चेरापुंजी

जगातील सर्वात अधिक पावसाचा प्रदेश म्हणुन चेरापुजी प्रसिध्द आहे. आता मात्र हा मान इथुन जवळच असलेल्या माउसीनरॅम(Mawsynram) याला जातो.चेरापुंजी हे शिलांग-शेला या रस्त्यावर तर माउसीनरॅम हे शिलाग-बालट या रस्त्यावर्. चेरापुंजी आणि माउसीनरॅम हे अंतर(Ariel) केवळ ८ कि.मि. शिलांग ते चेरापुजी हे अंतर ५३ कि.मि.चे पण प्रवास मात्र अडिच तासाचा. चेरापुजी हा ४५०० फुटावरील पठाराचा प्रदेश. चेरापुजी ला जातांना डावी कडे लाबच लाब इंग्रजी "व्ही" आकाराची दरी पसरलेली आहे. या दरीत कायम ढग पसरलेले असतात. त्यामुळे ते द्रुष्य पहात पहातच आपला प्रवास संपतो आणि आपण चेरापुंजी ला पोचतो. उन असले तरी थंड हवेची झुळुक आणी कायम सभोवती डोगरावर दिसणारी हिरवळ मन प्रसन्न ठेवते. मेघालयात वाहतुकिचे मुख्य साधन म्हणजे टाटा सुमो आणी मारुती-८०० त्याही कायम चकचकीत कारण धुळीचे प्रमाण शुन्य. टॅक्सी स्टॅडवरच गरम गरम पुरी भाजी ची दुकाने त्यामुळे पावले तिकडे न वळली तरच नवल.

ठीक़ठीकाणी असलेले धबधबे हे चेरापुंजी चे वैषिष्ट्य. येथे रामकृष्ण आश्रम ची भव्य वास्तु १०० वर्ष जुनी असुन त्याच्या द्वारे अनेक शैक्षणीक उपक्रम राबविले जातात. सुरवातिच्या काळात त्याचे कार्य बंद पाडायचे अनेक प्रयत्न ख्रिश्चन मिशनर्‍याद्वारे केल्या गेले. शाळेचा पाणी पुरवठा बंद केल्या गेला आणी काही काळ शाळा बंद ही होती. पण मग तत्कालीन पंतप्रधान श्री. मोरारजी देसाई याच्या मध्यस्तीने शाळा सुरु झाली.

चेरापुजी पठारावरुन दक्षिणेकडे सखल प्रदेशाकडे पाहिले असता संपुर्ण बागला देशाचा सिलहट जिल्हा दृष्टिस पडतो. शिलांग पीकवरुन येणारी उमीआम( Umiam)नदी चेरापुजी आणि माउसिन् रॅम् याच्या मधुन शेला मधुन बांगला देशातुन वाहुन समुद्राला मिळते. याच कारणाने या भागात पाउस झाला की बांगला देशात पूरसदृश परिस्थीती निर्माण होते. चेरापुजीत पडणारा सर्व पाउस वाहुन जात असल्यामुळे येथे कायम पाण्याची समस्या असते. मात्र इतका पाउस असुनही येथे चिखल नावाचा प्रकार् नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

फ्लिकर वा

अन्य सेवा वापरून धबधब्यांचे फोटो येथे डकवावेत. लेख वाचायला अजुन मजा येईल.

--------------------------X--X-------------------------------
फिकट निळीने रंगविलेला कापुस मेघांचा,
वरूनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा ।
त्यांतहि हसली मंदपणे ती चंद्रकला राणी,
कडेकडेच्या मेघांवर ये मोत्यांचें पाणी ।।

वर्णन

चेरापुंजीचे अजुन चांगले वर्णन करता येईल असे वाटते.






चेरापुन्जी

http://www.orkut.co.in/Main#AlbumZoom.aspx?uid=9188152962153142777&pid=1...

वरील लिन्क्स मी आधी पण दिल्या होत्या पण दिसत नाहीत.

विश्वास कल्याणकर

लय भारी !

व्वा ! चेरापूंजीचे फोटो भारी आले आहेत.
फक्त, प्रत्येक फोटोत तुम्ही लैच गंभीर दिसत आहात.
म्हणजे शिस्त वगैरे वाले दिसता ! :) (ह. घ्या)

-दिलीप बिरुटे

चेरापुंजी

मी २० वर्ष बैकेत मॅनेजर होतो त्याचा परिणाम असावा. हसला की फसला असे वाटल्यामुळे आणी विदर्भ-मराठवाडा, चंन्द्रपुर, गडचिरोली आणि पंजाब हरियाणा ह्या भागात बहुतेक काळ गेल्यामुळे कायम दहशतीत राहिलो त्यामुळे हसणे विसरल्यासारखे झाले. आता उपक्रम मधील मित्रामुळे जुन्या सवई जातील. शिस्त म्हणाल तर मी एन् सी सी मधे १० वी ते बी.ए. म्हणजे तब्बल पाच वर्षे काढली.त्याचा परीणाम असावा. पण २० व्या वर्षी ग्लायडीग आणि फ्लाईंग करीत आकाशात भरार्‍या मारल्या म्हणुन कुणीच सहसा जात नसलेल्या प्रदेशात जाउन तेथील लोकांमधे मिसळावेसे वाटते.

विश्वास कल्याणकर

 
^ वर