भारतातील मंदिरे-४

,एहोळॆ,बदामी आणि पट्टडकल

विजापुरपासून १२५-१५० किलोमीटर अंरावरची तीन गावे. एकमेकातील अंतरही ४०-५० कि.मि. गावे तशी लहानच म्हणावयास पाहिजेत. पण आता वर्ल्ड हेरिटेजमुळे जागतीक नकाशावर आलेली. बदामी (वातापी ) व एहोळी पूर्वी कर्नाटकच्या राजधान्या होती. पण नंतर हळुहळु मह्त्व कमी कमी होत गेले. ४० वर्षांपूर्वी तर उतरावयाची चांगली सोयही नव्हती.आता चांगली सोय आहे म्हणतात. चार पाच दिवसांचा वेळ काढून विजापुर-एहोळी-पट्टडकल-बदामी-विजयनगर अवष्य पहा. ही तीन गावे तशी शेजारी शेजारी असल्याने त्यांचा विचार एकत्रच केला पाहिजे. पहाण्यासारखे काय आहे? भरपूर आहे. हा, हळेबिडू,बेलूर, वेरुळ, कोणार्क, इत्यादी उत्तरकालीन मंदिरांसारखे विकसित शिल्प येथे नाही. परंतु ही देवळे विकसित कशी झाली हे मात्र इथेच पहावयास मिळेल.

देवळॆ हळूहळू विकसित झाली. प्रथम इमारत लहान होती, १०-१५ मि.वर्ग. पण जेंव्हा देऊळ मोठे करावयाचे ठरवले तेंव्हा दोन पर्याय उपलब्ध झाले. (१) लांबी-रुंदी वाढवणे किंवा (२) उंची वाढवणॆ. या विस्तारित वास्तूमध्ये खिडक्या, खांब, जाळ्या, रुपके, मूर्ति, कोठे व कशा वापरावयाच्या, छप्पर कसे करावयाचे या सर्व गोष्टींचा विचार सुरू झाला. निरनिराळ्या जुळणीं (COMBINATIONS) प्रमाणे निरनिराळ्या शैलींचा (नागरी-द्राविड)/ उपशैलींचा(चंदेल-मालव-परमार-होयसाळ) उगम झाला.पण या सर्वांची सुरवात तर कुठेतरी व्हावयाला पाहिजे ना. एक विचारसरणी अशी की ही सुरवात एहोळे-पट्टडकल येथे झाली. तेथील एक जण म्हणाला " मी ऊर्ध्व ( vertical) गमनी पद्धत वापरणार." त्याने एक-दोन देवळॆ बांधली. त्यातून नागर शैली विकास पावली. दुसरा म्हणाला " मला ऐसपैस, लांब-रुंद देउळ पाहिजे, भले छप्पर सपाट, गजपृष्ट राहीना का" (Horizontal). त्यानेही तसा प्रयत्न केला. त्यातून द्राविड शैली विकास पावली. नागर व द्रविड दोनही शैलींची मंदिरे तुम्हाला येथे पहावयास मिळतील. वेरुळचे कैलास लेणे कशावरून "बेतले" ? येथे विरुपाक्ष मंदिर पहा. दुर्गा मंदिर पहा, पापनाथ पहा, लाडखान पहा, सर्व हिंदुस्तानातील देवळांची सुरवात पहावयास मिळेल. The Big Bang starts here. एहोळे येथे तर हा विकासाचा उपक्रम काही शतके चालू होता. सुरवात करतांना बुद्ध कलेचा उपयोग केला गेला पण हळूहळू स्वतंत्र शैली निर्माण झाल्या. काही पूर्णावस्थेतील, काही अर्धवट सोडलेली, काही गिरिशिल्पे असे सर्व काही तुम्हाला येथे पहावयास मिळेल. श्री.
धनंजय यांनी दुर्गा मेंदिराची उत्तम छायाचित्रे दिली असल्याने व या लेखाच्या संदर्भात आणखीही काही मिळण्याची शक्यता असल्याने आज ह्या देवळाचा विचार करू.

देवळाचा पदविन्यास देत आहे. त्यावरून माहिती वाचणे व छायाचित्रे पहाणे सोपे जाईल.
durga mandir

देऊळ मुळात विष्णूचे किंवा सूर्याचे असावे. विधान "चाप " परंपरेतील आहे, म्हणजे बौद्ध मंदिरासारखे. मुख्य वास्तू १८ मी. लांब व ११ मी. रुंद असून भद्राची लांबी ७ मी. आहे. एकात एक तीन परिसर असून प्रत्येकाची उंची दुसऱ्यापेक्षा जास्त आहे. गाभारा चापाकार आहे.प्रदक्षिणा मार्ग व आठ खांब यांना वेढणाऱ्या भिंतीला जाळ्या आहेत.(फ़ोटोत दिसतात.) पीठ, उपपीठ व गाभाऱ्याचे लहानसे जोते(उप-उप-पीठ) अशी व्यवस्था. गाभाऱ्याचे छप्पर सर्वात उंच, दुसऱ्या परिसराचे कमी उंच बाहेरच्या परिसराचे त्याच्याही खाली. मूळ पीठच उंच असल्याने हे छप्पर जमिनी पासून २० फ़ूटापेक्षा जस्त उंच येते.गाभाऱ्यावरील शिखर पूर्णावस्थेत नाही पण ते चौकोनी असल्याने चापाकार गाभाऱ्यावर विपरीत (odd) वाटते.पीठ,उपपीठ सालंकृत आहेत. खांब प्रशस्त, चौकोनी व भक्कम आहेत. मुखमंडपावरील स्तंभांना जोडून मिथुन मूर्ती आहेत. स्तंभांना साजेसे तरंगहस्त असून तुलाभार प्रेक्षणीय आहेत. दरवाज्याला अनेक शाखांची चौकट असून दोनही बाजूसर्धास्तंभ्कपोताकार तुला आहे.गणेशपट्टीवरील ललाटबिंबावर गरुड. मूर्ती असून तीने पकडलेले नाग द्वारशाखेच्या पायथ्यापर्यंत पोचतात. नागर शैलीच्या या मंदिराचे वैशिष्ट्य़ म्हणजेचापाकार आकार, येथील इतर नगर शैलीच्या मंदिरात हा चौरस वा आयताकार दिसतो.

पट्टडकल येतील पापनाथ मंदिर हे नंतरच्या काळातील . या मंदिरावर तोपर्यंत रुजलेल्या द्राविड पद्धतीचा ठसा काही प्रमाणात दिसतो. म्हणजे संमिश्र पद्धतही हाताळून पाहिली गेली. गाभाऱ्याचा व विमानाचा भाग तसेच आतील सजावट नागरी पद्धतीची व समोरचा लांबलचक पट्टा द्राविड पद्धतीचा.

पापनाथ

बदामी येथील गिरिशिल्पाचे एक छायाचित्र देऊन आज थांबू. पुढील भागात गिरिशिल्पे.

बदामी

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

चालुक्य शैलीच्या

मंदिराचे स्थापत्य-शिल्पकलेच्या अंगाने वर्णन आवडले.

अवांतर :
याच वर्षी मी ही स्थाने पहिल्यांदा बघितली . पुणे बेंगळूर रस्त्यावर जाताना मुद्दामून वाकडी वाट काढून एका दिवसात ऐहोळे, पट्टदकल्लु, बादामी गावे केली - प्रत्येक ठिकाणी दोन तास! अगदी उडतउडत बघायची तरी प्रत्येक ठिकाणी अर्धा-एक दिवस घालवावा, अशी ठिकाणे आहेत. (अभ्यासच असला तर एक आठवडा काय आणि एक वर्ष काय - पण ती वेगळी गोष्ट.)
बादामीला एकदोन (बाहेरून) बरी हॉटेले दिसली, पण माझा मुक्काम होसपेटे इथे होता - त्यातल्या त्यात ऐहोळे पासून जवळ. तिथे बरीच हॉटेले आहेत. बादामीला जवळचे मोठे शहरगाव म्हणजे गदग. पण तिथल्या राहाण्याची सोय काय त्याबद्दल मला काहीच ठाऊक नाही.

दुर्ग (दुर्गा) मंदिर

हे मुळात मंदिर नसावे असे वाचले (धनंजय यांनीही असेच काही कळल्याचे म्हटले आहे). तरी यावर देवादिकांची चित्रे आढळतात याचे आश्चर्य वाटले. या मंदिराचा जालावरचा एकही फोटो समोरून काढलेला सापडला नाही - सगळे फोटो देवळाचा विशिष्ट आकार दाखवणारे मिळाले. गणेशपट्टी म्हणजे देवळाच्या दर्शनी भागातील पट्टी (ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे असे वाचले). काही फोटो सापडले. फोटो लावताना चूक होत असावी, त्यामुळे मला दिसत नसतील म्हणून नुसते दुवे देते आहे.

चालुक्यकालीन कला
अनेक फोटोंचा पिकासावरील एक दुवा.

तुलाभार म्हणजे काय ते नीट कळले नाही. या सर्व देवळांचा काळ काय असावा? इस. सातवे शतक? या काळापर्यंत विष्णू, गरूड, शंकर, शेषनाग, या सर्व देवता जनमानसात रूढ झाल्या असाव्यात असे वाटले. (मला यावरून बौद्ध देवतांबद्दलही काही प्रश्न आहेत, ते तुमचा त्यासंबंधी लेख आला की विचारीन).

(कदाचित अवांतर -
आलमपूर येथील काही सुरूवातीच्या चालुक्यकालीन शिल्पांचे फोटो जालावर सापडले. हा शेवटचा फोटो नुसते अंगठी घालणार्‍या दांपत्याचा आहे असे वर्णन आहे. पण ते पाहून एक शंका आली - हे दांपत्य शकुंतला दुष्यंत हे तर नसेल ना? मला पूर्वी वाटे की साखरपुड्याला अंगठी घालण्याची पद्धत अलिकडची म्हणजे पश्चिमेकडून उचललेली आहे. )

मंदिरच, पण दुर्गेचे नव्हे, असे मार्गदर्शक म्हणाला

थोडे स्पष्टीकरण - ते मंदिरच आहे, पण दुर्गेचे नव्हे, असे आमचा मार्गदर्शक म्हणाला. पूर्वी ते तटबंदीजवळ म्हणजे "दुर्ग"जवळ होते. त्यातली देवता कोण हे माहीत नसल्यामुळे त्याला ठिकाणावरून "दुर्ग"मंदिर म्हणतात.

ज्या कुठल्या देवतेचे देऊळ होते, त्या मूर्तीसाठी गर्भगृह वगैरे नेहमीप्रमाणे आहे, म्हणजे देऊळच आहे, याबाबत शंका नाही.

कन्नडामधला "दुर्गऽ" असा उच्चार अपरिचित असला तर "दुर्गा" असा ऐकू येतो, शिवाय इंग्रजीतले स्पेलिंग "Durga" असे वाचले, की आपल्याला देवीचेच नेहमीचे स्पेलिंग आठवते. म्हणून कित्येक पर्यटकांना ते "दुर्गा"मंदिर असल्याचा गैरसमज होतो - असा माझा कयास आहे.

परंतु बिनय गुप्त यांच्या "चालुक्य भव्यता" (The Chalukyan magnificence) लेखात असा संदर्भ सापडतो : "हे देऊळ नसून सभागृह असावे असे मानले जाते." म्हणजे लेखकाचे मत नव्हे तर लेखकाने ऐकलेले मत सांगितलेले आहे. त्यामुळे असे काही मानण्यासाठीसुद्धा जागा असावी. (त्या दुव्यावरील लेखात "दुर्ग" आणि "लाडखान" मंदिरांच्या चित्रांखालील मजकूर आलटले-पालटले आहेत, पण लेखातील उल्लेख मात्र यथायोग्य आहेत.)

तुम्ही नाही, तुमच्या मार्गदर्शकाने.

आणि तपशिलातल्या इतरही दुरूस्तीबद्दल आभार. इतर संदर्भ घाईत वाचल्याने आणि तुमचा प्रतिसादही परत न पाहता लिहील्याने गडबड झाली.
The name "Durga" refers to a fort, not to the goddess; apparently at one time the building was used as a military outpost (durg). It is not known to which deity the temple was originally dedicated.
संदर्भ -
http://www.art-and-archaeology.com/india/aihole/dur01.html

The name 'Durga' for the temple is misleading, since it was not dedicated to Durga, and is due to the fact that till the earlier part of the last century the temple formed part of a fortification (durga), probably of the Marathas.
(संदर्भ -http://asi.nic.in/asi_monu_tktd_karnataka_durga.asp)

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.वप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नये. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत

मौलिक माहिती

हा लेख थोडा कठीण/विस्कळीत वाटला.. आज तिसर्‍यांदा वाचल्यावर समजला. (कदाचित माझेच मुलभूत विषयांतील/संकल्पनांबाबतचे अज्ञान याला कारणीभूत असु शकते)
मात्र माहिती मौलिक आहे हे वादातीत. त्याबद्दल धन्यु!

एक काहिसा अवांतर प्रश्नः जर मंदीर, पुल, किल्ले अश्या संकल्पना देखील बाहेरून आल्या, तर खास भारतीय म्हणू शकु अशी स्थापत्यतील संकल्पना कोणती?

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

अवघड विषय

मान्य. जरा जास्तच "शास्त्र" आले. द्या सोडून. मंदिर, पूल, गड बाहेरून आलेले नाहीत. पूर्ण भारतीय. भानगड ही आपणही बाहेरून आलो.येतांना काही कल्पना आणल्या. भारतात रुजवल्या. आणि दळणवळण चालू होतेच हो. बाहेरच्या कल्पना वापरल्या जाणार. त्यात
आपल्या मिसळूनच नवीन कलाकृती निर्माण होणार.
शरद

 
^ वर