उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
माहिती: वडापाव, पावभाजी आणि पोळी-भाजीचे जनक
अंजली
June 18, 2009 - 6:47 am
माहिती: वडापाव, पावभाजी आणि पोळी-भाजीचे जनक
काही दिवसांपुर्वी लोकराज्य ह्या मासिकाचा मार्च-एप्रिल - २००९ चा अंक वाचण्यात आला.
हा अंक वाचत असताना खुप दिवसांपासुन मनात असलेल्या काही मुंबईच्या खाद्यपदार्थांचे जनक कोण ह्याचे उत्तर मला मिळाले.
ते तुमच्या माहितीसाठी इथे देत आहे.
१) वडापवः वडापावचे जनक अशोक वैद्य आहे. त्यांच्या कल्पकतेने १९६६ साली पहिला वडापाव बाजारात आला.
२) पावभाजी: ताडदेवचा सरदार पावभाजीवाला हा पावभाजीचा जनक आहे. १९६० च्या दशकात हा पदार्थ लोकप्रिय झाला, आणि अजुन हि आहे.
३) पोळी-भाजी केंद्र: घरगुती पोळी-भाजी केंद्राचे जनक डोंबवलीचे बंडू कानिटकर आहे.
दुवे:
Comments
चिक्की चे जनक
चिक्की चे जनक
मागे एकदा पुण्याला इण्टर्सिटीने जात असतांना कोण्या एका गृहस्थाने लोणावळा स्थानकावर एका चिक्कीवाल्यास चिक्की चे जनक कोण असे विचारले होते. त्या प्रश्नाचे उत्तर अजून शोधत आहोत. लोकराज्य हे ५ रु.स मिळणारे, शासनाची भूमिका मांडण्यासाठी असलेले असावे असे, तरीही चांगले असे मासिक आहे.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
किंमत
लोकराज्याच्या ह्या अंकाची किंमत रु. १० आहे. खाद्द पदार्थांची लज्जतदार, चांगली माहिती दिलेली आहे.
पावभाजी
>>पावभाजी: ताडदेवचा सरदार पावभाजीवाला हा पावभाजीचा जनक आहे. १९६० च्या दशकात हा पदार्थ लोकप्रिय झाला, आणि अजुन हि आहे.
अतिअवांतर आणि उपक्रमावर न शोभणारा प्रतिसाद: त्याकाळी त्या पदार्थाला पावभाजी न म्हणता भाजीपाव म्हणत असत असे स्मरते.
मस्त
वडापावबाबत माहिती होते. पावभाजीबद्दल पहिल्यांदाच कळले.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अरे वा!
अरे वा! नवीन माहिती मिळाली
मी साक्षात जनकाच्या गाडीवर पावभाजी खाल्याचे समजल्याने भरून आले आहे..
(सद्गदीत)ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्याच्या त्या प्राथमिक चुका
१९६०चे दशक?
१९६०चे दशक म्हणजे काय? जानेवारी १९६०पासून पुढची दहा वर्षे की अगोदरची दहा वर्षे? सन एकवीसशेच्या अगोदरच्या शंभर वर्षांना एकविसावे शतक म्हणतात, तसेच इथे आहे? विसाव्या शतकातले सहावे किंवा सातवे दशक असे म्हटले असते तर कदाचित माझा घोटाळा झाला नसता. इतरांना काय बोध झाला, माहीत नाही!--वाचक्नवी
१९६० चे दशक
१९६० ते १९७० याकाळाला १९६० चे दशक असे संबोधले आहे.
सिक्स्टीज
१९६० चे दशक सिक्स्टीज् च्या मराठी करणाचा प्रयास दिसतो. ० ते १०० पहिले शतक असल्याने ७ वे दशक (विसाव्या शतकातलेच) म्हणणे योग्य असले तरीही इंग्रजीतही तसा प्रघात नसल्याने म्हटले नसेल.
'साठी/सष्ठी'च्या दशकात चालू शकले असते. नव्वदीच्या दशकात ऐकल्यासारखा वाटतो.
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
नव्वदीचे दशक म्हणजे
मला वाटते नव्वदीचे दशक म्हणजे १९८० ते १९९०.
त्याच अर्थाने वयाची विशी, तिशी, चाळीशी हे आकडे वापरले जातात असे वाटते. (चू.भू.द्या.घ्या.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
गद्धे पंचविशी
विशी तिशी अनुक्रमे २०, ३० या वया साठी वापरत असावेत, कालखंडासाठी असतील असे वाटत नाही. उदा. विशी ओलांडल्यावर, चाळीशी (गाठल्या) नंतर. गद्धे पंचविशी २०-३० मध्ये असल्याने देखील ही शंका बळावते.
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
गद्धे पंचविशी
गद्धे पंचविशी म्हणजे २० - २५. २५ वा वाढदिवस (किंवा जन्मदिवसाचा २५वा वर्धापन झाल्यानंतर ) पंचविशी वापरत नाही. म्हणजे २६ वर्षाच्या तरुणाने शिंगे मोडून स्वतःची पंचविशी जाहीर करु नये.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मध्ये
'मध्ये' मधे 'पासून-पर्यंत' अपेक्षित नसून २० 'नंतर' ३० च्या 'आधी' अपेक्षित होते. २० ते २५ हा कालखंड ही याबाहेर नाही. तो १० - २० मध्ये खासच नाही.
'नव्वदीचे दशक म्हणजे १९८० ते १९९०' असल्यास ही 'पंच' विशी १०-२० च्या बाहेर आलेली दिसते इतकेच दर्शवायचे होते.
अवांतर - इथे अर्थ २५ वर्षापर्यंत असा दिसला.
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
चांगली माहिती....
अरे मुंबईकरांनो, कुणी शिव वडापावची टेस्ट घेऊन बघितली का रे? नुकतीच दुकाने सुरु झाली आहेत वाटते.
-सौरभ.
==================
फक्त मुंबईत?
शिव वडा फक्त मुंबईतच आहे काय? (एक शंका.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
लेको हो
माननीय बा. ठा. रुग्णालयात आहेत. अशावेळी शिव वड्याची चर्चा?
शिव शिव.
कृपया हलकेच घेणे. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो.
--------------------------X--X-------------------------------
अरे मानसा मानसा, तुझी नियत बेकार |
तुझ्याहून बरं, गोठ्यातलं जनावर ||
मतलबासाठी मान मानुस डोलये |
इनामाच्यासाठी कुत्रा शेपुट हालये ||
नसावा..पण
मुंबईतली दुकाने सुरु (झाली) असावीत. विशेषतः दुपारी किंवा रात्री उशीराही सुरु (उघडी) असावीत. ;-) त्यामुळे टेश्टरांची संख्या अधिक असावी.
पोळीभाजी
वडापाव आणि पावभाजीचे जनक कोण हे माहित नव्हते. नविन माहिती समजली. आभारी आहे.
पोळीभाजीचे जनक मात्र कानिटकरांना म्हणता येणार नाही. पोळी भाजीचे मार्केटींग करायच्या एका उपायाचे जनक असे फार तर म्हणता येईल, खरं पोळी भाजीचे जनक ते कसे काय?
पोळी-भाजी केंद्र
पोळीभाजीचे जनक मात्र कानिटकरांना म्हणता येणार नाही
माहिती :
पोळी-भाजी केंद्र: घरगुती पोळी-भाजी केंद्राचे जनक डोंबवलीचे बंडू कानिटकर आहे.
पोळी-भाजी केंद्र आणि बटाटेवडा
पोळी भाजी हा जेवणाचा प्रकार महाराष्ट्रात गेल्या काही शतकांपासून चालत आलेला असावा. अर्थात पोळी-भाजीचा जनक कोण हे सांगणे निव्वळ अशक्य. पोळी-भाजी केंद्राचे जनक बंडू कानिटकर असणे शक्य आहे!
वडापावचे जनक अशोक वैद्य असणे शक्य आहे परंतु बटाटे वड्याचे जनक पहिल्या बाजीराव पेशव्यांचे खानसामे हे होते, असे वाचल्याचे आठवते. (बटाटा हा पदार्थ त्याच सुमारास भारतात नव्याने आला होता)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
फाश्ट फूड
बटाटे वड्याचे जनक पहिल्या बाजीराव पेशव्यांचे खानसामे हे होते, असे वाचल्याचे आठवते. (बटाटा हा पदार्थ त्याच सुमारास भारतात नव्याने आला होता)
असं आहे काय! आता पेशव्यांना बटाटेवडे खाऊन गॅस होत होता काय? जळजळ होत होती काय? झाल्यास ते "इनो" घेत असत काय? इनो नसल्यास त्यासम दुसरा कोणता इलाज होता आणि त्याचे मार्केटिंग मराठी माणसाला करता येईल काय? या प्रश्नांची उत्तरे शोधा. - ह. घ्या.
-राजीव.
मजेदार
लोकराज्यात ही माहिती दिली आहे म्हणजे आता एमपीएससी भावी फौजदारांना, महसूल अधिकाऱ्यांना
असे प्रश्न नक्की विचारणार :)
अभ्यासू
अभ्यासू प्रतिसाद आहे. अपेक्षित प्रश्नसंच!
पावभाजीचा शोध कुठे/ कसा लागला ह्या बरेच दिवस पडलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडले. धन्यवाद.