उपाय सुचवावा
मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (मुंमग्र) दादर शाखेची प्रथम बालविभागाची सदस्या होते व आता सामान्य विभागाची सदस्या आहे.
माझ्या लहानपणी दूरचित्रवाणी नावाचा सर्व मनोरंजनांच्या साधनांना भस्म करणारा असुर फारसा कोणाकडे नसल्यामुळे बालविभाग सुद्धा दणकून चालायचा. मनोरंजनाची अन्य साधने होती पण वाचनालयाला पर्याय ती होऊ शकत नव्हती.
कालांतराने ग्रंथालयाची बालविभागाची बरीच पुस्तके गहाळ झाल्यावर, वेगवेगळे सदस्य क्रमांक घेऊन झाल्यावर यथावकाश मी सामान्य सदस्या झाले. म्हणजे आता मोठ्यांच्या विभागात आले होते. इथे गुप्तेबाईंच्या सारख्या तत्पर व ग्रंथालय शास्त्रातील जणू संगणक असणार्या ग्रंथालय सेविका होत्या. पारायणेंसारखे त्यांना पण लाखो पुस्तकांच्यात कोणते पुस्तक कुठे ठेवले आहे, लेखक कोण, प्रकाशक कोण, मुल्य काय हे सारे तोंडपाठ असायचे. त्यावेळी सर्व ग्रंथालय सेविका उत्तम सेवा देत होत्या आणि आजही देत आहेत. तेही केवळ प्रतिदिनी रु. १/- इतक्या कमी सदस्य शुल्कात (ग्रंथालयाचे मासिक शुल्क रु. ३० आहे).
मात्र त्यावेळी माझा सदस्य क्रमांक ९०० च्या आसपास होता. तो दरवर्षी कमी होत होत आता चाळीसच्या आसपास आलेला आहे. बालविभाग तर नामशेष झालेला आहे. प्रौढांचा विभाग बहुतांशी पुस्तकांवर चालण्याऐवजी गृहशोभिका सारख्या मासिकांवर चालत आहे. अंदाजे लाखभर पुस्तके वाचकांची वाट पाहात आहेत. सर्व ग्रंथप्रेमींनी ह्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
बरेच जण म्हणतात की मुंमग्र ने आता इंग्रजी पुस्तके ठेवावीत. पण इंग्रजी पुस्तके वाचनासाठी ठेऊन मराठीचा वाचक वर्ग वाढेल असे म्हणणे फारसे सुसंगत आहे असे मला वाटत नाही. अर्थात असे होऊ पण शकेल, मला नक्की कल्पना नाही.
आपल्याला काही तर्कयुक्त विचार सुचतो का?
मला एक उपाय सुचतो तो म्हणजे शासनाने फिरते ग्रंथालय निर्माण करून मुंबईत ज्या मराठी शाळा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांच्या दरवाज्यापर्यंत ही पुस्तके न्यावीत तसेच उद्योगजगताला पुरक असणार्या पुस्तकांचे संच करून वेगवेगळ्या उद्योगांमध्ये ते तिथल्या चाकरवर्गाला देता येतील ह्यासाठी तिथे लघुशाखा निर्माण कराव्यात. उदा. दर आठवड्याला बँकेत अर्थशास्त्राशी संबंधित वेगवेगळी पुस्तके ठेऊन तिथल्या कर्मचार्यांना पुस्तके वाचण्यास प्रवृत्त करणे.
असो. आपणही ह्या विषयावर चिंतन करावे व आपली मते मांडावीत.
Comments
उपाय
मराठीचा वाचक वर्ग वाढण्यासाठी घरपोच ग्रंथालय हा प्रकार पुण्यात वाढत आहे. 'अन्यथा वाचले नसते' असा वर्ग आता वाचु लागला आहे. तसेच मराठी संकेतस्थळांना भेट देणारा वर्ग ही वाढलेला आहे ही समाधाची बाब आहे. संगणकसाक्षरता वाढवणे हाही उपाय आहे. युनिकोडचे आभार
प्रकाश घाटपांडे
घरपोच पुस्तके
ही खरोखरच चांगली योजना आहे. पण ती "शासकीय अनुदानावर जगणार्या व कर्मचार्यांना फुटकळ वेतन देऊ शकणार्या" संस्थेसाठी कितपत व्यवहार्य आहे हे पहावे लागेल. खाजगी वाचनालयांना ते परवडते कारण त्यांचे मासिक शुल्क रु. १००-१५० च्या आसपास असते. पण तरीही मी म्हणेन की मुंमग्रने हा प्रयोग करून पाहायलाच हवा.
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
वाचक कमी झाले की?
वाचक कमी झाले की इतर काही कारणे आहेत?
तुम्ही ५०० पानांचे पुस्तक वाचणे पसंत करता की तेवढीच माहिती कमी वेळात जास्त प्रभावीपणे मिळत असेल तर ती घेता? मला स्वतःला डिस्कवरी चॅनेल पाहून अनेक पुस्तके वाचून सुद्धा जी माहिती मिळाली नसती ती मिळते. मग मी पुस्तक का वाचू? याचा अर्थ पुस्तके वाचणे वाईट आहे असे नाही. तसेच ज्यांना पुस्तके संगणकावर उपलब्ध आहेत आणि सोयीचे वाटते त्यांनी वाचनालयात का जावे? माझे वैयक्तिक मत असे आहे की वाचनालयात जाणारा वाचकवर्ग कमी होण्याची इतर कारणे सुद्धा असावीत. उगाच एखाद्या गोष्टीला/तंत्रज्ञानाला दोष देऊन ती कारणे बाजूल सारु नयेत.
मान्य आहे पण...
१) अत्यंत वेगाने माहितीचा अति मारा झाल्याने झाल्यावर ती माहिती मेंदुला कितपत पचत असेल? एखादे खाणे २ मिनिटात खाणे आणि आस्वाद घेत घेत खाणे ह्यात चांगले कोणते? आस्वाद घेत घेत खाल्ले तर शरीरात पाचकरस अधिक प्रमाणात निर्माण होतात. म्हणूनच बहुदा एक घास बत्तीस वेळा चावून खावे असे म्हटले जात असावे. २) तुमच्या माझ्या सारखे डिस्कव्हरीच्या पाकात घोळलेले किती आणि सांस-बहु नवरसांत घोळलेले किती? तसेच फार थोड्या वाहिन्या प्रेक्षकांना हितकारी अश्या गोष्टी दाखवितात. इतर सर्व वाहिन्या त्यांचे प्रायोजक, निर्माते, अधिकारी ह्यांना जे विक्रीयोग्य वाटेल तेच विकतात. त्यांच्यासाठी हा सर्व पैश्याच्या आवकीचा मामला आहे.
खरे आहे. बर्याच प्रतिक्रियांमध्ये आता ग्रंथालयांनी वाचकांपर्यंत जावे हा सूर दिसतो तो त्यामुळेच.
त्या बाबींचा सविस्तर ऊहापोह इथे अपेक्षित आहे. उदा. माझा अनुभव सांगते. मी हल्लीच मुंमग्र मध्ये गेले होते. तिथे संगणकीकरणाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. अर्थात अपुर्या सेवकवर्गानिशी १-१.५ लाख पुस्तकांची विस्तृत नोंद करणे सोपे नव्हे. त्यामुळे सध्या पुस्तके देण्याचे काम मानवीय स्तरावर चालू आहे. मी न्या. मोहम्मद करीम छागला ह्यांचे शिशिरातील गुलाब हे अनवट पुस्तक मागितले. जिला सांगितले ती ग्रंथालय सेविका नवी होती. तिने मला ५ मिनिटांनी येऊन सांगितले की छगन ह्या नावाचे कोणतेही लेखक दिसत नाहीत. आता माझ्या ऐवजी इतर कोणी कामावर जाणारी, घाईत असणारी व्यक्ती असती तर ती वैतागून निघून गेली असती. असो. अश्या समस्यांचाच धांडोळा आपण ह्या मंचावर घेऊया.
खरे आहे. त्या कारणांवरच उपाय काढणे आवश्यक आहे.
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
स्कॅन इट्
इंग्रजी पुस्तके ठेवण्यापेक्षा जी आहेत तीच स्कॅन करत बसा म्हणावं.
अंदाजे लाखभर वाचक पुस्तकांची वाट पहात आहेत.
जगात अनेक ठिकाणी हा प्रकार चालू आहे.
माझ्या महिती प्रमाणे महा. शासनाने असा प्रकल्प हाती घेतलेला नाही. (घेणार ही नाही कदाचित)
अंतरजालावर
इथे बरीच मासिके अगदी दिवाळी अंक पण वाचण्याची सोय आहे पण ती स्कॅन केलेली पाने माझ्याच्याने सलग जास्त वाचवत नाहीत. दिवाळी अंकांचे ताजेपण, आकर्षक रंगसंगती, कोरेपणाचा वास ह्यांची मजा काहीच जाणवत नाही. असो. पण त्या संकेतस्थळ चालविणार्यांनी मराठी मासिके वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. माझ्यातर्फे मी त्यांच्या प्रयत्नांचे जाहीर कौतुक करीत आहे.
गडे, तुम्ही भारीच अपेक्षा करता बुवा आपल्या सरकारकडून आणि मग अपेक्षाभंगाचे दु:ख कुरवाळत बसता ! हे काय दुष्ट वागणे बरे ! जा बुवा तिकडे ! कट्टी, कट्टी, कट्टी !
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
संगणकावर पुस्तकवाचन?
छे! अगदी नाइलाज झाला तरच, एखादे दुर्मीळ पुस्तक वाचायला संगणकासमोर बसावे.. पुस्तक कसे उताणे-पालथे झोपून, खांबाला टेकून उभे राहिल्याराहिल्या, जेवणाच्या मेजावर जेवताजेवता, लोकल किंवा थेट आगगाडीच्या प्रवासात, आरामखुर्चीवर रेलून किंवा घरामधल्या वा घराच्या अंगणातल्या झोपाळ्यावर बसून वाचायचे असते. पुस्तक वाचताना डोळ्याला ताण पडता कामा नये.
पुण्यात अनेक फिरती ग्रंथालये आहेत, मुंबईतपण आहेत. पण त्यांची संख्या फारच कमी आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांत तर मराठी ग्रंथालये शून्यवत आहेत. इंग्रजी डझनावारी आहेत.ग्रंथालये प्रत्येक नगरात व उपनगरात पायी चालायच्या अंतरावर पाहिजेत. पायी जायलाच पाहिजे असे नाही, पण अंतर तेवढेच असावे. ग्रंथालयांची साखळी हवी. म्हणजे कुठलेही पुस्तक आज मागणी नोंदवल्यावर दुसर्या ग्रंथालयातून आणून दिले गेले पाहिजे. २००० पेक्षा जास्त वस्तीच्या प्रत्येक गावात साखळीने मोठ्या ग्रंथालयाशी जोडलेले छोटे ग्रंथालय हवे. ग्रंथालयात धार्मिक, भाषिक, जातीय विद्वेष भडकावणारी पुस्तके अजिबात नकोत. आणि आज आढळतात तशा, केवळ चटोर कादंबर्या नसाव्यात. ललित लेखनाइतक्याच संख्येने वैचारिक लिखाण असलेली पुस्तके आणि आणि थोडेफार संदर्भग्रंथ हवेत, हे मुद्दाम सांगायलाच नको.--वाचक्नवी
सुंदर, मनकवडा
असा प्रतिसाद. १०१% सहमत. घरात सोबत चिवड्याची, खार्या शेंगदाण्याची वाटी असायलाच हवी आणि हातातले पुस्तक वाचून संपल्यावरच खाली ठेवले जावे, अगदी मध्यरात्र झाली तरीही.
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
सहमत + काहि
श्री वाचक्नवींच्या बर्याचशा सुधारणांशी सहमत (असहमती केवळ धार्मिक, भाषिक, जातीय विद्वेष भडकावणारी पुस्तके अजिबात नकोत याला. माझ्यामते पुस्तक एकदा छापले आणि शासकीय बंदी नसली की ते ग्रंथालयात असावे. वाचायचे की नाहि ते वाचक ठरवतील)
त्याशिवाय, पुस्तक जालावरून आधीच आरक्षित करून ठेवणे बरेच फायद्याचे ठरावे. प्रत्येकाला ग्रंथालयात जाऊन पुस्तक शोधायला वेळ असेलच असे नाहि. अथवा काय वाचायचे आहे हे ठरवले असेलच असे नाहि. अश्यावेळी यादी जालावर मिळाली तर ग्रंथालयात जाऊन फक्त पुस्तक बदलणे हेच काम राहिल
अजून एक सुचना अशी की एकावेळी ४-५ पुस्तके देण्याची सोय असावी ज्याने खेपा वाचतील.
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
सूचना चांगल्या
त्याने वेळ नक्कीच वाचेल. तसेच समभाग व्यवसायात जसे "कॉल अँड ट्रेड" असते तशी "कॉल अँड बुक" सुविधा देता आली तर उत्तमच.
४-५ पुस्तके नेण्याची सुविधा पण देता येतील पण त्यासाठीची वाढीव सुरक्षा अनामत भरायची किती वाचकांची तयारी असेल? कारण नेलेली पुस्तके परतच केली नाहीत तर ग्रंथालयाचे नुकसानच होईल. तसेच ती पुस्तके परत मिळावीत म्हणून जो खटाटोप करावा लागेल त्यासाठी मनुष्यबळ कुठून आणायचे?
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
अनुभवाचे बोल
१. माझ्यामते बर्याच जणांची तयारी असेल. चांगल्या वाचनासाठी वाजवी दरवाढ/अनामत रक्कम ठेवणारे बरेच जण असतील. एक उदाहरण सांगतो माझ्या शाळेतील ग्रंथालय मुंमग्रंसच्या मानाने कहिच नाहि. मात्र ५ वर्षांपूर्वी ते सार्वजनिक झाले आणि आता प्रचंड चालते. (फी जास्त, अनामत जास्त, पुस्तके मुंमग्रंसच्या पेक्षा बरीच कमी). पहिल्या वर्षी ते चालत नव्हते. त्यामुळे पुस्तके पडून रहाण्यापेक्षा लोकांना २ मासिके आणि २ पुस्तके आणि १ सीडी इतके देण्यास सुरूवात झाली आणि सदस्यसंख्या काहि पटीत वाढली.. लोकांना कंटाळा नाहि मात्र त्यांना दर आठवड्यात ग्रंथालयात जायला वेळ नहि. महिन्यातून एकदा जाणे मात्र सहजशक्य आहे.
२. अश्या ग्रंथालयात वर्गणी भरून येणार्या वाचकांत फसवणार्या वाचकांची टक्केवारी काय? नव्या वाचक संख्येच्यासाठी ही नाममात्र हानी फायद्याचा सौदा ठरावा असे वाटते. तरीही आज जातोय तर ग्रंथपालाला विचारतो की असे कीती अनुभव येतात
*****
काल ग्रंथपालाला विचारले.. त्याने सांगितले की अजूनपर्यंत (गेल्या वर्षात साधारण) ५-७ जण असे निघाले ज्यांनी पुस्तके परत केली नाहित. त्यातील एक-दोघांनी हरवली असे सांगून पुस्तक रकमेच्या २.५ पट रक्कम भरली आहे.
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
या खजिन्याचा उपयोग झाला पाहिजे
लेखात सांगितलेली परिस्थिती चिंताजनक आहे. (पुस्तके उपलब्ध आहेत हे आशाजनक!)
इंग्रजी पुस्तके ठेवून मराठी वाचक वाढणार नाहीत याबद्दल सहमत. घरपोच ग्रंथालय हा आळसावर आणि इच्छादारिद्र्यावर उपाय बरा वाटतो.
महाजालावर पुस्तक मागवावे, आणि घरपोच मिळावे, अशी सोय करता येईल का? (माझ्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात मी गेले कित्येक वर्षे पाय ठेवला नाही. ग्रंथांची सूची महाजालावर आहे, आणि पुस्तक कार्यालयात पोचते होते.) पण तरी कदाचित लोकांना कुठले पुस्तक मागवायचे ते सुचणार नाही.
जर आईवडलांनी नाव नोंदवले, की दर महिन्याला अमुक वयाच्या मुला-मुलीसाठी पुस्तक पाठवा, तर वेगवेगळी पुस्तके घरपोच करता येतील. मग "कुठले पुस्तक मागवू" असे कोणी भांबावून जायची गरज नाही, हळूहळू वेगवेगळ्या लेखकांची ओळख होईल.
(जो काही उपाय होईल त्यासाठी खर्च किती येईल - असा विचार मनात येतो.)
उत्तम वाटला
घरपोच पुस्तक मागवता येणे हा खरच उत्तम उपाय आहे.
तसेच वाचनायलयांची आंतरजाल जोडणी ही फार महत्त्वाची ठरावी.
आपला
गुंडोपंत
सरकारी वाचनालयांनी
कूर्मगतीने संगणकाकडे वाटचाल करायला सुरवात केली आहे.
हळू हळू महाजालापर्यंत पण पोहोचतील :)
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
आळस, इच्छादारिद्र्य
पुस्तके घरपोच द्यायची मागणी करणार्यांवर सरसकट असे दोषारोपण करणे योग्य ठरणार नाही. किमान मुंबईतल्या लोकांची तरी या मागणीमागची कारणे वेगळी असू शकतात. मी मुंबईत जिथे राहते, तिथे ५ कि.मि. च्या परिसरात एकही चांगले मराठी पुस्तकांचे वाचनालय नाही. (दोन खूप छोटी वाचनालये आहेत. एकात पुस्तकांनी भरलेले एक कपाट आहे, तर दुसर्यात इन मिन चार कपाटे आहेत. दोन्हींत माझ्या आवडीची पुस्तके फारशी नाहीत.) ५ कि.मि. अंतरावर एक वाचनालय आहे, परंतू ते माझ्या महाविद्यालयाला जाण्या- येण्याच्या रस्त्यात पडत नाही. तिथे जायला सुमारे १५ मिनिटे पायी चालत जावे लागते, परत २० मिनिटे दुसर्या दिशेने पायी चालून बस पकडावी लागते. साधारण अर्धा तास ट्रेनमधून तिंबून निघाल्यावर आणि जोराची भूक लागल्यावर हे अंतर आणि एवढा वेळ असह्य होतो. सुट्टीत तर या वाचनालयात जायचे असेल तर १० रु. आणि दिवसातले ३ तास वेगळे खर्च करून जावे लागत असे. एवढे असूनही काही वर्षे मी ते वाचनालयाचे सदस्यत्व चालू ठेवले. परंतू तिथेही पुस्तके फारशी नव्हती, जी होती त्यांपर्यंत पोचण्यासाठीची त्यांची प्रक्रिया गुंतागुंतीची होती. हातात पुस्तके घेऊन चाळून ठरवायला मिळत नसे. आपल्याला हव्या असलेल्या लेखकाचे / पुस्तकाचे नाव माहित असेल तरच पुस्तक मिळवता येत असे. अशा सर्व कारणांस्तव ते वाचनालय सोडणे भाग पडले. एवढे सविस्तर सांगण्याचे कारण म्हणजे मुंबईतल्या (विशेषतः उपनगरात राहणार्या सर्वांचीच ही व्यथा आहे) आणि याला आळस किंवा इच्छादारिद्र्य म्हणणे योग्य होणार नाही असे वाटते.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची पुस्तक घेण्याची प्रक्रिया कशी आहे, ते माहित नाही, परंतू बर्याचदा ग्रंथालयांची ही प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची, कंटाळवाणी आणि वेळखाऊ असते. मी ज्या महाविद्यालयात शिकायचे तिथे तर या सर्वांवर कडी करणारी प्रक्रिया होती. पुस्तके डोळ्यांनी पहायला मिळायची नाहीत. दिसायची ती फक्त पुस्तकांची नावे लिहिलेली कार्डं. त्यातली तीन कार्डं निवडायची. त्यांची सर्व माहिती, नाव, लेखक, प्रकाशनाची तारीख, प्रकाशक सर्व काही एका कागदावर लिहायचे. तो कागद एका पेटीत टाकायचा. त्यानंतर दुसर्या दिवशी जर त्या तीन पुस्तकांतले एखादे पुस्तक उपलब्ध असेल, तर ते पुस्तक काढून ठेवले जायचे. इतक्या घाणेरड्या प्रक्रियेमुळे पुस्तके वाचण्याचा उत्साहच निघून गेला. नंतर जेव्हा वर्षभरासाठी आत जाऊन पुस्तके बघून घ्यायची परवानगी मिळाली, तेव्हा मात्र चंगळ झाली. माझ्या विषयाची पुस्तके कोणत्या कपाटात कुठल्या फळीवर कुठे ठेवली आहेत, हेही पाठ झाले. पण त्याचबरोबर तत्त्वज्ञान, इतिहास अशा इतर विषयांची पुस्तकेही वाचली गेली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या महाविद्यालयात एक अक्खे दालन हे विविध प्रकारच्या शब्दकोशांना वाहिलेले आहे. त्यात काही इतके दुर्मिळ शब्दकोश सापडतात, की त्यांना साधा हात लावायलासुद्धा परवानगी काढावी लागते. परंतू या कार्ड-प्रक्रियेमुळे महाविद्यालयाच्या ९९.९९% जनतेपर्यंत या दालनाची माहितीही पोहोचत नाही. इतकी पुस्तके साठवून उपयोगच काय, जर ती वाचकापर्यंत पोहोचत नसतील तर?
काही वाचनालयांची प्रवेश घेण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. इथल्या बर्याच जणांना माहित असेल, की अशियाटिक लायब्ररीचा प्रवेश घेणे हे महाकठीण कर्म आहे. त्यासाठी आधी तासाभराचा प्रवास करून मुंबईला जावे लागते, बरे हा प्रवास त्यातला सर्वांत कमी कष्ट देणारा भाग आहे. पुढे अनेक फॉर्म्स भरावे लागतात. सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे, तिथे २ वर्षांहून अधिक काळ सदस्यत्व असलेल्या २ व्यक्तींची शिफारस मिळवणे. ती मिळवल्यावरही लगेच आपल्याला सदस्यत्व मिळेल या भ्रमात राहून उपयोग नाही. त्यानंतर वर्षातून एकदा का दोनदा की त्याहून जास्त (नक्की कितीवेळा ते माहित नाही) वेळा जी मिटिंग भरते, त्यात या अर्जाचा विचार केला जाणार. आणि त्यानंतर कुठे सदस्यत्व मिळणार. माझ्या ओळखीची एक मुलगी गेले चार महिने ही मिटिंग भरण्याची वाट पाहत आहे. मला आता तिला सदस्यत्व मिळाल्यावर दोन वर्षे थांबावे लागणार आहे. अशियाटिक लायब्ररी ही मराठी पुस्तकांची लायब्ररी नाही हे ठाऊक आहे, परंतू सर्व वाचनालयांवर माझा गुंतागुंतीची प्रक्रिया हा एकमेव आक्षेप असतो, म्हणून सांगते आहे.
याऊलट कुठल्याही विश्वविद्यालच्या वाचनालयात पुस्तके घेण्याची प्रक्रिया प्रचंड सोपी असते. तिथे आपल्या डोळ्यांनी पुस्तके पाहता येतात. परंतू दुर्दैवाने फक्त तिथल्या विद्यार्थ्यांनाच त्याचा लाभ घेता येतो.
या सर्व बाबींमुळे माझे मराठी वाचन बरेच कमी झाले, तेव्हा ते वाढवण्यासाठी मी पुण्याच्या एका घरपोच सेवा देणार्या वाचनालयाचे सदस्यत्व घेतले. परंतू तिथेही मला हवी असलेली अर्धी पुस्तके मिळत नसल्याने निराशाच पदरी पडली. पालखीचा गोंडा सारखी १९व्या शतकातली पुस्तके जुनी आहेत म्हणून मिळत नाहीत हे कारण मी काही प्रमाणात खपवून घेईन. परंतू आसावरी काकडेसारख्या आजच्या काळातल्या लेखिकेचा कवितासंग्रह कसा मिळू शकत नाही?
याऊलट इंग्रजी पुस्तके इतक्या सहजी इंटरनेटवर उपलब्ध होतात, की तीच वाचली जातात. इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत तर गुटेनबर्गकृपेने द ओल्डर द बेटर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याऊलट आपल्या कडची वाचनालये!
तेव्हा जर मराठी वाचनालयांना आपला वाचकवर्ग वाढवायचा असेल, तर त्यांना प्रवेशाची प्रक्रिया सुलभ करणे, पुस्तक घेण्याची प्रक्रिया सुलभ करणे, जास्तीत जास्त पुस्तके उपलब्ध करून देणे, आपल्या शाखा वाढवणे, घरपोच पुस्तकांचा पर्याय उपलब्ध करून देणे अशा गोष्टींचा तरी किमान विचार केला पाहिजे
याहूनही वेगळे काही उपक्रम करता येतील.
१- नभोवाणीवर एक पुस्तक घेऊन त्याचे रोज क्रमशः वाचन केले जाते. बर्याच गृहिणींना नव्या पुस्तकांची माहिती मिळण्याचा हा एकमेव स्रोत असतो. त्या वाचनानंतर हे पुस्तक आमच्या अमुक तमुक वाचनालयात उपलब्ध आहे अशी जाहिरात करणे
२- आपल्याकडच्या दुर्मिळ पुस्तकांचे अशा पद्धतीने वाचन करवून घेणे
३- आपल्या पुस्तकांचे थीम नुसार गट पाडून एका- एका गटाचे प्रदर्शन भरवणे. म्हणजे एखाद्या दिवशी फक्त दुर्मिळ पुस्तके, एखाद्या दिवशी फक्त स्त्री-लेखकांची पुस्तके इ.
४- आचार्य अत्रे कट्ट्याच्या धर्तीवर बागेत वगैरे व्याख्यात्यांची पुस्तक-विषयक व्याख्याने भरवणे. नव्या लेखकांना बोलवून त्यांच्या आगामी पुस्तकाबद्दल त्यांना बोलते करणे. हाच कार्यक्रम ग्रंथालयाच्या अमुक मजल्यावरच्या तमुल सभागृहात झाला, तर त्याचा उपयोग नाही. कारण त्याला फार कमी लोक येणार. याऊलट बागेत झाल्यास तिथे त्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना नसलेली पण जाता जाता दिसले म्हणून कुतुहलाने आलेली लोकंही येऊ शकतील. वातावरण अधिक इन्फॉर्मल होईल.
५. जि पुस्तके दुर्मिळ आहेत, ज्यांचे प्रकाशन बंद झाले आहे, अशा पुस्तकांच्या झेरॉक्स प्रतीही ठेवल्या तरी चालेल. (यातला कॉपीराईटचा त्रास गेल्यानंत्र)
असो, आपण येथे उहापोह करून फारसा उपयोग होईल असे दिसत नाही.
राधिका
कर्मचार्यांविषयी
याचबरोबर ग्रंथालयात पुस्तकांबद्दल आणि वाचकांबद्दल आत्मीयता असलेले आणि मदतशील असे कर्मचारी असले तर सोन्याहून पिवळे.
राधिका
सह - अनुभूति...
हा विनोद कीर्ति महाविद्यालयात पण चालत असे. पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे ताजे खवणलेले खोबरे गार झालेल्या साबुदाण्याच्या खिचडीवर पडते आणि शब्द ऐकू येतात, "आता गिळा !" वाचनालयांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या ह्या लोभसवाण्या वागणूकीमुळे विद्यार्थ्यांची वाचनेच्छा मेली नाही तरच नवल.
बापरे ! हा म्हणजे द्रविडीप्राणायाम आहे. ह्या पेक्षा घरात बसून क्रौञ्चासन, मयूरासन, परिवृत्तत्रिकोणासन, सुप्तभदकोणासन, उत्थितपार्श्वकोणासन, वसिष्ठासन वै. करणे सोपे म्हणायची वेळ आणली आहे ह्या ग्रंथालयाने.
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
अडचण
तेच तर करण्याचा विचार होता. पण ही सगळी आसने कशी करायची हे ठाऊक नव्हते. म्हणून तर 'ग्रंथालयात त्यावर काहीं पुस्तकें मिळालीं, तर पहावें' म्हणून ग्रंथालयाचे सदस्यत्व घेण्याच्या विचारात होतो...
अवांतर
दादरमध्येच पुस्तके विकत घेताना छबिलदास गल्लीतील एका दुकानात सर्व पुस्तके उपलब्ध असतात पण सेवकवर्गाला सांगितले की ते मेहेरबानी केल्याप्रमाणे आणून देतात आणि आपण पुस्तक चाळून परत देईपर्यंत आपल्यावर पहारा देतात. मात्र टिळक पुलाखालच्या दुसर्या एका प्रकाशनाच्या दुकानात अंदाजे ५०००+ पुस्तके उघड्यावर ठेवलेली असतात. आपण ती पाहायची, मनसोक्त वाचायची आणि आवडली तर घ्यायची असा सारा मामला असतो आणि रु. १००+ ची पुस्तके घेतली की स्वत:हून १०% सवलत दिली जाते.
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
मुंमग्र मध्ये
मात्र आजपर्यंत एखादे पुस्तक उपलब्ध नाही असे एकदाही ऐकण्यात आले नाही. उलट तिथेच प्रथम मी शांताबाईंचे "चौघीजणी" वाचले. मग त्या पुस्तकाच्या प्रकाशकांना नवी आवृत्ती कधी काढणार विचारले तर त्यांनाच ते पुस्तक आपण प्रकाशित केले आहे हे माहित नव्हते. मग त्यांनी जुन्या बाडातून ते पुस्तक काढले व नव्याने छापले.
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
ऊहापोह
हा अनुभव प्रा. प्रह्लाद चेंदवणकरांच्या टाच ह्या आत्मकथनाचे वाचन जेव्हा आकाशवाणीवर झाले तेव्हा आला होता. अनेकांनी हे आत्मकथन ग्रंथालयात उपलब्ध आहे का असे विचारले होते. मी त्या काळी आकाशवाणीवरचे कार्यक्रम विशेष ऐकत नसे. तसेच हे चरित्रवाचन सकाळी ७ वा. होत असे. पण माझ्या एका परिचितांनी एकदा सकाळी ७.४५ ला फोन करून सांगितले की प्रा. प्रह्लाद चेंदवणकरांनी टाच मध्ये असा उल्लेख केला आहे की ते दलित समाजातील असून सुद्धा त्यांना रा.स्व. संघाची शाखा आणि कार्यकर्त्यांच्या घरी कधीही जातीयवादाचा अनुभव आला नाही. हे ऐकून माझी पण उत्सुकता वाढली आणि मी वाचनालयात चौकशी केली तेव्हा कळले की त्या पुस्तकासाठी किमान ७०-७५ जणांची प्रतीक्षा यादी आहे.
+ १ सहमत.
विषयानुसार पुस्तक प्रदर्शन भरविण्याची कल्पना स्तुत्य आहे.
हुं, खरे आहे. लोक हल्ली जिने चढून यायचे पण टाळतात.
छे, छे ! अस्सलप्रतींनाच वाचक नाही तर नक्कल प्रतींचा तरी काय उपयोग? कित्येक दुर्मिळ पुस्तके तर फक्त मार्चमध्ये औषध फवारणीसाठी कपाटातून बाहेर काढली जातात. लोक वाचतच नाहीत. काय करणार?
आता मी जेव्हा तिथे जाईन तेव्हा तिथल्या कार्यवाहांना (श्री. प्रेमानंद भाटकर ह्यांना) आग्रहाने हा लेख पाहा असे सांगणार आहे.
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
द ओल्डर द बेटर
इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत तर गुटेनबर्गकृपेने द ओल्डर द बेटर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याऊलट आपल्या कडची वाचनालये!
खरे आहे.
जुन्यात माझा जीव अडकलाय.
(अरे कुणी हाती घ्या रे असा प्रकल्प मराठीसाठी. पाहिजेतर मी स्कॅनर देतो, ३ बिहारी (/स्वस्त) मजुर ही पोसतो, पुस्तकं नाहीयेत. तुमच्याकडे असल्यास संपर्क साधा).
अवांतर: छान पिल्लू सोडलं आहे.
लोकं सुद्धा डोकं लढवून टंकित बसलेत.
मुंमग्र वाल्यांना हे उपाय सांगणार कोण?
आणि ते ऐकणार आहेत का? (जातो बुवा तिकडे)
सहमत
मध्यंतरी लोकसत्ताने एक छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध केले होते. इयत्ता १ ते ४ च्या विद्यार्थ्यांना आकलनक्षमतेनुसार सुचविलेल्या पुस्तकांची त्यात सुंदर सूची होती. आपण म्हणता त्या प्रमाणे कित्येक अश्रुत लेखकांची पुस्तके त्या सूचीमध्ये होती.
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
वाचनालये
मी २/३ वर्षांपूर्वी याच विषयावर एक लेख लिहिला होता. लेख् बराच मोठा असल्याने प्रतिसादात टाकणे शक्य नाही. स्वतंत्रपणे लेख म्हणून प्रसिद्ध केल्यास या लेखाशी तो कसा लिन्क करावयाचा हे कोणी सांगू शकेल का?
चन्द्रशेखर
वाचनालये
माझ्या याच विषयावरच्या लेखाचा हा दुवा आहे.
चन्द्रशेखर
अर्थ
लायब्ररी म्हणजेच ग्रंथालय का? मला वाटते की लोकांना लायब्ररी हवी असते फक्त ग्रंथालय नाही.
खरे तर
लोकांना ग्रंथालय / वाचनालय / अभ्यासिका असे सर्वच हवे असते. विशेषत: अभ्यासकांना, पत्रकारांना, लेखकांना तसेच विद्यार्थ्यांना आणि बहुतेक सर्व मुंमग्र शाखांमध्ये संदर्भ ग्रंथालय / वाचनालय / अभ्यासिका ह्या सर्व सुविधा एकत्रच उपलब्ध असतात आणि त्याही नाममात्र किंमतीत.
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
ग्रंथालय
तुम्ही अजुन ग्रंथालयातच अडकला आहात. आम्ही लायब्ररीची चर्चा करावी म्हणतो आहे.
प्रश्न
वाचनालय वा ग्रंथालय हा नसून लोक तिथे पर्यंत वा ते लोकांपर्यंत कसे पोहोचणार हा आहे. असो. मुंमग्र मध्ये एकदाच रु. ३००/- सुरक्षा अनामत भरून सर्व प्रकारची पुस्तके तिथे बसून कधीही वाचता येतात. मला वाटते की तुम्हाला हेच अपेक्षित आहे.
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
मराठी वाचक
विषयांतरः वाचन हे एक व्यसन आहे. दारु सारखे ते लागणे आवश्यक आहे.आणि त्याला पर्याय नाही. मला हे व्यसन(वाचनाचे) लहानपणापासुन आहे. हे व्यसन मला माझ्या आईने लावले. ती ४ थी पास होती पण तीला हे व्यसन कसे लागले मला माहित नाही पण कुणाही नातेवाईकाकडे गेलो की ती नेहमी त्याच्या कडे आटाळात काही कांदबर्या शोधत राही आणी काही मराठी जाड पुस्तके फाटके असलेतरी घरी आणी व वाचे. मला देखील ते व्यसन लागले.मी नुकतेच पेंडसे यांचे तुम्बाडचे खोत हे पुस्तक 2 खन्ड Crossword मधुन विकत घेउन आणुन वाचले. त्याकाळी ह.ना.आपटे, ना.सी फडके, वि.स.खांडेकर् यांचे अफाट वाचन केले आहे. आज मला त्यांच्या नावाव्यतिरीक्त कथा आठवत नाही. पण आजही मराठी कादंबरी दिसली की मी त्याचा फडशा रात्री जागुन वाचुन काढतो. आजही विश्वास पाटील, ना.स. ईनामदार यांच्या सर्व कादंबर्या माझ्या संग्रही आहेत. शेफाली.कॉम वर मी वाचलेल्या पुस्तकांची यादी मी ठेवली आहे.
विश्वास कल्याणकर