ख्रिस्ती अल-कायदा

एखाद्या राज्यात जेंव्हा ख्रिश्चन मिशनरी हे अल्पसंख्याक असतात तेंव्हा ते खुप मितभाषी आणि सभ्यतेने वागतात. जेंव्हा ते बहुसंख्येत होतात तेंव्हा ते कोल्ह्यासारखे लबाड होतात. आणी जेंव्हा ते सत्ताधारी होतात तेंव्हा ते नृशंस आणी क्रुर होतात अशा अर्थाची एक ईंग्रजी म्हण आहे. भारतासारक्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात त्रिपुरा राज्यात एक फेरफटका मारल्यास याची प्रचिती येते. अतिरेकी संघटनेला हाताशी धरुन अमेरीकन बाप्टीश चर्च तेथे जो धुमाकुळ घालुन सामान्य नागरीकांना सळो की पळो करित आहे त्याची तुलना केवळ अल् कायदा या दहशतवादी संघटनेशी केल्यास वावगे ठरु नये.

आपल्या भारतात एखाद्या राज्याची शासकिय भाषा ईग्रजी असु शकते यावर मी तेथे जात पर्यंत माझा विश्वास नव्हता. एकतर राज्याची शासकिय भाषा तेथील स्थानिक लोकांची भाषा असावी किंवा राष्ट्रभाषा हिंदी असा माझा भाबडा समज तिथे दुर झाला.

त्रिपुरा राज्यातील अतिरेकी संघटना आणी त्याचे तेथील पाठीराखे याबाबत विस्तृत वर्णन पुढील लेखात.

लेखनविषय: दुवे:

Comments

भाबडा समज

"आपल्या भारतात एखाद्या राज्याची शासकिय भाषा ईग्रजी असु शकते यावर मी तेथे जात पर्यंत माझा विश्वास नव्हता. एकतर राज्याची शासकिय भाषा तेथील स्थानिक लोकांची भाषा असावी किंवा राष्ट्रभाषा हिंदी असा माझा भाबडा समज तिथे दुर झाला."

तुम्ही नागालॅंडचा उललेख करत आहे का की त्रिपुरा ह्या राज्याबद्दल?

विकी वर त्रिपुरा राज्याची राज्य भाषा इंग्रजी आहे ह्याचा उल्लेख केलेला दिसत नाही.

खालील ४ राज्यांमध्ये इंग्रजी ही अधिकृत भाषा म्हणून वापरली जाते. त्यातील ३ राज्यात बोली भाषेबरोबर इंग्रजीही पण एक राज्य भाषा आहे. नागालॅंड हे एकमेव राज्य आहे की तिथे इंग्रजी हीच एक राज्य भाषा आहे.
मेघालय --> खासी, गारो, इंग्रजी
मिझोरम --> मिझो, इंग्रजी
नागालॅंड --> इंग्रजी
तामिळनाडू --> तमिळ,इंग्रजी

भारताच्या अधिकॄत भाषा बद्दलची अधिक माहिती.

राज्य अधिकृत भाषा
१. आंध्र प्रदेश --> तेलुगू, हिंदी, उर्दू
२. अरुणाचल प्रदेश --> इंग्रजी, हिंदी
३. आसाम --> आसामी, बोडो, बंगाली, करबी
४. बिहार --> हिंदी, उर्दू, भोजपुरी, मगधी, मैथिली
५. छत्तीसगढ --> हिंदी, छत्तीसगढी
६. गोवा --> कोंकणी, मराठी, पोर्तुगीज
७. गुजरात --> गुजराती
८. हरियाणा --> हिंदी, पंजाबी
९. हिमाचल प्रदेश --> हिंदी, पहाडी
१०. जम्मू आणि काश्मीर --> उर्दू, काश्मीरी
११. झारखंड --> हिंदी
१२. कर्नाटक --> कन्नड
१३. केरळ --> मल्याळम
१४. मध्य प्रदेश --> हिंदी
१५. महाराष्ट्र --> मराठी, कोंकणी
१६. मणिपूर --> मैतेई
१७. मेघालय --> खासी, गारो, इंग्रजी
१८. मिझोरम --> मिझो, इंग्रजी
१९. नागालॅंड --> इंग्रजी
२०. ओरिसा --> ओरिया
२१. पंजाब --> पंजाबी
२२. राजस्थान --> हिंदी, राजस्थानी
२३. सिक्कीम --> नेपाळी
२४. तामिळनाडू --> तमिळ,इंग्रजी
२५. त्रिपुरा --> बंगाली, कोकबोरोक
२६. उत्तराखंड --> हिंदी
२७. उत्तर प्रदेश --> हिंदी, उर्दू
२८. पश्चिम बंगाल --> बंगाली

गोव्यात कोंकणी ही राज्यभाषा, मराठीला सहभाषेचा दर्जा

१९८७च्या राजभाषा कायद्यानुसार कोंकणी (देवनागरी लिपीत लिहिलेली) ही गोव्याची एकच राज्यभाषा आहे. परंतु सरकारी कार्यालयाशी मराठीतून (आणि हिंदीमधूनही) पत्रव्यवहार करायची मुभा आहे (पण ती राज्यभाषा नाही.) पोर्तुगीज तर गोव्यातली राज्यभाषा मुळीच नाही. पोर्तुगीज वाचता येणारे लोक गोव्यात आता फारच थोडे सापडतील.

(वरील यादी ठीक नसावी.)

सत्य आहे

एखाद्या राज्यात जेंव्हा ख्रिश्चन मिशनरी हे अल्पसंख्याक असतात तेंव्हा ते खुप मितभाषी आणि सभ्यतेने वागतात. जेंव्हा ते बहुसंख्येत होतात तेंव्हा ते कोल्ह्यासारखे लबाड होतात. आणी जेंव्हा ते सत्ताधारी होतात तेंव्हा ते नृशंस आणी क्रुर होतात अशा अर्थाची एक ईंग्रजी म्हण आहे.

अगदी सत्य आहे. परंतु अल्पसंख्याक असतात तेंव्हा ते खुप मितभाषी वगैरे नसतात, ते फारच भामटेपणाने बोलत असतात!

बाकी पटण्यासारखे आहे,
कुठेही पाहिले तरी ते दिसतेच आहे. शांतीचा संदेश देणार्‍या या क्रुसाच्या आड किती क्रौर्य आहे ते इतिहासात वारंवार दिसतेच!

कुणा रोमन लोकांनी कधी तरी जोडजाड करून भामटेपणाने एकत्र केलेल्या बायबल नामक ग्रंथाने जेव्हढा रक्तपात घडवला तितका फक्त दुसर्‍या एका ग्रंथानेच घडवला आहे.

आपला
गुंडोपंत

भारतात एखाद्या राज्याची शासकिय भाषा ईग्रजी असु शकते यावर मी तेथे

भारतात एखाद्या राज्याची शासकिय भाषा ईग्रजी असु शकते यावर मी तेथे जात पर्यंत माझा विश्वास नव्हता.

भारताची शासकीय भाषा इंग्रजी (हिंदीसोबत) आहे.

बाय द वे, कालच मुलायमसिंग यांनी संसदेत इंग्रजीत उत्तर देणाऱ्या मंत्र्यांना उद्देशून हे इंग्लंडचे पार्लमेंट आहे का असा प्रश्न केल्याचे पेपरात वाचले. त्यांची कीव करावी तितकी थोडीच.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

बाय द वे, कालच मुलायमसिंग यांनी संसदेत इंग्रजीत उत्तर देणाऱ्या मंत्र्यांना उद्देशून हे इंग्लंडचे पार्लमेंट आहे का असा प्रश्न केल्याचे पेपरात वाचले. त्यांची कीव करावी तितकी थोडीच.

सहमत.

आजूबाजूस कोणी इंग्रजी बोलल्यास अथवा पाश्चात्य संगीत वगैरे ऐकल्यास "अंग्रेज़ चले गये, लेकिन औलाद पीछे छोड़ के चले गये" अशा प्रकारची विधानेही पूर्वी ऐकलेली आहेत, त्यापेक्षा हे विधान आणि त्यामागची मानसिकता फारशी वेगळी वाटत नाही.

अर्थात या किंवा अशा प्रकारचे विधान भारताच्या कोणत्याही भागात कोणत्याही भाषेतून (आणि इंग्रजीच्याच नव्हे, तर स्वभाषा अथवा "आपली" मानलेली भाषा वगळता इतर कोणत्याही भाषेच्या बाबतीत) ऐकायला मिळाल्यास आश्चर्य नसावे. (किंबहुना भारताच्याच नव्हे, तर जगाच्या कोणत्याही भागात हे थोड्याफार फरकाने खरे असावे, असे वाटते. शेवटी हा मानवी स्वभावाचा भाग आहे.)

मात्र या विशिष्ट उदाहरणात, इंग्रजी भाषेबद्दलच्या (नेहमीच्याच यशस्वी) न्यूनगंडाबरोबरच, "आपली" भाषा ही "राष्ट्रभाषा" मानली गेल्यामुळे तिच्या "वर्चस्वा"संबंधी (hegemony अशा अर्थी) असलेल्या सुप्त (आणि भ्रामक) कल्पना कितपत कामी येत असाव्यात, हे कळत नाही.

अर्थात अशा विधानांस चपखल प्रतिवाद हा संसदेत संबंधित मंत्र्यांनी अस्खलित तमिळ, मराठी अथवा बंगालीतून अथवा भारताच्या अधिकृत संसदीय भाषांपैकी हिंदी आणि इंग्रजी वगळता जी कोठली भाषा संबंधित मंत्र्यास अवगत असेल त्या आणि त्याच भाषेतून अट्टाहासाने प्रश्नांना उत्तरे देऊन करता येण्यासारखा आहे.

"भारत की सभी भाषाऍं हमारी अपनी भाषाऍं हैं' हे वाक्य केवळ दिल्ली परिवहन निगमच्या बसेसच्या आतल्या भिंतींवर लिहिण्याकरिता (मुंबईच्या लोकलमधील पर्ल सेंटरच्या जाहिरातींप्रमाणे) अपरिहार्य न राहता ज्या दिवशी त्या बसेसच्या बाहेर पडून जनमानसात उतरेल, त्या दिवशी भारत खर्‍या अर्थाने एकात्म व्हायच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.

भाषा

"भारत की सभी भाषाऍं हमारी अपनी भाषाऍं हैं' हे वाक्य केवळ दिल्ली परिवहन निगमच्या बसेसच्या आतल्या भिंतींवर लिहिण्याकरिता (मुंबईच्या लोकलमधील पर्ल सेंटरच्या जाहिरातींप्रमाणे) अपरिहार्य न राहता ज्या दिवशी त्या बसेसच्या बाहेर पडून जनमानसात उतरेल, त्या दिवशी भारत खर्‍या अर्थाने एकात्म व्हायच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.

इथे दुर्गाबाई भागवतांच्या दुपानी या पुस्तकातील एक उतारा द्यावासा वाटतो.
"आम्ही शिकत होतो तेव्हा मुंबई इलाख्यात सिंधी, गुजराती, मराठी नि कानडी (धारवाडला कानडी, मराठी दोन्ही भाषा होत्या.) अशा भाषांची चौसंगी होती. एकाच शिक्षणखात्यामुळे नवी रचलेली गाणीही दुसर्‍या प्रातीय भाषांशी विसंगत नसत. साने गुरूजींनी या जुन्या मिळतेजुळतेपणाला आकार दिला, रंग दिला, गती दिली नि राष्ट्रीय झोतात आंतरभारतीला खेळते ठेवले. पण नंतर? प्रांतवार भाषारचना अस्तित्वात आल्यानंतर मागचे सहज दळणवळण तुटले. लोक सांस्कृतिक एकात्मता विसरले. भाषिक अलगता व हेवा वाढला. प्रथम आंतरभारतीने या रेट्याला तोंड दिले. पण आता तो झरा प्रसन्नपणे झुळझुळत नाही हे खरे आहे."

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

सुंदर

वा! काय छान लिहिले आहे दुर्गाबाईंनी.
आवडले!
येथे दिल्याबद्दल धन्यवाद.

जेंव्हा दोन्ही बाजूंनी असा भाव आणलेला असतो तेंव्हा विलगता वाढीस न लागता सलगताच अनुभवास येते यात शंका नाही.

आपला
गुंडोपंत

परामर्शाचा प्रयत्न

एखाद्या राज्यात जेंव्हा ख्रिश्चन मिशनरी हे अल्पसंख्याक असतात तेंव्हा ते खुप मितभाषी आणि सभ्यतेने वागतात. जेंव्हा ते बहुसंख्येत होतात तेंव्हा ते कोल्ह्यासारखे लबाड होतात. आणी जेंव्हा ते सत्ताधारी होतात तेंव्हा ते नृशंस आणी क्रुर होतात अशा अर्थाची एक ईंग्रजी म्हण आहे.

अशी इंग्रजी म्हण माझ्या ऐकण्यात किंवा वाचनात आजतागायत आलेली नाही. कृपया संदर्भ देऊ शकाल काय? माझ्या इंग्रजी सुभाषितसंपदेत भर घालण्यास मोलाची मदत होईल.

भारतासारक्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात त्रिपुरा राज्यात एक फेरफटका मारल्यास याची प्रचिती येते.

भारताव्यतिरिक्त इतर धर्मनिरपेक्ष राष्ट्रांत 'त्रिपुरा' नावाचे राज्य (निदान माझ्या माहितीत तरी) नसल्याकारणाने, भारतासारख्या इतर धर्मनिरपेक्ष राष्ट्रांत त्रिपुरा राज्यात फेरफटका मारून याची प्रचीती येऊ नये, असे वाटते.

कृपया वाक्याचा पुनर्विचार व्हावा. अन्यथा, इतरही एखाद्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात 'त्रिपुरा' नावाचे एखादे राज्य असल्यास, तसे कळवावे. माझ्या भौगोलिक ज्ञानात भर घालण्यास मोलाची मदत होईल.

विनोदाचा भाग सोडल्यास,

भारतासारक्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात त्रिपुरा राज्यात एक फेरफटका मारल्यास याची प्रचिती येते. अतिरेकी संघटनेला हाताशी धरुन अमेरीकन बाप्टीश चर्च तेथे जो धुमाकुळ घालुन सामान्य नागरीकांना सळो की पळो करित आहे त्याची तुलना केवळ अल् कायदा या दहशतवादी संघटनेशी केल्यास वावगे ठरु नये.

यात नेमका आक्षेप कशाला आहे?
१. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे या बाबीला?
२. अमेरिकन बॅप्टिस्ट चर्चसारख्या ख्रिस्ती संघटना त्रिपुरात किंवा भारतात अन्यत्र धर्मप्रसार करतात, या बाबीला? की,
३. अमेरिकन बॅप्टिस्ट चर्चसारख्या संघटना स्थानिक सामान्य नागरिकांना सळो की पळो करून सोडतात, या बाबीला?

पहिल्या मुद्द्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारत हे घटनेनुसार धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे खरे. आहे हे असे आहे, आणि जसे आहे तसेच चांगले आहे, असे निदान मला तरी वाटते. आपल्याला तसे वाटत नसल्यास, आणि भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे या बाबीस आपला विरोध असल्यास, तसे मत स्पष्टपणे मांडावे.

दुसर्‍या बाबीबद्दल बोलायचे झाल्यास, एकदा भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे म्हटल्यावर कोणालाही कोणत्याही धर्माचा प्रसार करण्यास घटनेनुसार, आणि म्हणूनच कायद्याने, आडकाठी येऊ शकत नाही. (या 'कोणालाही' मध्ये देशी संघटना अथवा विदेशी संघटना असा भेदही होऊ शकत नाही. मात्र, अशा विदेशी संघटनांना भारतात येऊ देताना त्यांच्यावर काही अंशी नियंत्रण ठेवले जाऊ शकते. मिशनर्‍यांकरिता वेगळा व्हिसा असतो, आणि असा व्हिसा देण्याची कार्यपद्धतीही सामान्य पर्यटक व्हिसा देण्याच्या कार्यपद्धतीपेक्षा वेगळी आहे. तसेच अशा मिशनरी व्हिसाऐवजी सामान्य पर्यटक व्हिसावर भारतात प्रवेश करून नंतर धर्मप्रसारकार्यच नव्हे, तर एखाद्या साध्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन आयत्या वेळी अनाहूतपणे किंवा उत्स्फूर्तपणे एखादे भाषण देणे हेसुद्धा पर्यटक व्हिसाच्या तरतुदींचे हकालपट्टीपात्र - deportable - उल्लंघन मानले जाते, आणि पोलिसांच्या लक्षात आल्यास त्यावर त्वरित कार्यवाही होऊन अशा व्यक्तीची भारतातून ताबडतोब हकालपट्टीही होऊ शकते. त्यामुळे, विदेशी धार्मिक संस्थांच्या भारतातील प्रवेशावर आणि प्रवेशानंतरच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यास भारतीय कायद्याच्या तरतुदी तत्त्वतः पुरेश्या सक्षम आहेत असे वाटते. अशा तरतुदींची प्रभावी रीत्या अंमलबजावणी होत नसेल तर ती कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता जबाबदार असणार्‍या शासकीय यंत्रणेची त्रुटी मानता येईल, परंतु मुळात नियंत्रणाच्या पुरेशा तरतुदी नाहीत असे वाटत नाही. पण मुळात धर्मप्रसार करण्यासाठी कायद्याची आडकाठी नाही, आणि असूही नये.) त्यामुळे अमेरिकन बॅप्टिस्ट चर्चसारख्या संघटना त्रिपुरात किंवा भारतात अन्यत्र ख्रिस्ती धर्मप्रसार करत असल्यास त्यात अवैध किंवा आक्षेपार्ह असे काहीच नाही.

(त्याचप्रमाणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या किंवा तत्सम संघटनांना, इच्छा असल्यास आणि शक्य झाल्यास, त्रिपुरात किंवा ईशान्येकडील अन्य राज्यांत किंवा भारतात अन्यत्र कोठेही हिंदू धर्मप्रसार करण्याकरिता कायद्याची कोणतीही आडकाठी येण्याचे तत्त्वतः काहीही कारण दिसत नाही, आणि त्यास तत्त्वतः, किमानपक्षी 'कायद्याचे उल्लंघन' या मुद्द्यावरून, कोणाचा आक्षेप असण्याचे काही कारण नाही. मात्र त्या परिस्थितीत अशा संघटनांनी 'उपरोल्लेखित ठिकाणी हिंदू धर्मप्रसार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे' असे स्पष्टपणे आणि उघडपणे म्हणावे, एवढी माफक अपेक्षा आहे. After that, it's a free-for-all; May the best organization win - Christian, Hindu or otherwise. धर्मप्रसाराच्या चढाओढीच्या खेळात स्थानिकांचा फायदातोटा किंवा हितसंबंध ही पूर्णपणे वेगळी आणि अत्यंत गौण बाब आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारक संघटना तरी याहून फारसे वेगळे असे काय करतात?)

तिसर्‍या मुद्द्यावरून आक्षेप असल्यास हा आक्षेप रास्त आहे. मात्र ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या अखत्यारीतली बाब आहे, धार्मिक नव्हे. अशा जनतेला सळो की पळो करण्याच्या घटना घडत असल्यास अशा घटनांविरुद्ध फौजदारी गुन्हे जरूर नोंदवावेत; असे गुन्हे नोंदवण्यास स्थानिक जनतेस मदतीची गरज भासल्यास अशी मदत जरूर करावी. आणि अशा गुन्ह्यांच्या तक्रारींचा पाठपुरावा व्हावा, आणि कायद्याची अंमलबजावणी व्हावी, कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, म्हणून आग्रह जरूर धरावा, आणि चळवळीही जरूर कराव्यात. मात्र मुळात धर्मप्रसारालाच विरोध करण्याचे काही कारण दिसत नाही, आणि ते घटनेच्या चौकटीतही बसत नाही.

(तसेही, मन खंबीर असल्यास आजच्या जगात कोणीही कोणावरही कोणताही धर्म प्रचाराने इच्छेविरुद्ध लादू शकतो यावर माझा विश्वास नाही. इथे अमेरिकेतही - विशेषतः दक्षिणेकडील राज्यांत - सदर्न बॅप्टिस्ट चर्च असे वेडेवाकडे उद्योग करत असते. जसे, दिवाळीच्या दिवसांत, "आज दिवाळी आहे, कोट्यवधी हिंदू आज कोट्यवधी दिवे लावून आपापली घरे प्रकाशाने उजळतात, परंतु त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलेले नसल्यामुळे त्यांच्या अंतःकरणात मात्र अंधःकारच आहे. तेव्हा त्यांना सन्मार्ग सापडो म्हणून आज आपण विशेष प्रार्थना करू या." अशा छापाची पत्रके आपापसात वाटणे वगैरे. तसाही दुर्लक्ष करण्यासारखा प्रकार असतो - हे लोक कोणाचेही काहीही वाकडे करू शकत नाहीत. परंतु आजकाल अमेरिकेतील हिंदू संघटनाही ऐकून घेत नाहीत. निदर्शने वगैरे करतात. तेव्हापासून हाही प्रकार कमी झाला आहे. तशीही ही 'विशेष वागणूक' केवळ हिंदूंपुरतीच मर्यादित असते असेही नाही. मुसलमानांच्या, ज्यूंच्या उत्सवांच्या वेळीही यांचे हेच चालत असे. तेही लोक ऐकून घेत नाहीत. त्यामुळे तेही प्रकार हल्ली कमी आहेत. अधूनमधून रविवारी दारोदार बायबल वाटून 'चर्चा' वगैरे करण्याचे प्रयत्न करत असतात; हाकलून दिले की व्यवस्थित मार्गी लागतात असा अनुभव आहे. (पुण्यात असताना "संघास तुझ्यासारख्या बुद्धिमंतांची गरज आहे" वगैरे म्हणून मागे लागून गंडा किंवा राखी बांधण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कटवतेवेळी वापरलेल्या टॅक्टिक्सचा अनुभव आणि झालेला सराव अशा प्रसंगी चांगला कामी येतो, हे कळवण्यास विशेष आनंद वाटतो. आमच्यातील आत्मविश्वास घडवण्याच्या आणि स्वत्वभावना जागवण्याच्या बाबतीतील संघाचे आमच्यावरचे उपकार हे अप्रत्यक्षच असले, तरी थोर आहेत.)

पूर्वीच्या काळात विहिरीत पाव टाकून वगैरे जी मोठ्या प्रमाणात धर्मांतरे झाली म्हणतात, त्यातसुद्धा अशा धर्मांतरित व्यक्तींनी "आमचा धर्म बदलला नाहीच" म्हणून मनाचा खंबीरपणा दाखवला असता, आणि आपल्याच इतर धर्मबांधवांनी त्यांना साथ दिली असती, तर अशा धर्मांतराचे प्रमाण खूपच कमी झाले असते, असे वाटते. जेथे आपलेच लोक साथ द्यायला कमी पडले, तेथे धर्मप्रसारकांना पूर्णपणे दोषी धरता येणार नाही. त्यांनी आपले काम चोख बजावले; आपण आपले काम केले नाही.

तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार हा काहीसा वेगळा प्रकार आहे. परंतु तेथेही अशांचा मुकाबला करायला आपणच कमी पडलो, आणि प्रसंगी आपल्यातलीच फूट आड आली, हाही एक भाग आहेच.)

आपल्या भारतात एखाद्या राज्याची शासकिय भाषा ईग्रजी असु शकते यावर मी तेथे जात पर्यंत माझा विश्वास नव्हता. एकतर राज्याची शासकिय भाषा तेथील स्थानिक लोकांची भाषा असावी किंवा राष्ट्रभाषा हिंदी असा माझा भाबडा समज तिथे दुर झाला.

इतरत्र म्हटल्याप्रमाणे, इंग्रजी ही भारताच्या अधिकृत राजभाषांपैकी एक आहे. तेव्हा एखाद्या राज्याची ती शासकीय भाषा असल्यास त्यात गैर असे काही नसावे.

राज्याची शासकीय भाषा ही शक्य तोवर तेथील स्थानिक लोकांची भाषा असावी हे पटण्यासारखे आहे. परंतु काही कारणांनी जर हे शक्य नसेल (जसे राज्यातील असंख्य विविध गट विविध भाषा बोलत असल्याकारणाने कोणत्याही एका गटाला प्राधान्य न देता आणि इतर गटांवर अन्याय न करता अशी एक भाषा निवडणे शक्य नसेल, आणि एकाहून अधिक भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा देणे हे भाषाबाहुल्यामुळे शक्य नसेल), आणि राज्यास स्थानिक नसलेल्या एखाद्या बाहेरील भाषेसच जर राज्याच्या शासकीय भाषेचा दर्जा द्यावयाचा असेल, तर दूरस्थ दिल्ली-भारतीय शासनाने लादलेली हिंदी भाषा आणि दूरस्थ दिल्ली-इंग्रजी शासनाने लादलेली इंग्रजी भाषा यांत डावेउजवे नेमके कसे करायचे? त्रिपुरात हे कदाचित काहीशा कमी अंशी घडत असेलही, परंतु साधारणतः ईशान्येत इतरत्र अनेक स्थानिक जमातींकरिता बहुधा हिंदी हीसुद्धा इंग्रजीइतकीच परकीय भाषा (परिचयाच्या दृष्टीने) ठरावी. त्यातल्या त्यात जेथे इतरांचे प्रयत्न - कोणत्याही कारणामुळे - पोहोचलेच नाहीत, अशा ठिकाणी पूर्वापार मिशनर्‍यांनी केलेल्या शिक्षणप्रसारामुळे इंग्रजी ही अनेक स्थानिकांस अधिक परिचित वाटत असणे, किंबहुना इंग्रजीतून विनासंकोच संभाषण साधण्याइतकी, इंग्रजीतून विनाअडथळा शिक्षण घेण्याइतकी आणि इंग्रजीतून बिनदिक्कतपणे स्वतःला व्यक्त करण्याइतकी इंग्रजी अवगत असणे, हे अशक्य नाही. अशा परिस्थितीत त्यांनी एक त्यातल्या त्यात अनेकांना अवगत अशी भाषा या कारणास्तव इंग्रजी ही राज्याची शासकीय भाषा म्हणून निवडली, तर त्यात नेमके गैर ते काय? आणि त्यात इतरांना अडचण का असावी?

मी पण

अशी इंग्रजी म्हण माझ्या ऐकण्यात किंवा वाचनात आजतागायत आलेली नाही.

अशी इंग्रजी म्हण आजतागायत ऐकलेली नाही. पण आपल्याच कोणत्या तरी आफ्रिकन बांधवाने ह्या ख्रिस्ती मिशनर्‍यांविषयी काढलेले उद्गार वाचलेले आहेत, "जेव्हा ते आले तेव्हा त्यांच्याकडे बायबल होते आणि आमच्याकडे जमिनी होत्या. ते म्हणाले, चला प्रार्थना करूया. आम्ही (भक्तीभावाने) डोळे मिटले. मात्र जेव्हा डोळे उघडले तेव्हा बायबल आमच्याकडे होते आणि आमच्या जमिनी मात्र त्यांच्याकडे होत्या".

--------------------------X--X-------------------------------

इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||

घाट्याचा सौदा

जमिनीच्या बदल्यात बायबलचा घाट्याचा सौदा करणार्‍यांचा मूर्खपणा म्हणा, किंवा भोळसटपणा म्हणा, नडला असे म्हणावे लागेल. (आम्हा भारतीय बांधवांनीही अशा प्रकारचा मूर्खपणा कदाचित वेगळ्या बाबतीत केला, इतकेच.)

पण आता तर अक्कल आलेली आहे ना? 'सब कुछ लुटा के होश में आए' छापाची असली तरी? मग आता तो मेलेला साप पुन्हापुन्हा धोपटण्यात कितपत हशील आहे?

साप मेलाय?

कोण म्हणते साप मेलाय?

साप मेला असता तर त्याने पिन कोड नुसार प्रत्येक गावात धर्मांतर असा अजेंडा ठेवला असता होय?
साप दहा तोंडांनी अंगावर येतोय हे दिसत असतांनाही, तो मेला आहे असाच समज करून जर स्वस्थ बसणार असाल तर मग काय बोलणार?

आपला
गुंडोपंत

घाबरायचे कशाला?

साप मेला नसेलही कदाचित, पण त्यात काही दम नाही हेही खरे. जोपर्यंत त्याला कोणी भाव देत नाही, तोपर्यंत. (नाहीतर मग भित्यापाठी ब्रह्मराक्षस काय, नेहमीच असतो.)

तो फुस्सकन आवाज काढत असेलही. आपल्यात अजून दम आहे असे भासवण्यासाठी अधूनमधून फुस्सकन आवाज काढावा लागतो त्याला. पण जोपर्यंत त्याला कोणी विचारत नाही, घाबरत नाही आणि आपण होऊन बळी पडत नाही, तोपर्यंत तो कोणाचेही काहीही करू शकत नाही. त्याच्या नादी जर कोणी लागला आणि त्याला भाव दिला, तर गोष्ट वेगळी.

साप मेला असता तर त्याने पिन कोड नुसार प्रत्येक गावात धर्मांतर असा अजेंडा ठेवला असता होय?

ठेवू दे की! त्याला कशाला घाबरायचे? नुसता अजेंडा ठेवल्याने काय होते? एवढेच असेल आणि असेल हिंमत, तर एकदा तमाम पिन कोड ४११०३०ला ख्रिस्ती करून दाखवच म्हणावे त्याला!

साप दहा तोंडांनी अंगावर येतोय हे दिसत असतांनाही, तो मेला आहे असाच समज करून जर स्वस्थ बसणार असाल तर मग काय बोलणार?

पुन्हा, अंगावर येतो म्हणजे काय खातो की गिळतो? फुस्स करतो, एवढेच ना? तसे केले तर मग दाखवा की त्याला इंगा, नाही कोण म्हणतोय? पण ऊठसूट त्याला घाबरून, त्याचा बागुलबुवा बनवून बोंबाबोंब कशाला करायची म्हणतो मी?

(बागुलबुवा बनवून) ऊठसूट चर्चला धोपटणे आणि ऊठसूट ब्राह्मणांना धोपटणे यांत अर्थाअर्थी फारसा फरक निदान मला तरी जाणवत नाही.

आणखी पिनकोड

एवढेच असेल आणि असेल हिंमत, तर एकदा तमाम पिन कोड ४११०३०ला ख्रिस्ती करून दाखवच म्हणावे त्याला!

पिन कोड ४११०३०चे एक वेळ जाऊ द्या. पिन कोड ४००००८चे संपूर्ण ख्रिस्तीकरण करण्याचा प्रयत्न करून पाहू दे त्याला.

क्या बोलते, भाईजान?

(बाय द वे, पिन कोड ४००००८चे ख्रिस्तीकरण करण्याबद्दल काही आक्षेप?)

मराठी समंजसपणा

चुकलेली कोणतीच बस आपली नसते या दिलास्या इतके समाधान कशातच नसते याचा प्रत्यय आला.

विश्वास कल्याणकर

प्रतिसाद

पुण्यात असताना "संघास तुझ्यासारख्या बुद्धिमंतांची गरज आहे" वगैरे म्हणून मागे लागून गंडा किंवा राखी बांधण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कटवतेवेळी वापरलेल्या टॅक्टिक्सचा अनुभव आणि झालेला सराव अशा प्रसंगी चांगला कामी येतो, हे कळवण्यास विशेष आनंद वाटतो. आमच्यातील आत्मविश्वास घडवण्याच्या आणि स्वत्वभावना जागवण्याच्या बाबतीतील संघाचे आमच्यावरचे उपकार हे अप्रत्यक्षच असले, तरी थोर आहेत
हा हा हा. हे फारच थोर आहे!
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोति मे!

कल्पना नाही

हा हा हा. हे फारच थोर आहे!

'थोर' वगैरेबद्दल कल्पना नाही. पण अगम्य निश्चितच आहे.

प्रस्तुत संघप्रचारकास मला 'बुद्धिमंत' वगैरे म्हणावेसे का वाटले असावे, हे मला आजतागायत कळलेले नाही. कदाचित गोड बोलून, मला चढवून गटवावे असा उद्देश असू शकणे अगदीच अशक्य नाही, असा एक विचार मनात येऊन गेला. परंतु संघासारख्या प्रामाणिक संघटनेचा पाईक अशा अप्रामाणिक उद्देशाने असे काही म्हणेल, हेही विचाराअंती पटले नाही.

मात्र माझ्यासारख्याला 'बुद्धिमंत' वगैरे म्हणावेसे वाटण्याइतकी आणि माझ्यासारख्या 'बुद्धिमंतां'ची संघाला आत्यंतिक निकड वगैरे भासण्याइतकी शोचनीय परिस्थिती संघावर का बरे आली असावी, या विचाराने बराच वेळ त्रास दिला. शेवटी पुष्कळ त्रासाअंती "माझ्या बुद्धिमत्तेच्या आकलनाच्या कक्षेबाहेरील गोष्ट" म्हणून विचार करणे जेव्हा सोडून दिले, तेव्हा कोठे मनःशांती लाभली.

(शेवटी सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्याच पाहिजेत, असे थोडेच आहे? आम्ही नाही बुवा  तितके बुद्धिमंत!)

असो.

काही खंडन

एखाद्या राज्यात जेंव्हा ख्रिश्चन मिशनरी हे अल्पसंख्याक असतात तेंव्हा ते खुप मितभाषी आणि सभ्यतेने वागतात. जेंव्हा ते बहुसंख्येत होतात तेंव्हा ते कोल्ह्यासारखे लबाड होतात. आणी जेंव्हा ते सत्ताधारी होतात तेंव्हा ते नृशंस आणी क्रुर होतात अशा अर्थाची एक ईंग्रजी म्हण आहे.

इंग्रजी म्हण असण्याबद्दलची माझी शंका एक वेळ सोडून द्या, पण एक गृहीतक म्हणूनसुद्धा हे फारसे पटत नाही.

ख्रिस्तीबहुल असलेल्या अमेरिकेसारख्या देशात एक हिंदू म्हणून राहायला आणि वावरायला मला मिशनर्‍यांकडून कोणतीही आडकाठी होऊ शकत नाही. थोडाफार प्रचारकी उपद्रव यदाकदाचित झालाच, तर त्यास मी इतरत्र म्हटल्याप्रमाणे अशा लोकांस हाकलून देऊन बिनदिक्कतपणे निपटू शकतो. एकंदरीत एक सामान्य नागरिक म्हणून येथे राहताना एक हिंदू म्हणून मी मानाने जगू शकतो. त्यात मला कोणतीही अडचण येत नाही.

उलटपक्षी, माझ्या (कोणीही सक्ती न करता किंवा कोणीही करायला न सांगता, स्वेच्छेने आणि वैयक्तिक आवडीखातर केलेल्या) गोमांसभक्षणामुळे माझे हिंदुत्व आणि (हल्ली बरेच कमी, पण तरीही काही थोड्या प्रमाणात) माझ्या मांसभक्षणामुळे माझे ब्राह्मणत्व भ्रष्ट होते असे मानणारे अनेक हिंदुबांधव आणि (हल्ली बरेच कमी, परंतु तरीही काही थोडे) ब्राह्मणबंधू (इतक्या फालतू कारणांनी भ्रष्ट होण्याइतका माझा हिंदुधर्म किंवा माझे ब्राह्मणत्व तकलादू नाही असे मला स्वतःला कितीही वाटत असले तरी) हिंदुस्थानात (येथे अमेरिकेत मला क्वचित उपद्रव देऊ शकणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या तुलनेत) खूपच अधिक भेटू शकतात. (माझ्या ब्राह्मणत्वामुळे माझ्याबद्दल आपोआप छुपा किंवा उघड आकस असणारे हिंदुबांधवही हिंदुस्थानात अनेक असू शकतात, हाही एक पूर्णपणे वेगळा मुद्दा. तो तूर्तास विषयबाह्य म्हणून सोडून देऊ.)

अर्थात यांपैकीसुद्धा कोणाचा मला फारसा त्रास होत नाही. तसा तो होऊ न देण्याचा प्रयत्न मी शक्य तितका करतो. परंतु एक हिंदू नागरिक म्हणून, तत्त्वतः, हिंदूबहुल भारतापेक्षा ख्रिस्तीबहुल अमेरिकेत राहताना मी तुलनेने अधिक आत्मसन्मानपूर्वक आणि अधिक बिनदिक्कतपणे, माझ्या वैयक्तिक आयुष्यात तुलनेने कमी लुडबूड सहन करून राहू शकतो असे मला वाटते.

पण तेही एक वेळ सोडून द्या. येथे विषय ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या उपद्रवाचा चालू आहे, तेव्हा त्या मुद्द्यावरून तुलना करू.

ख्रिस्तीबहुल अमेरिकेत एक हिंदू म्हणून ख्रिस्ती मिशनर्‍यांचा मला फारसा उपद्रव होत नाही. (जो काही अगदी क्वचित आणि अगदी मामूली प्रमाणात होऊ शकतो, तेव्हा त्यास माझ्या पद्धतीने व्यक्तिगत रीत्या निपटताना मला कोणतीही अडचण, आडकाठी किंवा अडथळा येत नाही. आणि तेवढेच अती झाले, तर येथील न्यायालये पूर्णपणे माझ्या आणि माझा धर्म पाळण्याच्या माझ्या अधिकाराच्या बाजूने उभी राहतील याबद्दल मला पूर्ण विश्वास वाटतो. पण तेवढे अती होतही नाही.) मात्र, आपल्याच सांगण्यानुसार, हिंदूबहुल भारतात ख्रिस्ती मिशनर्‍यांचा खूपच अतिरेकी उपद्रव होऊ शकतो, इतके की स्थानिक जनतेला ते सळो की पळो करून सोडतात. अर्थात आपल्या कथनाच्या सत्यतेबद्दल मी फारशी शंका व्यक्त करू इच्छीत नाही, परंतु मग आपल्या तथाकथित इंग्रजी म्हणीमागील गृहीतक आपल्याच कथनाच्या विरोधात जात नाही काय?

कदाचित त्याऐवजी 'पिकते तेथे विकत नाही' या शुद्ध मराठमोळ्या म्हणीमागील तत्त्व येथे कामी येऊ शकत असेल काय?

आणि एका हिंदूस हिंदू म्हणून जगताना ख्रिस्ती मिशनर्‍यांचा उपद्रव 'पिकते तेथे विकत नाही' या तत्त्वाप्रमाणे ख्रिस्तीबहुल नसलेल्या (आणि हिंदूबहुल असलेल्या) देशाच्या मानाने ख्रिस्तीबहुल देशात तुलनेने खूपच कमी होत असेल, तर आलम हिंदुस्थानात ख्रिस्ती धर्मप्रसार करून देशास ख्रिस्तीबहुल केल्याने या प्रश्नाची दाहकता वाढण्याऐवजी उलट कमी करता येऊ शकेल काय?

अर्थात भारत ख्रिस्तीबहुल व्हावा असे मला मनापासून वाटत नाही; तो विनोदाचा भाग म्हणून वाटले तर सोडून द्या. पण भावनाविह्वल होऊन अतिशयोक्त लिहिण्यापूर्वी याकडे एकदा विचारास खाद्य या दृष्टिकोनातून जरूर पहा, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे.

आपण स्वतः जावून कधी पाहिले का हो की इशान्य भारतात काय चालले आहे

पर्स्पेक्टिवराव,

आपण स्वतः जावून कधी पाहिले का हो की इशान्य भारतात काय चालले आहे ते?

मला वाटते की, विश्वासराव स्वतः जावून आले आहेत आणी त्यांचे अनुभव ते लिहित आहेत.
आपण जावून आल्यावर त्याचा वृत्तांत तुमच्या दृष्टीकोनातून लिहा.

तोवर जे ते लिहित आहेत, त्याला येता जाता दरवेळी वाक्या वाक्याला आडवे जायची काय आवश्यकता आहे?

माझीही तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, आंब्याची जांभळाशी तुलना करू नका.
अमेरिका वेगळी आणि भारताचा हा भाग वेगळा.

अधिक एन एल एफ टी विषयी अधिक माहिती येथे

आणि येथे आहेच.

आणि काही येथे आहे.

तसेच ही वेब साईट पाहा.
महाराष्ट्रात काहीही करून ख्रिस्तीकरणाची लाट आणायचीच असा चंग बांधलेली ही वर्ध्याची संघटना आहे.

भारतात येव्हढ्यात वाढलेल्या ख्रिस्तीकरणाची लाट संघटनांच्या या यादीतून लक्षात येईल.
त्याच वेळी भारतीय राजकारणात येनकेन प्रकारे धर्मांतराचा ठसा उमटवला पाहिजे हे उद्दिष्ट ते उघडपणे मांडत आहेत.

हे पाहा खाली त्यांची उद्दीष्टे:

Encouraging collaboration, partnership development among Christian organizations, Churches and individuals with priorities on evangelism, revival, discipleship.

To encourage mutual and multi-directional exchange of information and voluntary collaboration.

Liasion with Church Leaders.

Assisting the Church to effect changes in society based on biblical values.

Encouraging and equipping evangelicals to play catalytic,? roles in the nation’s socio-economic-political life.

तसेच याच स्थळावरील बातम्यां मध्येही चर्च विरुद्ध पाहा कसे जग चालले आहे, म्हणून एक व्हा आणि जगाचे धर्मांतर करा असाच सूर आळवलेला दिसतो.
या पाहा हेड लाईन्स
Islamic Militants Behead Seven Somali Christians
Iraqi Christians defiant in face of church attacks
Protestant churches to deliberate on gay law in Chennai

यांचे न्युज बुलेटीन म्हणते
Arson continues in Kandhamal, Orissa
Pastor attacked in Andhra Pradesh
Extremists threaten and attack Christian students
आपला
गुंडोपंत

आपण स्वतः जावून कधी पाहिले का हो की इशान्य भारतात काय चालले आहे ते?
मला वाटते की, विश्वासराव स्वतः जावून आले आहेत आणी त्यांचे अनुभव ते लिहित आहेत.
आपण जावून आल्यावर त्याचा वृत्तांत तुमच्या दृष्टीकोनातून लिहा.
तोवर जे ते लिहित आहेत, त्याला येता जाता दरवेळी वाक्या वाक्याला आडवे जायची काय आवश्यकता आहे?
माझीही तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, आंब्याची जांभळाशी तुलना करू नका.
अमेरिका वेगळी आणि भारताचा हा भाग वेगळा.
अधिक एन एल एफ टी विषयी अधिक माहिती
आपण स्वतः जावून कधी पाहिले का हो की इशान्य भारतात काय चालले आहे ते?
मला वाटते की, विश्वासराव स्वतः जावून आले आहेत आणी त्यांचे अनुभव ते लिहित आहेत.
आपण जावून आल्यावर त्याचा वृत्तांत तुमच्या दृष्टीकोनातून लिहा.
तोवर जे ते लिहित आहेत, त्याला येता जाता दरवेळी वाक्या वाक्याला आडवे जायची काय आवश्यकता आहे?
माझीही तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, आंब्याची जांभळाशी तुलना करू नका.
अमेरिका वेगळी आणि भारताचा हा भाग वेगळा.
अधिक एन एल एफ टी विषयी अधिक माहिती
आपण स्वतः जावून कधी पाहिले का हो की इशान्य भारतात काय चालले आहे ते?
मला वाटते की, विश्वासराव स्वतः जावून आले आहेत आणी त्यांचे अनुभव ते लिहित आहेत.
आपण जावून आल्यावर त्याचा वृत्तांत तुमच्या दृष्टीकोनातून लिहा.
तोवर जे ते लिहित आहेत, त्याला येता जाता दरवेळी वाक्या वाक्याला आडवे जायची काय आवश्यकता आहे?
माझीही तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, आंब्याची जांभळाशी तुलना करू नका.
मेरिका वेगळी आणि भारताचा हा भाग वेगळा.
अधिक एन एल एफ टी विषयी अधिक माहिती

खंडन

तोवर जे ते लिहित आहेत, त्याला येता जाता दरवेळी वाक्या वाक्याला आडवे जायची काय आवश्यकता आहे?

त्यांच्या लिखाणात आणि ऍनालिसिसमध्ये जेथे ढळढळीत चुका दिसल्या, तेथेच त्यांचे खंडन केलेले आहे.

ख्रिस्ती मिशनरी संस्था जे काही करतात त्याचे मुळीच समर्थन केलेले नाही, करू इच्छीतही नाही.

पण एखाद्या गोष्टीला टक्कर देण्यापूर्वी आपलीही बाजू पूर्णपणे भक्कम आहे, याची खात्री पाहिजे. आपण जे काही करतोय ते का आणि कशाच्या आधारावर करतोय, याची पूर्ण माहिती पाहिजे. चुकीच्या गृहीतकांच्या आधारावर योग्य लढासुद्धा देता येत नाही.

महाराष्ट्रात, भारतात किंवा जगात ख्रिस्तीकरणाची लाट आणण्याचा चंग बांधलेल्या कित्येक संस्था असतील याबद्दल मला शंका नाही. परंतु ज्यांचे ख्रिस्तीकरण करायचे त्यांच्या ऐच्छिक किंवा अनैच्छिक सहकार्याशिवाय असे कोणतेही ख्रिस्तीकरण शक्य नाही. (जसे, कोणीही कितीही चंग बांधला तरी मला शाखेत घेऊन जाणे शक्य नाही, तसेच. आणि तसे प्रयत्न अनेक झाले याला ईश्वर साक्षी आहे. अमेरिकेत माझे मन वळवून माझे ख्रिस्तीकरण करण्याचे प्रयत्नही झाले, कधी कार्यालयीन सहकार्‍यांकडून झाले, यालाही ईश्वर साक्षी आहे. त्याचाही काही फायदा झाला नाही. मी तक्रार केली असती तर अशांची कार्यालयातून हकालपट्टीही झाली असती याचीही मला खात्री आहे. तेवढे करण्याची गरज भासली नाही. मान आडवी हलवता येते ना? मराठीत एक दोनअक्षरी शब्द आहे. कुत्र्यांना त्याचा अर्थ कधी अस्थिखाद्य असा तर कधी 'चालता हो' असा समजतो. त्याचा वापर करण्यास शिकावे.) अनैच्छिक सहकार्य असेल, तर ते रोखण्यासाठी अशांचा मानसिक खंबीरपणा पाहिजे. दहशत असेल, तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास जबाबदार शासकीय यंत्रणेवर आपले काम करण्यासाठी दबाव आणला पाहिजे, आणि मुख्य म्हणजे तक्रारी नोंदवल्या पाहिजेत. घाबरणार्‍याला काय, दहा जण दहा वेळा बाटवतील हो! बाटवणारे काय, टपून बसलेलेच आहेत! त्यांना भाव किती द्यायचा, ते बाटवून घेणार्‍यास कळायला नको का? उगीच आपले 'अल्-कायदा, अल्-कायदा' म्हणून ओरडण्यात नि बागूलबुवा उभा करण्यात काय अर्थ आहे? मग 'इस्लाम खतरे में है'मध्ये आणि याच्यात फरक तो काय उरला?

(अमेरिकेतही 'वॉर ऑन टेरर'च्या नावाने असे प्रयोग झाले. सुदैवाने काहींची अक्कल तरीही शाबूत होती आणि अनेकांची - सगळ्यांचीच नव्हे, तरी - कालांतराने लायनीवर आली. असो.)

(ऐच्छिक ख्रिस्तीकरण असेल, तर प्रश्नच मिटला!)

आणखी थोडे

आपण स्वतः जावून कधी पाहिले का हो की इशान्य भारतात काय चालले आहे ते?

नाही. मी पाहिलेले नाही. आपण पाहिले आहे की नाही याबद्दल कल्पना नाही. त्यामुळे आपलेही म्हणणे स्वानुभवसिद्ध आहे की केवळ आपल्या (विश्वासरावांनी येथे लिहिलेल्या किंवा इतरत्र आपण वाचलेल्या तत्सम लेखांच्या) वाचनावर आणि विचारसरणीवर आधारित आहे, याबद्दल मी बोलू शकत नाही, आणि बोलू इच्छीतही नाही.

आपण जावून आल्यावर त्याचा वृत्तांत तुमच्या दृष्टीकोनातून लिहा.

यदाकदाचित तेथे जाण्याचा योग आला, तर कदाचित लिहीनही. (किंवा लिहिण्याचा कंटाळा केला, तर कदाचित नाहीसुद्धा लिहिणार.) तूर्तास तरी माझ्या अजेंड्यावर ही गोष्ट (असलीच तर) फारश्या वरच्या क्रमांकावर नाही.

परंतु तोपर्यंत (विश्वासरावांनी किंवा इतर संघवाद्यांनी लिहिलेल्या किंवा चर्चने लिहिलेल्या किंवा इतर कोणीही लिहिलेल्या) सेकंडहँड माहितीवर, माझ्या वैयक्तिक माहितीशी, अनुभवांशी आणि विचारपद्धतीशी पडताळून पाहिल्याशिवाय, जसाच्या तसा शंभर टक्के विश्वास टाकण्याची निदान माझी तरी इच्छा नाही. (आपली किंवा इतर कोणाची असल्यास तो माझा प्रश्न नाही. मला जे वाटते ते मी मांडले, आणि मांडणार.)

तसेच याच स्थळावरील बातम्यां मध्येही चर्च विरुद्ध पाहा कसे जग चालले आहे, म्हणून एक व्हा आणि जगाचे धर्मांतर करा असाच सूर आळवलेला दिसतो.

त्यांचे "कार्यकर्ते" तेथे जाऊन त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना जसे दिसते, ते मांडतात. त्यांच्या "कार्या"वर विश्वास असलेले त्यांच्या संघटनांमधील अनुयायी त्यावर विश्वास ठेवतात. विरोधक विश्वास ठेवत नाहीत.

(विश्वासराव किंवा) संघाचे (इतर) कार्यकर्ते तेथे (ईशान्येत) जाऊन त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना जसे दिसते, ते (येथे किंवा इतरत्र) मांडतात. त्यांच्या कार्यावर विश्वास असलेले त्यांच्या संघटनांमधील (पक्षी: संघाचे) अनुयायी त्यावर विश्वास ठेवतात. विरोधक विश्वास ठेवत नाहीत.

मग चर्चवाद्यांमध्ये आणि संघवाद्यांमध्ये नेमका फरक काय?

(व्यक्तिशः मला संघ आणि चर्च यांपैकी दोघांवरही विश्वास ठेवावासा वाटत नाही. कारण त्यांच्यातील फरक मला दिसू शकत नाही. कदाचित माझाच दृष्टिदोष असेल.)

या पाहा हेड लाईन्स

'ख्रिस्ती अल-कायदा' ही हेडलाइन यापेक्षा फारशी वेगळी नाही. (मी चर्चचे वकीलपत्र घेतलेले नाही, आणि चर्चचा - कोणत्याही धर्माच्या चर्चचा - समर्थकही नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

त्याच वेळी भारतीय राजकारणात येनकेन प्रकारे धर्मांतराचा ठसा उमटवला पाहिजे हे उद्दिष्ट ते उघडपणे मांडत आहेत.

यात नवीन काहीही नाही, आणि गुपितही नाही.

'भारतीय राजकारणात येनकेन प्रकारेण हिंदुत्वाचा ठसा उमटवला पाहिजे' असे उद्दिष्ट संघाने उघड मांडावे. आमचा तात्त्विक विरोध राहिला, तरी निदान संघाच्या प्रामाणिकपणाबद्दल आदर वाढेल. (किंवा कदाचित ते तसे उघडपणे म्हणत असतीलही. कोणास ठाऊक, मीच ऐकले नसेल. माझाच श्रवणदोष असेल.)

असो.

(अवांतर: 'बुद्धिमंतां'ना कोणाकडून 'बौद्धिकां'ची गरज भासत नाही.)

खंडन

एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो. मी संघाचा कार्यकर्ता कधीच नव्हतो आणि स्वयंसेवक ही नाही. मात्र ईशान्य भारतात बाप्टिस्ट चर्च आणि बांगला देशी घुसखोरी याला आपल्या परीने सातत्याने प्रतिकार करुन तेथील जनजातीना त्यांची अस्मिता जोपासण्यासाठी संघाच्या पाठीब्याने ज्या सेवा व्रती संस्था तिथे कार्य करित आहेत त्यानी मी पुर्णपणे प्रभावीत झालो आहे हे नक्की. सगळिकडे राष्ट्रद्रोही, आणि भ्रष्टाचारी कारवाया सुरू असतांना एखादी संस्था जर एक वेगळे कार्य करित असेल तर त्याबद्द्ल कौतुकाचे चार शब्द बोलुन आणि त्यांचे कार्य इतरांच्या माहितीत आणुन देण्याचे कार्य करुन या राष्ट्रीय महत्व असलेल्या कार्यात माझा खारीचा वाटा उचलण्याची मला लाज तर अजिबात वाटत नाही उलट अभिमान वाटत आहे.

एक डोळस भारतिय या नात्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापने मागील डॉ हेगडेवार यांचे उद्दिष्ट् आणि त्यासाठी त्यांनी खालेल्या खस्ता आणि त्यांच्या नंतर त्याना लाभलेल्या द्र्ष्ट्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचाच परिणाम म्हणजे आज दिसत असलेला हा वटवृक्ष. अनेक संस्थां मतभेदांमुळे दुभंगल्याचे किवा लुप्त झाल्याचे आपण पहातो पण संघाबद्दल असे काही झाले नाही यातच त्याचे वैषिष्ट्य आहे. भौतीक वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या आजच्या पिढीतील अनेक तरुण आजही झपाटल्यासारखी निरपेक्ष भावाने संघाचे काम दुर्गम अशा भागांत आणि प्रतिकुल परिस्थीतित करित आहेत् यातच संघाच्या यशाचे गमक आहे असे मला वाटते.

आणि म्हणुनच त्यांच्या ईशान्य भारतात सुरु असलेल्या कामा बद्द्ल थोडी का होइना माहीती सर्वांना व्हावी हाच माझा प्रयत्न आहे. उर्वरित भारतातील तरुण मोट्या संख्येत या कामात यावे आणि आपल्यापासुन दुरावत जाणारा हा प्रदेश आणि तेथील साधेभोळे लोक आपल्यात रहावे असे वाट्ल्याने हा लेखन प्रपंच.

विश्वास कल्याणकर

भूमिका

मात्र ईशान्य भारतात बाप्टिस्ट चर्च आणि बांगला देशी घुसखोरी याला आपल्या परीने सातत्याने प्रतिकार करुन तेथील जनजातीना त्यांची अस्मिता जोपासण्यासाठी संघाच्या पाठीब्याने ज्या सेवा व्रती संस्था तिथे कार्य करित आहेत त्यानी मी पुर्णपणे प्रभावीत झालो आहे हे नक्की. सगळिकडे राष्ट्रद्रोही, आणि भ्रष्टाचारी कारवाया सुरू असतांना एखादी संस्था जर एक वेगळे कार्य करित असेल तर त्याबद्द्ल कौतुकाचे चार शब्द बोलुन आणि त्यांचे कार्य इतरांच्या माहितीत आणुन देण्याचे कार्य करुन या राष्ट्रीय महत्व असलेल्या कार्यात माझा खारीचा वाटा उचलण्याची मला लाज तर अजिबात वाटत नाही उलट अभिमान वाटत आहे.

ईशान्येत कोणीही (आपण, संघ, चर्च किंवा इतर कोणीही) काहीही विधायक कार्य करत असेल तर त्याला माझा आक्षेप नाही. कार्य कोणीही करत असले तरी चांगल्या कार्याचे कौतुकच आहे.

परंतु याचा अर्थ संघाने किंवा संघाच्या समर्थकांनी अथवा प्रभावितांनी (तसेच दुसर्‍या बाजूने चर्चने किंवा इतर कोणत्याही संस्थेने अथवा अशा संस्थेच्या समर्थकांनी अथवा प्रभावितांनी) अशा संकेतस्थळांवरून चर्चेच्या निमित्ताने आपला प्रचार करावा (उघड किंवा by proxy), आणि "दुसर्‍या पक्षाच्या" कृष्णकारवायांवर एकतरफी चिखलफेक सुरू करावी, हेही पटत नाही.

आजवर चर्चने (किंवा इतर संस्थांनी) असा कोणताही प्रयत्न प्रस्तुत किंवा तत्सम संकेतस्थळांवरून केल्याचे आठवत नाही. केल्यास त्यालाही सदस्यांकडून कडकडून विरोधच होईल, याची खात्री आहे.

त्याचप्रमाणे, आजतागायत कोणीही येथे किंवा तत्सम अन्य संकेतस्थळांवर विनाकारण संघविरोधी चर्चाप्रस्ताव आपण होऊन सुरू केल्याचे निदान मला तरी आठवत नाही. मात्र संघसमर्थकांनी अनेकदा प्रचारात्मक किंवा अपप्रचारात्मक (उदा. विनाकारण गांधीविरोधी किंवा कुत्सित) चर्चा सुरू केल्याची आणि मग त्यांचा संघविरोधकांनी (किंवा गांधीप्रेमींनी) समाचार घेतल्याची उदाहरणे अनेक सापडतील.

या संकेतस्थळाच्या धोरणाबद्दल किंवा या संकेतस्थळाच्या वतीने अधिकृत रीत्या बोलू शकत नाही आणि इच्छीतही नाही, परंतु 'माहितीची देवाणघेवाण' या सदरात माहितीची neutrality निश्चितच अपेक्षित असते, असे वाटते.

याउपर, घटनेनुसार संघाला, चर्चला किंवा इतर संस्थांना आणि त्यांच्या समर्थकांना आणि प्रभावितांना अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कलमाखाली आपापला प्रचार करण्याचे स्वातंत्र्य निश्चितच आहे, परंतु प्रस्तुत संकेतस्थळ किंवा तत्सम संकेतस्थळे ही त्यासाठी योग्य जागा आहे असे वाटत नाही. त्यासाठी अशा संस्थांची संकेतस्थळे, मुखपत्रे आणि प्रभावितांचे खाजगी ब्लॉग्ज़ ही माध्यमे अधिक उचित ठरावीत असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

अवांतर

परंतु 'माहितीची देवाणघेवाण' या सदरात माहितीची neutrality निश्चितच अपेक्षित असते, असे वाटते.

हे पटले नाहि. कारण पत्रकारीता (वार्तांकन)/ कायदा सुव्यवस्था वगैरे तत्सम बाबी सोडल्यास न्युट्रल लेखन नसावे असे वाटते. (अगदी अग्रलेखातही). प्रत्येकाने आपले मत/ आपल्याकडील माहीती (शक्यतो सत्यता पडताळून/ससंदर्भ/स्वानुभवावरून) लिहावी मग ती एक बाजूने झुकलेली असेल तरी चालेल..
अर्थात जर चर्चेत त्याचे सोदाहरण/ससंदर्भ/बहुसंख्यांच्या उलट अनुभवावरून खंडन झाले तर आपले मत/माहिती बदलण्याची तयारी मात्र् हवी. (जे जाहिरातीत होत नाहि)

बाकी चालु द्या!

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

सहमत

योग्य मुद्दा आहे आणि मी सहमत आहे. अनेकदा न्युट्रल राहणे म्हणजे, उत्तर हो किंवा नाही द्या असे असताना माहित नाही असे उत्तर असणे होते. अर्थात नेहमीच नाही. उद्या भारत-पाक चर्चा करा म्हटले तर आम्हाला न्युट्रल म्हणजे कसे ते कळेल का?


कदाचित...

उद्या भारत-पाक चर्चा करा म्हटले तर आम्हाला न्युट्रल म्हणजे कसे ते कळेल का?

कदाचित दोन्ही किंवा सर्व बाजूंचे मुद्दे काय असू शकतील हे पूर्णपणे कळू नाही शकले, तरी काय असू शकतील, याचा किमान अंदाज बांधून दोन्ही बाजूंच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा किमान प्रयत्न करून? दोन्ही किंवा सर्व बाजूंचे बूट किमानपक्षी साइझसाठी ट्राय तरी करून?

:)

जेथे साईझ वेगळे आहेत हे माहित आहे तेथे ट्राय कसला? कार्यालयीन व्यवस्थापनात विन-विन सिच्युएशन मान्य आहे. पण तेच तत्व सर्व ठिकाणी वापरणे अमान्य. एकिकडे धर्मवेडे आणि एकिकडे धर्मनिरपेक्ष अशी चर्चाच मुळात हास्यास्पद आहे. पण आपलाच दाम खोटा मग ... असो, या मुद्यावर चर्चा वाढवल्यास विषयांतर ठरेल्.


तितकेसे पटले नाही / भूमिका

कारण पत्रकारीता (वार्तांकन)/ कायदा सुव्यवस्था वगैरे तत्सम बाबी सोडल्यास न्युट्रल लेखन नसावे असे वाटते. (अगदी अग्रलेखातही). प्रत्येकाने आपले मत/ आपल्याकडील माहीती (शक्यतो सत्यता पडताळून/ससंदर्भ/स्वानुभवावरून) लिहावी मग ती एक बाजूने झुकलेली असेल तरी चालेल..

तितकेसे पटत नाही.

शेवटी मनुष्य लिहिणार म्हणजे कितीही झाले तरी मत किंवा माहिती एका बाजूने थोडीशी तरी झुकलेली असणार हे ओघाने आले. (हे कोणत्याही बाजूसाठी सत्य आहे.)

परंतु इतरही संदर्भचौकटी असू शकतात, याची किमान जाणीव ठेवून थोडा समतोल राखता आला तर राखावा, आणि जमल्यास इतरही संदर्भचौकटींशी आपल्या संदर्भचौकटीची सांगड घालून आपले मत, आपले विधान संशोधित करता आले तर पहावे, असे वाटते.

आणि मुळात आपली संदर्भचौकट नेमकी काय आहे, याचीही पूर्ण आणि स्पष्ट जाणीव असणेही लाभदायक ठरू शकते.

श्री. विश्वास कल्याणकर ईशान्येत चर्च जो काही गोंधळ घालत आहे त्याबद्दल वक्तव्य करतात, त्यातील तथ्याबद्दल मला फारसा आक्षेप नाही. त्यांची संदर्भचौकट (आणि त्यांच्या concernsसुद्धा) मी समजू शकतो. किंबहुना चर्चच्या कांगाव्याबद्दल आणि कार्यपद्धतीबद्दल ते जे काही म्हणतात, त्यातील काही विचार कधीकाळी माझ्याही मनात येऊन गेलेले असण्याची आणि काही अंशी त्यातील काही विचारांशी मी तेव्हा आणि कदाचित काही प्रमाणात आजही थोडाफार सहमत असण्याची शक्यता मी पूर्णपणे नाकारत नाही.

पण तरीही त्यांचे कथन बरेचसे एकांगी, काही बाबतीत अतिशयोक्त आणि काही बाबतीत धडधडीत चुकीच्या माहितीवर किंवा गृहीतकांवर आधारलेले आहे असे वाटले. किंवा त्यांची आधाराची माहिती जरी योग्य वाटली तरी निष्कर्ष अतिशयोक्त, अतिरंजित किंवा माझ्या विचारसरणीप्रमाणे मला मान्य न होण्यासारखे आहेत असे वाटले. जेथेजेथे असे वाटले तेथेतेथे त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न केलेला आहेच, आणि वेळ झाल्यास आणि ऊर्जा असल्यास आणखीही करेन आणि करत राहीन. किंवा कंटाळा आला तर करणारही नाही.

अवांतर, थोडेसे स्वतःच्याच संकल्पना स्वतःच स्पष्टपणे समजून घेण्यासाठी:
'पृथ्वी सपाट आहे' / 'पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी स्थिर असून पृथ्वीभोवती सूर्य फिरतो' / 'परमेश्वराने जग सहा दिवसांत निर्मिले आणि सातव्या दिवशी त्याने विश्रांती घेतली' / 'येशू ख्रिस्त हा एका अनाघ्रात तरुणीपोटी जन्मला' / 'येशू ख्रिस्त सार्‍या जगास तारण्यासाठी पृथ्वीवर जन्माला आला' ही विधानेही 'माहितीची देवाणघेवाण' या सदराखाली मोडू शकतात. यांतील प्रत्येक विधानाबद्दल नेमके काय धोरण असावे, आणि कोणत्या कारणास्तव असावे बरे?

पैकी पहिली दोन विधाने आपल्या आजच्या मान्यताप्राप्त वैज्ञानिक 'सत्या'च्या विरोधात जाणारी भासली, तरी एके काळी तीही मान्यताप्राप्त वैज्ञानिक 'सत्ये' होती, असे वाटते. एवढेच नव्हे, तर approximationची पातळी आणि नेमक्या कोणत्या संदर्भचौकटीच्या सापेक्ष ही विधाने केलेली आहेत यावरून आजच्या वैज्ञानिक निकषांतही ही विधाने बसवता येतील असे वाटते.

इतर विधानांबद्दल कल्पना नाही.

ख्रिस्ती अल् कायदा

एखाद्या प्रदेशात ख्रिस्ती समाज अल्पसंख्य असताना तो शेळीप्रमाणे गरीब व निरुपद्रवी वाटतो, तुल्यबल बनल्यावर कोल्ह्याप्रमाणे लबाड बनतो व बहुसंख्य झाल्यावर चित्त्याप्रमाणे क्रूर व आक्रमक बनतो, अशा अर्थाची ती म्हण आहे.

बहुसंख्य ख्रिस्ती झालेल्या समाजाने क्रूर दहशतवादाचा प्रत्यय आणून देण्यास त्रिपुरामध्ये सुरुवात केली आहे. NLFT च्या माध्यमातून त्यांनी त्रिपुरात निर्माण केलेली नरकसदृश स्थिती पाहता अंगावर शहारे येतात. नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा ह्या अतिरेकी संघटने वर बेप्टिस्ट चर्चचे पूर्ण नियंत्रण आहे.

गेल्या १० वर्षातील प्रसिध्द झालेल्या सरकारी आकड्यांनुसार एन एल एफ टी ने या कालावधीत १७५७ लोकांचे अपहरण केले. त्यापैकी १२० जणांना मारुन टाकले तर उरलेल्यांची प्रचंड खंडणी घेउन सुटका केली. या कालावधीतच सरकारी वा हिंदू संस्थांद्वारे चालविण्यात येणार्‍या सर्व शाळा बंद करुन फक्त मिशनर्‍यांद्वारे चालविल्या जाणार्‍या शाळांमध्येच मुलांना घालण्याचा फतवा एन् एल् एफ् टी ने काढला आहे. परिणाम स्वरुप आज मिशान्सच्या शाळा वगळता अन्य सर्व शाळा बंद झाल्या आहेत व फतवा न मानलेल्या शाळा अतिरेक्यांनी नष्ट केल्या आहेत.

एन् एल् एफ् टी चे अन्य फतवे म्हणजे हिंदू पध्द्तीनी पूजा अर्चा करण्यास बंदी, महिलांना कुंकू-सिंदूर लावण्यास , बांगड्या भरण्यास बंदी इत्यादी.

त्रिपुरा राज्यात कांचनछेडा गावातील वनवासी कल्याणाश्रमाच्या सेवा प्रकल्पाला भेट देण्यासाठी गेलेल्या संघाच्या चार जेष्ट कार्यकर्त्यांचे एन् एल एफ टी ने १९९९ ला अपहरण केले आणी त्यांना बांगला देशात नेउन २००१ मध्ये ते मारल्या गेल्याची बातमी भारत सरकारने दिली.

रक्त, घाम सिंचून ईशान्य भारतात संघ स्वयंसेवक अविरत राष्ट्र साधना करीत आहेत्. चार कार्यकर्त्यांच्या हत्येने ही साधना तर
थांबणार नाहीच. परंतु त्यातून प्रेरणा घेऊन अधिक कार्यकर्ते कामाला लागतील. या कार्यामध्ये तन, मन, धन पूर्वक सहभागी होणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली नाही काय?

एक शंका

रक्त, घाम सिंचून ईशान्य भारतात संघ स्वयंसेवक अविरत राष्ट्र साधना करीत आहेत्. चार कार्यकर्त्यांच्या हत्येने ही साधना तर
थांबणार नाहीच.
परंतु त्यातून प्रेरणा घेऊन अधिक कार्यकर्ते कामाला लागतील. या कार्यामध्ये तन, मन, धन पूर्वक सहभागी होणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली नाही काय?

ख्रिस्ती मिशनरी भारतात जे काही करू पाहतात, त्याचे मुळीच समर्थन करू इच्छीत नाही. पण...

ग्रॅहम स्टेन्सचे अनुयायी नेमके अशाच प्रकारचे काही म्हणत असावेत काय?

त्रिपुरा व ख्रिस्ती अल कायदा

त्रिपुरा हे ईशान्येतील सात राज्यांपैकी सर्वात छोटे म्हणजे फक्त १०४९१ चौ. कि.मी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. आसाम(५३ कि.मी) मिझोराम्(१०९ कि.मी) वगळता त्रिपुराची उर्वरित सर्व सीमा म्हणजे ८५६ कि.मी.ही बांगला देशाला लागून आहे. ही सीमा कोणत्याही भौगोलिक प्रकृतिबंधानुसार ठरलेली नसल्याने दोन्ही बाजूंनी आवक्-जावक सहज शक्य आहे. त्रिपुराचा बहुतांशी भाग डोंगराळ् असून लोकसंख्या अंदाजे ३५ लाख आहे. त्यात त्रिपुरी, जमातिया, नवातिया व रियांग या चार प्रमुख वन्य जनजाती राहतात. मैदानी भागात पूर्वीपासूनच बंगाली समाजाचे वास्तव्य होते. फाळणीनंतर लगेचच बांगला देशातून(तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातून) लाखो हिंदू शरणार्थी त्रिपुरात आले. डोंगराळ जनजातीच्या 'कॉकबरोक' या बोली भाषेला गेली ५०० वर्षे बंगाली लिपी वापरली जात होती. तसेच आपल्या परंपरागत निसर्गपूजेबरोबरच या जनजातीनी बंगाली लोकांची शक्तिपूजा पध्दतीदेखील अंगिकारली होती. अर्थात पूर्वी डोंगराळ जनजातीय व मैदानावरील बंगाली यांचे उत्कृष्ट स्नेह संबंध होते. सुप्रसिध्द संगीत दिग्दर्शक एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन हे मूळ बंगाली नसून या जनजाती पैकी होते.

त्रिपुरातील शांती भंग करण्यास कारणीभूत ठरले ते म्हणजे.... नंतर सातत्याने येत राहिलेले बांगलादेशी घुसखोर, दहशतवादी, क्म्युनिस्ट चळवळ व अमेरिकेचे हस्तक असलेले बॅप्टिस्ट मिशनरी आणी त्यांनी हाताशी धरलेल्या दहशत वादी संघटना.

आश्चर्य!

त्रिपुरातील शांती भंग करण्यास कारणीभूत ठरले ते म्हणजे.... नंतर सातत्याने येत राहिलेले बांगलादेशी घुसखोर, दहशतवादी, क्म्युनिस्ट चळवळ व अमेरिकेचे हस्तक असलेले बॅप्टिस्ट मिशनरी आणी त्यांनी हाताशी धरलेल्या दहशत वादी संघटना.

काय?????? कम्युनिस्ट चळवळ आणि अमेरिकेचे हस्तक हातात हात धरून आहेत?????? 'दो जिस्म मगर एक जान हैं हम'??????

ऐकावे ते नवलच! Politics makes strange bedfellows!

दहशतवाद

अल कायदावाले जगभर बाँबस्फोट वगैरे घडवून आणून लोकांना भयभीत करतात असे आपण वाचतो. काही लोकांनी त्याचा प्रत्यक्ष कटु अनुभवसुद्धा घेतला असेल. त्रिपुरामधल्या दहशतवादाबद्दल किंवा त्रिपुराबद्दलच फारसे कधी छापून येत नाही. हे लोक आपली दहशत नेमकी कशा रीतीने बसवतात?

ख्रिश्चन अलकायदा

१३/१/२००२ चा रविवार सात वर्षाच्या श्रीमा या गोंड्स मुलीच्या आयुष्यातील विशेष दिवस् होता. या दिवसाची ती वर्षभर वाट पहात होती. कारण या दिवशी तीचे आई वडील तीला बाजारात घेउन जाणार होते तीच्या साठी छान छान नवीन कपडे घेउन देणार होते आणि दुसरे दिवशी मकर संक्रांतीला ती ते घालुन् मिरवणार होती. सिगीचरा बाजार त्या दिवशी गजबजलेला होता कारण श्रीमा च्या कुटुंबासारखीच अनेक कुटुंबे मकर संक्रांतीची खरेदी करण्यासाठी इथे उत्साहाने आले होते. त्या उत्साहाचे नादात ते हि गोष्ट् पुर्णपणे विसरले की बाप्टीस्ट चर्च निर्मीत ख्रिश्चन अलकायदा(एन एल एफ टी) ने काढलेल्या फतव्याचे ते उल्लंघन करित आहेत. त्याचप्रमाणे त्यांना या गोष्टीची देखिल जाणीव झाली नाही कि आपल्या देशाचा एक महत्वाचा सण साजरा करण्याचा परिणाम त्याच्या जीवावर बेतणार आहे.

श्रीमाच्या आयुष्यात आता कधीच मकर संक्रांत येणार नाही कारण त्या दिवशी बाजारात या सणाच्या खरेदीत मग्न घोळक्याला एन एल एफ टी च्या अतिरेक्यांनी सर्व बाजूनी घेरले आणी त्यांच्यावर बेछुट गोळिबार केला त्यात जे सोळा लोक मारले गेले त्यात ही श्रीमा नावाची चिमुरडी देखील होती.

ख्रिस्ताच्या सैनिकांनी त्या दिवशी त्रिपुरा मध्ये जे बिभत्स आणी क्रुर कृत्य केले असे प्रकार ते जगभरात शतकानुशातके करित आले आहेत आणि करत राहणार आहेत.

आपण जर मुघलांशी टक्कर देणारा शिवाजी होउ शकत नसलो तरी त्यांचे मावळे तरी होण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

 
^ वर