गारो हिल्स येथील बेलबारी प्रकल्प-निवासी शाळा.

वेस्ट गारो हिल्स मधील तुरा हे शहर मेघालयातील् सर्वात मोठे शहर व जिल्ह्याचे ठीकाण . लोकसभेचे माजी सभापति श्री पी.ए. संगमा याच शहराचे. त्यांची कन्या सध्या येथील खासदार आहे. शिलांग पासुन याचे अंतर ३०३ कि.मि. असुन नियमीत बस सेवा आहे. शिलांग हुन संध्याकाळी ४ वाजता ४-५ बसचा ताफा तुर्‍यासाटी निघतो. अतिरेक्याच्या कारवायांमुळे ही खबरदारी. मी याच बस ने निघालो ते पहाटे ४ वाजता त्तुर्‍याला पोचलो. बस अर्थात गोहाटी मार्गे जाते.
http://farm4.static.flickr.com/3620/3553955890_ff8ec3c423_m.jpg
शिलांग स्टँड वरिल
तेथील कार्यालयातील कम्पुटर नादुरस्त झाल्याने बेलबारी येथील निवासी प्रकल्पाला भेट द्यायचे ठरले.तेथील एक कार्यकर्ते श्री बिंदुराम कोच
http://farm3.static.flickr.com/2588/3707950036_dfbe53da01_m.jpg
हे गारो कार्यकर्ते माझे सोबत आले. भाषेच्या समस्येमुळे तसेच नवीन माणसाकडे संशयाने पाहिले जात असल्यामुळे स्थानिक व्यक्ती सोबत असणे गरजेचे असते.तुर्‍या पर्यंत माझे सोबत शिलांग पासुन एक गारो रहिवासी माझे सोबत होता. बेलबारी ह्या गावी जाण्यासाटी आधी गारोबढा या गावी बस ने जावे लागते हे अंतर तुर्‍यापासुन ५३ कि.मि. अंदाजे १.३० तास लागला. तेथे न्याहारी म्हणजे पुरी-भाजी खाउन आटो रीक्षा करुन आम्ही बारकाना येथे गेलो ते अंतर १० कि मि होते. बारकाना येथे सेवा भारती चे कार्यालय आहे ते स्थानिक कार्यकर्ते बघतात. तुरा येथे मात्र मराठी कार्यकर्ता आहे. बारकाना येथे आम्ही मोटरसायकल कार्यालयातुन घेतली व बेलबारी ला पोचलो. बेलबारि हे गाव ८ कि.मि. वर असुन तेथिल शाळा थोडी आत असल्यामुळे स्वतःचे वाहन आवश्यक होते.
http://farm4.static.flickr.com/3646/3553149449_2d66a0e7d5_m.jpg
बेलबारी शाळेचे विद्यार्थी व शिक्षक.
http://farm4.static.flickr.com/3618/3553149683_fbd4181393_m.jpg

आम्ही तेथील विद्यार्थ्यांसोबत जेवण केले व तेथील समस्यांबाबत चर्चा केली बिदुराम् कोच हे तेथील सक्रिय कार्यकर्ते आहेत्.
नंतर आम्ही तीच मोटर सायकल घेउन तुर्‍याला परतलो. तेथील वळणदार् व पहाडी रस्यावरुन मोटरसायकल चालविण्याचा मनमुराद आनंद लुटुन आम्ही कार्यालयात पोचलो. तुरा हे मेघालयात असुनही तेथे पुण्यासारखीच गरमी आहे. कारण सखल प्रदेश. तिथुन बांगलादेशाची सीमा ३५ कि.मी वर आहे.

क्म्पुटर नादुरुस्त असल्याने मी लगेच रात्री ८ च्या बसने शिलांग साठी निघालो. मात्र येताना दुसर्‍या दिवशी ११ वाजता मी शिलांगला पोचलो. गरम प्रदेशातुन शिलांग ला येणे खरच सुखावह आहे. माझ्या तेथील एक महिन्याच्या वास्तव्यात फिरुन शिलांग ला आलो कि घरि आल्यासारखे वाटायचे. कारण लोक खुप चांगले असले तरि दोन चार हिंदी किंवा ईग्रजी शब्दापलिकडे त्याना विषेश ज्ञान नसल्यामुळे संवाद साधणे कठिण व्हावयाचे. त्यामानाने शिलांग मधील खासी लोक थोडे फार् हिंदी समजत असल्याने त्यांच्यात आलो कि घरच्या सारखे वाटे.

लेखनविषय: दुवे:

Comments

तुरा येथील फोटो

on way to Tura from Shillong Bus stand
Binduram Koch-Barkana

विश्वास कल्याणकर

 
^ वर