मराठी संकेतस्थळे

नोव्हेंबर २००८ मधे महाराष्ट्र टाइम्स् मधे ऑनलाईन उपक्रम, मायबोली दिवाळी अंका बद्दल वाचले अणि त्या दिवशी मला इंटरनेट वरील मराठी जगाची ओळख झाली. मराठी वाचनाची आवड असल्याने विवीध मराठी संकेतस्थळे शोधणे हा एक छंदच झाला. काही दिवसांपूर्वी जाणवले की अजुन बरेच लोक असतील की त्यांना ह्या जगाची माहीती नसेल, म्हणून माझ्या बुकमार्कस् मधून एक संकेतस्थळ बनवायचा विचार केला.
इथे किंवा इथे बघून सांगा की हे जमले आहे का?

Comments

वा छान!

वा छान,
पण त्याचे वेळी त्या स्थळावर आज काय हेडलाईन/बदल आहे ते पण रियलटाईम दिलेत तर अजून मजा येईल.

तसे कुठेकायमध्ये आहे पण ती साईट दर १० दिवसांनी अपडेट होते बहुदा...
आपला
गुंडोपंत

"कुठे काय"

सध्या २ तासांनी अद्ययावत होते पण लवकरच १५ मिनिटांनी होईल.
अजून २ नवी संकेतस्थळेही जोडली जातील.
"कुठे काय"

मराठीतील ई-पुस्तके

आपल्या संकेतस्थळावर मराठी ई-पुस्तकांची संकेतस्थळे दिसली नाहीत. ती कशी शोधायची?
चन्द्रशेखर

ब्लॉग्ज

आपल्या संकेतस्थळाची कल्पना तसेच मांडणी उत्तम आहे. सर्व मराठी ब्लॉग्जसाठी एकाच ब्लॉगविश्वाचा दुवा देण्यापेक्शा त्यांचीसुद्धा वर्गवारी केली तर शोधण्यास बरे पडेल.

मुळ प्रश्न

मुळ प्रश्न हा आहे की,
मराठी ही सर्च दिल्यावर
ही स्थळे गुगलवर समोर का येत नाहीत?

आपल्यात कुणीच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करू शकत नाही का?

हा प्रश्न मी मागेही वारंवार विचारला आहे....

आपला
गुंडोपंत

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन

आपल्या सूचनेप्रमाणे गुगलमध्ये काही ठराविक संकेतस्थळे शोधली जातील अशी व्यवस्था येथे केली आहे.

http://tinyurl.com/mjbqwj

आणखी काही साईट्सचा समावेश करता येण्यासारखा असला तर सांगावे.

हे

क्षमा करा पण आपण नक्की काय केले आहे मला निट कळले नाही.

माझ्या मते 'नॉर्मल' गुगलवर सर्च केल्यावर ही स्थळे सापडावीत.

आपला
गुंडोपंत

हेतु

गुंडोपंत, इथे माझा 'कुठे काय' शी स्पर्धा करण्याचा प्रयत्न नाही आहे. इथे मी फक्त मराठी संकेतस्थळांची विषयवार सुची बनवायचा प्रयत्न केला आहे. हेतु एवढाच की नवीन लोकांना एका जागी अनेक मराठी संकेतस्थळांची माहीती मिळेल.

आनंद घारे, जसा वेळ मिळेल तशी ब्लॉग्सची पण वर्गवारी करायचा प्रयत्न करीन.

आपल्या सर्वांच्या सुचनांसाठी धन्यवाद. तुम्ही मला suchana@marathinet.tk येथे पण सुचना पाठवू शकता

http://marathinet.tk

 
^ वर