उत्सव : पाण्यावरील जाळाचा

उत्सव : पाण्यावरील जाळाचा

पुर्वरंगः
र्होवड आयलंड ( Rhode Island ), हे उत्तर अमेरीकेतल सगळ्यात छोटं राज्य. प्रोविडेंस (Providence) ही ह्या राज्याची राजधानी. प्रोविडंस गावंठाणच्या मधुन वाहाणार्याा तिन नद्या - प्रोविडेंस (Providence), वूनास॑उअटुकेट -(Woonasquatucket), आणि मोशस्सुक (Moshassuck) ज्या भागात मिळता त्या भागाला वॉटरपार्क म्हणतात. ह्या वॉटरपार्कमध्ये हा उत्सव साजरा केला जातो.

आजुबाजुचा परीसर अतीशय सुरेख बांधकाम केलेला. सहजरीत्या आपण नदीच्या काठाने चालू शकतो. ह्या काठावरुन त्या काठावर जायला बर्याॉच ठिकाणी लहान आणि
मोठे पुल बांधले आहे. काही ठीकाणी सुरेख बाग फुलविली आहे. बाजुला बसायला बाक आहे. काही ठीकाणी सैन्याला स्मरून केलेल्या धातुच्या कलाकृती आहे. ह्या राज्यातल्या ज्या काही थोडया ऊंच ईमारती आहे त्या ह्याच परीसरात.... मे ते ओक्टोबर महिन्याच्या काही दिवशी, जास्तकरुन शनिवारी - रविवारी "पाण्यावरील जाळ ("WaterFire")" हा उत्सव साजरा केला जातो असे माझ्या अमेरीकन सहकार्यां कडुन समजले. कुठल्या दिवशी हा उत्सव साजरा होणार, त्या दिवशी कोणते कार्यक्रम साजरे होणार, सुर्यास्ताची वेळ आणि ह्या कार्यक्रमाला कोणि आर्थिक साह्यय केले याची सगळी माहिती वॉटरफायरच्या अधि़कृत संकेतस्थळावर (http://www.waterfire.org/) दिलेली असते. ही माहिती पण त्यांनीच दिली.

माझे २००६ सालामधले काही दिवसांचे वास्तव्य ह्याच काळातले, त्या मूळे मला हे प्रत्यक्ष बघता आले.

प्रत्यक्ष अनुभव :
जालावरुन थोडी माहिती बघीतली असली तरी vप्रत्यक्षात कसे असणार याची उत्सुकता
होती.

ठरल्या प्रमाणे मी नदीच्या कीनारी जाउन उभी राहीली...माझ्या सारखे बरेच जण लवकर आलेले होते. मी फक्त ९ -९:३० वाजे पर्यंतच बघायच ठरवल होत. परत घरी जायची शेवटची बस ११:३० वाजताची होती. ती सुटली की स्पेशल टॅक्सीकरुन जावे लागणार होते.
आले तेंव्हा जास्त गर्दि नव्ह्ती....पण आधी बघितलेला हा परीसर आणि आजचा ह्यात खुपच फरक जाणवत होता. खाण्यापिण्याचे बरेचसे उघड्यावरची दुकाने नदीच्या दोन्ही तीरावर थाटलेली होती.. आजच्या सुर्यास्ताची वेळ ८:०४ होती.. हळू ह्ळू गर्दि वाढू लागली.. नदीत बर्याखच ठिकाणी पाण्यावर तरंगत असलेल्या भांड्यात ला़कडे ठेवण्यात येत होती.

हळू ह्ळू संगित वाजवले जात होते. पाण्यात बोटी फिरत होत्या.

पहिल्या बोटीतुन चायनिज् वंशाचेलोक वाद्यवाजवत एक एक आधिच पाण्यावर रचुन ठेवलेल्या भांड्यातील लाकडे पेटवत होते. बोटीत बसलेल्या सगळ्यांचे कपडे काळ्यारंगाचे होते.. सुमारे १०० अश्या भांड्यात जाळ पेटवला जातो. दिसायला हे दॄश्य खुपच विलोभनिय वाटत होत. हि तरंगती भांडी नेहमी करता बनवलेली आहे.

हळू हळू संगित मोठयाने वाजुलागले. खाण्याच्या पदार्थांचा खमंग वास ईकडे तिकडे सुटला. प्रत्येकाच्या हातात खायच्या वस्तु होत्याच!

नदीत फिरण्यार्याप काही बोटीतुन हातात घेतलेल्या जाळाचे खेळ करून दाखवत होते. ह्या बोटी एका टोका पासुन दुसर्याक टोका (नियोजित मार्गाच्या) पर्यंत तालबद्ध जात होत्या. पाण्यात पेटवलेल्या होळ्यांचा जाळ कमी झाला की त्यात लाकडे टाकली जायची. काही ठीकाणचा हा जाळ खुप जास्त होत होता. हवेबरोबर त्याची दिशाबदलायची . काठावरच्या लोकांना बाजुला सरकाव लागायच.

RI-waterfire-1
RI-Waterfire-2
RI-Waterfire-3
RI-Waterfire-4

काही बोटी ह्या नदीत विहार करण्या साठी राखुन ठेवल्या होत्या. ५० ते २०० डॉलर प्रति फेरी, बोटीत वाईन पिण्याची, आणि खाण्याची सोय केलेली होती.

प्रत्येक ठीकाणचा नजारा वेगळाच होता. जशी जशी रात्र पुढे पुढे सरकत होती तस तसे वातावरण मस्तीत अधिकच धुंद बनत होते.

काही गडबड झालीच तर लोकांच्या रक्षणासाठी पोलिस होतेच!!!

एक हिंदी गाणे पण वाजवण्यात आले होते. बरेच भारतीय विद्यार्थी शिकायला इथल्या विद्यापिठात येतात अशी नंतर माहिती मिळाली.

बाजुच्या एका मोकळ्या जागे मधे "बॉलडाँस" स्पर्धा चालू होत्या. काहीजण वेगवेगळे सोंग घेवुन पैसे मागण्याचे मुकपणे काम करत होते.

मला आपल्याकडच्या होळीची आणि पोटासाठी जाळाशी खेळणार्यार डोंबार्यांरची आठवण झाली.

मी नदी कीनार्याचवरुन फेर फटका मारत न कळणार्याळ पण कानाला बर्याी वाटणार्यान संगीताची मजा घेत नदीपात्रात पेटवलेल्या होळ्यांकडे पाहात होते.

त्रिपुरी पोर्णिमेला नाशिक मधे गोदापात्रत असेच सुरेख दिसते...फरक हाच की गोदापात्रात... ह्जारोंच्यावर छोटे दिवे पेटवतात तर... ईथे... १०० मोठ्या होळया....
मनात आलं.... गोदावरी नदीच्या अहिल्याबाई होळकर (व्हीक्टोरीया) पुला पासुन ते....रामकुंड घाट .... लक्ष्मण कुंड घाट...गाडगेमहाराजा पुला पर्यंतच्या मार्गावर हे मे महिन्यात साजरेकेल तर?

मनात एक शंका आली... हे लोक भारतात येवून आपले..नदीपात्रात दिवे सोडण्याची आणि होळीची प्रथातर पाहुन गेले नाही ना?

कोणाच्या डोक्यात ही कल्पना आली असेल बुवा???....

बार्नबी इवान्स (Barnaby Evans) ह्याने ही प्रथा १९९४ सालापासुन सुरू केली.
बार्नबी इवान्सने ह्या उत्सवाच्या पाठीमागे त्याची काय भुमिका आहे हे सांगताना.. ग्रीक देवता अथेनच्या जगण्याकडे पाहाण्याचा संदेशाचा आधार घेतला.
ग्रीक देवता अथेननुसार ज्योत हा जाळाचा शांत अवतार आहे. ज्याने जगाला प्रकाश देण्याचे काम होते. जाळ/अग्नी आणि पाणि हे माणसाला जगण्यासाठी लागणारे मुलभुत घटक आहेत.
खुल्या आकाशाखाली प्रकाशात संगित, वास्तुशिल्प, शिल्पकला, हाताने बनवलेल्या सजावटीच्या वस्तु, काचेच्या शोभिवंत वस्तु, जहाज तयार करण्याची कला हे सगळ ह्या उत्सवात सामिल करुन घेतल... ज्या ज्या गोष्टींमुळे माणसाला आनंद मिळेल त्या सगळ्यांचा समावेश केला आहे.

एक वेगळाच अनुभव मी घेत होते. जगात ही एकमेव जागा आहे की जीथे ह्या प्रकारचा उत्सव लोक साजरा करतात.

ह्या उत्सवात भाग घेण्या साठी पैसे लागत नाही... ही अजुन एक गंमत... नाहीतर... अमेरीकेत.... कशा कशा साठी पैसे मोजावेलागतात हयावर न बोललेच बरे!

तुम्हाला दान म्हणुन द्यायचे असेलतर, स्वयंसेवकांनकडे देवु शकता.

ह्या निमीत्याने मी र्होचड आयलंडचा हा सांस्कृतिक ठेवा पाहु शकले. खरतर हे वर्णन शब्दात सांगता येत नाही... ते अनुभवावे लागते!!!

मध्यरात्री पर्यंत हे असेच चालु राहणार होते... ९:३० कधीच वाजुन गेले होते. वेळ कसा गेला हे कळल सुध्दा नाही... घडयाळ्यात पाहिलेतर... ११:२० झाले होते.... धावत पळत बस थांब्यावर गेले.. थांब्यावर कोणीच नव्हते... थोडी भीती वाटली... थोड्याच अंतरावर लोक वॉटरफायरचा आनंद लुटत होते. संगीत.. स्पष्टपणे एकू येत होते.. तेवढयात.... काही कल्लु मुलामुलींचा घोळका आला... थोडी भीती वाटली ...पण बससाठी अजुन कोणी थांबले आहे हे बघुन हायसे वाटले. ११:३०ला बस आली... शेवटची बस घरी जायला मीळाल्या मुळे अजुन आनंद झाला.

मी माझ्या ४ महिन्याच्या कालावधित ३ वेळा ह्या पाण्यावरील जाळाचा आनंद लुटला.......

लेखनविषय: दुवे:

Comments

वा!

मी माझ्या ४ महिन्याच्या कालावधित ३ वेळा ह्या पाण्यावरील जाळाचा आनंद लुटला.......

अरे वा! छानच!

आपला,
(आनंदी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

माहीतीपूर्ण लेख

माहीतीपूर्ण लेख..ललित अंगाने जाणार्‍या माहीतीपूर्ण लेखांतील माहीती माझ्या अधिक लक्षात राहते.. त्यामुळे अश्या शैलीत अजून लेख येऊ देत.

(पर्यटक) ऋषिकेश
------------------
हिंस्त्र श्वापदे जंगलात असतात तेव्हाच हिंस्त्र वाटतात.. एकदा संकेतस्थळाच्या पिंजर्‍यात आली की हिंस्त्रपणा जाऊन उरतात ती फक्त श्वापदे

छान लेख

वॉटरफायरची कल्पना आवडली. भरतीची वेळ बघून आणि पाणी कितपत वर चढेल ह्याचा अंदाज घेऊन ज्योत पेटवत असतील का?
राधिका

ता.क.- लेखनपद्धतीत बरीच सुधारणा झाल्याचे दिसले, त्याबद्दल अभिनंदन.

हस्वाचे दीर्घ आणि या उलट.

जिथे र्‍हस्व लिहावेसे वाटते तिथे दीर्घ, आणि जिथे दीर्घ वाटते तिथे र्‍हस्व लिहिले की निम्म्या चुका कमी होतात, असा अनेकांचा अनुभव आहे.--वाचक्‍नवी

धन्यवाद

मला आपली हरस्व- दीर्घाची शुद्धलेखन- संकल्पना फारशी रुचत नसल्याने, मला या सूचनेचा काही उपयोग नाही. तेव्हा थँक्स बट नो थँक्स. मी माझ्या आधीच्या एका प्रतिसादातही शुद्धलेखनाचा फारसा आग्रह नाही अशी माझी भूमिका स्पष्ट केली होती. असो, शुद्धलेखन पटणार्यांना ही सूचना उपयोगी पडेल.
राधिका

हरस्व-दीर्घाची संकल्पना

लेखनपद्धतीत बरीच सुधारणा झाल्याचे दिसले, त्याबद्दल अभिनंदन.
या बाबतीत सहमत. या लेखाच्या पहिल्या दोन परिच्छेदांत टंकलेखनामध्ये फक्त १५, र्‍हस्वदीर्घलिखाणांत ५६ आणि व्याकरणासंदर्भात केवळ १७ त्रुटी आहेत. ह्या आधीच्या लेखांतील चुकांच्या मानाने लक्षणीयरीत्या कमी आहेत. माझेही अभिनंदन!
उरलेले परिच्छेद त्या दृष्टीने वाचले नाहीत.
हे किरकोळ दोष सोडले तर लेख माहितीपूर्ण आणि वाचनीय!--वाचक्‍नवी

संदर्भ

लेखनपद्धतीत बरीच सुधारणा झाल्याचे दिसले, त्याबद्दल अभिनंदन.

या माझ्या वाक्याला अंजली यांच्या 'मला भावलेला कारंजा' या लेखावरील माझ्या प्रतिसादाचा संदर्भ आहे. शब्दाच्या अर्थाचा अनर्थ किंवा निरर्थ होऊ न देणे अशी काहीशी माझी चांगल्या लेखनपद्धतीची व्याख्या आहे. शिवाय दोन वाक्यांतील टिंबांची संख्याही या लेखात कमी झालेली दिसली. म्हणून हे वाक्य. आपल्या माझ्या वाक्यावरील प्रतिसादातून (आधीच्या व नंतर संपादित केलेल्या नंतरच्या) माझ्या या भूमिकेबद्दल गैरसमज झाल्याचे दिसले म्हणून हे स्पष्टीकरण.
राधिका

ज्योत पेटवण्याची वेळ

भरतीची वेळ बघून आणि पाणी कितपत वर चढेल ह्याचा अंदाज घेऊन ज्योत पेटवत असतील का

माझ्या अंदाजाप्रमाणे अंधार पडल्यावर पाण्यावरील जाळाचा देखावा अधिक सुरेख दिसत असेल. सुर्यप्रकाशात ते तेवढे सुरेख वाटणार नाही. सुर्यास्ता नंतर अंधार पडायला सुरवात होत असल्यामुळे, सुर्यास्ताला महत्वप्राप्त झाले असावे.

भरती?

या तीन नद्या आहेत की समुद्राच्या खाड्या वगैरे? (नदीला भरती येते ही माहिती नवीन आहे.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ओह्

नदीला भरती येत नाही हे माहित नव्हतं (माफ करा आमचा विज्ञानाच्या बाबतीत मोठा लोचा आहे) पण जर भरती येत नसेल, तर आधी घेतलेल्या फोटोंमध्ये पाण्याची पातळी खाली आणि नंतरच्या फोटोमध्ये वर हे गौडबंगाल काय आहे बरे?

राधिका

नदीच्या मुखाजवळ भरती-ओहटी येते

नदीच्या मुखाजवळ पाण्याला भरती-ओहटी येते. ह्रोड (होय असाही उच्चार होतो!) ह्रोड आयलंडचा अख्खा प्रांतच समुद्राजवळ आहे, म्हणून या नदीला भरती-ओहटी येत असणारच.

खार्‍या पाण्याच्या खाडीला भरती ओहटी येते, हे समजणे कदाचित सोपे आहे (उदाहरणार्थ गोव्यातील मांडवी नदी.) कोणी म्हणेल की खाडी म्हणजे समुद्राचाच भाग. परंतु समुद्रात मोठ्या प्रमाणात गोडे पाणी ओतणार्‍या मिसिसिपी नदीलासुद्धा तिच्या मुखाजवळ भरती आणि ओहटी येते. थोडा विचार करता, हे तितके चमत्कारिक वाटणार नाही. समुद्राची पातळी नदीच्या पातळीपेक्षा खाली असेस्तोवर नदीतील पाणी समुद्रात वाहाते, मुखाजवळ समुद्राची आणि नदीची, दोघांची पाण्याची पातळी जवळजवळ समसमान असते. सागराच्या ओहटीच्या वेळेला आणि भरतीच्या वेळेलाही! म्हणजेच असे, की समुद्राच्या भरतीच्या वेळेला नदीच्या मुखात पाण्याची ती पातळी होईपर्यंत गोडे पाणी साचत राहाते. त्याची पातळी भरतीच्या समुद्राशी सम होते मग प्रवाह वाहात राहातो. अशा प्रकारे गोड्या पाण्याचीसुद्धा पातळी वाढून-घटून भरती-ओहटी येते.

धन्यवाद

नदीच्या मुखाजवळ भरती येते हे माहीत होते. त्रिभुज प्रदेशाच्या निर्मितीत या घटनेचे महत्त्व आहे असे पुसटसे आठवते. मात्र हे राज्य व नद्या या समुद्राजवळ आहेत हे माहिती नव्हते. प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. धन्यवाद.

(आभारी) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ता. क. २

तिसरा फोटो जबरी आला आहे.
राधिका

हम्म!

लेख आणि माहिती आवडली.
चित्रे सुरेख आहेत.

र्होवड आयलंडला बरेचसे लोक र्‍होड आयलंड असे म्हणत असावेत. तसा र्‍ह हा नेमका उच्चार होत नसावा इंग्रजीत असे वाटते.

काही कल्लु मुलामुलींचा घोळका आला... थोडी भीती वाटली

कोण जाणे, त्यांनाही ब्लडी इंडियन बघून थोडीशी भीती वाटली असावी. असो. माझ्या वाक्या इतकेच आपले वाक्यही आक्षेपार्ह वाटले हे वेगळे सांगायची गरज नसावी. अशाप्रकारची लेखातील वाक्ये लेखाचे गांभीर्य आणि दर्जा कमी करतात असे मला वाटते.

सहमत आहे

काही कल्लु मुलामुलींचा घोळका आला... थोडी भीती वाटली

का अशी भीती वाटली?
काही खास असे अनुभव आहेत का?

भीतीदायक असे व्यक्तिगत अनुभव नसल्यास असा 'भीतीदायक' ग्रह का झाला असावा?
फक्त कुणाच्या सांगोवांगी असतील तर अयोग्य आहे असे माझे मत आहे. (मी हे मत मांडतो आहे कारण आपणही आपले मत सार्वजनिकरित्या मांडले आहे.)

ही फक्त कातडीच्या रंगावर आधारीत आपले विधान असेल तर... आपले विधान आक्षेपार्ह आहे!

आपला
गुंडोपंत

भीती

ही फक्त कातडीच्या रंगावर आधारीत आपले विधान असेल तर... आपले विधान आक्षेपार्ह आहे!

हे विधान कातडीच्या रंगावर आधारीत नाही.

माझा अनुभवः
त्यांच्याच गटातल्या मुलामुलींशी त्यांचे मोकळेपणाने एकमेकांशी वागतांना,आरडा ओरडा करतांना बाजुला उभ्या असलेल्यांना बर्‍याच वेळा धक्का लागतो आणि काही वेळा त्याचे रूपांतर भांडणात झाले असलेले मी पाहिले होते.
त्यामुळे मला त्यांना पाहिल्यावर त्यांची भीती वाटली.

त्या नावाचा उच्चार..

त्या नावाचा अमेरिकन उच्चार रोऽड्‌ असावा, आणि मराठी उच्चार र्‍होड. यातला र्‍हो-र्‍होडेशियातला.--वाचक्‍नवी

र्‍होड

आमच्या टंकलेखनाच्या चुकीमुळे "र्होड" लिहीण्यात आले. " र्‍होड" हा शब्द बरोबर वाटतो. पुढच्या लेखात " र्‍होड" असे टंकवेल.

र्होड/र्‍होड

या दोन्हींचाही उच्चार एकच असावा असे वाटते. त्यामुळे दोन्हीही शब्द योग्य असावेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

प्रियाली यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

लेख, माहिती आणि चित्रे आवडली.

वर्णनात्मक शब्द म्हणून कुत्सित शब्द वापरणे टाळावे.

माहितीपूर्ण

लेख माहितीपूर्ण वाटला. चित्रेही छान. येऊ द्या आणखी लेख.

अवांतरः कल्लु वगैरे उल्लेख फारसे रुचणारे नाहीत या मताशी मी सहमत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कल्लु म्हणजे?

कल्लू म्हणजे उल्‍लू? उडाणटप्पू? की आणखी काही? आम्हाला गुज्‍जू माहीत होते, पण हे कल्लू नवीनच ऐकले.--वाचक्‍नवी

म्हणजे...

...भारतीय उपखंडातील उगम असलेल्या अमेरिकेतील रहिवाश्यांच्या शब्दसंपदेमधील आफ्रिकन वंशाच्या (विशेषतः अमेरिकेतील) कृष्णवर्णीयांबद्दल असलेला एक अत्यंत अपमानकारक आणि वर्णविद्वेषी उगम असलेला एक शब्द.

अमेरिकेतील इतर वर्णीयांच्याबद्दलही असे शब्द भारतीय उपखंडातील उगम असलेल्या अमेरिकेतील रहिवाश्यांच्या शब्दसंपदेत सापडतात. ते येथे किंवा इतरत्र मांडण्याची इच्छा नाही. ते उचितही होणार नाही.

धन्यवाद

माहितीबद्दल धन्यवाद. व्याख्या किती जटिल शब्दांत केलीत. मी अशी केली असती: अमेरिकेत राहणारे मूळ हिंदुस्थानी, अमेरिकन निग्रोंबद्दल वापरत असलेला कुत्सित शब्द. व्याख्या परिपूर्ण नसेल, पण काम चालून जाईल.-वाचक्‍नवी

आफ्रिकन अमेरिकन!

अमेरिकन निग्रोंबद्दल वापरत असलेला कुत्सित शब्द.

'नीग्रो' हा शब्द ('निग्रो' नव्हे! 'निग्रो' हा बहुधा खास भारतीय/मराठी उच्चार असावा असे वाटते.) काही काळापासून वर्णवाचक, अपमानास्पद आणि या कारणास्तव अशिष्टसंमत, तसेच सर्वसंमत अलिखित संकेताने वर्ज्य मानला जात असून, प्रचलित अमेरिकन बोली आणि लेखी भाषेतून हल्ली त्याचे कायद्याने नसले तरी संकेताने जवळपास संपूर्ण उच्चाटन झालेले आहे. त्याऐवजी 'आफ्रिकन अमेरिकन' हा शब्द वापरण्याचा सर्वसंमत प्रघात आहे.

'नीग्रो' हा शब्द आजकाल जुन्या वाङ्मयाबाहेरील वापरात अपवादानेच आढळतो. सहसा जुन्या काळातील कृष्णवर्णीयांशी निगडित संस्थांच्या नावांत जेथे हा शब्द आढळतो, तेथे अशा संस्थांचा (अभ्यासपूर्ण लेखांत वगैरे) थेट नामोल्लेख करताना, किंवा अशा प्रकारे असा वापर जेथे अपरिहार्य आहे, केवळ अशाच ठिकाणी असा वापर प्रस्तुत काळात करण्यात येतो. अन्यथा या शब्दाचा वापर शक्य तितका टाळण्याकडे कल आहे.

'ब्लॅक' आणि 'कलर्ड' हे शब्द (वर्णात्मक अर्थाने) संकेताने वर्ज्य मानले जात नसले (विशेषतः 'ब्लॅक'च्या बाबतीत), आणि 'ब्लॅक' हा शब्द अपमानास्पद मानला जात नसला, आणि दोन्ही शब्द अमेरिकन बोली आणि लेखी वापरात काही अंशी प्रचलित असले, तरी शक्य तोवर त्यांऐवजी 'आफ्रिकन अमेरिकन'सारखे पर्यायी शब्द वापरण्याकडे सामान्य आधुनिक कल आहे.

(बरेचदा अमेरिकेला भेट देण्यास येणारे जुन्या पिढीतले भारतीय अनवधानाने 'नीग्रो' हा शब्द - क्वचित्प्रसंगी स्थानिक अमेरिकनांशी बोलतानासुद्धा - वापरतात असे आढळते. असा वापर हा अज्ञानमूलक आणि अनवधानाने होणारा असला, त्यामागे कोणतीही गैर भावना नसली आणि बोलणार्‍याचा वयोगट आणि त्याहीपेक्षा पिढी लक्षात घेऊन ऐकणारांकडूनसुद्धा सहसा त्याकडे दुर्लक्ष केले जात असले, तरी या बाबतीत माहितीच्या प्रसाराची बरीच आवश्यकता आहे हे जाणवते.)

अवांतर: 'नीग्रो' या शब्दाचे मूळ लक्षात घेता (स्पॅनिश 'नेग्रो' negro = 'काळा', 'एक रंग' अशा अर्थी.) 'नीग्रो' आणि 'ब्लॅक' यांच्यात अर्थाअर्थी फारसा फरक नाही. मात्र इंग्रजीत 'नीग्रो' हा शब्द केवळ एका वर्णगटाचा सरसकट (आणि अनेकदा परंपरेने हेटाळणीपूर्वक) उल्लेख करण्यासाठी वापरण्यात येत असल्यामुळे काही काळापासून अपमानास्पद आणि आक्षेपार्ह मानला जाऊ लागला आहे (जे समजण्यासारखे आहे), असे वाटते.

छान

छान् लिहीले आहेस्

- गौरी

छान..

लेख छान झाला आहे पण आम्हाला कॅमॅर्‍याविषयीही माहिती मिळाली तर अजून चांगले....

-सौरभ.

==================

कॅमॅर्‍याविषयी माहिती

कॅमॅर्‍याविषयी माहिती : सोनी साबरशॉट - ७ मेगा पिक्सल.

वॉशिंग्टन डीसी सर्वात छोटे राज्य

र्होवड आयलंड ( Rhode Island ), हे उत्तर अमेरीकेतल सगळ्यात छोटं राज्य.
सर्वात छोटे राज्य डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया अर्थात वॉशिंग्टन डीसी. जालावर कुठेही ही माहिती मिळेल. क्रमांक दोनचे छोटे राज्य र्‍होड आयलंड.

चित्रे आवडली.

कीस: डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हे "राज्य" नव्हे.

डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हे अमेरिकन घटनेनुसार व एरवीसुद्धा अमेरिकन राज्यांमध्ये गणले जात नाही. तो केवळ एक 'फेडरल डिस्ट्रिक्ट' (संघराज्यीय प्रदेश?) परंतु अमेरिकेच्या घटकराज्यांपेक्षा वेगळा गणला जातो.

अमेरिकन घटनेनुसार अमेरिकन संसदेच्या (काँग्रेस) उच्च सभागृहात (सेनेटमध्ये) प्रत्येक राज्यास प्रत्येकी दोन प्रतिनिधींद्वारे (सेनेटर्स) प्रतिनिधित्व असते. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियास अमेरिकन सेनेटमध्ये प्रतिनिधित्व नाही.

अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (हाउस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्ज़मध्ये) डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियास प्रतिनिधित्व असले तरी ते इतर राज्यांच्या तोडीचे नाही. त्या प्रतिनिधीस त्या सभागृहात सामान्य मताधिकार नाही - केवळ ज्याज्या संसदीय समित्यांवर अशा सदस्याची नेमणूक झालेली आहे त्यात्या समित्यांपुरता त्याला मताधिकार आहे - असे कळते.

अमेरिकन संसदेमध्ये अशा प्रकारचे (म्हणजे उच्च सभागृहात मुळीच नाही, तर कनिष्ठ सभागृहात मर्यादित मताधिकार असलेले) प्रतिनिधित्व हे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया वगळता केवळ अमेरिकन संयुक्त संस्थानांचा भाग नसलेल्या परंतु अमेरिकेचे अधिपत्य असलेल्या / 'अमेरिकन भूमी'चा दर्जा असलेल्या अनेक प्रदेशांना (उदा. प्वेर्तो रिको, यू. एस. वर्जिन आयलंड्ज़ इ.) आहे.

अध्यक्षीय निवडणुकांच्या बाबतीतसुद्धा डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाची परिस्थिती ही १९६१मध्ये २३वी घटनादुरुस्ती होईपर्यंत अमेरिकन संयुक्त संस्थानांचा भाग नसलेल्या परंतु अमेरिकेचे अधिपत्य असलेल्या / 'अमेरिकन भूमी'चा दर्जा असलेल्या अनेक प्रदेशांप्रमाणेच होती, असे कळते. तेथील रहिवाशांना अध्यक्षीय निवडणुकीत मताधिकार नसे. २३व्या घटनादुरुस्तीने डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या रहिवाशांना हा मताधिकार देण्यात आला. (मात्र अमेरिकन संयुक्त संस्थानांचा भाग नसलेल्या परंतु 'अमेरिकन भूमी'चा दर्जा असलेल्या भूप्रदेशांना अध्यक्षीय निवडणुकीत मताधिकार अजूनही नाही.)

अधिक माहिती येथे आणि येथे.

अवांतर: प्वेर्तो रिको या प्रदेशास "अमेरिकन भूमी"चा आणि तेथील रहिवाशांस "अमेरिकन नागरिकां"चा दर्जा अमेरिकन घटनेनुसार असला तरी या "अमेरिकन नागरिकां"स अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांत मताधिकार नाही. मात्र याचा संबंध नागरिकत्वाच्या दर्जाशी नसून रहिवासाच्या स्थानाशी आहे. प्वेर्तो रिकोचे रहिवासी अमेरिकन संयुक्त संस्थानांत स्थलांतरित होऊन त्यांनी तेथे कायम रहिवास पत्करल्यास त्यांना अध्यक्षीय निवडणु़कीत मताधिकार आपोआप (म्हणजे केवळ स्थानिक मतदारयादीत नाव नोंदवून) प्राप्त होतो; उलटपक्षी संयुक्त संस्थानांचे रहिवासी असलेले अमेरिकन नागरिक प्वेर्तो रिकोमध्ये स्थलांतरित झाल्यास त्यांचा अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीतील मताधिकार (दूरस्थ मतदानानेसुद्धा) ते प्वेर्तोरिकोचे रहिवासी असेपर्यंत आपोआप लुप्त होतो, असे कळते. (स्रोत: विकी; संदर्भ याक्षणी नाही, परंतु शोधून काढता यावा.)

 
^ वर