मेघालयातील स्वातंत्र्य योध्दा-किआंग नॉन्गबाह्

Monument of Kiang Nongbah

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हा लढा १८५७ पासुन सुरु असल्याचे आपण ऐकतो. तात्या टोपे, भगतसिह, राजगुरु, सुखदेव हे तर आपले दैवतच. पण या शिवाय ही ब्रिटींशाच्या कट कारस्थानात आपले प्राण ज्यानी अर्पण केले त्यात मेघालयातील क्रांतीकारी किआंग नांग्बाह् यांच्याबद्दल जर आपण जाणुन घेतले नाही तर स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास अपुर्ण राहिल इतके त्याचे महत्व आहे. स्य्न्तु कसिआर् च्या किनार्‍यावर माइन्त्दु नदिच्या शेजारी एक् अति विस्तीर्ण मैदानी भाग आहे. या मैदानावर जयंतीया जमातीच्या प्रमुख नेत्यांची बैठक १८६१ मधे झाली होती. जयंतियांच्या पुर्वापार चालत आलेल्या प्रशासन व्यवस्थेत् ब्रिटिशांचा हस्तक्षेप् इतका वाढला होता कि त्यांच्या सामाजिक व्यवस्थेत असंतोष निर्माण व्हायला लागला. या सभेत उ. किआंग नान्ग्बाह् याला सर्वानुमते नेता निवड्ण्यात आले. त्याने हे नेतृत्व आनंदाने मान्य केले आणि ब्रिटीशांशी लढा देण्यात जंयंतीयाचे नेतृत्व करण्याची शपथ घेतली. काहिही झाले तरी ब्रिटिशांना आपल्या प्रदेशातून हाकलुन् देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. उपस्थित नेत्यांनी त्याला हे सिध्द् करण्याची गळ घातली की जेणेकरुन त्यानी त्याला नेतृत्व देण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. किआंग नांगबाह् ने सभोवार द्रुष्टिक्षेप केला आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या॑ कडाक्याच्या थंडीत शेजारुन वहाणार्‍या नदित उडी घेतली आणी काही क्षणात तळातील एक रोप मुळासकट उपटुन सगळ्याना दाखविले. सर्व उपस्थिताना आपण घेतलेल्या निर्णयाच्या योग्यतेची पावती मिळाली. त्याच्या नेतृवाखाली जयंतीयानी इंग्रजाशी सतत २ वर्ष संघर्ष केला. पण अखेर ब्रिटिशांच्या कुट निती पूढे त्या भोळ्या लो़कांचे काहि चालेले नाही आणी ३०/१२/१८६२ रोजी ब्रिटिशांनी त्याचेवर खटला भरून त्याला सर्वांसमक्ष फासावर लटकवले.अखेरच्या क्षणि त्याने आपल्या देशबांधवांना उद्देशुन जे उदगार काढले ते खरे ठरले. तो म्हणाला फाशी झाल्यावर माझा चेहरा जर पुर्वेकडे वळला तर समजा कि आपल्याला १०० वर्षाच्या आत स्वातंत्र्य मिळेल पण जर चेहरा पश्चिमेकडे वळला तर मात्र आपली गुलामगिरी कायमची फाशीनंतर त्याचा चेहरा पुर्वेकडे वळला होता आणि खरोखर आपण १९४७ मध्ये म्हणजे त्याच्या बलिदानाच्या १०० वर्षाच्या आत स्वतंत्र झालो.

100 year old bridge on syntu ksiar alongside the river Myntdu
Entry gate to the mountain
लेखनविषय: दुवे:

Comments

पूर्वी

लाचित बड फुकान ह्या ईशान्येतील अनाम अकीर्त स्वातंत्र्यवीराविषयी वाचले होते आणि आज किआंग विषयी कळले. धन्यवाद.

अवांतर : आपले नाव पूर्वांचल असे ठेवाल का?
--------------------------X--X-------------------------------

इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||

धन्यवाद

जेव्हा मी प्रथमच या साईट वर आलो तेव्हा मला मराठी टायपिंग चा विशेष सराव नव्हता. तुमची सुचना जरुर अमलात आणण्याचा प्रयत्न करिन.

पुर्वांचल.

 
^ वर