ओबामा यांचे काँग्रेसला उद्देशून भाषण

नुकतेच ओबामा यांनी त्यांचे काँग्रेसला उद्देशून पहिले भाषण दिले. ते ऐकल्यावर ओबामा फक्त बोलत नाहीत त्यामागे तितकीच प्रभावी कृतीही असते हे जाणवले. मला अमेरिकेतील अंतर्गत राजकारणातची फारशी माहिती नाही तरीही काही उल्लेखनीय मुद्दे प्रकर्षाने जाणवले.

  • ग्वांटानामो बे बंद केला.
  • इराकमधील युद्ध संपणार अशी ग्वाही.
  • उगीच अमेरिका अंडर अटॅक अशी ओरड करून अवाच्या सवा डिफेन्स बजेट न काढता शिक्षण, पर्यायी उर्जा आणि हेल्थ केअर यावर लक्ष केंद्रित करणार.
  • लोकांच्या नोकर्‍या परत कशा मिळतील यावर भर.
  • पहिल्यांदाच बजेटमध्ये इराक युद्धाचा खर्च दाखवला जाईल.
  • ब्यांका आणि कंपनींचे सीइओ सरकारकडून घेतलेल्या मदतीसाठी पूर्णपणे जबाबदार राहतील.

आणखीही मुद्दे नक्कीच असतील. एकूणात अमेरिका योग्य मार्गावर आहे असे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

कृती ?

ग्वांटानामो बे बंद केला.

सध्या तरी फक्त हीच 'कृती' दीसते.

शब्दखेळ

हा शब्दखेळ वाटतो आहे. योग्य निर्णय घेणे ही सुद्धा कृती आहे. (जी आधीच्या प्रशासनाला कधीही जमली नाही.) योग्य निर्णय घेतले नाहीत तर काहीच करता येणे शक्य नाही. ओबामांचे भाषण लक्षपूर्वक ऐकल्यास त्यांनी बरेच महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत असे दिसते. उदा. इराक मुद्दा सोडून शिक्षण, पर्यायी उर्जा आणि हेल्थ केअर यावर लक्ष केंद्रित करणे हा निर्णयही एक महत्वपूर्ण कृती आहे असे वाटते.
----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

इराकमधील युद्ध

इराकमधील सैन्य परत बोलवण्याबाबत ओबामांचे वेळापत्रक तयार असल्याची बातमी ऐकली होती. सत्तेवर आल्यावर जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे कृती होत नसते. कृती करण्यासाठी वेळापत्रक आणि योजना तयार करणे यावर काम सुरू होत असेल तरीही तो त्या कृतीचाच पहिला टप्पा मानला जातो असे वाटते.

माझे निरीक्षण आणि आवडलेले

ओबामाचे भाषण नक्कीच आवडले, निवडणूकीतल्या भाषणांपेक्षाही अधीक. ते वक्ता दशसहस्तेशू मधे नक्कीच मोडतात. शपथविधीनंतरचे लगेचचे (इनॉगरल) पहीले भाषण (कॅपिटॉल हील वरील) मी त्याच वेळेस पहात होतो. त्याच वेळेस (भाषण चालू असताना) त्या भाषणाची प्रत वॉलस्ट्रीटने छापली ती पण एकीकडे पहात होतो. एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजेम् ते साधा स्वल्पविराम पण चुकत नव्हते (अगदी टेलीप्राँप्ट्रर होता हे समजले तरी, ते जरा जास्तच तयारी ने आलेले दिसले).

ग्वांटानामो बे बंद केला.
अजून केलेला नाही. एक वर्षाने होईल असे सांगितले. त्याला कायदेशीर कारणे आहेत पण ते जेंव्हा होईल तेंव्हा खरे.

बाकी बरेच चांगले बोलले असले तरी त्यांची आवडलेली कृती म्हणजे, http://www.recovery.gov/ हे संकेतस्थळ जेथे स्टिम्युलस पॅकेजमधे खर्च होणार्‍या पैं पैचा हिशेब लिहीला गेला आहे आणि जसे घडत आहे तसा तात्काळ लिहीला जात आहे. त्यातून चोर्‍या करणारे करतीलच पण काही अंशी "अकांटेबिलीटी" येईल असे वाटले.

त्यांचा भर हा पारदर्शकतेवर आहे आणि तसे खरेच केले तर त्याचे चांगले परीणाम शकतील...

वक्तृत्व

सहमत आहे. ओबामांचे वक्तृत्व हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. फारच क्वचित अडखळणे, स्पष्ट शब्दांमध्ये फाफटपसारा न मांडता नेमके मुद्दे मांडणे आणि नुसती तथ्ये न मांडता मधून-मधून माणुसकीची झलक दाखवणे अशी अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. ज्यांना सभेत कसे बोलावे यावर टिप्स हव्या असतील त्यांनी ओबामांची भाषणे जरूर पहावीत.
आणि काय करू नये यासाठी मा. बुशरावजीचंद्रसाहेब यांची भाषणे पहावीत. :)

---
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

आणखी एक..

युद्धभुमीवरुन येणार्‍या शवपेट्यांच्या प्रसिद्धीवरील बंदी उठवली.

---
इराक युद्ध संपवणार ही घोषणा मात्र मोघमच आहे. २०१० मध्ये युद्ध संपवणार असले तरी सगळे सैन्य घरी येणार नाही. इराकी सरकारला मदत, त्यांच्या सैन्याला प्रशिक्षण, अतिरेक्यांशी मुकाबला अश्या कामांसाठी सैन्य तिथेच राहणार आहे. थोडक्यात हा शब्दछल आहे कारण तसेही पारंपारिक युद्ध कधीच संपले आहे.

स्पष्टवक्ता

कठीण परिस्थितीमध्येही स्पष्टवक्ता, आशावादी आणि मूल्यांना न विसरणारा नेता पाहून बरे वाटले.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

आणखी एक चित्रफित

रोज ओबामांची नवीन चित्रफित देणे मलाही योग्य वाटत नाही, पण आत्तापर्यंत अमेरिकेचे जितके अध्यक्ष पाहिले त्यात असे वर्तन एकदाही दिसले नाही. आणि कदाचित आधीच्या दुधाने इतके भाजले आहे की आत्ताचे कोमट ताकही थंडगार वाटते आहे. याचा अर्थ लावण्याकरता आधी हे चित्र पहा आणि मग ते.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

ओबामांची एक चित्रफीत ;)

फारच आवडली. :p


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पसंद

पसंद अपनी अपनी ;)

----

 
^ वर