मराठी शाळेसाठी

नमस्कार मित्रांनो मी एक प्राथमिक शिक्षक आहे. व मराठी माध्यमाच्या मुलांसाठी एक संकेतस्थळ सुरु केले आहे. अर्थात हा माझा प्रयत्न आहे. आपल्याला मदत झाली तर आनंदच वाटेल.
http://sites.google.com/site/pearlsproject/

लेखनविषय: दुवे:

Comments

मराठी शाळेसाठी

फारच चांगला प्रयत्न. उपक्रम संकेतस्थळाला भेट देणारी मंडळी नक्कीच मदत करू शकतील.

शुभेच्छा!

वा! अभिनंदन

उत्तम सुरवात.
जर इच्छा असेल तर माझे हे लेख तिथे क्रमशः प्रसिद्ध करायला परवानगी देऊ शकतो.
अजूनहि काहि मदत लागेल तर कळवा.. जमेल तशी करेनच..

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

काहि फुकाच्या सुचना

स्थळ बघितलं .. कहि गोष्टी टाळता येतील / टाकता येतील
जसे अभारतीय चित्रे, संदर्भ देणे.. उदा. घर म्हणताना भारतीय घराचा, डबा बरोबर भारतातील डब्याचा, ओझेवाला निग्रो न दाखवता हमालाचा फोटो देणे
अधिक चांगला फाँट वापरणे ज्यामुळे मुलांवर चांगले वळण ठसेल
स्लाईडना आवाजाची पार्श्वभुमी देणे..
बालगीते विभाग
गोष्टी ... आवाज + दृष्य

थोडक्यात साईट आणि पुस्तकात जो फरक आहे तो ठसणे.... इंग्रजी न वापरता हे करता आले तर अधिक आनंद होईल

अर्थात ह्या फुकाच्या सुचना झाल्या.. स्वतः काहिहि न करता अश्या सुचना देणे सोपे असते.. तेव्हा त्या फार मनावर घेऊ नयेत .. पण झाले तर मुलांसठीच बरे म्हणून देत आहे.. :)

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

चांगला उपक्रम

मी तुमचे संकेतस्थळ पाहिले. ड्रुपलसारखी मुक्तप्रणाली वापरून तुम्हाला संकेतस्थळ अधिक सुलभ बनवता येईल का यावर येथे चर्चा करावी.

परदेशांत शालेय मुलांसाठी अनेक साईट्स असतात. त्यांचा तुम्हाला काही उपयोग होतो का पहावा. काही नमुने येथे देते -

http://www.funbrain.com/math/

http://www.harcourtschool.com/activity/thats_a_fact/english_K_3.html

http://www.learningplanet.com/sam/sm/index.asp

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.-> तर मग सर्व युआरएलचे मराठीकरण करावे लागेल. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.-> तर मग सर्व युआरएलचे मराठीकरण करावे लागेल.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.-> तर मग सर्व युआरएलचे मराठीकरण करावे लागेल.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.-> तर मग सर्व युआरएलचे मराठीकरण करावे लागेल.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.-> तर मग सर्व युआरएलचे मराठीकरण करावे लागेल.

ड्रुपालविषयी

माझ्यासाठी वेब डिझाईनिंग हे क्षेत्र अगदीच नवे आहे. ड्रुपालविषयी ऐकूण आहे शिकायला मिळाले तर आनंद होईल. आपण मार्गदर्शन करु शकाल ? अर्थात हे मला झेपेल की नाही कुणास ठावूक कारण मी प्रोग्रामिंगची कोणतीही भाषा शिकलेलो नाही. असो मार्गदर्शनाबददल धन्यवाद.

प्रकल्प

सहभागी होऊ इच्छिणार्‍या सदस्यांच्या मदतीने तुमच्या वेबसाईटसाठी प्रकल्प राबवता येऊ शकतो.






उपक्रम

उपक्रमाची निर्मिती ड्रुपलमधीलच आहे. इथे विषयातील अनेक तज्ज्ञ आहेत (माझ्याखेरीज :-) ). प्रोग्रॅमिंगची फार आवश्यकता नसावी असे वाटते.

साईट कॉन्फिगरेशनमध्ये अनेकजण सहज मदत करू शकतील.

अभिनंदन

येथील वेबडिझाईन जाणकारांच्या मदतीने तुमचे संकेतस्थळ अधिकाधिक सुबक होईल.

चांगले काम सुरू केल्याबद्दल अभिनंदन!

 
^ वर