उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
कलेची पारख
आरागॉर्न
April 18, 2007 - 3:00 pm
आत्ताच बातमी वाचली की प्रसिद्ध व्हायोलिन वादक जोशा बेल न्यूयॉर्क मेट्रो स्टेशनवर ४५ मिनिटे व्हायोलिन वाजवत होते पण त्यांना कुणीही ओळखले नाही. ते १७१३मध्ये बनवलेले ३५ लाख रुपयांचे व्हायोलिन वाजवत होते. त्यांनी ४५ मिनिटात ३२ डॉलर कमावले!
जोशा बेल यांना ग्रॅमी पारितोषिक मिळाले आहे.
अधिक माहिती इथे.
राजेंद्र
दुवे:
Comments
दैव गती !
वाचून खुप वाईट वाटले. एवढ्या महान कलाकारावर अशी वेळ यावी यासारखे दुसरे दुर्दैव नाही. दखल घेतली न जाणे म्हणजे मरणच.
भाकरीचा चंद्र
हा प्रयोग कार्यालयीन गर्दीच्या वेळेत (रश अवर) केला गेल्याने असे झाले असावे. जर पोट भरलेले नसेल तर चंद्रदेखील भाकरीसारखा भासतो, तसेच काहीसे.
बरेचदा
वादक, गीतकार, संगीतकार यांचे चेहरे लक्षात येत नाहीत. पडद्यावर कॅमेरा ज्याच्यावर रोखलेला आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित होतं, तसेच मेट्रो स्टेशन वरच्या घाईत लोकांना लक्षातच आले नसेल.
असे करण्यात खरेतर त्या कलाकारांना मजा येत असावी की काय कळत नाही, म्हणजे इतक्या बिनदिक्कत सर्व लोकांत उभे राहून मोठ्या कलाकाराने कलाप्रदर्शन करणे साधी गोष्ट नाही.
खरे आहे
प्रियालि आपले म्हणणे खरे आहे. पण भारतात हि गोष्ट अशक्य आहे.
क्लासिकल
मला वाटते यामागे अजून एक कारण म्हणजे क्लासिकल संगीत तितके लोकप्रिय नाही हे असावे. काही वर्षांपूर्वी यू२ ह्या लोकप्रिय रॉक बँडने रस्त्यात कार्यक्रम केला होता, तेव्हा हळूहळू बरीच गर्दी जमली होती.
लेखाबद्दल
लेखाच्या दुव्याबद्दल आभार. लेख वाचला. लेखात आलेले महत्वाचे मुद्दे,
१. जवळून जाणारे मुख्यतः मध्यम श्रेणीतील अधिकारी वगैरे होते.
२. हा वॉशिंगटन पोस्टने केलेला प्रयोग होता, मूळ कल्पना बेलचीच होती.
३. याचा उद्देश 'संदर्भ, दृष्टीकोन व प्राधान्यक्रम व सामान्य जनतेची कलेची जाण पाहणे' असा काहीसा होता.
४. ओळखिच्या वा सुप्रसिद्ध चिजा टाळण्यात आल्या.
इथे माणसाची संगिताची/कलेची जाण/आवड ही बर्याचदा समाजाच्या एकूणमतप्रवाहात मिसळण्याची वा प्रवाहाविरुद्ध पोहोण्याची धडपड मात्र असते. या आवडीत मूळ संगिताला/कलेला फारसे महत्व नसते. अर्थात ही भरल्यापोटी फावल्या वेळेत करावयाची कामे, हे ही आलेच.
उदा. मला गालिब आवडतो, हिमेश आवडत नाही. लता आवडते, लता आवडत नाही असे म्हणणे. मला क्रिकेट न आवडता 'स्क्वॅश'च आवडणे. इत्यादी इत्यादी.
धन्यवाद
त्याच्या प्रतिदसादानंतर हे का केले याचे उत्तर मिळाले.
मनाची दारे
कलेचा, किंवा कशाचाही आस्वाद घेण्यासाठी माणूसाच्या मनाची दारे उघडी असावी लागतात. समजा मला आमरस फार आवडतो, रस्तावरून घाईत जाता जाता मला एका ठिकाणी व्यवस्थित पारदर्शक डब्यात ठेवलेला आमरस दिसला, त्याचा समजा वासही आला तरी मी तो खाण्यासाठी थांबेन का? तेच जर एखाद्या मेजवानीच्या ठिकाणी तश्याच पारदर्शक डब्यात आमरस असेल तर तो घेण्यासाठी रांगेत उभी राहीनच की नाही? तसेच हे. जोशा बेलचे व्हायोलिन ऐकायला म्हणून गेल्यावर त्यातल्या खाचाखोचा समजावून घेणे, वादनाचा आस्वाद घेणे स्वाभाविक आहे, तसेच रस्त्यातला व्हायोलिनवादक एव्हढा लक्ष देण्यासारखा नाही हे गृहित धरणेही स्वाभाविकच.
सहमत/असहमत
अर्धा सहमत आहे :)
कलेच्या आस्वादासाठी मनाची दारे उघदी असावी लागतात हे मान्य. पण शेवटचे वाक्य पटले नाही. जेव्हा मी जोशा बेलचे व्हायोलिन ऐकायला तिकीट काढून जातो, तेव्हा ते चांगले असणार हे जवळजवळ गृहीत असते, हे साहजिक आहे. पण रस्त्यावर वाजवणारा वादकही चांगला असू शकतो ही शक्यता मला मनात ठेवायला हवी. दुसर्या शब्दात सांगायचे तर फक्त नाव असले तरच कला चांगली असते असे मानणे चूक आहे. अर्थात ह्या प्रसंगी येणारेजाणारे लोक घाईत होते हे विसरून चालणार नाही. कदाचित हा प्रयोग शांत ठिकाणी करायला हवा होता.