कल्पनेच्या तीरावर

शशश्रुंग- एक असा देश जिथे लैंगिक भूक ही नैसर्गिक गरज असल्याने अतिशय सामान्य बाब, गोपनीय नसलेली, जशी आपल्या समाजात पोटाची भूक ही अतिशय सामान्य बाब.
शशश्रुंग- एक असा देश जिथे मृत्यू ही आनंददायक घटना आहे.
शशश्रुंग- एक असा देश जिथे विचारवंत, गवंडी, न्हावी, राजकारणी या सगळ्यांना समान महत्त्व आहे.
शशश्रुंग- एक असा देश जिथे देवाचे अस्तित्व मान्य आहे पण धर्माचे नाही.

असे अनेक सामाजिक नितीनियम शशश्रुंग देशाला आपल्या समाजापासून वेगळा ठरवतात.
आपल्या सामाजिक नितीनियमांमागे काहीतरी कारणं आहेत (असं आपण मानतो) , त्याप्रमाणेच शशश्रुंगातही प्रत्येक नियमामागे काहीतरी ठोस तात्त्विक कारण आहे.
शशश्रुंगाबद्दल अशा अनेक गोष्टी सांगता येतील पण त्या मुळातून वाचणे इष्ट, कारण मूळ कादंबरीची किमान पातळीवरून ओळख करून देण्याएवढीच माझी पात्रता.
वि. वा. शिरवाडकर यांची 'कल्पनेच्या तीरावर' ही कादंबरी म्हणजे एक तत्त्वज्ञान आहे. मराठीतली एक दुर्लक्षित कलाकृती.
मॅजिकल रिआलिझम, फँटसी. . .( मॅजिकल रिआलिझमवाला मार्क्वेझ).
फिलॉसॉफी थ्रू फिक्शन.

कल्पनेच्या तीरावर- वि. वा. शिरवाडकर,
काँटिनेन्टल प्रकाशन,
किंमत- पन्नास रुपये.

लेखनविषय: दुवे:

Comments

चूक

पहिल्यांदाच येथे लिहित असल्याने गडबडीत विषय निवडीत चूक राहून गेली आहे, त्याबद्दल क्षमस्व.

कल्पनेच्या तीरावर

वरील पुस्तक मी २५ किंवा ३० वर्षांपूर्वी वाचले होते. त्या वेळी ते मला अगदी ओढून ताणून लिहिल्यासारखे वाटले होते. आता परत एकदा वाचले पाहिजे.
चन्द्रशेखर

ओढून ताणून

ही कादंबरी काही वेळा ओढून ताणून लिहिल्यासारखी वाटते, हे काही प्रमाणात खरेच. पण तरीही (मराठीतील) एक त्यातल्यात्यात वेगळा प्रयोग वाटला.

 
^ वर