सुळावर चढवणे

एक पौराणिक कथा वाचताना एक लहानसा प्रश्न मनात डोकावला.

कथा मांडव्य नावाच्या ऋषींची असून त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून सुळावर चढवण्यात आले. सुळावर ते बराच काळ यातना भोगत होते आणि नंतर राजाच्या लक्षात चूक आल्यावर त्यांना सुळावरून खाली उतरवण्यात आले. सुळाचा एक भाग त्यांच्या शरीरात राहीला आणि त्यांचे नाव अणिमांडव्य पडले. या आणि अशा अनेक घटनांवरून सुळावर चढवण्याची पद्धत भारतात रूढ असावी असे वाटते.

सूळ म्हणजे नेमके काय असा प्रश्न मनात आला. मला वाटते की सूळ म्हणजे लाकूड किंवा धातूचा भाला. जो गुन्हेगाराच्या पोटात भोसकून त्याला अन्नपाण्यावाचून अतीव वेदनांनी मरायला भाग पाडणे. पोटशूळ हा शब्द सूळ पोटात घुसवल्याने होणारी अतीव वेदना व्यक्त करतो असे वाटते. यालाच इंपेलमेंट असेही म्हटले जाते आणि जगाच्या अनेक भागांत ही शिक्षा अंमलात आणली जाई. व्लाद द्राकुल तिसरा किंवा काउंट ड्रॅक्युला हा अशा शिक्षा देण्यासाठी प्रसिद्ध होता असे इतिहासात सांगितले जाते. नमुन्यासाठी आणि अधिक माहितीसाठी येथे पहा.

आता काही प्रश्न -

१. सूळ या शब्दाचा सुळा (हत्ती, गेंड्याचा ;-)) या शब्दाशी संबंध वाटल्याने सूळ म्हणजविशिष्ट प्रकारचा भाला (स्टंप, स्टेक) असे वाटते. याच प्रमाणे भारतात क्रुसिफिकेशनसारख्या शिक्षा ही होत्या काय?

२. चिनी शिक्षा अतिशय क्रूर आणि भयंकर असत. माया आणि इंका संस्कृतीतील शिक्षा किंवा मानवी जीवनाशी खेळ ही बर्‍यापैकी क्रूर होते. ग्रीक आणि रोमन साम्राज्यातील ग्लॅडिएटरचे खेळही अतिशय क्रूर असत. याप्रमाणे भारतात अशा शिक्षा, खेळ इ. चालत का?

३. वधस्तंभ या शब्दातील स्तंभ नेमके काय दर्शवतो?

४. सुळावरची पोळी या वाक्प्रचाराचा अर्थ माहित आहेच पण तो कसा रूढ झाला असावा याबाबत काही माहिती आहे का?

लेखनविषय: दुवे:

Comments

सूळ

वर दिला आहे त्यापेक्षा जास्त स्पष्ट अर्थ कॅन्डीचा शब्दकोश देत नाही . कोशाच्या ८६७ व्या पानावर पहावे. सुळाचे चित्र पाहिल्याशिवाय नक्की समजणे कठीण. बिरबल-बादशहाच्या एका पुस्तकात सर्व जावयांना सुळावर चढवण्यासाठी तयार केलेल्या सुळांचे चित्र होते. त्यात ते सूळ खूप मोठ्या आकाराच्या क्रिकेटच्या स्टंपसारखे दाखवले होते, असे आठवते.--वाचक्‍नवी

मोल्जवर्थात पाहिले होतेच

मी मोल्जवर्थात अर्थ पाहिला होताच. तोही जे जगात इतरत्र सूळ वापरले जातात त्यांच्याशी साधर्म्य दाखवतो. सुळाचे चित्र वरील दुव्यावर पाहता यावे. ती चित्रे जशीच्या तशी उपक्रमावर लावावी की नाही याबाबत शंका वाटल्याने लावली नाहीत.

वधस्तंभातील स्तंभाबाबत माहिती आहे का?

गुगल

या विषयाबद्दल मला काहीच माहिती नाही. लेख वाचल्यावर गुगलून पाहिले तर तमिळनाडूमधील बुलफायटिंगसदृश खेळाबद्दल हा दुवा सापडला.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

जाल्लीकट्टू

जाल्लीकट्टू असाच उच्चार असेल तर नाव मस्त आहे.

स्पॅनिश बुलफायटींगपेक्षा थोडा वेगळा असल्याचे म्हटले आहे दुव्यात. याचे कारण गायी-बैलांना असणारे धार्मिक महत्त्व यामुळे असू शकेल. परंतु, अशा खेळात माणसाचा जीव जाण्याची शक्यता आहेच त्यामुळे हिंसक खेळ मानता यावा पण ग्लॅडिएटरच्या खेळाप्रमाणे क्रूर वाटला नाही.

कॅनबल होलकास्ट

या विवादास्पद चित्रपटात अशी सुळावरची शिक्षा पाहिल्याचे स्मरते.

भारतात कानात शिसे ओतणे वगैरे क्रूर शिक्षा होत्या असे वाचून आहे.नरकातल्या उकळत्यातेलाच्या कढया नजरेसमोर आल्या (हलकासा हिरण्यकश्यपूही आठवला). विषप्राशन करणारी मीरा आठवली. टकमक टोक आठवले.

याचाच अर्थ भारतीयांची कल्पकता तरी क्रूरतेत मागे नव्हती असे म्हणावययास वाव आहे.

कोंबड्यांची झुंज, हत्तींची साठमारी वगैरे झुंजीचे प्रकार होते. पण साठमारीसोबत वाघाशी झुंज वगैरे वर्णने अतिरंजित असावित.यातील किती खेळ/शिक्षा भारतीय व किती 'बाहेरून' अलेले/ल्या यावरही सुरस चर्चा होऊ शकेल.

नुकताच दूरदर्शनवर महाराष्ट्रात खास व फक्त मुलींसाठी होणारा बैलगाड्यांच्या शर्यतीचा प्रकार पाहण्यात आला होता जो थोडासा धक्कादायक होता. यातच यावरची बंदी उठवल्याचा की झुगारल्याचा उल्लेखही पुसटसा आठवतो.

अनारकली

भारतात कानात शिसे ओतणे वगैरे क्रूर शिक्षा होत्या असे वाचून आहे.नरकातल्या उकळत्यातेलाच्या कढया नजरेसमोर आल्या (हलकासा हिरण्यकश्यपूही आठवला). विषप्राशन करणारी मीरा आठवली. टकमक टोक आठवले.

भारतातील शिक्षा आणखीही आहेत. भिंतीत चिणून मारणे, हत्तीच्या पायी देणे, हात-पाय तोडणे, दुधात बुडवून मारणे [स्त्री-अर्भकाला] वगैरे.

सूळ हा शब्द अनेकदा वापरात येतो पण त्याला पूरक अशी चित्रे, लेखन इ. दिसत नाही म्हणून त्याविषयी जरा अधिक उत्सुकता होती.

* अनारकली ही आख्यायिका असू शकते याची पूर्ण कल्पना आहे परंतु भिंतीत चिणून मारणे ही शिक्षा केवळ आख्यायिका नसावी असे वाटते.

लेख उद्बोधक

सूळ या विषयावरचा लेख आवडला. कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये वेदनाछळाची अनेक उपकरणे पाहिली होती. त्यांची आठवण झाली.
लेखिका म्हणते त्याप्रमाणे 'सूळ' म्हणजे टोक केलेला लाकडी खांब असावा. तो शरिराच्या गुह्यद्वारात अथवा पोटात घुसवून अपराध्याला तडफडत ठेवले जात असावे. ही अतिशय निर्घृण शिक्षा आहे.

माझे दोन पैसे -
१.अ. सूळ या शब्दाचा सुळा (हत्ती, गेंड्याचा ;-)) या शब्दाशी संबंध वाटल्याने सूळ म्हणजविशिष्ट प्रकारचा भाला (स्टंप, स्टेक) असे वाटते.
-संस्कृतात शूल म्हणजे 'काटा' हे तर सर्वविदित आहेच.(शिवाय शिवाचे 'त्रिशूळ' आहे.)

२. चिनी शिक्षा अतिशय क्रूर आणि भयंकर असत. माया आणि इंका संस्कृतीतील शिक्षा किंवा मानवी जीवनाशी खेळ ही बर्‍यापैकी क्रूर होते. ग्रीक आणि रोमन साम्राज्यातील ग्लॅडिएटरचे खेळही अतिशय क्रूर असत. याप्रमाणे भारतात अशा शिक्षा, खेळ इ. चालत का?
-साठमारी हा कोल्हापुरातला सु/कुप्रसिद्ध खेळ काहीसा बुलफाईट पद्धतीचा. पण इथे माजलेल्या बैलाऐवजी माजलेला हत्ती वापरला जात असे. कोल्हापुरात अजूनही हे साठमारीचे मैदान अस्तित्वात आहे. यात चौतरफा जाडजूड भिंत (तटबंदी)असून तटबंदीत आणि मैदानात अनेक पोकळ बुरुज आहेत.तटबंदीवरच प्रेक्षकांच्या बैठकीची व्यवस्था आहे. (मद्य पाजून)पिसाळवलेल्या अथवा मदावर आलेल्या हत्तीला मैदानात भाल्याने भोसकून शरण आणण्याचा हा खेळ होता. हत्ती अंगावर आल्यास बुरुजात लपण्याची सोय होती. अर्थात यात काहीवेळा हत्ती अथवा व्यक्ती अथवा दोन्ही यांचे मरण ठरलेले असायचे.
हत्तीला जेरीस आणण्याची अनेक क्रूर हत्यारे 'न्यू पॅलेस' संग्रहालयात पहावयास मिळतात.
जि़ज्ञासूंनी न्यू पॅलेसला नक्की भेट द्यावी.

४. सुळावरची पोळी या वाक्प्रचाराचा अर्थ माहित आहेच पण तो कसा रूढ झाला असावा याबाबत काही माहिती आहे का?
-याचे 'कायच्या काय' उत्तर म्हणजे १८५७च्या 'स्वातंत्र्यसमरात' पोळीच्या रूपाने उठावाचा संदेश पसरवण्यात येत होता. ही पोळी स्विकारणे म्हणजे उठावात भाग घेण्याची शपथ घेण्यासारखे होते. पोळी हाती घेतली म्हणजे सूळ ठरलेला. म्हणून हा वाक्प्रचार अस्तित्वात आला असावा असा माझा आपला एक कयास. चुभूदेघे.

संतसाहित्यातून प्रचलित झालेला वाक्यप्रचार

>> पोळी हाती घेतली म्हणजे सूळ ठरलेला. म्हणून हा वाक्प्रचार अस्तित्वात आला असावा...
नाही. मराठीतील अनेक वाक्यप्रचार जसे प्रचलित झाले तसेच हाही संतसाहित्यातून प्रचलित झालेला वाक्यप्रचार आहे. हा दुवा पाहा.

http://tinyurl.com/sulawaril

सूळ

मी लहानपणी जे ऐकले होते त्यावरून माझी अशी कल्पना झाली होती की सूळ हा मलखांबासारखा आठ दहाफूट उंच पण खालून वर निमूळता होत गेलेला लाकडाचा खांब थोडा जमीनीत गाडून उभा केलेला असायचा. ज्या माणसाला सुळी चढवायचे असेल त्याचे दोन्ही पाय दोन बाजूंना सोडून त्याला त्यावर बसवून त्याचे दोन्ही पाय खाली ओढले जात. खालच्या बाजूने तो सूळ त्याच्या शरीरात घुसल्यानंतर तो असह्य अशा वेदनेने तडफडत असे, पण त्याचा जीव लगेच जात नसे. त्याला खाली उतरता येणेही शक्य नसे. अतीशय हाल हाल होऊन अखेर त्याचा जीव जात असे. हा सूळ सार्वजनिक जागी ठेवला असल्यामुळे ते दृष्य सर्वांना दिसावे व त्यामुळे त्याची धास्ती त्यांच्या मनात भरावी असा उद्देश असे. कांही दयाळू लोक त्या बिचार्‍याची भूक भागवण्यासाठी त्याला पोळी खाऊ घालीत. अशी ही 'सुळावरची पोळी' झाली.

अंधेर नगरी चौपट राजाच्या गोष्टीत एका निरपराध माणसाला सुळावर चढवण्यासाठी एक सूळ बनवला जातो, पण तो त्या कृश माणसाच्या आकाराच्या मानाने जाड बनवला गेल्यामुळे त्याच्या शरीरात घुसतच नाही म्हणून त्या सुळाच्या आकाराच्या जाड माणसाचा शोध सुरू होतो!

कालिकामूर्ती

गो ना दातार यांच्या कालिकामूर्ती या थरारक पुस्तकातही देवी काटेरी बाहूंनी मिठी मारुन शेवटी सुळासारखे घुसवून मारते असे वर्णन आहे.

वाचक्नवी यांनी लिहिल्याप्रमाणे बिरबल बादशहाच्या गोष्टीतील सुळांचे फोटो हीच माझीही कल्पना आहे.

वधस्तंभाबाबत (जीए व इतरांच्या पुस्तकांत वाचल्याप्रमाणे) माझी कल्पना अशी की या खांबाला बांधून जिवंत जाळणे किंवा फटके देऊन मारणे अशी शिक्षा देत असावेत. येशूचा क्रॉस हाही वधस्तंभाचाच/सुळाचा एक प्रकार असावा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सुळ,महाभारतातील

सुळ

हा एक वधस्तंभ. एक जाड भाला किंवा क्रिकेटची मोठी स्टंप असे म्हणावयास हरकत नाही. हा जमीनीत गाडून त्याचे पाते वर ठेवले जाई. ज्या गुन्हेगाराला शिक्षा द्यावयाची त्याला त्या खांबावर असे ठेवले जाई की गुदद्वारातून पाते शरिरात आत घुसेल. माणसाच्या वजनाने हे पाते हळुहळु पोटात घुसे. मरण तात्काळ येत नसून चार-पाच दिवस असह्य वेदना सहन कराव्या लागत, अन्न-पाणि मिळत नसल्याने तहानेने व वेदनेने जीव जाई. ही प्रथा बरीच जुनी दिसते,कारण महाभारतात त्याचा उल्लेख आहे.

मांडव्य नावाचे एक थोर ऋषि वनात, आपल्या आश्रमात, मौन व्रत धारण करून तपश्चऱ्या करत होते. काही चोर राजाचे धन चोरून यांच्या आश्रमात घुसून लपून बसले. राजाचे शिपाई पाठलाग करत मागून आले. त्यांनी ऋषींना विचारले पण मौन व्रतामुळे ऋषि काही बोलले नाहीत, शोध घेतल्यावर आश्रमात चोर व धन सापडले.चोरांबरोबर मांडव्यांनाही पकडून राजासमोर उभे केले.विचारपूस न करता राजाने सुळावर चढवण्याची शिक्षा दिली. खाणेपिणे काही नव्हते तरी मांडव्य ऋषि तसेच वेदपठन करत अनेक दिवस तपश्चर्या करत राहिले. राजाला कळाल्यावर , तो तेथे आला व क्षमा मागून त्याना सुळावरून खाली उतरवले. सुळ पोटातून काढावयाचा प्रयत्न केला पण तो निघेना . सुळ मुळाशी तोडला पण शूलाग्र पोटातच राहिले. ऋषि तसेच घोर तपश्चर्या करत. पुढे एक दिवस यमधर्माच्या सभेत जाऊन त्यांनी धर्मराजाला विचारले, " प्रभो, माझ्या हातून जाणूनबुजून काहीही अपराध झालेला नाही.नकळत झालेल्या कोणत्या दुष्कृत्याबद्दल माझी अशी अवहेलना झाली ? " यमधर्म म्हणाला " हे तपोधन ऋषे, लहानपणी, मौज म्हणून एका पक्षाला तुम्ही काडी टोचली होतीत, त्याचे हे फ़ळ." रागावून ऋषि म्हणाले " बारा वर्षांपेक्षा लहान असताना केलेल्या कृत्यांबद्दल मुलाला जबाबदार धरता येत नाही. यापुढे चौदा वर्षे वयानंतर केलेल्या दुष्कृत्यांबद्दलच शिक्षा व्हावी. हे यमधर्मा, शूद्र वर्णात तुझा जन्म होईल. " या शापामुळे यमधर्माला विदुराचा जन्म घ्यावा लागला.
शरद

बारा ते चौदा

बारा वर्षांपेक्षा लहान असताना केलेल्या कृत्यांबद्दल मुलाला जबाबदार धरता येत नाही. यापुढे चौदा वर्षे वयानंतर केलेल्या दुष्कृत्यांबद्दलच शिक्षा व्हावी. हे यमधर्मा, शूद्र वर्णात तुझा जन्म होईल. " या शापामुळे यमधर्माला विदुराचा जन्म घ्यावा लागला.

बारा वर्षांनंतर आणि चौदा वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यांचे काय ?

(एक गंमत म्हणून विचारले)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

न्यायसंस्था

बारा वर्षांनंतर आणि चौदा वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यांचे काय ?

कोर्टात केस दाखल करायची. निकालाच्या प्रतिक्षेत चौदा वर्शे निघुन जातात. बारा वर्षांनंतर हेच घडत.
प्रकाश घाटपांडे

ग्रेस पीरियड

माडव्याची माहिती अन्यत्र वाचली. त्या माहितीमध्ये हा बारा-चौदाचा घोळ तसाच आहे. याचा अर्थ बारा ते चौदा वर्षे ही वाढीव मुदत असावी. वयाच्या बारा वर्षाच्या आतल्या मुलाकडून घडलेल्या गुन्ह्यासाठी मुलाला जबाबदार धरता येणार नाही, परंतु शिक्षा देण्यासाठी प्रसंगी ही मुदत चौदा वर्षे वयापर्यंत विचारात घेता येत असावी.--वाचक्‍नवी

धन्यवाद

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद.

विसुनाना, आनंद घारे, शरद यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. ते येथे दिल्याबद्दल विशेष धन्यवाद.

पौराणिक कथा सोडल्यास आणि बादशहा-बिरबलाच्या गोष्टींतील तथ्यांश १००% पुरावा मानता येणार नाही असे धरले तर भारतीय इतिहासात सुळावर चढवण्याची शिक्षा दिल्याचे संदर्भ मिळतात का?

बारा-चौदा

बारा वर्षे हा काल मांडव्य ऋषींनी यमधर्माला जाब विचारण्या पूर्वीचा असावा. कारण त्यांनी असे म्हटले की, "असो. आजपासून
असा धर्मफ़लाचा उदयकारी नियम बांधून देतो कीं, चौदा वर्षेंपर्यंत घडलेल्या दुष्कृत्याबद्दल जीवास दंड असूं नय़ॆ, कारण , तें
त्याचे दुष्कृत्य अज्ञान्जन्य असल्याने पापकारी होत नाही, या वयाच्या पुढें झालेली दुष्कृत्ये पापकारी होतील. "
शरद

 
^ वर