पसरलेलं असतं आणि चाफ्याची फुलं जमिनीवर पडलेली असतात. . .

मळलेला सदरा, पँट. . . टक्कल, उदास चेहरा, दाढीचे खुंटं. . . पायामध्ये काहीतरी दोष असल्यामुळे बेढब झालेली चाल. . . असा तो माणूस चालत जात असतो.

प्रवास
लेखनविषय: दुवे:

Comments

प्रवास

पहिल्या फेरीत छायाचित्र चिकटविण्यात चूक झाली, ती दुरुस्त करत आहे.

छायाचित्रे

ब्लॉगवर सुरेख चित्रे आहेत. येथेही आणखी डकवा.
शरद

आवडले

वा! प्रस्तावनेत गुंफलेले छायाचित्र खूपच आवडले
घेतानाच कृष्णधवल घेतले की नंतर बदल केला आहे?

अधिज्क चित्रे येऊ द्यात..

टिपः अनेक उपक्रमी चांगले छायाचित्रकार आहेत.. त्यामुळे क्यामेराची आणि फोटोच्या सेटिंगची माहिती टाकलीत तर त्यांच्या प्रतिक्रीयांतून माझ्यासारख्या नवख्याला शिकता येते.. तेव्हा क्यामेरा व क्यामेराची सेटिग्जही टाकावित ही विनंती

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

हेच म्हणतो

हेच म्हणतो
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

शरद, ऋषिकेश, प्रकाश घाटपांडे,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

ऋषिकेश,
हे छायाचित्र रंगीत फिल्मवर काढून नंतर कृष्णधवल केले आहे.
लेन्स- ३५ एम्. एम्.
इतर सेटिंग्ज् नोंदविली नव्हती.

 
^ वर