छायाचित्र टिका..

बर्‍याच काळानंतर एक छायाचित्र आपल्या सर्वांच्या प्रतिसादासाठी देत आहे.....

तांत्रिक माहीती -
कॅमेरा - पॅनासोनिक डि. एम्. सी. एफ् झेड् २८
एफ् नंबर्- ३.६
आय् एस् ओ - १६०
एक्स्पोजर् - १/३० सेकंद
फोकल लेंग्थ् - १२२ मिमि (३५ मिमि इक्विवॅलंट्)

धन्यवाद !
-मित्र

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला प्रयत्न

उत्तम प्रयत्न.

पण स्टिल लाइफ मधील घटकांची रचना मला तितकी भावली नाही आहे. सफरचंदे-केळी वेगवेगळ्या प्रकारे हलवून चित्र काढायचा प्रयत्न केला आहे का?

लाल-पिवळा हे दोन प्राथमिक रंग म्हणून त्यांची जोडी चांगली दिसायला पाहिजे. या दृष्टीने तुमची फळांची निवड मान्य. पण सफरचंदांच्या तपकिरी लाल रंगाचा गडदपणा, आणि केळ्यांच्या पिवळ्याचा फिकटपणा माझ्या दृष्टीने योग्य संगत साधत नाही आहेत. :-(

(गडद लाल रंगाला गडद पिवळ्या रंगाची संगत, फिकटला फिकट रंगाची, असा अधिक समतोल साधता येतो.)

सारांश : उत्तम प्रयत्न. माझी टीका हवी तितकी सकारात्मक नाही, पण तुमची पुढील स्टिल-लाईफ चित्रे बघायला जरूर आवडतील.

असेच आणि टिका

उत्तम प्रयत्न. माझी टीका हवी तितकी सकारात्मक नाही, पण तुमची पुढील स्टिल-लाईफ चित्रे बघायला जरूर आवडतील.

हेच म्हणतो. टिका हे बाकी संकुचित, कूपमंडूक आणि कुचमलेले वाटते. त्याला थोडे "टीका"ऊ करा.
सन्जोप राव
संस्कृत शिका, संस्कृत लिहा!
http://spokensanskrit.de

छान!

स्टिल लाईफ फोटोग्राफीचा प्रयत्न छानच आहे. प्रकाश योजना मला आवडली. तुम्ही वापरलेली चादर/पार्श्वभुमी पूर्ण पांढरी असती तर अजूनच सुंदर 'हाय की' चित्र बनले असते.

स्टिललाईफ फोटोग्रफी ही घरात (इनडोअर) केली जाते. त्यामुळे जवळपास सर्व गोष्टी तुमच्या नियंत्रणात असतात. आणि म्हणूनच अशी अपेक्षा असते की चित्र 'परफेक्ट' यावे. उदा. तुमच्या चित्रात ठेवलेली सफरचंदे मस्त आहेत पण केळी तितकी छान नाहीत. सगळ्यात उजवीकडच्या केळ्यावर काळे डाग पडले आहेत जे सहज सुधारता आले असते.

परत

या लेखात आपापल्या मनोधारणेला सापेक्ष असेल ते दिसते असे काही बोलणे निघाले होते.. हे तुमचे चित्र आकारांच्या दृष्टीने एकसंध नाही, पण त्याने जो काही आकार तयार झाला आहे तो एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाप्रमाणे आहे असा भास झाला. पिल्लू (सफरचंदांच्या ठिकाणी डोके, कान, काळे नाक) आणि केळ्यांच्या ठिकाणी अंग असलेले ( पाय पोटाशी घेऊन झोपलेले) असे असल्यासारखा आकार वाटला. :)

(किंवा अवघड कवितांमधले अर्थ लावता लावता डोक्याची आज चंपी होऊन गेली आहे, त्याने डोक्यावर झालेला परिणाम याला कारण असेल !).

वा वा वा!

छायाचित्र छानच आले आहे. आवडले. असे प्रयोग करुन बघणार्‍यांचे कौतुक!
बिनडागाची केळी (बहुधा हायब्रीड) मिळाली तर त्यांनीही प्रयोग करुन बघा. चित्रातली देखील चालून जाण्यासारखी आहेत. सफरचंदे आणि केळी भारतीय आहेत का? तशी दिसत आहेत.
मात्र सगळ्यात डावीकडचे सफरचंद मात्र कसेतरीच वाटते. जरा अधिक लालबुंद हवे होते.
अशी चित्रे शटरस्टॉक किंवा आयस्टॉकफोटोवर चांगल्या किंमतीला विकली जाऊ शकतात. तिथली काही चित्रे जरुर बघावीत. तुम्हाला अजून सुधारणा करता येतील.

-सौरभ.

==================

धन्यवाद !

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
@धनंजय - तुमचे मत बरोबर आहे कारण केळ्यांचा रंग तितकासा गडद वाटत नाही.
@कोलबेर - स्टिललाईफ फोटोग्रफी ही घरात (इनडोअर) केली जाते. त्यामुळे जवळपास सर्व गोष्टी तुमच्या नियंत्रणात असतात. आणि म्हणूनच अशी अपेक्षा असते की चित्र 'परफेक्ट' यावे.
अगदी बरोबर पण मी फोटोशॉप वापरुन मूळ वस्तूंमधे सुधारणा करणे मुद्दामहून टाळले. परंतू वस्तूंची निवड ही अतिशय महत्वाची आहे. तुमच्या सूचना नक्कीच लक्षात ठेवेन.

@सौरभदा - सफरचंदे आणि केळी भारतीय आहेत का?
असतील कदाचित, पण इंग्लंड मधे विकत घेतलेली आहेत. तुम्ही दिलेल्या शटरस्टॉक किंवा आयस्टॉकफोटो या संकेतस्थळांच्या माहीतीबद्दल धन्यवाद! सुधारणा करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.

-मित्र

 
^ वर