हेमाडपंती देवळे
हेमाडपंती देवळे
श्री. घारे यांनी विचारल्यावरून हेमाडपंती देवळांची माहिती थोडक्यात देत आहे.
हेमाद्री वा हेमाडपंत हा देवगिरीकर यादवांच्या काळात ( १३ वे शतक) एक वरिष्ट अधिकारी होता. ह्या प्रकांड पंडिताच्या नावावर अनेक धार्मिक ग्रंथ आहेत. एका विशिष्ट घाटाच्या मंदिरांना हेमाडपंती म्हणावयाची पद्धत आहे. यात बांधणीकरिता चुन्याचा वापर केला जात नाही.ठराविक पद्धतीने दगडावर दगड ठेवून किंवा दगडांना खाचा घेवून हे बांधकाम केले जाते. या पद्धतीत
पायाची आखणी ज्या आकाराची असेल, नेमकी त्याच आकाराची लहान आकृती शिखरावरील आमलकाची बैठक असते. पायाची आखणी अनेक कोनबद्ध असते. शिखराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर पद्धतीने बसवल्यामुळॆ लहान लहान शिखरे रचून मोठे शिखर तयार केले असे वाटते.ही शिखरे जागच्या जागी रहावीत म्हणून उपयोगात
आणलेल्या दगडांवर नक्षीकाम करून उठाव आणतात.शिखरांमध्ये अनेक प्रकार असून अश्वथर, गजथर इत्यादी प्रकार प्रामुख्याने वापरतात. ही शिल्पपद्धती हेमाडपंताच्या नावाने प्रसिद्ध असली तरी अशा प्रकारची देवळे त्याच्या काळाच्या आधीपासून आढळतात.
निलंगे व नारायणपूर येथी या प्रकारची देवळे आहेत.
शरद
Comments
थोडक्यात मस्त
थोडक्यात मस्त माहिती मिळाली.
धन्यवाद!
ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्याच्या त्या प्राथमिक चुका
हेमाडपंत
खूप दिवसांपासून हे हेमाडपंत कोण असे कुतुहुल होते.
छान माहिती
चन्द्रशेखर
थोडक्यात आणि छान
उपक्रमींकडे या शैलीतल्या मंदिरांची चित्रे असतील तर येथे पाहायला आवडतील.
हेमाडपंती मंदिरांवर विस्तृत लेख
येथे वाचता येईल.
लेखात चित्रांचा समावेशही आहे. अधिक चित्रे ध्रुवकडे उपलब्ध आहेत.
धन्यवाद
माझ्या प्रश्नाचा एवढा मान राखून लगेच हेमाडपंथी देवळांची सविस्तर माहिती पुरवल्याबद्दल मी आपला आभारी आहे.
मूळ प्रश्न
आपल्या लेखात हेमाडपंती देवळांबद्दल आणि हेमाडपंत या व्यक्तीबद्दल महत्वाची माहिती मिळाली. प्रियालीताईंच्या लेखात तर खूप विस्ताराने आणि सचित्र माहिती वाचायला मिळाली. त्यांचेही आभार. माझ्या मनात निर्माण झालेले कुतूहल मी या शब्दात विचारले होते.
हेमाडपंती हे नाव लहानपणापासून ऐकत आलो आहे. ती एकादी उपशैली आहे का?
सविस्तर लेख वाचून वास्तुशिल्पातली शैली आणि बांधण्याची पद्धत याबद्दलचा माझ्या मनातला गोंधळ काही संपला नाही. त्याबद्दल थोडासा खुलासा करावा अशी विनंती आहे.
शैली-उपशैली
शैली किंवा उपशैलीबद्दल अधिकारवाणीने बोलण्यासाठी मी या विषयातील तज्ज्ञ नाही. इतिहास आणि पौराणिक कथांची थोडीफार आवड असल्याने लेखाचा जन्म झाला होता. जितकी माहिती मिळवणे मला शक्य होते तेवढी मिळवून लेखात टाकली आहे. शैली का उपशैली या प्रश्नाचे ठोस आणि पुराव्यानिशी उत्तर सध्यातरी माझ्याकडे नाही. शरद यांच्याकडे खुलासा असल्यास मलाही वाचायला आवडेलच.
दोन्ही लेख आवडले
प्रियाली यांच्या लेखातून चित्रे बघितली. (त्यांचे वरील उत्तरही वाचले.)
शरद यांच्यासाठी माझाही प्रश्न आनंद घारे यांनी विचारलेलाच प्रश्न आहे. ही नागर शैलीची उपशैली आहे काय?
आता हे संगमेश्वराच्या देवळाचे प्रियाली यांच्या मनोगतावरील लेखातले चित्र (दुवा मनोगतावरचाच आहे, ते चित्र मी माझ्या संगणकावर उतरवून घेतलेले नाही)
याचे उभट बाकदार विमान, नटमंडप, आमलक वगैरे बघावेत.
संगमेश्वर मंदिर
धनंजयांनी येथे लावायचा प्रयत्न केलेले चित्र दिसत नाही असे वाटल्याने हे चित्र पुन्हा देत आहे.
चित्र सौजन्यः ध्रुव.
अंबरनाथचे शिवमंदीर
आणि हरिश्चंद्रगडावरील शिवमंदीर हे दोन्ही हेमाडपंथीच असावेत. चु.भू. द्या. घ्या.
--------------------------X--X-------------------------------
सिंह एकटाच प्रतिसाद देतो. डुकरे मात्र त्या प्रतिसादावर कळपाने टीका करतात.
शैली
शैली
हेमाद्रीचे नाव देवळे बांधावयाच्या पद्धतीवरून पडले आहे. त्यामुळे अशी देवळे नागर वा द्राविड या दोनही शैलीत बांधता येणे
शक्य आहे.आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्या काळाच्या आधीही अशी देवळे बांधत होतेच. त्याचे स्वत:चे वास्तव
देवगिरीला, महाराष्ट्रात असल्याने बरीच देवळे नागरी पद्धतीची आढळतात. विदर्भात, वर्हाडात, जयपुर-कोटली, अमदापूर,शिरपूर, मेहेकर,लोणार, धोत्रा, सातगाव (जि.बुलढाणा)येथील देवळे बर्यापैकी स्थितीत आहेत. आंध्र प्रदेशातील देवळे या पद्धतीची आहेत पण त्यांचा संबंध हेमाद्रीशी जोडणे अवघड आहे. आपण जेंव्हा वेरुळ-घृष्णेश्वर बघावयाला औरंगाबादला जाता तेंव्हा एक दिवस काढून लोणारला अवष्य जा. उल्का निर्मीत सरोवर, देवळे, सिंदखेडराजा वगैरे एका दिवसात बघून होते.
आज एका पुस्तकाचा परिचय करून द्यावयाचा आहे. श्री. के.आ.पाध्ये यांनी "हेमाद्रि उर्फ हेमाडपंत यांचे चरित्र" नावाचे एक पुस्तक
१९३१ साली प्रसिद्ध केले होते. वरदा प्रकाशनचे श्री.भावे यांनी २००८ ला त्याचे पुनर्मुद्रण करून एक महत्वाचे काम केले आहे.
नानाविध माहितीचा खजिनाच या पुस्तकात आढळतो.हेमाद्रीचे चरित्र,त्याचे ग्रंथरचना,यादव घराण्याचा इतिहास,मोडीलिपी,
महानुभाव वाङ्मय, हेमाडपंती देवळे,इत्यादी विविध भाग असून शिवाय ४ परिशिष्टेही आहेत. वाचनीय पुस्तक.
शरद