भारतातील मंदिरे
भारतातील मंदिरे
(भारतातील मंदिरांचा इतिहास,त्यांच्या उभारणीमधील वेगवेगळ्या शैली, त्यांतील उपशैली, निरनिराळ्या प्रांतातील देवळांत आढळणारे फ़रक, तसेच वैयक्तिक देवळातील वैशिष्टे, नेमके काय पहाण्यास विसरू नये यांची तोंडओळख करून देणारी लेखमाला. इथे आपणास काही पारिभाषिक शब्दांची सूचीही पहाता येईल. तीचा उपयोग आपणाला इतर तांत्रिक लेख वाचतानाही होईल. विषयाचा आवाका फ़ार मोठा असल्याने जास्त माहिती देणे शक्य नाही. दिग्दर्शन एवढाच माफ़क उद्देश.)
इतिहास.
आपण लहानपणी देवळात जातो. मोठेपणी जातोच असे नाही.पण देवळांबद्दलचे एक आकर्षण मनात घर करून रहातेच. ही भावना सर्व भारतीयांच्या मनात शेकडो वर्षे घर करून राहिली आहे.त्यामुळे क्षेत्रांमध्ये सोडाच पण पुण्यासारख्या शहरातही शेकडो देवळे आढळतात. हिंदू धर्मात अनेक देव असल्याने त्यात भर पडते. वर्षानुवर्षे कलाकारांनी अपार कष्ट करून जागतिक दर्जाच्या कलाकृती निर्माण केल्यामुळे देवळे भक्तांचीच नव्हे तर पर्यटकांचीही आकर्षणे ठरली आहेत. तर अशी ही देवळे बांधावयास सुरवात तरी केंव्हा झाली ?
किंवा असे विचारले की सर्वात पुरातन देऊळ पहावयाचे असेल तर ते कोणत्या शतकातील असेल ? माझी खात्री आहे बहुतेकांचा अंदाज चुकीचा असेल. बरेच जण सांगतील इ.स. पूर्वी किमान ४००-५०० वर्षे. या काळातील बौद्ध स्तुप, विहार,चैत्य आपल्या समोर आहेत. पण देऊळ म्हणाल तर आपल्याला इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पुढे यावे लागते. कारण अगदी साधे आहे.बुद्ध-जैन धर्मांच्या आधी धर्म होता तो "वैदीक धर्म".त्यात इंद्र, वरूण इत्यादी देवता होत्या, यज्ञ होता, पण या गोष्टी देवालय बांधावयाला सोयिस्कर नव्हत्या.
पुराणांनी जेव्हा शंकर, विष्णु असे "सगुण" देव "हिंदू" धर्माला दिले तेंव्हा देवळे बांधावयाची सोय झाली. पहिल्यांदा मूर्ती आली व नंतर तीचे घर.आधीच्या वाङ्मयात उल्लेख असले तरी दगड विटांची टिकावू देवळे उभारावयाची वेळ तिसऱ्या शतकातच आली. शंख-चक्र-गदा-पद्मधारी मूर्तीची पूजाअर्चा करावयाची तर गाभारा पाहिजे, चार लोकांना बसावयाला मंडप पाहिजे, प्रदक्षणा मार्ग पाहिजे. बस, सुरवातीच्या देवळात एवढीच सोय होती. मध्य प्रदेशातील तिगवा "कंकाली मंदिर" सर्वात जून्या देवळातील एक. गाभारा बाहेरून पावणेचार मि.लांब-रूंद, आतल्या बाजूने अडीच मि.चौरस.समोरचा मुखमंडप पावणेचार मि.लांब व पावणेदोन मि. रुंद आहे. चार स्तंभ, त्यावर पूर्ण कलश व सिंहाच्या मूर्ती. सपाट छप्पर.द्वाराभोवती गंगा- यमुनेच्या मूर्ती. पूजेला आवश्यक तेवढ्याच भागांचा समावेश. पण सुरवात जरी अशी साधी-सुधी असली तरी पुढील प्रगती भराभर झाली.याचे कारण परत अगदी साधे. बौद्ध-जैन स्थापत्यकलेमुळे कलाकार कलेत आणि तांत्रिक बाबतीत परिपूर्ण होते. काय करावयाचे सांगा. कसे करावयाचे आम्ही बघू. बुद्ध हवा? बुद्ध घ्या. शंकर हवा? शंकर घ्या; तितकाच सुंदर. काय बांधावयाचे, कसे बांधावयाचे ते ठरवण्यास एक दोन शतके लागली. हा काळ चाचपणीचा (trial and error) होता. निरनिराळ्य़ा शैलींचा उगम या काळातीलच.
सुरवातीलाच मी काही पारिभाषिक शब्दांची सूची देतो आहे. त्याची गरज भासेलच असे नाही. पण माहिती असेल तर नागर-द्रविड शैलींमधील बारकावे समजावून घेणे सोपे जाईल.
अर्धमंडप मंदिराच्या मुख्य मंडपाच्या समोरचा लहान आकाराचा, तीन बाजूंनी उघडा असलेला मंडप.
अर्धस्तंभ भिंतीत गुंतवल्यामुळे ज्यांचा अर्धाच भाग दृष्टीस पडतो असा खांब.
आमलक शिखराच्या माथ्यावर येणारे, रायआवळ्यासारख्या खाचा असलेले दगडी चक्र.
उत्क्षिप्त भिंतीचे पुढे सरकलेले ( फ़ेकलेले म्हणजे क्षिप्त ) काही भाग यांना रथ असेही म्हणतात.यांना विसंवादी, मागे सरकलेले, उठाव .देणारे भाग म्हणजे उत्क्षिप्त.
उद्गम . भिंतीवर सजावटीसाठी वापरण्यात येणारे त्रिकोणी रूपक .
अंतराळ देवळाचा गाभारा आणि मंडप यांच्या मधोमध येणारे दालन. आरंभी याच्यावर छप्पर नसे. उपपीठ मुख्य पीठाच्या (जोत्याच्या) वर येणारे, कमी उंचीचे जोते किंवा चौथरा.
कपोत सज्जा किंवा पागोळी .
कोष्ठ कोनाडा
गजपृष्ठ चापाकार वास्तूचे छप्पर.
जंधा देवालयाच्या भिंतीचा मधला भाग.हा सहसा सपाट असून यावर मूर्तिकाम केलेले आढळते.
तरंगहस्त bracket.
प्रणाल पन्हाळ.
पीठ जोते.
भद्र कोणत्याही इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर बांधण्यात येणारा उघडा मंडप.
भूमी मजला.
मंडप आयताकार दालन. विशेषत: गाभाऱ्य़ासमोरील.
रथ गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीवर असणारे उभे पट्टे. हे एकापुढे एक सरकतात. या रथांच्या संख्येवरून विधानाला त्रिरथ, पंचरथ अशी नावे देतात.
वितान छत.
विमान गाभारा व शिखर यांना मिळून दिलेले नाव.
वेदिका कठडा.
व्याल सिंह, वाघ, हत्ती अशा निरनिराळ्या प्राण्यांचे अवयव जोडून केलेला प्राणी.शरीर मुख्यत्वे सिंहाचे असते.
शाला आयताकार विधानाची इमारत.
शिखर छप्पर. यात कळसाचाही समावेश होतो.
शुकनास "अंतराळ" य़ा भागावर येणारे गोलाकर छप्पर. याच्या लहान बाजूंपैकी एक शिखराला चिकटलेली असते तर दुस्रीत कोनाडा करून देवमूर्ती बसवतात.
हस्त क्षिप्त भाग. Bracket
काही इन्ग्रजी शब्दही बघू.
Apsidal चापकार विधानाची वास्तू.
Arc कमान
Barrel vaulted roof गजपृष्टाकार छप्पर.
Brace कर्ण
Bracket हस्त
Capital स्तंबशीर्ष, मथळा
Ceiling छत, वितान
Column खांब
Facade गृहमुख
Frieze शिल्पपट्ट
Medallion तबक
Monolithic एकपाषाणी
Motif रूपक
Pilaster अर्धस्तंभ
Plan पदविन्यास,विधान
Recess प्रतिक्षेप
Relief उठाव
शरद
Comments
माहीतीपूर्ण
लेख आवडला. माहीतीपूर्ण आहे. पारिभाषिक शब्दांची सूची आवडली. पुढच्या लेखांबद्दल उत्सुकता. एक प्रश्न (जर पुढील लेखात आला तर उत्तम): बुद्धस्तुपांचा इसवीसनानंतरच्या देवळांशी लावलेला संबंध समजू शकतो. पण वेदांमधे मंदीर रचनेसंबंधी माहीती होती तसेच पातंजली (की पाणिनी? का इ.स.पुर्वीचे दोघेही?) यांनी पण त्यासंदर्भात लिहीले आहे असे ऐकल्याचे आठवते. नंतर शोधून माहीती मिळाल्यास येथे लिहीनच पण त्यासंबंधी माहीती असल्यास अवश्य लिहावी.
अतिशय माहितीपूर्ण
अतिशय माहितीपूर्ण
पुढील भागांच्या प्रतिक्षेत
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
वा!
अगदी जतन करावा असा हा लेख आहे. खूपच माहिती मिळाली. नेटवर मिळालेली चित्रे लावण्याचा प्रयत्न करते. (बरीचशी चित्रे सर्व्हे ऑफ इंडिया आणि शेवटचे युनिव्र्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया येथील डिजिटल लायब्ररीतून)
चुकले असल्यास कृपया सुधारणा सुचवाव्या.
अर्धमंडप
हे अर्धस्तंभ का?
रथ म्हणजे काय ते नक्की कळले नाही.
आमलक
मंडप
यातील वॉक-थ्रू मध्ये जो चौथरा आहे तो म्हणजे उपपीठ का?
यात स्तंभांचा वरील भाग - फ्लेअर / ब्रॅकेट .
यू. पेन. दुवा : ब्रॅकेट
सहमत आहे
लेख माहितीपूर्ण आहेच पण चित्रे असतीतर आणखी सुबोध झाला असता असे वाटत होते. चित्रा यांनी नेमके तेच केल्याने तीही अडचण दूर झाली.
मंदिरे
१. वाङ्मयीन उल्लेख
मी लेखातच म्हटले आहे की ३ ऱ्या शतकापूर्वीच्या वाङ्मयात देवळांचे उल्लेख मिळतात त्याअर्थी देवळे होतीच.पण ती बहुदा मातीची/लाकडांची असावीत. त्यामुळे
ती आज पहाता येत नाहीत. पूरातत्त्व जाणकारांच्या मताप्रमाणे ती सुरवातीला गोलाकार झोपड्यांसारखी असावित. (वर झावळ्या? ). टिकावू नसल्याने ती आज पहाता येत
नाहित.
२. अर्धमंडप/अर्धस्तंभ
अर्धमंडप हा आकाराने लहान (निम्मा) मंडपच. जमा झालेल्या माणसांना बसण्यास जागा पाहिजेच.मंडपाला भर (Suppliment) म्हणून अर्धमंडप. आजही देवळात
लग्ने लागतात. दक्षिणेत त्याला "कल्याणमंडप" म्हणतात.
अर्धस्तंभ हा हल्लीच्या भिंतीतील column प्रमाणे अर्धवट दिसणारा. तो मोकळा असेल तर पूर्ण दिसतो, भिंतीत गाडला गेला तर अर्धा.
३. रथ.
सपाट भिंतीपेक्षा मागेपुढे झालेली भिंत सुशोभित दिसते. यातील पुढे आलेल्या भागाला रथ म्हणतात. उभी पट्टी म्हणा ना. चित्रात रथ व आमलक दाखविले आहेत.
४. उपपीठ
पीठ ... जोते. उपपीठ ... दुय्यम जोते. जोत्यावरील उंचीने व आकाराने लहान असलेले जोते.
५. चित्रे.
चित्रे येणार आहेतच. पण तिगवा किंवा सांची येथील पहिल्या देवळांची चित्रे मिळाली नाहित. चित्राताई देणार आहेत, उत्तमच.
६. सूची.
सूची देतांना शब्दांपुढे जागा सोडली होती. चिकटवल्यानंतर ती नाहिशी झाली. मागे कबूल केल्याप्रमाणॆ माझे संगणकाबद्दलचे ज्ञान मोठे शून्य. सहाय्यकडे मदत मागितली आहे. तूर्तास क्षमस्व.
शरद
माहितीपूर्ण
लेखमाला होणार आहे.
पुढील लेख वाचायची उत्सूकता वाढलेली आहे.
सुरेख
लेख आवडला. पु.ले.शु. वेळ झाला की सविस्तर प्रतिसाद देईनच.
उत्तम लेख-माला + काही निरीक्षणे
या विषयावर चांगली लेखमाला हवीच होती. पहिल्याच लेखाने अपेक्षा पूर्ण होणार याची खात्री पटली. प्रकाशचित्रे, रेखाचित्रे दिल्यास उत्तम.
काही निरीक्षणे -
बुद्ध-जैन धर्मांच्या आधी धर्म होता तो "वैदीक धर्म". त्यात इंद्र, वरूण इत्यादी देवता होत्या, यज्ञ होता, पण या गोष्टी देवालय बांधावयाला सोयिस्कर नव्हत्या.
-मागे एका चर्चेत म्हटल्याप्रमाणे वैदिक धर्मियांची एक अंडाकार 'हिरण्यगर्भ' मूर्ती असे. पण तिची देवळे मात्र आढळत नाहीत.
महत्त्वाचे म्हणजे केरळमधील एका परंपरेनुसार मोठ्या प्रमाणावर (उत्सव स्वरुपात) यज्ञ केल्यावर तेथील वेदींसह मंडप (यागशाला) जाळून टाकण्याची प्रथा आहे. ही परंपरा वेदिक काळापासून चालत आल्याचे हे नम्बुद्री अग्नीहोत्री सांगतात. (हे सर्व एका दूरचित्रवाहिनीवर काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष पाहिले होते. जालावर बरेच शोधले तेव्हा हा संदर्भ मिळाला :) यज्ञपुच्छम विभागातील 'त्रेताग्नी' पहा.)
तसेच या नम्बुद्री यागशालेच्या निर्मितीची पूर्ण माहिती उपलब्ध आहे. ही सुद्धा एकप्रकारे स्थापत्यकलाच म्हणावी लागेल. ही वैदिक आर्यांची देवळे म्हणता येतील काय?
ही नम्बुद्री यज्ञप्रथा जर खरोखरच वैदिक काळापासून चालत आलेली असेल तर वैदिक हिंदूंची देवळे न सापडण्याचे कारण स्वच्छ आहे.
बौद्ध-जैन स्थापत्यकलेमुळे कलाकार कलेत आणि तांत्रिक बाबतीत परिपूर्ण होते. काय करावयाचे सांगा. कसे करावयाचे आम्ही बघू. बुद्ध हवा? बुद्ध घ्या. शंकर हवा? शंकर घ्या; तितकाच सुंदर. काय बांधावयाचे, कसे बांधावयाचे ते ठरवण्यास एक दोन शतके लागली. हा काळ चाचपणीचा (trial and error) होता.
-हिंदू देवळांची स्थापत्यकला विकसित होण्यास चाचपणीचा काळ एक-दोन शतकांचा होता हे विधान साधार असेलच. पण बौद्ध - जैन स्थापत्यकला विकसित होण्यास चाचपणीची (trial and error)किती शतके लागली असावीत?
आणि तिगवा मंदिराचे छायाचित्रः
बुद्ध धर्मीय वास्तूंचा देवळांवरील परिणाम
बुद्ध-जैन स्थापत्यकलेचा देवळांवरचा परिणाम
बुद्धाच्या निर्वाणानंतर लगेचच त्याच्या अवशेषावर (उदा. दात ) इमारत बांधावयास सुरवात झाली. तसेच विहार, चैत्य यांचीही उभारणी सुरू झाली. हा काळ सुमारे इ.स.पूर्व ४०० च्या आधी. बौद्ध धर्माचा ओसर इ.स. ३०० ते ४०० धरला तर जवळजवळ ७०० वर्षे ही बांधकामे चालू होती. या काळात चाचपणी होत असणारच.हिंदू देवळांची लाकडी किंवा कच्च्या विटांची बांधकामे आधीपासून चालू असली पाहिजेतच कारण वाङ्मयात तसे उल्लेख मिळतात. कबूल. पण दगडांची देवळे तिसऱ्या शतका नंतरचीच मिळतात. त्या काळच्या स्थपती समोर विहार, चैत होते आणि देवळे बांधताना तो त्यांचा उपयोग करणारच. आधाराबाबत म्हणाल तर बौद्ध कलेचा देवळांच्या बांधणी वरचा परिणाम यावर (थोडेसे) लिहीन. सुरवातीला म्हटल्याप्रमाणॆ विषयाचा आवाका मोठा असल्याने सगळ्याच गोष्टींबद्दल लिहणॆ अवघड आहे. क्षमस्व. तिगवा येथील देवळाचा फ़ोटो दिलात हे छान झाले. धन्यवाद. आता त्या देवळाबद्दल लिहताना माहिती देणे सोपे जाईल.
शरद
ओळखा पाहू
अंकोर वाट
असावे
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
असावे नाही, आहे.
स्थापत्त्य शास्त्राचा अप्रतिम नमुना असणारे आंकोर वटच आहे. :-)
हम्म्...
पण हा कृष्ण विष्णु क्षीरसागर लंका कुरुक्षेत्र वगेरे प्रकार काय?
तिथे कसा? ताई, जरा प्रकाश टाकाच. तुम्हाला कदचित आवडेल तसे करायला. (तुमची जुनी लिखाणं वाचुन असे वाटले)
(माफ करा, शंका जरा अवांतरच आहे. भारतातले नाही पण भारतीयत्वाची खुण सांगणारे चित्र वाटले म्हणुन विचारले.
अधिक अवांतरः थायलंड मधे अयुत्थ्या म्हणुन एक जागा आहे, पर्यटन स्थळ. तिथे राम नावाचा राजा, सीता नावाची राणी, शरयू नावाची नदी वगेरे होते/आहे. तिथेही खुप मंदिरे आहेत. प्रेक्षणीय! )
लेख
ते बास रिलिफ आहे. उठावदार कोरीवकाम.
ते पूर्वीच्या लेखातून केलेले आहेच. अधिक माहिती नेटावर मिळेल किंवा ग्रंथालयांतून.
एक प्रश्न - देवळांवरून
देवळांवर प्राणी, फुले पाने असे काही कोरलेले नेहमीच आढळते. पण कुठचीही अवजारे, शस्त्रे अशी देवळावर कोरलेली पाहिली आहेत का? तसेच प्राणी जसे हमखास दिसतात तसे पक्षी कोरलेले दिसतात का?