निसर्ग प्रेमी - मेघालय

खासी, जयंतीया किंवा गारो काय सर्वच जमाती निसर्ग प्रेमी. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या या जमाती निसर्गालाच आपला देव मानणार्‍या. निसर्गानी देखील त्यांना भरभरून दिले. दुर्गम प्र्देशात वस्ती करुन रहात असल्याने त्यांच्या वाटेला आपल्या सारख्या विज्ञान अधिष्टित सुख सोयी फार आल्या नाहीत तरीही त्या वाचुन त्याचे काहीच अड्ले नाही उलट त्यामुळे त्यांच्या कल्पकतेला अधिक वाव मिळाला. या लढ्वैय्या जमातींनी आपल्या सोयी स्वतःच निसर्गातुन निर्माण केल्या त्यातीलच एक म्हणजे जिवंत मुळांपासुन विकसीत केलेले मोठमोठे पुल.

रबराच्या झाडांची मुळे खोडांपासुन बरेच लांब आणि खोल पसरतात याचे त्यांनी निरीक्षण केले आणि त्यातुन त्यांनी खोल दर्‍यावर आणी नद्यांवर त्यापासुन पुल तयार केले.

Live root bridge cherrapunjee
Double decker root bridge

सुपारी चे लाब झाड आवश्यक त्या लांबीचे घेउन ते उभे दोन भागात कापुन जिथे पुल हवा असेल् तेथे टाकतात नंतर योजना बध्द्पणे दोन्ही किनार्‍यावर रबराचे झाड लावतात. खोडांपासुन पसरणारी ती मुळे त्या आड्व्या झाडावर जातील अशी त्याना दिशा देतात. काही वर्षांनी आडवे टाकलेले झाड सडुन गळुन पडते आणी मुळाचा तयार होतो तो मजबुत पूल. हा पुल वापरण्याजोगा व्हायला १० ते १५ वर्षे लागतात. या पुलावरुन एका वेळी ५० लोक सहज जा ये करु शकतात. हे पुल १०० ते १५० वर्षे सहज वापरात रहातात.

हे पुल हे एक जगातले एकमेव आश्चर्य आहे आणि हे पुल पहाण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांची गर्दी असते.

लेखनविषय: दुवे:

Comments

कल्पक टिकाऊ उपयोगी अभियांत्रिकी

मुळा-पारंब्यांनी बनलेला पूल म्हणजे कल्पक टिकाऊ उपयोगी अभियांत्रिकी.

टुमच्या चित्राचा दुवा बघता बरीच तपशीलवार माहिती मिळाली (दुवा). धन्यवाद.

कमाल आहे...

ह्या वनवासी बांधवांच्या निसर्गाचा सुयोग्य उपयोग करून घेण्याच्या वृत्तीची.

मजबूत, टिकाऊ आणि पर्यावरण-प्रेमी सेतु.
--------------------------X--X-------------------------------

इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||

झकास

काय कल्पकता आहे. माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

+१

असेच म्हणतो.. कमालीची कल्पकता आहे
आभार!

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

लेखमाला होत आहे.

आपण अनेक लेख एकाच विषयावर लिहित असल्याने त्याची सुंदर लेखमाला होत आहे.
उपक्रमराव जरा या लेखांना एका मालेत ओवताल का हो? नम्र विनंती आहे.

 
^ वर