ओपन आयडी

काही दिवसांपूर्वी मी ओपन आयडी बद्दल वाचले. कल्पना छान आहे. माझाही एक ओपन आयडी बनवला.
कल्पना अशी आहे की तुम्हाला वेगवेगळ्या स्थळांवर प्रत्येक वेळी नवीन सदस्य नाव न बनवता लॉगीन करता येइल. या मुळे अगणित स्थळांवरील अगणित आयडीज् आणि अगणित पासवर्डस् लक्षात ठेवायाची गरज नाही.
उपक्रम, मायबोली, मनोगत, मिसळ पाव आणि इतर अनेक मराठी स्थळे द्रुपल वापरून बनवली आहेत. द्रुपलचेही ओपन आयडी मॉड्यूल आहे.
तुम्हाला काय वाटते? उपक्रम नी स्वतः मध्ये बदल करून ओपन आयडी वापरण्याची सुविधा द्यावी का?
तुमचा मधील अनेकांचे इतर मराठी स्थळांवर आयडीज् आहेत. तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्या त्या स्थळांवरील संपादक मंडळाला विनंती कराल का?

http://marathinet.tk

Comments

नंतर बंद

अनेक संकेतस्थळांनी ओपन आय डी ची आधी असलेली सुविधा बंद केली आहे.

कारण?

याचे कारण काय आहे?

धोका

ओपनाअयडीमध्ये एकच पासवर्ड लक्षात ठेवण्याची सुविधा असली तरी तो एकच पासवर्ड कुणाच्या हाती लागला तर तुमची सर्व खाती कॉम्प्रोमाइज होतात. यामुळे ही संकल्पना कधी वापरावीशी वाटली नाही.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

 
^ वर