खिडक्यांची सजावट, झूबंटू वगैरे

लिनक्स प्रेमी मंडळींना कामाच्या ठिकाणी कधी कधी विंडोज वापरायला लागते. काही कडव्या युनिक्सभक्तांना मात्र विंडोजचे तोंडही बघणे असह्य वाटते. आता त्याच्यावर एक छोटासा पर्याय उपलब्ध आहे.

या
दुव्यावर २ उपयुक्त सॉफ्टवेअर्सची माहिती दिली आहे. पहिले म्हणजे थीम पॅचर आणि दुसरे म्हणजे प्रत्यक्ष थीम. या दोन गोष्टींचा उपयोग केल्यावर माझा विंडोज एक्सपी असलेला संगणक जवळ जवळ उबंटू सारखा दिसू लागला आहे.

desktop
desktop

चित्र दिसत नसल्यास इथे पहा.

इथे आणखी काही थीम्स उपलब्ध आहेत.

या थीम्स मुळे फक्त विंडोजचा रंग / कोपरे / बटणांवरील चित्रे बदलतात. पण वरच्या फोटोमध्ये फयरफॉक्सच्या मेन्यूमधील बटणेही बदललेली दिसतील. ती करामत आहे फायरफॉक्सच्या या थीम ची!

असो, हे झाले विंडोजच्या बाह्य सजावटीबद्दल. पण मूळ गाभ्याचे काय? त्यासाठी ए-टी अँड टी ने तयार केलेले यूविन हे सॉफ्टवेअर वापरून बघा. यावर तुम्हाला विंडोजमध्ये सगळ्या युनिक्स कमांड्स वापरता येतात. कॉर्न शेल मध्ये स्क्रिप्ट्सही लिहिता येतात. युनिक्स वाल्यांचा जुन्याकाळापासून लाडका असलेला "व्ही आय" एडिटरही यात असतो. "बॅच प्रोग्रॅम"च्या मर्यादा शेल स्क्रिप्टने दूर केल्या जातात.
सारांश, यूविन वापरल्याने विंडोज असतानाही युनिक्सची कमतरता जाणवत नाही.

तुम्हाला काहीही इन्स्टॉल न करता युनिक्स कमांड्स वापरायच्या असतील तर एक युक्ती आहे.
तुम्ही ls.bat नावाची फाईल तयार करा. त्यात dir ही डॉस कमांड लिहा. आणि ls.bat तुमच्या "पाथ" मधे ठेवा.
झाले - आता तुम्ही ls लिहिलेत की प्रत्यक्षात dir कमांड चालून अपेक्षित परिणाम साधला जाईल. - चेंज का चेंज - सेम का सेम (हा "डायलॉग" "खोसला का घोसला" मधून साभार)

"व्ही आय" सारखाच (म्हणजे शक्तिशाली पण वापरायला क्लिष्ट) असा दुसरा एडिटर म्हणजे "ईमॅक्स". याची विंडोजसाठी बनवलेली आवृत्ती इथून उतरवून घेता येईल.

असो, हे झाले विंडोजच्या सजावटीबद्दल. आता माहिती करून घेऊ उबंटूच्या एका स्वादाची (फ्लेवर चे न-भाषांतर आहे. तांत्रिक लेख लिहिताना असले प्रकार करावे लागतात. नाहीतर "मराठी वाचवा" मालिकेतल्या लेखात आमच्या या लेखाचा उल्लेख "हे लिखाण नक्की कुठल्या भाषेत आहे?" असा होईल)
या प्रणालीचे नाव आहे झूबंटू .(उच्चार विकिपीडियावरून साभार).
उबंटू जरी विंडोजपेक्षा जलद चालत असली तरी जुन्या काळच्या म्हणजे पेंटियम-३ सारखा प्रोसेसर असलेल्या संगणकावर ती मंद वाटू शकते.
शिवाय संगणक चालायला ६४० किलोबाईट्स पेक्षा जास्त मेमरी लागणार नाही असे एका थोर व्यक्तीने म्हटल्याचे अनेकांना आठवते. (खुद्द त्या व्यक्तीलाच ते आठवत नाही ही गोष्ट वेगळी !)
तर, अगदी ६४० किलोबाईट्स जरी नाही तरी ६४ मेगाबाईट्स मेमरीवर चालेल अशी झूबंटू ही प्रणाली आहे.

झूबंटू तुम्ही स्वतंत्रपणे इन्स्टॉल करू शकता किंवा उबंटूचे रूपांतर झूबंटूमध्ये करता येऊ शकते. कसे ते इथे वाचा.
ही प्रणाली उबंटूमधे असलेल्या जीनोम ऐवजी XFCE नावाचा दुसरा जलद विंडोज मॅनेजर वापरते. शिवाय उबंटूमधे असलेल्या अनावश्यक रंगरंगोटीला इथे संपूर्ण फाटा दिलेला आहे. (एका अतिप्रचलित लोकप्रिय पर्यायी वाक्प्रचाराचा मोह आम्ही कटाक्षाने टाळल्याचे चतुर वाचकांच्या लक्षात आले असेलच.)

आम्ही एका २२४ मेगाबाईट्स मेमरी / पेंटियम-३ प्रोसेसर असलेल्या एका जुन्या संगणकावर झूबंटू इन्स्टॉल केले आहे. आणि तो संगणक अतिशय व्यवस्थित चालतो आहे.

झूबंटू प्रमाणे के-उबंटू, edubuntu असे आणखी काही उबंटूचे उप-प्रकारही उपलब्ध आहेत. ते आम्ही वापरून पाहिले नसल्याने त्यांच्याबद्दल अधिक सांगू शकत नाही.

असो, काही नवीन सॉफ्टवेअर्सची ओळख करून द्यावी या उद्देशाने लेख लिहिण्याचा प्रपंच केला. आणखी काही सापडल्यास पुन्हा भेटू!

लेखनविषय: दुवे:

Comments

सुधारणा

वरील लेखात एका फोटोची लिंक देताना काही चूक झाल्याने लेख विचित्र दिसत आहे.
शिवाय, त्या चित्राच्या आधीची काही वाक्येही गायब झाली आहेत.
या दुव्यावरून २ उपयुक्त सॉफ्टवेअर्स उतरवून घेता येतील. ती म्हणजे "थीम पॅचर" आणि योग्य ती "थीम" (ढोबळमानाने - रंगसंगती). याचा उपयोग करून तुमच्या विंडोजचे रूपडे तुम्ही हवे तसे बदलू शकता. विंडोज एक्सपी असलेल्या आमच्या संगणकाचा पडदा आता जवळजवळ उबंटूसारखा दिसू लागला आहे. चित्र पहा

संपादक मंडळाने कृपया लेखात बदल करू देण्याची परवानगी द्यावी.

अमित

मस्त रे !

संपादक हो, लेख एकदा सरळ करा राव !
(प्रतिसाद लिहून दहा तास झाले तरी लेख तसाच ओबड-धाबड अवस्थेत पडून आहे, कमाल आहे )

-दिलीप बिरुटे

वा!

अमितराव
अतिशय सुंदर माहितीपूर्ण आणि संदर्भासहीत असलेला लेख.

बाकी अनेक वाक्प्रचारांना 'फाट्यावर मारले असते' तरी चालले असते यात शंका नाही. असो.
लेख मनापासून आवडला. संदर्भासहीत दिल्या बद्दल विशेष अभिनंदन!

तुम्हाला काहीही इन्स्टॉल न करता युनिक्स कमांड्स वापरायच्या असतील तर एक युक्ती आहे.
खल्लास युक्ती आहे.

संपादक लिनक्स विषयक सर्व लेख
(आधी आलेले अजानुचे, कोलबेराचे, शशांकरावांचे वगरे)
खिडक्यांना पर्याय या एकाच दोर्‍यात ओवतील काय?

किंवा गेलाबाजार 'हे ही पहा' अशी लिंक तरी द्या!

आपला
गुंडोपंत

झूबंटू

>>>आम्ही एका २२४ मेगाबाईट्स मेमरी / पेंटियम-३ प्रोसेसर असलेल्या एका जुन्या संगणकावर झूबंटू इन्स्टॉल केले आहे. आणि तो संगणक अतिशय व्यवस्थित चालतो आहे

झूबंटू चा मलाही आलेला अनुभव अगदी चांगला आहे. मी झूबंटू माझ्या १० वर्षे जुन्या संगणकावर ( पी-२ , ३५० मेहट्झ, २५६ मेबा र्‍याम ) ६-७ महिने वापरले.

गोंधळ

युविन हे वर्णनावरून तरी सेजविन सारखे युनिक्स इम्युलेटर आहे असे वाटते.
पण त्याचा उबंटुशी काय संबंध आहे हे नीटसे कळाले नाही.
असो. बाकी उबंटु झकास आहे त्यात काही वाद नाही...

यूविन

विंजिनेर,
यूविनचा उल्लेख "खिडक्यांची सजावट" (विंडोजचे युनिक्समधे प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष रूपांतर कसे करता येईल) यासाठी केला होता.
वरील लेखातल्या थीम पॅचर, फायरफॉक्स थीम, यूविन, झूबंटू यांचा एकमेकांशी काही संबंध नाही.

प्रतिक्रियेबद्दल आभार,
अमित

गंमत वाटली

विंडोजला उबुंटूचा मुखवटा चढवण्याची युक्ती मजेदार वाटली.

मी ऑफिसातला एक संगणक हल्लीच खर्‍याखरच्या उबुंटूवर चालवू लागलो आहे. हळूहळू "एकनिष्ठ" होऊ लागेन...

उपयुक्त माहिती

अमितराव, उपयुक्त माहिती. व्हिस्टावर हे चालतं का पाह्यलं पाहिजे. अनेक साध्या गोष्टी, उदा. फिक्स्ड किंवा स्टॅटीक आय.पी. टाकताना व्हिस्टा जाम ताप देत होतं.

अलिकडेच मी काही प्रयोग (किडे?) करण्यासाठी नवीनतम कुबुंटू (केडीई+उबुंटू) ९.०४ टाकलं. बाकी सर्व ठीक आहे, पण (इथेही तोच प्रकार!) फिक्स्ड किंवा स्टॅटीक आय.पी. टाकण्यासाठी कमांड लाईनच वापरावी लागते, 'नेटवर्क मॅनेजर'मधे काही बग आहे. लिनक्ससाठी नवख्या लोकांना तापदायक वाटू शकेल असा हा प्रकार आहे. बाकी केडीई ४.२ आहे, केडीई ३.* ची सवय् असणार्‍यांना ते आवडत नाही, पण केडीई ३.*चा लूक आणता येतो.

केडीई ४.३ वापरा

केडीई ४.३ हे त्यापूर्वीच्या वर्जनपेक्षा चांगले आहे. (मला सुटसुटीतपणामुळे जीनोम अधिक आवडते.) केडीईच्या अनुभव घेण्यासाठी कुबुंटू वापरु नका. मँड्रिवा किंवा ओपनसुसे उत्तम!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर