नाडी ग्रंथांचा भांडाफोड

प्रेषक shashioak (सोम, 05/18/2009 - 07:41)

सारासार विचार, विवेक बुद्धी, तर्क, प्रयोग, सांख्यिकीय अंदाज व विश्लेषण, सामान्य ज्ञान (common sense) इत्यादींच्या सहाय्याने अशा चमत्कारांची भांडाफोड करणे सहज शक्य आहे.

जर वरील विचारांनी नाडी ग्रंथांचा भांडाफोड सहज शक्य असेल तर मग आपणाला थांबवले कोणी आहे ? कराना. आत्तापर्यंत जे नाडी ग्रंथांना नाकारतात त्यांनी तर्काच्या साधनाशिवाय काहीच सिद्ध केलेले नाही. अगदी कोवूरांपासून ते बी. प्रेमानंद या दाक्षिणात्य विचारकांनी देखील 'असे असावे वा असू शकते' असे वेळोवेळी तर्कयुक्त अंदाज वर्तवण्यापलिकडे शोध कार्य म्हणूवून घेण्यासारखे काही केलेले मला ज्ञात नाही. ज्यांना भांडाफोड करणे 'सहज शक्य' आहे त्यांनी नाडीपट्या मिळवून, त्यातील भाषेचा, अर्थाचा, ऐतिहासिकतेचा मागोवा घेऊन त्याची कार्बन १४ कसोटी करावी व आपले निष्कर्ष जरूर मांडावेत. या पुर्वी ज्यांनी नाडी ग्रंथांना फोल ठरवण्यासाठी जे प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नातील फोलपणा वा खोटेपणा दाखवून दिला गेल्याने त्या शोधकार्याला काहीच अर्थ नाही हे सिद्ध झाले आहे. या संदर्भात ‘Indian Skeptic’ by Sri Basav Premanand. यांनी व्यक्तकेलेल्या तर्कांवर एका नाडी ग्रंथ केंद्रचालकाने दिलेल्या स्पष्टीकरणांचा विचार व्हावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

नाडी ग्रंथांचा भांडाफोड

वरील विषयाशी संबंधित लिंक काही कारणाने उमटलेली नव्हती. त्या बद्दल क्षमस्व.<"http://groups.yahoo.com/group/naadiastrology/message/3690" title="नाडी ग्रंथांचा भांडाफोड करताना श्री. बी प्रेमानंदांची झालेली पंचाईत">

गरज

जेंव्हा कांही लोक स्वतःहून धूर्त लोकांकडून फसवून घ्यायला इतके उत्सुक असतात तेंव्हा इतरांनी तिकडे लक्ष देण्याची गरज नसते हेच कारण बहुधा कोणी तसा प्रयत्न न करण्याच्यामागे असावे असा माझा अंदाज आहे.

एक वाक्यप्रयोग

भोंदुंनी फसवावे आणि दुधखुळ्यांनी फसावे या वाक्यप्रयोगाची आठवण आली. नाडी ज्योतिष आणि फलज्योतिष या प्रकरणात याचा समाचार यापुर्वीच घेतला आहे.
प्रकाश घाटपांडे

वेळेचा अभाव

जर वरील विचारांनी नाडी ग्रंथांचा भांडाफोड सहज शक्य असेल तर मग आपणाला थांबवले कोणी आहे ?

करण्यासारख्या इतर अनेक रोचक, उत्पादक आणि चांगल्या कामांनी घेतलेल्या वेळाने मलातरी थांबवले आहे. कधी ना कधी या नाडी केंद्रात जाऊन किमान स्वतः आणि इतर काही समविचारी मित्र-मैत्रिणींपुरतीतरी भांडाफोड करायची / विश्वास ठेवण्याची इच्छा आहे, पण वेळ नाही.
प्रायॉरिटीजच्या यादीत नाडी-भविष्य अगदी तळात आहे.

ओकसाहेब, आपण अनेक ठिकाणी प्रा. नारळीकरांना आव्हान देण्याचा उल्लेख करता. त्यांनीही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे असं म्हणता, त्यांनीही असाच विचार केला नसेल, कशावरून? याचा काही उल्लेख त्यांच्या नाडीपट्टीत मिळू शकेल काय?

नाडी ग्रंथांचा भांडाफोड - वेळेचा अभाव व गरज

वेळेचा अभाव आणि गरज
ही वर नमूद केलेली कारणे वैयक्तिक असू शकतात. मात्र ती कारणे ज्यांचा या नाडी ग्रंथांच्याबद्दलच्या विचारांशी विरोध आहे अशा संस्थांना पुढे करता येत नाहीत. त्यांचे अस्तित्वच अशा विचारांचा प्रतिकार करण्यासाठी निर्माण झालेले असल्याने त्यांच्यासाठी ते वाक्य मुख्यतः आहे. अन्यथः प्रत्येकजण आपल्या खाजगी जीवनात नाडी ग्रंथ पहावे की नाही ते गरज, वेळ व पैसै याचा विचार करून ठरवतो त्यात नवीन ते काय?
मी शीर्ष कथनात दिलेली लिंकवाचून त्यावर कोणी आपले मत प्रकट करेल काय? त्यात बी.प्रेमानंदासारख्या प्रख्यात विचारकानी व्यक्त केलेल्या विधानांचा समाचार एका नाडी केंद्राच्या संचालकाने उत्तरे दिलेला असल्याने त्याचे महत्व वेगळे आहे.
संपादक मंडळ यास,
ती लिंक इंग्रजीत आहे. ती येथे डायरेक्ट देताना नाकारली जात आहे. त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन मिळेल काय?

 
^ वर