समाजस्वास्थ्य

समाजात काही उपक्रम चालु असतात. काही बंद पडतात काहींचे पुनरुज्जीवन होते. अशाच एका उपक्रमाची माहिती देत आहे. समाजस्वास्थ्य या नुकत्याच चालू झालेल्या ट्रस्टचा मी हितचिंतक आहे. माझे मित्र डॉ प्रदीप पाटील या समाजस्वास्थ्य द्वैमासिकाचे संपादक आहेत. काही सुचना असल्यास स्वागतार्ह आहेत. माझ्यापर्यंत पोहोचवल्यास मी त्या ट्रस्टला पोहोचवीन.

समाज स्वास्थ्य

मानव समुहात राहतो. समाज घडवतो. समाज टिकवतो. समाज टिकवताना तो अनेक प्रश्नांना तोंड देत जगतो. त्या त्या प्रश्नांची सोडवणुक करताना आचार- नीती नियम -संस्कृती उदयास येतात. व्यक्ती व्यक्तींमधील संबंध आणि व्यवहार यातुन राजकारण अर्थकारण समाजकारण घडत आहे.. या सर्व प्रश्नातुन वंश सातत्य ही टिकवण्यासाठी माणुस धडपडत असतो. वंशविस्तार आणि आपल्या कुळाचे अस्तित्व ही आदिम आणि मुलभुत अशी प्रेरणा माणुस बाळगतो.त्याचा पाया स्त्री पुरुष संबंधात असतो. स्त्री पुरुष संबंध आदिम काळात मुक्त होते. ते कधी स्त्रीसत्ताक होते तर कधी पुरुष सत्ताक; पण ते शोषण मुक्त होते असे म्हणणे अवघड आहे. स्त्री पुरुष संबंधांना कामजीवन असे म्हटले जाते. काम जीवन अति खाजगी व्यवहार असल्याने त्यात गुढता गोपनीयता आणि चमत्कारिकपणा प्रचंड वाढला. भारतीय संस्कृतीत ते वात्सायननाने तो भेदायचा प्रयत्न केला तरी अध्यात्मिक प्रवाहाने त्याचा पराभव केला. कामजीवन ही आनंद देणारी आणि जीवन समृद्ध करणारी गोष्ट आहे. कामजीवनाचा समाजावर व समाजाचा कामजीवनावर परिणाम होत आहे.हिंसाचार अत्याचार फसवणुक लूट शोषण हे सारे पैलु कामव्यवहारात दिसतात. पुरुष आणि स्त्री यांच्यात राजकारण आकारास येते. कामव्यवहार व समाज यांच्यात लपवाछपवी येते आणि त्यातुन अनेक गैरसमाजुती अंधश्रद्धा उदयास येतात. 'सेक्स' किंवा 'कामजीवन' याविषयी उघडपणे समाजात बोलणे 'पाप' समजले जाते.र.धो. कर्व्यांनी धाडस करुन समाजाला 'कामव्यवहार' सांगण्यासाठी समाजस्वास्थ्य मासिक काढले होते. पुढे ते थांबले. गोंधळलेल्या तरुणवर्गाला कामजीवनाविषयी योग्य मार्गदर्शन
नाही.विवाहितांना प्रौढांना ज्ञान नाही.अशी आजची कामजीवनाविषयीची परिस्थिती आहे. त्यासाठी महाराष्ट्रात एक स्वतंत्र व्यासपीठ उभे राहावे म्हणुन समाजस्वास्थ्य ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे.पुर्णत: कामजीवन विषयक सामाजिक प्रश्नांना वाहिलेले असे या ट्रस्ट च स्वरुप आहे. कामजीवन हे अनुवंशशास्त्र वैद्यकीय शास्त्र समाजशास्त्र मानसशास्त्र नीतीशास्त्र राजकारण उत्क्रांतीशास्त्र अशा अनेक विज्ञानांना स्पर्श करते. कामजीवनाचे या सर्व बाजू उलगडुन दाखवणे व कामजीवन निकोप राजकारणमुक्त आणि शोषण- अन्याय-हिंसाचारमुक्त करण्यासाठी चळवळ चालवणे हे ट्रस्ट चे प्रमुख उद्धिष्ट आहे.

आपले नम्र
डॊ.प्रदीप पाटील <> मनिषा सबनीस <> आशुतोष शिर्के

From समाज

द्वैमासिक
समाजस्वास्थ्य
कार्यालय: "चार्वाक" शिंदेमळा २६० / १-६, जुना कुपवाड रोड सांगली ४१६४१६
फोन / फॆक्स नं :- ०२३३-२६७२५१२
Email - samajswasthya@yahoo.in

आपण काय करु शकता?
*या कामात सहभागी होउ शकता
*समाजस्वास्थ्य ट्रस्टला देणगी देउ शकता
*समाजस्वास्थ्य चे उपक्रम आपण आयोजित करु शकता
*एखादे मदत केंद्र चालवु शकता
*समाजस्वास्थ्य म द्वैमासिकाचे वर्गणीदार होउ शकता मिळवु शकता आणि जाहिरात देउ शकता.

आपल्या काही समस्या आहेत?
मानवी नाते संबंध गुंतागुंतीचे असतात. अशा नात्यात स्त्री पुरुष पति पत्नीची मुख्य भुमिका बजावतात. तर पिता -कन्या, माता- पुत्र,बहिण्-भाउ अशा रितीने स्त्री पुरुषाची नाती असतातच. अशा नाते संबंधात अनेक समस्या निर्माण होतात. या वेगवेगळ्या समस्या अनेकविध कारणातुन उद्भवतात. त्यातुन अनेक प्रश्न निर्माण होतात.

या नात्यापैकी पती -पत्नी प्रियकर प्रेयसीच्या नात्यात कामविषयक प्रश्नांची भर पडते. अशा सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी समाजस्वास्थ्य हे व्यासपीठ आहे. आपण फक्त एवढेच करा. आपण टोपण नावाने अथवा ख-यानावाने आपले प्रश्न आम्हास पाठवा आम्ही त्याची उत्तरे देउ.
पत्ता - 'समाजस्वास्थ्य प्रश्न मंच' "चार्वाक" शिंदेमळा २६० / १-६, जुना कुपवाड रोड सांगली ४१६४१६
=================================================================================

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

अतिशय समाजोपयोगी उपक्रम आहे,
आवडला.

आताशा या वयात आम्हाला काही प्रश्न पडतच नाहीत.
पण जर कधी 'पडले' तर नक्की कळवेन.

असो,
फार वावगे नसेल असे समजून उपक्रम चांगला चालावा अश्या सदिच्छेने काही प्रश्न विचारू का?

१. या मासिकाचे वितरण/खप किती आहे?
२. पुढील पाच वर्षात खप वाढवण्याच्या काय योजना आहेत?
३. जाहिरातींसाठी काय नीती विषयक नियमावाली आहे?

आपला
गुंडोपंत

अजुन नवीन आहे

अद्याप नवीन असल्याने इतर धोरणात्मक बाबी फारशा ठरल्या नसाव्यात. अधिक माहिती विचारुन घेतो. आकार फाउंडेशन हा ही त्यांचा उपक्रम आहे. मित्रमंडळींना नमुना अंक भेट म्हणुन पाठवायचे असल्यास आपल्या मित्रमंडळींचा संपुर्ण पत्ता व ५ रु चे पोस्टाचे तिकीट कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवल्यास मोफत अंक पाठवला जाईल.
प्रकाश घाटपांडे

स्त्री पुरुष बदलते नाते संबंध

कालच कोथरुड येथील वसंत व्याखानमालेत डॊ प्रदीप पाटील यांचे स्त्री पुरुष बदलते नाते संबंध यावर व्याखान झाले. विशेषत: किशोर व तरुण वयीन संबंधावर अधिक फोकस होता.

 
^ वर