'स्वप्नसुंदरी' हजार किलोची...

रोजच्या जीवनात खून,मारामार्‍या,बलात्कार,खंडणी,दरोडे अशा आणि राजकारणाच्या बातम्या वाचून आपण वैतागलेले असाल तर ही एक मजेदार बातमी वाचा आणि खुष व्हा!महाराष्ट्र टाईम्स ह्या वृत्तपत्रात आलेली ही बातमी खाली वाचा.

' गोलू' चौदाशे किलोचा!
पंढरपूरकरांच्या भेटीला एक 'वजनदार' जोडी आली आहे. दोघेही वेगवेगळ्या प्रांतांचे, जातीचे. तो १४०० किलोचा आणि ती १००० किलोची. तो ५.७ फूट उंच, १४ फूट लांब; तर ती १० फूट लांब. त्याला रोज लागतो २० किलो चारा, ३ लिटर दूध आणि पाव किलो तूप; ती रोज खाते १२० किलो चारा आणि १५ किलो पेंड...

त्याचे नाव गोलू आणि तिचे नाव स्वप्नसुंदरी. रेडा आणि म्हशीच्या या जोडीला पाहण्यासाठी पंढरपुरातील 'केशरमाती' कृषी प्रदर्शनात झुंबड उडत आहे. 'मुऱ्हा' जातीचा गोलू रेड्याला आणलंय हरयाणातील पानिपत जिल्ह्यातील दीडवाडी येथील नरेंदसिंह यांनी. तर, 'स्वप्नसुंदरी'ला घेऊन आलेत सोलापुरातील नातेगोते येथील वीरेंद दावडा. त्यांनी ती १९९९ साली गुजरातमधील काठेवाडी जंगलातून आणली. रोज ती किमान ३० लिटर दूध देते. ही सगळी भक्कम मंडळी पंढरीतल्या प्रदर्शनात विशेष आकर्षणाचे केंदे ठरली आहेत!

साडेचार वर्षाचा गोलू दिसतो छोट्या हत्तीसारखा. सहा-सात माणसांनाही तो आवरत नाही. गोलूला त्याच्या राज्यात स्पर्धकच नाही. त्याने दोनदा 'ऑल इंडिया चॅम्पियनशिप' जिंकली आहे. गोलू मालकाला दर महिन्याला लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळवून देतो. म्हणूनच त्याला विकण्याची नरेंद यांची इच्छा नाही. प्रदर्शनात त्याला १० लाखाला मागणी आली होती. परंतु, नरेंद त्याला विकायला तयार नाहीत. गोलूचे सहा महिन्याचे रेडकू लालूही त्याच्यासारखेच 'वजनदार' आहे. त्याचे वजन ५५० किलो. लांबी १० फूट आणि उंची पाच फूट आहे.

मूळ बातमीचादुवा

Comments

मटा

मटा मधली बातमी जशी च्या तशी इथे पुनर्लिखित करण्यामागे काय् उद्देश होता?

माहितीची देवाणघेवाण!

माहितीची देवाणघेवाण! दुसरे काय?
खरं तर देवकाका तुम्ही असं लिहायला पाहिजे होतं.
हजार किलोंची स्वप्नसुंदरी.
अधिक माहितीसाठी इथे पहा. (इथे = म. टा. ची लिंक.) थोड्याच जागेत अधिक माहितीची देवाणघेवाण झाली असती.
या विषयी जास्तीची माहिती इथे वाचा.(इथे= माझी व्यक्तिरेखा)
---मी

सगळेजण मटा वाचत नसावेत...

म्हणून म्हटले ही बातमी इथे द्यावी. नुसताच दुवाही देता आला असता;पण तो कुठे देणार हे कळले नाही म्हणून बातमी जशीच्या तशी चिकटवली आणि दुवा देखिल दिला. काही चुकले असल्यास सांभाळुन घ्यावे ही विनंती.

हि कसली देवाण - घेवाण ?

अत्यानंद महाराज,
एखाद्या वर्तमान पत्रातली बातमी जशीच्या तशी लीहून कसली आलीय ' देवाण-घेवाण'?
बातमीवर काही मत दीले असतेत, मल्लीनाथी केली असतीत तर समजू शकतो. पण हे काय ?

 
^ वर